माझ्या प्रिय देशबांधवांनो,
नमस्कार!
गेल्या आठवड्यात आपण एक असे यश संपादन केलं आहे, ज्याचा आपल्या सर्वांनाच अभिमान वाटेल. आपण ऐकले असेल, की भारतानं गेल्या आठवड्यात, 400 अब्ज डॉलर्स म्हणजे 30 लाख कोटी रुपयांच्या निर्यातीचे लक्ष्य साध्य केलं. पहिल्यांदा हे ऐकल्यावर असं वाटेल की ही तर अर्थव्यवस्थेशी संबंधित गोष्ट आहे. मात्र, ही अर्थव्यवस्थेपेक्षाही, भारताचे सामर्थ्य, भारताच्या क्षमतेशी संबंधित बाब आहे.एक काळ असा होता, जेव्हा भारतातून होणाऱ्या निर्यातीचा आकडा देखील 100 अब्ज, कधी 200 अब्ज इतका राहत असे. मात्र, आज भारताची निर्यात, 400 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. याचा एक अर्थ असा आहे, की जगभरात, भारतात तयार होत असलेल्या उत्पादनांची मागणी वाढते आहे. आणि दूसरा अर्थ असा आहे की भारताची पुरवठा साखळी व्यवस्था देखील दिवसेंदिवस मजबूत होत चालली आहे. यातून एक खूप मोठा संदेशही आपल्याला मिळाला आहे,तो असा, की देशाच्या स्वप्नांपेक्षाही जेव्हा देशाचे संकल्प मोठे असतात, तेव्हाच देश विराट पावले उचलू शकतो. जेव्हा संकल्पपूर्ती करण्यासाठी अहोरात्र प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातात, तेव्हाच ते संकल्प खरे होतात, आणि आपण बघा, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात देखील, असेच घडते, नाही का? जेव्हा कोणाचेही संकल्प, त्यांचे प्रयत्न, त्यांच्या स्वप्नांपेक्षाही मोठे होतात, तेव्हा यश स्वतःच त्यांच्याकडे चालत येते.
मित्रांनो,
देशाच्या कानाकोपऱ्यातून नवी नवी उत्पादने परदेशात जात आहेत, आसामच्या हैलाकांडीची चामड्याची उत्पादने असोत की उस्मानाबादची हातमाग उत्पादने,बीजापूरची फळे – भाज्या असोत की चंदौलीचा काळा तांदूळ, सर्वांची निर्यात वाढत आहे. आता आपल्याला लदाखचे जगप्रसिद्ध जर्दाळू दुबईत देखील मिळतील आणि सौदी अरबमध्ये तामिळनाडू मधून पाठवली गेलेली केळी मिळतील. आता सर्वात मोठी गोष्ट ही आहे की, नवी नवी उत्पादने नव्या नव्या देशांत पाठवली जात आहेत. उदाहरणार्थ हिमाचल, उत्तराखंडमध्ये पिकवलेल्या भरड धान्याची पहिली खेप डेन्मार्कला निर्यात करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशच्या कृष्णा आणि चित्तूर जिल्ह्यातले बेगमपल्ली आणि सुवर्णरेखा आंबे दक्षिण कोरियाला निर्यात करण्यात आले आहेत. त्रिपुरातून ताजे फणस, हवाई मार्गाने लंडनला निर्यात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे भालीया गव्हाची पहिली खेप गुजरातमधून केनिया आणि श्रीलंकेला निर्यात करण्यात आली. म्हणजे, आता तुम्ही दुसऱ्या देशांत जाल, तर मेड इन इंडिया उत्पादने पूर्वीपेक्षा जास्त बघायला मिळतील.
मित्रांनो,
ही यादी खूप मोठी आहे आणि जितकी मोठी ही यादी आहे, तितकीच मोठी ‘मेक इन इंडियाची’ शक्ती आहे, तितकंच विराट भारताचं सामर्थ्य आहे, आणि या सामर्थ्याचा आधार आहे – आपले शेतकरी, आपले कारागीर, आपले विणकर, आपले अभियंते, आपले लघु उद्योजक, आपलं एमएसएमई क्षेत्र, वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक लोक, हे सगळे याची खरी ताकद आहेत. यांच्या मेहनतीमुळेच 400 अब्ज डॉलरच्या निर्यातीचे लक्ष्य गाठू शकलो आहोत आणि मला आनंद आहे की भारताच्या लोकांचे हे सामर्थ्य आता जगाच्या कानाकोपऱ्यात, नव्या बाजारपेठांत पोहोचत आहे. जेव्हा एक – एक भारतीय, लोकल करता व्होकल होतो, म्हणजे स्थानिक उत्पादनांचा जगभर प्रचार करतो, तेव्हा लोकलला ग्लोबल व्हायला वेळ लागत नाही. चला, लोकलला ग्लोबल बनवूया आणि आपल्या उत्पादनांची प्रतिष्ठा आणखी वाढवूया.
मित्रांनो,
‘मन की बात’ च्या माध्यमातून श्रोत्यांना हे ऐकून आनंद वाटेल की देशांतर्गत पातळीवर देखील आपल्या लघुउद्योजकांचे यश आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरलेआहे. आज आपले लघुउद्योजक सरकारी खरेदीत Government e-Marketplace म्हणजेच GeMच्या माध्यमातून मोठी भागीदारी पार पाडत आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पारदर्शक व्यवस्था उभी करण्यात आली आहे. गेल्या एक वर्षात GeM पोर्टलच्या माध्यमातून सरकारने एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्तच्या वस्तू खरेदी केल्या आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून जवळ जवळ सव्वालाख लघुउत्पादकांनी, छोट्या दुकानदारांनी आपले सामान थेट सरकारला विकले आहे. एक काळ होता जेव्हा मोठ्या कंपन्याच सरकारला सामान विकू शकत असत. मात्र, आता देश बदलतो आहे, जुन्या व्यवस्था देखील बदलत आहेत. आता छोट्यातला छोटा दुकानदार देखील GeMपोर्टलवर सरकारला आपले समान विकू शकतो – हाच तर नवा भारत आहे. हा केवळ मोठी स्वप्नंच बघत नाही, तर ते लक्ष्य गाठण्याची हिंमत देखील दाखवतो, जिथे पूर्वी कोणीच पोचलं नव्हतं. याच साहसाच्या जोरावर आपण सर्व भारतीय मिळून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न देखील नक्की पूर्ण करू.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
नुकत्याच पार पडलेल्या पद्म सन्मान सोहळ्यात आपण बाबा शिवानंद जी यांना नक्की बघितले असेल. 126 वर्षाच्या वृद्धाची चपळता बघून माझ्या प्रमाणेच प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला असेल आणि मी बघितलं, डोळ्याची पापणी लावते न लावते तोच, ते नंदी मुद्रेत प्रणाम करू लागले. मी देखील बाबा शिवानंद जी यांना पुन्हा पुन्हा वाकून नमस्कार केला. 126 व्या वर्षी बाबा शिवानंद यांचे वय आणि सुदृढ प्रकृती दोन्ही, आज देशात चर्चेचा विषय आहे. मी समाज माध्यमांवर अनेक लोकांची प्रतिक्रिया बघितली, की बाबा शिवानंद, आपल्या वयाच्या चार पट कमी वयाच्या लोकांपेक्षाही सुदृढ आहेत. खरोखरच, बाबा शिवानंद याचं जीवन आपल्या सर्वांना प्रेरणा देणारं आहे. मी त्यांच्या दीर्घायुष्याची कामना करतो. त्यांच्यात योगाविषयी एक जिद्द आहे त्यांची जीवनशैली अतिशय सुदृढ आहे.
जीवेत शरदः शतम्.
आपल्या संस्कृतीत सर्वांना शंभर वर्ष निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. आपण 7 एप्रिलला ‘जागतिक आरोग्य दिन’ साजरा करणार आहोत. आज संपूर्ण जगात आरोग्याविषयी भारतीय चिंतन, मग ते योग असो की आयुर्वेद, याकडे ओढा वाढतो आहे. आत्ता आपण बघितले असेल की गेल्या आठवड्यात कतरमध्ये एक योग कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. यात 114 देशांच्या नागरिकांनी भाग घेऊन एक नवा जागतिक विक्रम बनवला. याचप्रमाणे आयुष उद्योगाची बाजारपेठ देखील सातत्याने वाढते आहेत. 6 वर्षांपूर्वी आयुर्वेदाशी संबंधित औषधांची बाजारपेठ जवळपास 22 हजार कोटी रुपये इतकी होती. आज आयुष उत्पादन उद्योग, एक लाख चाळीस हजार कोटी रुपयांच्या जवळपास पोचला आहे, म्हणजे या क्षेत्रात संधी सातत्याने वाढत आहेत. स्टार्टअप जगातही आयुष, आकर्षणाचा विषय बनत आहे.
मित्रांनो,
आरोग्य क्षेत्राच्या इतर स्टार्टअप्स विषयी तर मी आधीही अनेक वेळा बोललो आहे, मात्र या वेळी आयुष स्टार्टअप्स वर खास करून बोलणार आहे. एक स्टार्टअप आहे कपिवा (Kapiva!). याच्या नावातच याचा अर्थ लपलेला आहे. यात Ka चा अर्थ आहे – कफ, Pi चा अर्थ आहे – पित्त आणि Vaचा अर्थ आहे वात. ही स्टार्टअप कंपनी, आपल्या परंपरेनुसार उत्तम पोषक आहाराच्या सवयीवर आधारित आहे. आणखी एक स्टार्ट अप निरोग-स्ट्रीट देखील आहे, आयुर्वेद आरोग्यसेवा व्यवस्थेत एक नाविन्यपूर्णकल्पना आहे. याचे तंत्रज्ञान-आधारितव्यासपीठ, जगभरातील आयुर्वेदिक डॉक्टरांना थेट लोकांशी जोडून देतो. 50 हजार पेक्षा जास्त आयुर्वेदाचार्य याच्याशी जोडले गेले आहेत. याचप्रमाणे, ‘आत्रेय इनोव्हेशन्स,’एक आरोग्यसेवा तंत्रज्ञान स्टार्टअप आहे, जे सर्वंकष निरामयता या क्षेत्रात काम करत आहे. Ixoreal (इक्सोरियल) ने केवळ अश्वगंधाच्या उपयोगाविषयीच जागरूकता पसरविली नाही, तर उच्च दर्जा उत्पादन प्रक्रियेवर देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. क्युरवेदा (Cureveda) ने वनौषधींच्या आधुनिक शोध आणि पारंपारिक ज्ञानाच्या संयोगातून सर्वंकष जीवनासाठी पोषक आहार तयार केला आहे.
मित्रांनो,
आता तर मी थोडीशीच नावं घेतली आहेत, ही यादी खूप मोठी आहे. हे भारताचे तरुण उद्योगपती आणि भारतात तयार होत असलेल्या संधींची काही प्रतीकात्मक उदाहरणे आहेत. मी आरोग्य क्षेत्रातल्या स्टार्टअप्स आणि विशेषतः आयुष स्टार्टअप्सना एक आग्रहाची विनंती देखील केली आहे. आपण कुठलेही ऑनलाईन संकेतस्थळ तयार करता, जी काही माहिती तयार करता, ती संयुक्त राष्ट्राने मान्यता दिलेल्या सर्व भाषांमध्ये देखील बनवण्याचा प्रयत्न करा. जगात असे अनेक देश आहेत जिथे इंग्रजी भाषा फारशी बोलली जात नाही आणि समजतही नाही. अशा देशांचा विचार करुन, आपल्या माहितीचा प्रचार – प्रसार करा. मला खात्री आहे, लवकरच भारताचे आयुष स्टार्टअप्स उत्कृष्ट गुणवत्तेच्या उत्पादनांनी जगावर आपली छाप पाडतील.
मित्रांनो,
आरोग्याचा थेट संबंध स्वच्छतेशी देखील आहे. ‘मन की बात’ मध्ये आपण नेहमी स्वच्छाग्रहींच्या प्रयत्नांविषयी नेहमीच बोलतो. असेच एक स्वछाग्रही आहेत चंद्रकिशोर पाटील. हे महाराष्ट्रात नाशिक इथे राहतात. चंद्रकिशोरजी यांनी स्वच्छतेचा फार मोठा संकल्प सोडला आहे. ते गोदावरी नदीजवळ उभे राहतात, आणि लोकांना नदीत घाण, कचरा न टाकण्याची विनंती करत असतात. जर कुणी असं करताना दिसला तर ते लगेच जाऊन त्याला थांबवतात. या कामात चंद्रकिशोर जी आपला खूप वेळ खर्च करतात. संध्याकाळ पर्यंत त्यांच्याकडे अशा गोष्टींचा ढीग जमा होतो, ज्या लोक नदीत फेकायला घेऊन आलेले असतात. चंद्रकिशोरजी यांचे हे प्रयत्न, जनजागृती देखील करतात आणि प्रेरणा देखील देतात. याच प्रमाणे आणखी एक स्वछाग्रही आहेत – ओडिशातील पुरीचे राहुल महाराणा. राहुल दर रविवारी सकाळी सकाळी पुरीच्या तीर्थस्थळांजवळ जातात, आणि तिथे प्लास्टिकचा कचरा साफ करतात. त्यांनी आतापर्यंत शेकडो किलो प्लास्टिक कचरा आणि घाण साफ केली आहे. पुरीचे राहुल असोत किंवा नाशिकचे चंद्रकिशोर, हे आपल्याला फार मोठी शिकवण देतात. नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य पार पडले पाहिजे, स्वच्छता असो, पोषण असो, किंवा मग लसीकरण, या सगळ्या प्रयत्नांनी देखील निरोगी राहायला मदत होते.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
चला आता आपण बोलूया, केरळच्या के मुपट्टम श्री नारायणन यांच्याविषयी, त्यांनी एक अभियान सुरु केलं आहे, ज्याचं नाव आहे, ‘‘Pots for water of life’- (म्हणजे जीवन देणाऱ्या जलासाठीची भांडी). तुम्हाला जेव्हा या प्रकल्पाबद्दल कळेल, तेव्हा तुम्ही पण विचार कराल, की काय जोरदार काम आहे !
मित्रांनो,
मुपट्टम श्री नारायणन जी, उन्हाळ्यात, पशु-पक्ष्यांना तहान लागू नये, पाणी मिळावे यासाठी मातीची भांडी वाटण्याची मोहीम चालवतात. उन्हाळ्याच्या दिवसांत पशु-पक्ष्यांना होणारा त्रास बघून तेही कासावीस होत असत. मग यावर उपाय म्हणून त्यांनी विचार केला की आपणच लोकांना मातीची भांडी पुरवली तर मग, लोकांना फक्त त्यात पाणी भरुन पशू-पक्ष्यांसाठी ठेवता येईल. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल मित्रांनो, की नारायणन जी यांनी वाटप केलेल्या भांड्यांची संख्या आता एक लाखांपेक्षा अधिक होणार आहे. आपल्या या अभियानातलं एक लाखावं भांडं ते महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या साबरमती आश्रमात दान करणार आहेत. आता जेव्हा उन्हाळ्याची चाहूल लागली आहे, अशावेळी नारायणन जी यांचे हे काम सर्वांना नक्कीच प्रेरणा देईल आणि आपणही या उन्हाळयात, आपल्या पशु-पक्षी मित्रांसाठी, पाण्याची व्यवस्था कराल.
मित्रहो,
‘मन की बात’च्या श्रोत्यांना माझा आग्रह आहे की, आपण सर्वांनी जलबचतीच्या संकल्पाचा पुनरूच्चार करावा. पाण्याचा अगदी थेंब न थेंब वाचविण्यासाठी आपण जे जे काही करू शकतो, ते ते जरूर केले पाहिजे. याशिवाय पाण्याच्या पुनर्वापरावरही आपण तितकाच जोर देत राहिले पाहिजे. घरामध्ये काही कामांसाठी वापरण्यात येणारे पाणी, घरातल्या कुंड्यांना घालता येऊ शकत असेल, बगिचाला देता येऊ शकत असेल तर ते जरूर पुन्हा वापरले पाहिजे. अगदी थोडक्या प्रयत्नांमधून तुम्ही आपल्या घरामध्ये अशी व्यवस्था तयार करू शकता. रहीमदास जी, युगांपूर्वी काहीतरी विशिष्ट हेतूनं असं म्हणून गेले आहेत की, ‘‘रहिमन पानी राखिए, बिन पानी सब सून’’ आणि पाणी वाचविण्याच्या या कामामध्ये मला मुलांकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. ज्याप्रमाणे स्वच्छतेला आमच्या मुलांनीच आंदोलन बनवले, त्याचप्रमाणे ही मुले आता ‘जल योद्धा’ बनून, पाणी वाचविण्यासाठी मदत करू शकतात.
मित्रांनो,
आपल्या देशामध्ये जल संरक्षण, जल स्त्रोतांचे रक्षण, अनेक युगांपासून समाजाच्या स्वभावाचा एक भाग आहे. मला आनंद होतो की, देशामध्ये अनेक लोकांनी जल संवर्धनाचे कार्य आपल्या जीवनाचे ‘मिशन’च बनविले आहे. जसे की, चेन्नईचे एक सहाकारी आहेत- अरूण कृष्णमूर्ती जी! अरूण जी यांनी आपल्या भागातल्या तलाव -तळ्यांची साफ-सफाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी 150 पेक्षा जास्त तलाव -तळ्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी उचलली आणि ती यशस्वीपणे पूर्णही केली. याच प्रमाणे महाराष्ट्रातले रोहन काळे नावाचे एक कार्यकर्ते आहेत. रोहन व्यवसायाने ‘ एच.आर.’ विभागात आहेत. त्यांनी महाराष्ट्रातल्या पाय-यांच्या शेकडो विहिरींचे संरक्षण करण्याची मोहीम सुरू केली आहे. यामध्ये अनेक विहिरी तर शेकडो वर्षे जुन्या, प्राचीन आहेत. अशा विहिरी जणू आपल्या वारशाच्या भाग आहेत. सिकंदराबादमध्ये बन्सीलालपेट इथे विहीर अशी एक पाय-यांची विहीर आहे, तिच्याकडे गेली अनेक वर्षे कुणाचं लक्ष नव्हतं, या उपेक्षेमुळे ही पाय-यांची विहीर माती आणि कच-यानं झाकून गेली होती. मात्र आता इथं या पाय-यांच्या विहिरीचे पुनरूज्जीवन करण्याची मोहीम लोकांच्या सहभागातून सुरू केली आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
ज्या भागात पाण्याची सदोदित टंचाई असते, अशा राज्यातून मी आलो आहे. गुजरातमध्ये अशा पाय-यांच्या विहिरींना ‘वाव’ असे म्हणतात. गुजरातसारख्या राज्यामध्ये वाव खूप मोठी भूमिका पार पाडते. या विहिरी किंवा आडांच्या संरक्षणासाठी ‘जल मंदिर योजने’नं खूप महत्वाची भूमिका निभावली आहे. संपूर्ण गुजरातमधल्या अनेक विहिरींना, आडांना पुनर्जीवित करण्यात आले. यामुळे त्या त्या भागामध्ये जलस्तर वाढण्यासाठी चांगली मदत मिळाली. असेच अभियान तुम्हीही स्थानिक पातळीवर चालवू शकता. ‘चेक डॅम’ बनविण्याचं काम असो, रेन हारवेस्टिंग म्हणजेच पावसाचं पाणी जमिनी मुरवून पावसाच्या पाण्याची ‘शेती’ करायचं काम असो, यामध्ये वैयक्तिक पातळीवर केलेले प्रयत्नही महत्वाचे आहेत आणि संयुक्तपणे प्रयत्न करणेही गरजे आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपल्या देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी 75 अमृत सरोवर बनवता येवू शकतील. काही जुन्या सरोवरांमध्ये सुधारणा केली जावू शकते. तसेच काही नवीन सरोवर बनविता येवू शकतील. या दिशेने आपण सगळेजण काही ना काही प्रयत्न जरूर कराल, असा मला विश्वास आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
‘मन की बात’ची एक अतिशय चांगली गोष्ट म्हणजे, आपल्याकडून मला अनेक भाषांमधून, अनेक बोलीं भाषांमधून संदेश येत असतात. काही लोक मायगव्हवर ‘ऑडिओ मेसेज’ ही पाठवत असतात. भारताची संस्कृती, आपल्या अनेक भाषा, आपल्या बोलीभाषा, आपले राहणे, वेशभूषा, खाण्याच्या -जेवणाच्या पद्धती यांचा विस्तार, अशा सर्व प्रकारची विविधता म्हणजे आपली एक प्रकारे खूप मोठी ताकद आहे. पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून ते दक्षिणे पर्यंत भारताची हीच विविधता, सर्वांना एकत्रित बांधून ठेवते. ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’बनवत आहे. यामध्येही आपली ऐतिहासिक स्थाने आणि पौराणिक कथा, अशा दोन्हींचे खूप मोठे योगदान आहे. आपण सर्वजण विचार करीत असणार की, या सर्व गोष्टी, मी आपल्यासमोर का मांडतोय? याचे कारण आहे, ‘माधवपूर जत्रा’ माधवपूरची जत्रा कुठे भरते, का भरते? वैविध्यपूर्णतेने नटलेली ही माधवपूर जत्रा भारताच्या विविधतेशी कशी जोडली गेली आहे, या जत्रेच्या आयोजनामागचे कारण जाणून घेणे ‘मन की बात’ च्या श्रोत्यांच्यादृष्टीने अतिशय रंजक ठरणार आहे.
मित्रांनो,
‘‘माधवपुर मेला’’ गुजरातमध्ये पोरबंदर इथं समुद्र किनारी वसलेल्या माधवपूर गावात भरतो. मात्र याचं नातं हिदुंस्तानच्या पूर्व किना-याशी जोडलं जातं . आता आपण विचार करीत असणार हे कसं शक्य आहे? तर याचंही उत्तर एका पौराणिक कथेमध्येच मिळतं. असं म्हणतात की, हजारों वर्षांपूर्वी श्री कृष्ण यांचा विवाह, ईशान्येकडील राजकुमारी रूक्मिणीबरोबर झाला होता. हा विवाह पोरबंदरच्या माधवपूरमध्ये साजरा झाला होता. आणि त्या विवाहाचे प्रतीक म्हणून आजही तिथे माधवपूर तिथं जत्रा भरविण्यात येते. पूर्व आणि पश्चिम यांचं घट्ट बनलेलं नातं म्हणजे, आपला संस्कृती वारसा आहे. काळाच्या बरोबर आता लोकांच्या प्रयत्नातून माधवपूर जत्रेमध्ये अनेक नवनवीन गोष्टी जोडल्या जात आहेत. आपल्याकडे वधुपक्षाला ‘घराती’ असे म्हणतात, आणि या जत्रेमध्ये आता ईशान्येकडून अनेक ‘घराती’ही येत आहेत. एक आठवडाभर चालणा-या या माधवपूर जत्रेमध्ये ईशान्येकडील सर्व राज्यांतून कलाकार येत आहेत. हस्तशिल्पी, हस्तकलाकार येत आहेत आणि ही मंडळी या मेळाव्यात अधिक बहार आणतात. एक आठवडाभर भारतातल्या पूर्व आणि पश्चिमेकडील संस्कृतींचा होणारा हा मेळ, म्हणजे माधवपूर जत्रा आहे आणि तो ‘एक भारत- श्रेष्ठ भारत’चे सुंदर उदाहरण बनत आहे. तुम्हीही या मेळाव्याची, जत्रेची माहिती वाचून, जाणून घ्यावी, असा माझा तुम्हा सर्वांना आग्रह आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे आता लोक सहभागाचे एक नवीन आदर्श उदाहरण बनले आहे. काही दिवसांपूर्वी 23 मार्चला हुतात्मा दिनी देशाच्या कानाकोप-यामध्ये अनेक कार्यक्रम झाले. देशानं आपल्या स्वातंत्र्यामधल्या नायक-नायिकांचं स्मरण केलं, श्रद्धापूर्वक स्मरण केलं. याच दिवशी मला कोलकाताच्या व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये बिप्लाबी भारत दालनाचं लोकार्पण करण्याची संधी मिळाली. भारताच्या वीर क्रांतिकारकांना श्रद्धांजली देण्यासाठी हे एक अतिशय अव्दितीय, अद्भूत दालन आहे. जर संधी मिळाली तर, तुम्ही हे दालन पाहण्यासाठी जरूर जावे.
मित्रांनो,
एप्रिल महिन्यामध्ये आपण दोन महान विभूतींची जयंती साजरी करणार आहोत. या दोघांनीही भारतीय समाजावर आपला अमिट ठसा उमटवला आहे. या महान विभूती आहेत - महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर! महात्मा फुले यांची जयंती 11 एप्रिल रोजी आहे आणि बाबासाहेबांची जयंती आपण 14 एप्रिलला साजरा करणार आहोत. या दोन्ही महापुरूषांनी भेदभाव, असमानता यांच्या विरोधात खूप मोठा लढा दिला. महात्मा फुले यांनी त्या काळामध्ये मुलींसाठी शाळा सुरू केल्या. बालिका हत्येच्याविरोधात आवाज उठवला. जल संकटातून मुक्ती मिळावी, यासाठीही त्यांनी मोठं अभियान चालविलं.
मित्रांनो,
महात्मा फुले यांच्याविषयी बोलताना सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख करणं, तितकंच जरूरीचं आहे. सावित्रीबाई फुले यांनी अनेक सामाजिक संस्था स्थापन करण्यामध्ये मोठी भूमिका पार पाडली. एक शिक्षिका आणि एक समाज सुधारक या रूपानं त्यांनी समाजाला जागरूकही केलं आणि सर्वांना प्रोत्साहनही दिले. दोघांनी मिळून सत्यशोधक समाजाची स्थापना केली. लोकांच्या सशक्तीकरणाचे प्रयत्न केले. आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामध्येही महात्मा फुले यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. ते म्हणायचे की, कोणत्याही समाजाच्या विकासाचे आकलन त्या समाजातल्या महिलांची स्थिती पाहून करता येते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेवून, सर्व माता-पिता आणि पालकांना सांगू इच्छितो की, त्यांनी आपल्या मुलींना जरूर शिकवावे. मुलींनी जास्तीत जास्त संख्येने शाळेत यावे म्हणून काही दिवसांपूर्वीच कन्या शिक्षण प्रवेश उत्सवही सुरू केला आहे. ज्या मुलींचे शिक्षण काही कारणामुळे थांबलं असेल, राहिलं असेल तर त्यांना पुन्हा एकदा शाळेत आणण्यावर भर दिला जात आहे.
मित्रांनो,
बाबासाहेब यांच्याशी संबंधित पंचतीर्थाचं कार्य करण्याची आपल्याला संधी मिळाली, ही आपल्या सर्वांसाठी सौभाग्याची गोष्ट आहे. त्यांचे जन्मस्थान -महू असो, मुंबईची चैत्यभूमी असो, अथवा दिल्ली मध्ये बाबासाहेबांच्या महा-परिनिर्वाणाचे स्थान, मला या सर्व स्थानांवर, सर्व तीर्थांवर जाण्याचं भाग्य लाभलं. ‘मन की बात’ च्या श्रोत्यांना मी आग्रह करतो की, त्यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित असलेल्या सर्व स्थानांचे दर्शन जरूर करावं. त्यामधून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
‘मन की बात’मध्ये यावेळीही आपण अनेक विषयांवर चर्चा केली. पुढच्या महिन्यामध्ये अनेक सण-उत्सव येत आहेत. काही दिवसांनीच नवरात्र येत आहे. नवरात्रामध्ये आपण व्रत-उपवास, शक्तीची साधना करतो. शक्तीची पूजा करतो, याचाच अर्थ आपल्या परंपरा आपल्याला सणांचे उत्सवी स्वरूपही शिकवतात आणि संयम कसा बाळगायचा हेही शिकवतात. संयम आणि तप सुद्धा आपल्यासाठी एक पर्व आहे. म्हणूनच नवरात्राचे आपल्या सर्वांसाठी एक विशेष महत्व असते. नवरात्राच्या पहिल्या दिवशी गुढी पाडव्याचा सणही आहे. एप्रिलमध्ये ईस्टरही येतो आणि रमजानचा पवित्र महिनाही या दिवशी सुरू होत आहे. आपण सर्वांना बरोबर घेवून हे सर्व सण साजरे करावेत, भारताच्या विविधतेला सशक्त बनवावे, अशीच सर्वांची इच्छा आहे. यावेळी ‘मन की बात’ मध्ये इतकंच! पुढच्या महिन्यात तुमची पुन्हा एकदा भेट घेवून नवीन विषयांवर तुमच्याबरोबर संवाद साधला जाईल, खूप-खूप धन्यवाद!!
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
नमस्कार!
गेल्या आठवड्यात आपण एक असे यश संपादन केलं आहे, ज्याचा आपल्या सर्वांनाच अभिमान वाटेल. आपण ऐकले असेल, की भारतानं गेल्या आठवड्यात, 400 अब्ज डॉलर्स म्हणजे 30 लाख कोटी रुपयांच्या निर्यातीचे लक्ष्य साध्य केलं. पहिल्यांदा हे ऐकल्यावर असं वाटेल की ही तर अर्थव्यवस्थेशी संबंधित गोष्ट आहे. मात्र, ही अर्थव्यवस्थेपेक्षाही, भारताचे सामर्थ्य, भारताच्या क्षमतेशी संबंधित बाब आहे.एक काळ असा होता, जेव्हा भारतातून होणाऱ्या निर्यातीचा आकडा देखील 100 अब्ज, कधी 200 अब्ज इतका राहत असे. मात्र, आज भारताची निर्यात, 400 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. याचा एक अर्थ असा आहे, की जगभरात, भारतात तयार होत असलेल्या उत्पादनांची मागणी वाढते आहे. आणि दूसरा अर्थ असा आहे की भारताची पुरवठा साखळी व्यवस्था देखील दिवसेंदिवस मजबूत होत चालली आहे. यातून एक खूप मोठा संदेशही आपल्याला मिळाला आहे,तो असा, की देशाच्या स्वप्नांपेक्षाही जेव्हा देशाचे संकल्प मोठे असतात, तेव्हाच देश विराट पावले उचलू शकतो. जेव्हा संकल्पपूर्ती करण्यासाठी अहोरात्र प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातात, तेव्हाच ते संकल्प खरे होतात, आणि आपण बघा, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात देखील, असेच घडते, नाही का? जेव्हा कोणाचेही संकल्प, त्यांचे प्रयत्न, त्यांच्या स्वप्नांपेक्षाही मोठे होतात, तेव्हा यश स्वतःच त्यांच्याकडे चालत येते.
मित्रांनो,
देशाच्या कानाकोपऱ्यातून नवी नवी उत्पादने परदेशात जात आहेत, आसामच्या हैलाकांडीची चामड्याची उत्पादने असोत की उस्मानाबादची हातमाग उत्पादने,बीजापूरची फळे – भाज्या असोत की चंदौलीचा काळा तांदूळ, सर्वांची निर्यात वाढत आहे. आता आपल्याला लदाखचे जगप्रसिद्ध जर्दाळू दुबईत देखील मिळतील आणि सौदी अरबमध्ये तामिळनाडू मधून पाठवली गेलेली केळी मिळतील. आता सर्वात मोठी गोष्ट ही आहे की, नवी नवी उत्पादने नव्या नव्या देशांत पाठवली जात आहेत. उदाहरणार्थ हिमाचल, उत्तराखंडमध्ये पिकवलेल्या भरड धान्याची पहिली खेप डेन्मार्कला निर्यात करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशच्या कृष्णा आणि चित्तूर जिल्ह्यातले बेगमपल्ली आणि सुवर्णरेखा आंबे दक्षिण कोरियाला निर्यात करण्यात आले आहेत. त्रिपुरातून ताजे फणस, हवाई मार्गाने लंडनला निर्यात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे भालीया गव्हाची पहिली खेप गुजरातमधून केनिया आणि श्रीलंकेला निर्यात करण्यात आली. म्हणजे, आता तुम्ही दुसऱ्या देशांत जाल, तर मेड इन इंडिया उत्पादने पूर्वीपेक्षा जास्त बघायला मिळतील.
मित्रांनो,
ही यादी खूप मोठी आहे आणि जितकी मोठी ही यादी आहे, तितकीच मोठी ‘मेक इन इंडियाची’ शक्ती आहे, तितकंच विराट भारताचं सामर्थ्य आहे, आणि या सामर्थ्याचा आधार आहे – आपले शेतकरी, आपले कारागीर, आपले विणकर, आपले अभियंते, आपले लघु उद्योजक, आपलं एमएसएमई क्षेत्र, वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक लोक, हे सगळे याची खरी ताकद आहेत. यांच्या मेहनतीमुळेच 400 अब्ज डॉलरच्या निर्यातीचे लक्ष्य गाठू शकलो आहोत आणि मला आनंद आहे की भारताच्या लोकांचे हे सामर्थ्य आता जगाच्या कानाकोपऱ्यात, नव्या बाजारपेठांत पोहोचत आहे. जेव्हा एक – एक भारतीय, लोकल करता व्होकल होतो, म्हणजे स्थानिक उत्पादनांचा जगभर प्रचार करतो, तेव्हा लोकलला ग्लोबल व्हायला वेळ लागत नाही. चला, लोकलला ग्लोबल बनवूया आणि आपल्या उत्पादनांची प्रतिष्ठा आणखी वाढवूया.
मित्रांनो,
‘मन की बात’ च्या माध्यमातून श्रोत्यांना हे ऐकून आनंद वाटेल की देशांतर्गत पातळीवर देखील आपल्या लघुउद्योजकांचे यश आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरलेआहे. आज आपले लघुउद्योजक सरकारी खरेदीत Government e-Marketplace म्हणजेच GeMच्या माध्यमातून मोठी भागीदारी पार पाडत आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पारदर्शक व्यवस्था उभी करण्यात आली आहे. गेल्या एक वर्षात GeM पोर्टलच्या माध्यमातून सरकारने एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्तच्या वस्तू खरेदी केल्या आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून जवळ जवळ सव्वालाख लघुउत्पादकांनी, छोट्या दुकानदारांनी आपले सामान थेट सरकारला विकले आहे. एक काळ होता जेव्हा मोठ्या कंपन्याच सरकारला सामान विकू शकत असत. मात्र, आता देश बदलतो आहे, जुन्या व्यवस्था देखील बदलत आहेत. आता छोट्यातला छोटा दुकानदार देखील GeMपोर्टलवर सरकारला आपले समान विकू शकतो – हाच तर नवा भारत आहे. हा केवळ मोठी स्वप्नंच बघत नाही, तर ते लक्ष्य गाठण्याची हिंमत देखील दाखवतो, जिथे पूर्वी कोणीच पोचलं नव्हतं. याच साहसाच्या जोरावर आपण सर्व भारतीय मिळून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न देखील नक्की पूर्ण करू.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
नुकत्याच पार पडलेल्या पद्म सन्मान सोहळ्यात आपण बाबा शिवानंद जी यांना नक्की बघितले असेल. 126 वर्षाच्या वृद्धाची चपळता बघून माझ्या प्रमाणेच प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला असेल आणि मी बघितलं, डोळ्याची पापणी लावते न लावते तोच, ते नंदी मुद्रेत प्रणाम करू लागले. मी देखील बाबा शिवानंद जी यांना पुन्हा पुन्हा वाकून नमस्कार केला. 126 व्या वर्षी बाबा शिवानंद यांचे वय आणि सुदृढ प्रकृती दोन्ही, आज देशात चर्चेचा विषय आहे. मी समाज माध्यमांवर अनेक लोकांची प्रतिक्रिया बघितली, की बाबा शिवानंद, आपल्या वयाच्या चार पट कमी वयाच्या लोकांपेक्षाही सुदृढ आहेत. खरोखरच, बाबा शिवानंद याचं जीवन आपल्या सर्वांना प्रेरणा देणारं आहे. मी त्यांच्या दीर्घायुष्याची कामना करतो. त्यांच्यात योगाविषयी एक जिद्द आहे त्यांची जीवनशैली अतिशय सुदृढ आहे.
जीवेत शरदः शतम्.
आपल्या संस्कृतीत सर्वांना शंभर वर्ष निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. आपण 7 एप्रिलला ‘जागतिक आरोग्य दिन’ साजरा करणार आहोत. आज संपूर्ण जगात आरोग्याविषयी भारतीय चिंतन, मग ते योग असो की आयुर्वेद, याकडे ओढा वाढतो आहे. आत्ता आपण बघितले असेल की गेल्या आठवड्यात कतरमध्ये एक योग कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. यात 114 देशांच्या नागरिकांनी भाग घेऊन एक नवा जागतिक विक्रम बनवला. याचप्रमाणे आयुष उद्योगाची बाजारपेठ देखील सातत्याने वाढते आहेत. 6 वर्षांपूर्वी आयुर्वेदाशी संबंधित औषधांची बाजारपेठ जवळपास 22 हजार कोटी रुपये इतकी होती. आज आयुष उत्पादन उद्योग, एक लाख चाळीस हजार कोटी रुपयांच्या जवळपास पोचला आहे, म्हणजे या क्षेत्रात संधी सातत्याने वाढत आहेत. स्टार्टअप जगातही आयुष, आकर्षणाचा विषय बनत आहे.
मित्रांनो,
आरोग्य क्षेत्राच्या इतर स्टार्टअप्स विषयी तर मी आधीही अनेक वेळा बोललो आहे, मात्र या वेळी आयुष स्टार्टअप्स वर खास करून बोलणार आहे. एक स्टार्टअप आहे कपिवा (Kapiva!). याच्या नावातच याचा अर्थ लपलेला आहे. यात Ka चा अर्थ आहे – कफ, Pi चा अर्थ आहे – पित्त आणि Vaचा अर्थ आहे वात. ही स्टार्टअप कंपनी, आपल्या परंपरेनुसार उत्तम पोषक आहाराच्या सवयीवर आधारित आहे. आणखी एक स्टार्ट अप निरोग-स्ट्रीट देखील आहे, आयुर्वेद आरोग्यसेवा व्यवस्थेत एक नाविन्यपूर्णकल्पना आहे. याचे तंत्रज्ञान-आधारितव्यासपीठ, जगभरातील आयुर्वेदिक डॉक्टरांना थेट लोकांशी जोडून देतो. 50 हजार पेक्षा जास्त आयुर्वेदाचार्य याच्याशी जोडले गेले आहेत. याचप्रमाणे, ‘आत्रेय इनोव्हेशन्स,’एक आरोग्यसेवा तंत्रज्ञान स्टार्टअप आहे, जे सर्वंकष निरामयता या क्षेत्रात काम करत आहे. Ixoreal (इक्सोरियल) ने केवळ अश्वगंधाच्या उपयोगाविषयीच जागरूकता पसरविली नाही, तर उच्च दर्जा उत्पादन प्रक्रियेवर देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. क्युरवेदा (Cureveda) ने वनौषधींच्या आधुनिक शोध आणि पारंपारिक ज्ञानाच्या संयोगातून सर्वंकष जीवनासाठी पोषक आहार तयार केला आहे.
मित्रांनो,
आता तर मी थोडीशीच नावं घेतली आहेत, ही यादी खूप मोठी आहे. हे भारताचे तरुण उद्योगपती आणि भारतात तयार होत असलेल्या संधींची काही प्रतीकात्मक उदाहरणे आहेत. मी आरोग्य क्षेत्रातल्या स्टार्टअप्स आणि विशेषतः आयुष स्टार्टअप्सना एक आग्रहाची विनंती देखील केली आहे. आपण कुठलेही ऑनलाईन संकेतस्थळ तयार करता, जी काही माहिती तयार करता, ती संयुक्त राष्ट्राने मान्यता दिलेल्या सर्व भाषांमध्ये देखील बनवण्याचा प्रयत्न करा. जगात असे अनेक देश आहेत जिथे इंग्रजी भाषा फारशी बोलली जात नाही आणि समजतही नाही. अशा देशांचा विचार करुन, आपल्या माहितीचा प्रचार – प्रसार करा. मला खात्री आहे, लवकरच भारताचे आयुष स्टार्टअप्स उत्कृष्ट गुणवत्तेच्या उत्पादनांनी जगावर आपली छाप पाडतील.
मित्रांनो,
आरोग्याचा थेट संबंध स्वच्छतेशी देखील आहे. ‘मन की बात’ मध्ये आपण नेहमी स्वच्छाग्रहींच्या प्रयत्नांविषयी नेहमीच बोलतो. असेच एक स्वछाग्रही आहेत चंद्रकिशोर पाटील. हे महाराष्ट्रात नाशिक इथे राहतात. चंद्रकिशोरजी यांनी स्वच्छतेचा फार मोठा संकल्प सोडला आहे. ते गोदावरी नदीजवळ उभे राहतात, आणि लोकांना नदीत घाण, कचरा न टाकण्याची विनंती करत असतात. जर कुणी असं करताना दिसला तर ते लगेच जाऊन त्याला थांबवतात. या कामात चंद्रकिशोर जी आपला खूप वेळ खर्च करतात. संध्याकाळ पर्यंत त्यांच्याकडे अशा गोष्टींचा ढीग जमा होतो, ज्या लोक नदीत फेकायला घेऊन आलेले असतात. चंद्रकिशोरजी यांचे हे प्रयत्न, जनजागृती देखील करतात आणि प्रेरणा देखील देतात. याच प्रमाणे आणखी एक स्वछाग्रही आहेत – ओडिशातील पुरीचे राहुल महाराणा. राहुल दर रविवारी सकाळी सकाळी पुरीच्या तीर्थस्थळांजवळ जातात, आणि तिथे प्लास्टिकचा कचरा साफ करतात. त्यांनी आतापर्यंत शेकडो किलो प्लास्टिक कचरा आणि घाण साफ केली आहे. पुरीचे राहुल असोत किंवा नाशिकचे चंद्रकिशोर, हे आपल्याला फार मोठी शिकवण देतात. नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य पार पडले पाहिजे, स्वच्छता असो, पोषण असो, किंवा मग लसीकरण, या सगळ्या प्रयत्नांनी देखील निरोगी राहायला मदत होते.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
चला आता आपण बोलूया, केरळच्या के मुपट्टम श्री नारायणन यांच्याविषयी, त्यांनी एक अभियान सुरु केलं आहे, ज्याचं नाव आहे, ‘‘Pots for water of life’- (म्हणजे जीवन देणाऱ्या जलासाठीची भांडी). तुम्हाला जेव्हा या प्रकल्पाबद्दल कळेल, तेव्हा तुम्ही पण विचार कराल, की काय जोरदार काम आहे !
मित्रांनो,
मुपट्टम श्री नारायणन जी, उन्हाळ्यात, पशु-पक्ष्यांना तहान लागू नये, पाणी मिळावे यासाठी मातीची भांडी वाटण्याची मोहीम चालवतात. उन्हाळ्याच्या दिवसांत पशु-पक्ष्यांना होणारा त्रास बघून तेही कासावीस होत असत. मग यावर उपाय म्हणून त्यांनी विचार केला की आपणच लोकांना मातीची भांडी पुरवली तर मग, लोकांना फक्त त्यात पाणी भरुन पशू-पक्ष्यांसाठी ठेवता येईल. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल मित्रांनो, की नारायणन जी यांनी वाटप केलेल्या भांड्यांची संख्या आता एक लाखांपेक्षा अधिक होणार आहे. आपल्या या अभियानातलं एक लाखावं भांडं ते महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या साबरमती आश्रमात दान करणार आहेत. आता जेव्हा उन्हाळ्याची चाहूल लागली आहे, अशावेळी नारायणन जी यांचे हे काम सर्वांना नक्कीच प्रेरणा देईल आणि आपणही या उन्हाळयात, आपल्या पशु-पक्षी मित्रांसाठी, पाण्याची व्यवस्था कराल.
मित्रहो,
‘मन की बात’च्या श्रोत्यांना माझा आग्रह आहे की, आपण सर्वांनी जलबचतीच्या संकल्पाचा पुनरूच्चार करावा. पाण्याचा अगदी थेंब न थेंब वाचविण्यासाठी आपण जे जे काही करू शकतो, ते ते जरूर केले पाहिजे. याशिवाय पाण्याच्या पुनर्वापरावरही आपण तितकाच जोर देत राहिले पाहिजे. घरामध्ये काही कामांसाठी वापरण्यात येणारे पाणी, घरातल्या कुंड्यांना घालता येऊ शकत असेल, बगिचाला देता येऊ शकत असेल तर ते जरूर पुन्हा वापरले पाहिजे. अगदी थोडक्या प्रयत्नांमधून तुम्ही आपल्या घरामध्ये अशी व्यवस्था तयार करू शकता. रहीमदास जी, युगांपूर्वी काहीतरी विशिष्ट हेतूनं असं म्हणून गेले आहेत की, ‘‘रहिमन पानी राखिए, बिन पानी सब सून’’ आणि पाणी वाचविण्याच्या या कामामध्ये मला मुलांकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. ज्याप्रमाणे स्वच्छतेला आमच्या मुलांनीच आंदोलन बनवले, त्याचप्रमाणे ही मुले आता ‘जल योद्धा’ बनून, पाणी वाचविण्यासाठी मदत करू शकतात.
मित्रांनो,
आपल्या देशामध्ये जल संरक्षण, जल स्त्रोतांचे रक्षण, अनेक युगांपासून समाजाच्या स्वभावाचा एक भाग आहे. मला आनंद होतो की, देशामध्ये अनेक लोकांनी जल संवर्धनाचे कार्य आपल्या जीवनाचे ‘मिशन’च बनविले आहे. जसे की, चेन्नईचे एक सहाकारी आहेत- अरूण कृष्णमूर्ती जी! अरूण जी यांनी आपल्या भागातल्या तलाव -तळ्यांची साफ-सफाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी 150 पेक्षा जास्त तलाव -तळ्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी उचलली आणि ती यशस्वीपणे पूर्णही केली. याच प्रमाणे महाराष्ट्रातले रोहन काळे नावाचे एक कार्यकर्ते आहेत. रोहन व्यवसायाने ‘ एच.आर.’ विभागात आहेत. त्यांनी महाराष्ट्रातल्या पाय-यांच्या शेकडो विहिरींचे संरक्षण करण्याची मोहीम सुरू केली आहे. यामध्ये अनेक विहिरी तर शेकडो वर्षे जुन्या, प्राचीन आहेत. अशा विहिरी जणू आपल्या वारशाच्या भाग आहेत. सिकंदराबादमध्ये बन्सीलालपेट इथे विहीर अशी एक पाय-यांची विहीर आहे, तिच्याकडे गेली अनेक वर्षे कुणाचं लक्ष नव्हतं, या उपेक्षेमुळे ही पाय-यांची विहीर माती आणि कच-यानं झाकून गेली होती. मात्र आता इथं या पाय-यांच्या विहिरीचे पुनरूज्जीवन करण्याची मोहीम लोकांच्या सहभागातून सुरू केली आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
ज्या भागात पाण्याची सदोदित टंचाई असते, अशा राज्यातून मी आलो आहे. गुजरातमध्ये अशा पाय-यांच्या विहिरींना ‘वाव’ असे म्हणतात. गुजरातसारख्या राज्यामध्ये वाव खूप मोठी भूमिका पार पाडते. या विहिरी किंवा आडांच्या संरक्षणासाठी ‘जल मंदिर योजने’नं खूप महत्वाची भूमिका निभावली आहे. संपूर्ण गुजरातमधल्या अनेक विहिरींना, आडांना पुनर्जीवित करण्यात आले. यामुळे त्या त्या भागामध्ये जलस्तर वाढण्यासाठी चांगली मदत मिळाली. असेच अभियान तुम्हीही स्थानिक पातळीवर चालवू शकता. ‘चेक डॅम’ बनविण्याचं काम असो, रेन हारवेस्टिंग म्हणजेच पावसाचं पाणी जमिनी मुरवून पावसाच्या पाण्याची ‘शेती’ करायचं काम असो, यामध्ये वैयक्तिक पातळीवर केलेले प्रयत्नही महत्वाचे आहेत आणि संयुक्तपणे प्रयत्न करणेही गरजे आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपल्या देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी 75 अमृत सरोवर बनवता येवू शकतील. काही जुन्या सरोवरांमध्ये सुधारणा केली जावू शकते. तसेच काही नवीन सरोवर बनविता येवू शकतील. या दिशेने आपण सगळेजण काही ना काही प्रयत्न जरूर कराल, असा मला विश्वास आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
‘मन की बात’ची एक अतिशय चांगली गोष्ट म्हणजे, आपल्याकडून मला अनेक भाषांमधून, अनेक बोलीं भाषांमधून संदेश येत असतात. काही लोक मायगव्हवर ‘ऑडिओ मेसेज’ ही पाठवत असतात. भारताची संस्कृती, आपल्या अनेक भाषा, आपल्या बोलीभाषा, आपले राहणे, वेशभूषा, खाण्याच्या -जेवणाच्या पद्धती यांचा विस्तार, अशा सर्व प्रकारची विविधता म्हणजे आपली एक प्रकारे खूप मोठी ताकद आहे. पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून ते दक्षिणे पर्यंत भारताची हीच विविधता, सर्वांना एकत्रित बांधून ठेवते. ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’बनवत आहे. यामध्येही आपली ऐतिहासिक स्थाने आणि पौराणिक कथा, अशा दोन्हींचे खूप मोठे योगदान आहे. आपण सर्वजण विचार करीत असणार की, या सर्व गोष्टी, मी आपल्यासमोर का मांडतोय? याचे कारण आहे, ‘माधवपूर जत्रा’ माधवपूरची जत्रा कुठे भरते, का भरते? वैविध्यपूर्णतेने नटलेली ही माधवपूर जत्रा भारताच्या विविधतेशी कशी जोडली गेली आहे, या जत्रेच्या आयोजनामागचे कारण जाणून घेणे ‘मन की बात’ च्या श्रोत्यांच्यादृष्टीने अतिशय रंजक ठरणार आहे.
मित्रांनो,
‘‘माधवपुर मेला’’ गुजरातमध्ये पोरबंदर इथं समुद्र किनारी वसलेल्या माधवपूर गावात भरतो. मात्र याचं नातं हिदुंस्तानच्या पूर्व किना-याशी जोडलं जातं . आता आपण विचार करीत असणार हे कसं शक्य आहे? तर याचंही उत्तर एका पौराणिक कथेमध्येच मिळतं. असं म्हणतात की, हजारों वर्षांपूर्वी श्री कृष्ण यांचा विवाह, ईशान्येकडील राजकुमारी रूक्मिणीबरोबर झाला होता. हा विवाह पोरबंदरच्या माधवपूरमध्ये साजरा झाला होता. आणि त्या विवाहाचे प्रतीक म्हणून आजही तिथे माधवपूर तिथं जत्रा भरविण्यात येते. पूर्व आणि पश्चिम यांचं घट्ट बनलेलं नातं म्हणजे, आपला संस्कृती वारसा आहे. काळाच्या बरोबर आता लोकांच्या प्रयत्नातून माधवपूर जत्रेमध्ये अनेक नवनवीन गोष्टी जोडल्या जात आहेत. आपल्याकडे वधुपक्षाला ‘घराती’ असे म्हणतात, आणि या जत्रेमध्ये आता ईशान्येकडून अनेक ‘घराती’ही येत आहेत. एक आठवडाभर चालणा-या या माधवपूर जत्रेमध्ये ईशान्येकडील सर्व राज्यांतून कलाकार येत आहेत. हस्तशिल्पी, हस्तकलाकार येत आहेत आणि ही मंडळी या मेळाव्यात अधिक बहार आणतात. एक आठवडाभर भारतातल्या पूर्व आणि पश्चिमेकडील संस्कृतींचा होणारा हा मेळ, म्हणजे माधवपूर जत्रा आहे आणि तो ‘एक भारत- श्रेष्ठ भारत’चे सुंदर उदाहरण बनत आहे. तुम्हीही या मेळाव्याची, जत्रेची माहिती वाचून, जाणून घ्यावी, असा माझा तुम्हा सर्वांना आग्रह आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे आता लोक सहभागाचे एक नवीन आदर्श उदाहरण बनले आहे. काही दिवसांपूर्वी 23 मार्चला हुतात्मा दिनी देशाच्या कानाकोप-यामध्ये अनेक कार्यक्रम झाले. देशानं आपल्या स्वातंत्र्यामधल्या नायक-नायिकांचं स्मरण केलं, श्रद्धापूर्वक स्मरण केलं. याच दिवशी मला कोलकाताच्या व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये बिप्लाबी भारत दालनाचं लोकार्पण करण्याची संधी मिळाली. भारताच्या वीर क्रांतिकारकांना श्रद्धांजली देण्यासाठी हे एक अतिशय अव्दितीय, अद्भूत दालन आहे. जर संधी मिळाली तर, तुम्ही हे दालन पाहण्यासाठी जरूर जावे.
मित्रांनो,
एप्रिल महिन्यामध्ये आपण दोन महान विभूतींची जयंती साजरी करणार आहोत. या दोघांनीही भारतीय समाजावर आपला अमिट ठसा उमटवला आहे. या महान विभूती आहेत - महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर! महात्मा फुले यांची जयंती 11 एप्रिल रोजी आहे आणि बाबासाहेबांची जयंती आपण 14 एप्रिलला साजरा करणार आहोत. या दोन्ही महापुरूषांनी भेदभाव, असमानता यांच्या विरोधात खूप मोठा लढा दिला. महात्मा फुले यांनी त्या काळामध्ये मुलींसाठी शाळा सुरू केल्या. बालिका हत्येच्याविरोधात आवाज उठवला. जल संकटातून मुक्ती मिळावी, यासाठीही त्यांनी मोठं अभियान चालविलं.
मित्रांनो,
महात्मा फुले यांच्याविषयी बोलताना सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख करणं, तितकंच जरूरीचं आहे. सावित्रीबाई फुले यांनी अनेक सामाजिक संस्था स्थापन करण्यामध्ये मोठी भूमिका पार पाडली. एक शिक्षिका आणि एक समाज सुधारक या रूपानं त्यांनी समाजाला जागरूकही केलं आणि सर्वांना प्रोत्साहनही दिले. दोघांनी मिळून सत्यशोधक समाजाची स्थापना केली. लोकांच्या सशक्तीकरणाचे प्रयत्न केले. आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामध्येही महात्मा फुले यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. ते म्हणायचे की, कोणत्याही समाजाच्या विकासाचे आकलन त्या समाजातल्या महिलांची स्थिती पाहून करता येते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेवून, सर्व माता-पिता आणि पालकांना सांगू इच्छितो की, त्यांनी आपल्या मुलींना जरूर शिकवावे. मुलींनी जास्तीत जास्त संख्येने शाळेत यावे म्हणून काही दिवसांपूर्वीच कन्या शिक्षण प्रवेश उत्सवही सुरू केला आहे. ज्या मुलींचे शिक्षण काही कारणामुळे थांबलं असेल, राहिलं असेल तर त्यांना पुन्हा एकदा शाळेत आणण्यावर भर दिला जात आहे.
मित्रांनो,
बाबासाहेब यांच्याशी संबंधित पंचतीर्थाचं कार्य करण्याची आपल्याला संधी मिळाली, ही आपल्या सर्वांसाठी सौभाग्याची गोष्ट आहे. त्यांचे जन्मस्थान -महू असो, मुंबईची चैत्यभूमी असो, अथवा दिल्ली मध्ये बाबासाहेबांच्या महा-परिनिर्वाणाचे स्थान, मला या सर्व स्थानांवर, सर्व तीर्थांवर जाण्याचं भाग्य लाभलं. ‘मन की बात’ च्या श्रोत्यांना मी आग्रह करतो की, त्यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित असलेल्या सर्व स्थानांचे दर्शन जरूर करावं. त्यामधून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
‘मन की बात’मध्ये यावेळीही आपण अनेक विषयांवर चर्चा केली. पुढच्या महिन्यामध्ये अनेक सण-उत्सव येत आहेत. काही दिवसांनीच नवरात्र येत आहे. नवरात्रामध्ये आपण व्रत-उपवास, शक्तीची साधना करतो. शक्तीची पूजा करतो, याचाच अर्थ आपल्या परंपरा आपल्याला सणांचे उत्सवी स्वरूपही शिकवतात आणि संयम कसा बाळगायचा हेही शिकवतात. संयम आणि तप सुद्धा आपल्यासाठी एक पर्व आहे. म्हणूनच नवरात्राचे आपल्या सर्वांसाठी एक विशेष महत्व असते. नवरात्राच्या पहिल्या दिवशी गुढी पाडव्याचा सणही आहे. एप्रिलमध्ये ईस्टरही येतो आणि रमजानचा पवित्र महिनाही या दिवशी सुरू होत आहे. आपण सर्वांना बरोबर घेवून हे सर्व सण साजरे करावेत, भारताच्या विविधतेला सशक्त बनवावे, अशीच सर्वांची इच्छा आहे. यावेळी ‘मन की बात’ मध्ये इतकंच! पुढच्या महिन्यात तुमची पुन्हा एकदा भेट घेवून नवीन विषयांवर तुमच्याबरोबर संवाद साधला जाईल, खूप-खूप धन्यवाद!!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. मन की बात मध्ये पुन्हा आपले स्वागत आहे. आज मन की बातची सुरूवात आम्ही भारताच्या यशस्वीतेच्या उल्लेखानं करणार आहोत. या महिन्याच्या सुरूवातीला, भारत इटलीतून आपला एक बहुमूल्य असा वारसा आणण्यात यशस्वी झाला आहे. हा वारसा आहे अवलोकितेश्वर पद्मपाणिची हजार वर्षांहूनही प्राचीन अशी मूर्ति. ही मूर्ति काही वर्षांपूर्वी, बिहारच्या गयाजी मधील देवीचे स्थान कुंडलपूर मंदिरातनं चोरीस गेली होती. परंतु भरपूर प्रयत्न करून अखेर भारताला ही मूर्ति परत मिळाली आहे. अशीच काही वर्षांपूर्वी तमिळनाडूच्या वेल्लूरहून भगवान अंजनेय्यर, हनुमानाची मूर्ति चोरीस गेली होती. हनुमानाची ही मूर्तिसुद्धा 600 ते 700 वर्ष प्राचिन होती. या महिन्याच्या सुरूवातीला, ऑस्ट्रेलियातून आम्हाला ही मूर्ति प्राप्त झाली असून आमच्या मोहिमेला ती मिळाली आहे.
मित्रांनो, हजारो वर्षांच्या आमच्या इतिहासात, देशाच्या कानाकोपऱ्यात एकाहून एक सुरेख मूर्ति बनवल्या गेल्या, त्यात श्रद्धा होती, शक्ति होती, कौशल्यही होते आणि वैविध्यपूर्णतेने भरलेल्या होत्या. आमच्या प्रत्येक मूर्तिमध्ये तत्कालिन काळाचा प्रभाव दिसून येतो. या भारताच्या मूर्ति मूर्तिकलेचे दुर्मिळ उदाहरण तर होतेच, परंतु आमची श्रद्धा तिच्याशी जोडलेली होती. परंतु इतिहासात कित्येक मूर्ति चोरी होऊन देशाबाहेर जात राहिल्या. कधी या देशात तर कधी त्या देशात या मूर्ति विकल्या जात राहिल्या आणि त्यांच्यासाठी तर त्या फक्त कलाकृति होत्या. त्यांना त्यांच्या इतिहासाशी काही देणेघेणे नव्हते न श्रद्धेचे काही महत्व होते. या मूर्ति परत आणणे हे भारतमातेच्या प्रति आमचे कर्तव्य आहे. या मूर्तिंमध्ये भारताचा आत्मा, श्रद्धेचा अंश आहे. या मूर्तिंचे एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्वही आहे. ही जबाबदारी समजून भारताने आपले प्रयत्न वाढवले. आणि यामुळे चोरी करण्याची प्रवृत्ती जी होती, त्यांच्यामध्ये एक प्रकारची दहशत निर्माण झाली. ज्या देशांमध्ये या मूर्ति चोरी करून नेल्या गेल्या, त्यांनाही असे वाटू लागले की, भारताशी संबंधांमध्ये सौम्य शक्तिचा जो राजनैतिक प्रवाह असतो, त्याचे महत्वही खूप असू शकते. कारण या मूर्तिंशी भारताच्या भावना जोडल्या आहेत, भारताची श्रद्धा जोडलेली आहे आणि एक प्रकारे लोकांचे परस्परांमधील संबंधांमध्ये मोठी शक्ति निर्माण करतात. आपण काही दिवसांपूर्वीच पाहिले असेल, काशीहून चोरीला गेलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ति सुद्धा परत आणली गेली होती. हे भारताप्रति बदलत चाललेल्या जागतिक दृष्टिकोनाचे उदाहरण आहे. 2013 पर्यंत जवळपास 13 मूर्ति भारतात आणल्या गेल्या होत्या. परंतु, गेल्या सात वर्षांत 200 हून जास्त अत्यंत मौल्यवान मूर्तिंना भारताने यशस्वीपणे मायदेशी परत आणले आहे. अमेरिका, ब्रिटन, हॉलंड, फ्रान्स, कॅनडा, जर्मनी, सिंगापूर अशा कितीतरी देशांनी भारताच्या या भावना समजून घेऊन मूर्ति परत आणण्यात आमची मदत केली आहे. मी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जेव्हा अमेरिकेत गेलो होतो, तेव्हा मला अनेक प्राचीन अशी कित्येक मूर्ति आणि सांस्कृतिक महत्व असलेल्या अनेक वस्तु मिळाल्या. जेव्हा देशाचा मौल्यवान वारसा परत मिळतो, तेव्हा साहजिकच इतिहासावर श्रद्धा असलेले, पुराणवस्तु संग्रहावर श्रद्धा ठेवणारे, आस्था आणि संस्कृतिशी जोडलेले लोक आणि एक भारतीय या नात्याने आम्हाला सर्वांना आनंद होणे स्वाभाविक आहे.
मित्रांनो, भारतीय संस्कृति आणि आपल्या वारशाची चर्चा मी करतो तेव्हा आज आपल्याला मन की बातमध्ये दोन व्यक्तिंशी तुमची ओळख करून देऊ इच्छितो. आजकालच्या दिवसात फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर टांझानियाचे दोन भाऊबहिण किली पॉल आणि त्यांची बहिण नीमा चर्चेत आहेत. आणि मला पक्का विश्वास आहे की, आपणही त्यांच्याबाबत जरूर ऐकलं असेल. त्यांच्यामध्ये भारतीय संगीताबाबत एक वेडच आहे, तीव्र आवड हे आणि याच कारणाने ते दोघेही अत्यंत लोकप्रिय आहेत. लिप सिंकच्या त्यांच्या पद्धतीवरून हे लक्षात येते की यासाठी ते किती प्रचंड प्रमाणात कष्ट घेतात. नुकतेच, आमच्या प्रजासत्ताक दिनी, आमचं राष्ट्रगीत जन गण मन गाताना त्यांचा व्हिडिओ भरपूर प्रमाणात पाहिला गेला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी लतादीदींचं गीत गाऊन त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली होती. मी या अद्भुत सर्जनशीलतेसाठी या दोघाही भाऊ बहिणींना किली आणि निमा यांची खूप प्रशंसा करतो. काही दिवसांपूर्वी, टांझानियामध्ये भारतीय वकिलातीत त्यांना सन्मानितही करण्यात आलं आहे. भारतीय संगीताचीच ही जादू आहे की, सर्वांना तिची भुरळ पडते. मला आठवते, काही वर्षांपूर्वी जगात दीडशेहून अधिक देशांतल्या गायक आणि संगीतकारांनी आपापल्या देशांत, आपापल्या वेषभूषेमध्ये पूज्य बापूंना अत्यंत प्रिय असलेलं भजन वैष्णव जन गाण्याचा यशस्वी प्रयोग केला होता.
आज जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, तेव्हा देशभक्तिपर गीतांच्या संदर्भात असे प्रयोग केले जाऊ शकतात. जेथे परदेशी नागरिकांना, त्यांच्या प्रसिद्ध गायकांना, भारतीय देशभक्तिपर गीतं गाण्यासाठी आमंत्रित केलं जावं. इतकंच नव्हे तर, टांझानियामधील किली आणि निमा भारताच्या गीतांना या प्रकारे लिप सिंक करू शकतात तर काय माझ्या देशात, आमच्या अनेक भाषांमधील अनेक प्रकारची गीतं आहेत, आम्ही गुजराती मुलं तमिळ गीतांवर तसं करू शकत नाही का, केरळची मुलं आसामी गीतांवर तसं करू शकतात, कन्नड मुलं जम्मू-कश्मिरच्या गीतांवर लिप सिंक करू शकतात. असं एक वातावरण आपण बनवू शकतो, ज्यात एक भारत-श्रेष्ठ भारतचा अनुभव आम्ही घेऊ शकतो. इतकंच नव्हे तर, आम्ही स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव एक वेगळ्या पद्धतीनं अवश्य साजरा करू शकतो. मी देशातील नवतरूणांना आवाहन करतो की, या, भारतीय भाषांमधील जी लोकप्रिय गीतं आहेत, त्यावर आपण आपल्या पद्धतीनं व्हिडिओ बनवा, खूप लोकप्रिय होऊन जाल आपण. आणि देशातल्या वैविध्याची ओळख नव्या पिढीला होईल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आताच काही दिवसांपूर्वी आपण मातृभाषा दिन साजरा केला. जे विद्वान आहेत, ते मातृभाषा शब्द कुठून आला, त्याची उत्पत्ती कशी झाली, यावर खूपशी पांडित्यपूर्वक माहिती देऊ शकतील. मी तर मातृभाषेबद्दल इतकंच म्हणेन की, जसे आपलं जीवन आपली आई घडवत असते, तसंच आपली मातृभाषा आपलं जीवन घडवत असते. आई आणि मातृभाषा, दोन्ही मिळून जीवनाचा पाया मजबूत करतात, चिरस्थायी करतात. जसं आपण आपल्या आईला सोडू शकत नाही, तसंच आपल्या मातृभाषेलाही सोडू शकत नाही. मला खूप वर्षांपूर्वीची एक गोष्ट आजही लक्षात आहे. जेव्हा मला अमेरिकेला जाणं भाग पडलं तेव्हा, वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये जाण्याची संधी मिळत असे. एकदा मला तेलुगू कुटुंबात जाण्याची संधी मिळाली आणि मला एक आनंददायक दृष्य दिसलं. त्यांनी मला सांगितलं की, आम्ही कुटुंबासाठी एक नियम तयार केला आहे. कितीही काम असो, परंतु आम्ही शहराच्या बाहेर जर आम्ही नसू तर कुटुंबातील सर्व सदस्य रात्रीचं जेवण टेबलवर एकत्र बसूनच घेणार. आणि दुसरा नियम म्हणजे रात्रीच्या जेवणाच्या टेबलवर सारे सदस्य तेलुगूतच बोलतील. जी मुलं त्या कुटुंबात जन्माला आली होती, त्यांनाही हाच नियम लागू होता. आपल्या मातृभाषेप्रति त्यांचं हे प्रेम पाहून मी या कुटुंबामुळे खूपच प्रभावित झालो.
मित्रांनो,
स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही काही लोक एक प्रकारच्या मानसिक द्वंद्वात जगत आहेत ज्यामुळे त्यांना आपली भाषा, आपला पोषाख, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी याबद्दल एक प्रकारचा संकोच वाटतो. जगात इतरत्र खरेतर असं कुठंच नाही. आमची मातृभाषा आहे, आम्ही ती गर्वानं बोलली पाहिजे. आणि आमचा भारत तर भाषांच्या बाबतीत इतका समृद्ध आहे की त्याची तुलनाच होऊ शकत नाही. आमच्या भाषांचे सर्वात मोठं सौदर्य हे आहे की, कश्मिरहून कन्याकुमारीपर्यंत, कच्छहून कोहिमापर्यंत शेकडो भाषा, हजारो बोली भाषा या एकमेकांपेक्षा वेगळ्या असल्या तरीही एकदुसरीमध्ये रचलेल्या आणि समाविष्ट झालेल्या आहेत. भाषा अनेक आहेत पण भाव एकच आहे. कित्येक शतकांपासून आमच्या भाषा एक दुसऱ्याकडून स्वतःला अत्याधुनिक बनवत आल्या आहेत, एक दुसरीचा विकास करत आहेत. भारतातली तमिळ भाषा ही जगातली सर्वात प्राचीन भाषा आहे आणि याचा प्रत्येक भारतीयाला गर्व असला पाहिजे की जगातील इतकी मोठी परंपरा आमच्याकडे आहे. याच प्रकारे जितके प्राचीन धर्मशास्त्रं आहेत, त्यांची अभिव्यक्तिसुद्धा आमची संस्कृत भाषाच आहे. भारतीय लोक जवळपास 121 मातृभाषांमध्ये जोडले गेले आहेत, याचा आम्हाला अभिमान असला पाहिजे आणि यातील 14 भाषा तर अशा आहेत ज्या एक कोटीहून अधिक लोक दैनंदिन आयुष्यात बोलतात. म्हणजे, जितकी युरोपियन देशांची एकूण लोकसंख्या नाही, त्यापेक्षा जास्त लोक आमच्या विविध 14 भाषांशी जोडले गेले आहेत. सन 2019 मध्ये, हिंदी जी जगातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ती भाषांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होती. याचाही प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे. भाषा ही केवळ अभिव्यक्तिचं माध्यम नाही तर भाषा, समाजाची संस्कृति आणि परंपरांना वाचवण्याचं काम करत असते. आपल्या भाषेच्या परंपरेला वाचवण्याचं काम सुरीनामचे सुरजन परोहीजी करत आहेत. या महिन्याच्या 2 तारखेला ते 84 वर्षांचे झाले आहेत. त्यांचे पूर्वजही कित्येक वर्षे पूर्वी, हजारो कामगारांच्या बरोबर, रोजीरोटीसाठी सुरीनामला गेले होते. सुरजन परोही हिंदीमध्ये खूप चांगल्या कविता करतात आणि तेथे त्यांचं नाव राष्ट्रीय कविंमध्ये घेतलं जातं. म्हणजे, आजही त्यांच्या ह्रदयात भारत असतो आणि त्यांच्या कार्याला हिंदुस्तानी मातीचा सुगंध आहे. सुरीनामच्या नागरिकांनी सुरजन परोहीजी यांच्या नावे एक संग्रहालय बनवले आहे. 2015 मध्ये त्यांना सन्मानित करण्याची संधी मला मिळाली होती, ही माझ्यासाठी अत्यंत सुखद गोष्ट आहे.
मित्रांनो, आजच्या दिवशी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन आहे. सर्व मराठी बंधु भगिनींना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
हा दिवस मराठी कविवर्य विष्णु वामन शिरवाडकरजी, श्रीमान कुसुमाग्रज यांना समर्पित आहे. आजच कुसुमाग्रज यांची जयंतीही आहे. कुसुमाग्रज यांनी मराठीमध्ये कविता केल्या, अनेक नाटकं लिहीली आणि मराठी साहित्याला नवी उंची दिली.
मित्रांनो, आमच्याकडे भाषेची आपल्याच स्वतःची वैशिष्ट्ये आहेत, मातृभाषेचे स्वतःचे विज्ञान आहे. हे विज्ञान समजून घेऊन, राष्ट्रीय शिक्षण धोरणात स्थानिक भाषेतनं शिकण्यावर जोर दिला गेला आहे. आमचे व्यावसायिक अभ्यासक्रमही स्थानिक भाषांमधून शिकवले जावेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत काळात या प्रयत्नांना आपण सर्वांनी मिळून वेग दिला पाहिजे. हे स्वाभिमानाचं काम आहे. माझी अशी इच्छा आहे की, आपल्यातील जे कुणी मातृभाषा बोलतात, त्यांनी तिच्या वैशिष्ट्याबद्दल काही न काही जाणून घ्यावं आणि काही न काही तरी लिहावं.
मित्रांनो, काही दिवसांपूर्वी, माझी भेट माझे मित्र आणि केनियाचे माजी पंतप्रधान राईला ओडिंगाजी यांच्याशी झाली. ही भेट अत्यंत मनोरंजक तर होतीच पण अतिशय भावनाप्रधानही होती. आम्ही खूप चांगले मित्र झालो आणि मनमोकळेपणी खूप साऱ्या गप्पाही मारतो. जेव्हा आम्ही चर्चा करत होतो, तेव्हा ओडिंगाजींनी आपल्या कन्येच्या बाबतीत माहिती दिली. त्यांची कन्या रोझमेरीला मेंदूचा ट्यूमर झाला आणि यासाठी त्यांना आपल्या मुलीवर शस्त्रक्रिया करावी लागली होती. परंतु त्याचा दुष्परिणाम असा झाला की, रोझमेरीच्या डोळ्यांतील दृष्टि जवळजवळ गेली आणि तिला दिसणंच बंद झालं. आता आपण कल्पना करू शकाल की, त्यांच्या कन्येचे काय हाल झाले असतील आणि एक वडिल म्हणून त्यांची मनःस्थितीचा अंदाज आपण लावू शकतो, त्यांच्या भावना समजू शकतो. त्यांनी जगभरातील रूग्णालयांमध्ये इलाज केले, जगातील एकही असा मोठा देश राहिला नसेल जेथे त्यांनी कन्येच्या इलाजासाठी भरपूर प्रयत्न केले नसतील. जगातील मोठमोठे देश त्यांनी पिंजून काढले, परंतु यश मिळालं नाही, एक प्रकारे त्यांनी साऱ्या आशा सोडल्या आणि संपूर्ण घरात निराशेचं वातावरण पसरलं होतं. यातच कुणीतरी त्यांना भारतातील आयुर्वेदाच्या उपचारांकरता येण्याचं सुचवलं आणि खूप काही केलं होतं, उपाय करून थकलेही होते. त्यांनी विचार केला, एक वेळेला प्रयत्न करायला काय हरकत आहे. ते भारतात आले , केरळात एका आयुर्वेदिक रूग्णालयात त्यांनी आपल्या कन्येचे उपचार सुरू केले. भरपूर काळ कन्या देशात राहिली. आयुर्वेदाच्या या उपचारांचा असा परिणाम झाला की रोझमेरीची दृष्टि बऱ्याचशा प्रमाणात परत आली आहे. आपण कल्पना करू शकता की, कसे एक नवं आयुष्य मिळालं आणि प्रकाश तर रोझमेरीच्या जीवनात आला. परंतु पूर्ण कुटुंबात एक प्रकाश परत आला आणि ओडिंगाजी इतके भावनावश होऊन मला ही गोष्ट सांगत होते. तसंच भारताच्या आयुर्वेदातील ज्ञान, विज्ञान केनियात नेण्याची त्यांची इच्छा आहे. जशा प्रकारे वनस्पती आयुर्वेदासाठी कामाला येतात, तसं त्या वनस्पतींची शेती करून त्याचा लाभ अधिकाधिक लोकांना देण्याकरता पूर्ण प्रयत्न करतील.
मला तर हीच खूप आनंदाची गोष्ट आहे की आमची धरती आणि आमच्या पंरंपरेनं एखाद्याच्या जीवनातील इतकं मोठं संकट दूर झालं. हे ऐकून आपल्यालाही आनंद झाला असेल. कोण भारतवासी नसेल की ज्याला याचा अभिमान नसेल? आपल्याला सर्वांना हे माहितच आहे की ओडिंगाजीच नव्हे तर जगातील लाखो लोक आयुर्वेदापासून असेच लाभ घेत आहेत.
आपल्या भूमीवरून आणि आपल्या परंपरेच्या माध्यमातून कोणाच्या तरी आयुष्यातून एवढं मोठं दुःख दूर झालं, ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. हे ऐकून तुम्हालाही नक्कीच आनंद होईल. कुठल्या भारतीयाला याचा अभिमान वाटणार नाही? केवळ ओडिंगाजीच नाही तर जगभरातील कोट्यवधी लोक आयुर्वेदापासून लाभान्वित होत आहेत, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे.
ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स हे सुद्धा आयुर्वेदाचे मोठे चाहते आहेत. मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटतो तेव्हा ते आयुर्वेदाचा उल्लेख नक्कीच करतात. भारतातील अनेक आयुर्वेदिक संस्थांचीही त्यांना माहिती आहे.
मित्रहो, गेल्या सात वर्षांत देशभरात आयुर्वेदाच्या प्रचारावर खूप लक्ष देण्यात आले आहे. आयुष मंत्रालयाच्या स्थापनेमुळे आपली पारंपारिक औषधे आणि आरोग्य पद्धती लोकप्रिय करण्याचा आमचा संकल्प आणखी दृढ झाला आहे. गेल्या काही वर्षांत आयुर्वेदाच्या क्षेत्रात अनेक नवीन स्टार्टअप उदयाला आले आहेत, याचा मला मनापासून आनंद आहे. या महिन्याच्या सुरुवातीला आयुष स्टार्ट-अप चॅलेंज सुरू झाले. या क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्ट-अप्सना ओळखणे आणि त्यांना पाठिंबा देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, अशी विनंती मी त्यांना करतो.
मित्रहो, लोकांनी एकत्र येऊन काही करण्याचा निश्चय केला की ते विलक्षण गोष्टी अगदी सहजपणे करतात. समाजात असे अनेक मोठे बदल घडून आले आहेत, त्यात लोकसहभाग आणि सामूहिक प्रयत्नांचा मोठा वाटा आहे. काश्मीरमधील श्रीनगरमध्ये ‘मिशन जल थल’ नावाची अशीच एक लोक चळवळ सुरू आहे. श्रीनगरमधील सरोवरे आणि तलाव स्वच्छ करून त्यांचे जुने वैभव पुन्हा मिळवून देण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे. “कुशल सार” आणि “गिल सार” वर“मिशन जल थल” उपक्रमाने लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये लोकसहभागासोबत तंत्रज्ञानाचीही मोठी मदत घेतली जाते आहे. कुठे अतिक्रमण झाले आहे, कुठे बेकायदेशीर बांधकामे झाली आहेत, याची माहिती घेण्यासाठी या भागाचे सर्वेक्षण करण्यात आले. प्लॅस्टिक कचऱ्याबरोबरच इतर कचराही स्वच्छ करण्याची मोहीम राबविण्यात आली. मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात जुन्या जलवाहिन्या आणि तलाव भरणारे 19 झरे पूर्ववत करण्यासाठीही खूप प्रयत्न करण्यात आले. या जीर्णोद्धार प्रकल्पाच्या महत्त्वाविषयी अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी स्थानिक लोकांना आणि तरुणांना जलदूत बनवण्यात आले. आता येथील स्थानिक लोकही "गिल सार तलावामध्ये स्थलांतरित पक्षी आणि माशांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि ते पाहून आनंद होतो आहे. असे विलक्षण प्रयत्न करणाऱ्या श्रीनगरच्या जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो.
मित्रहो,आठ वर्षांपूर्वी देशाने हाती घेतलेल्या'स्वच्छ भारत मोहिमेची व्याप्तीही काळाच्या ओघात वाढत गेली, नवनवीन शोधांचीही भर पडत गेली. तुम्ही भारतात कुठेही गेलात तरी प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेसाठी काही ना काही प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येईल. आसाममधील कोक्राझारमध्ये सुरू असलेल्या अशाच एका प्रयत्नाबद्दल मला माहिती मिळाली आहे. मॉर्निंग वॉकर्सच्या एका गटाने या भागात'स्वच्छ आणि हरित कोक्राझार' मोहिमेअंतर्गत एक अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या सर्वांनी नवीन उड्डाणपूल परिसरातील तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याची स्वच्छता करून स्वच्छतेचा प्रेरक संदेश दिला. तसेच विशाखापट्टणममध्ये 'स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत पॉलिथिनऐवजी कापडी पिशव्यांचा प्रचार केला जात आहे. पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी येथील लोक एकल वापर प्लॅस्टिकच्या उत्पादनांविरोधात मोहीम राबवत आहेत. त्याचबरोबर हे लोक घरातील कचऱ्याचे वर्गिकरण करण्यासाठी जनजागृती करत आहेत. मुंबईच्या सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही आपल्या स्वच्छता मोहिमेला सौंदर्यीकरणाची जोड दिली आहे. त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकाच्या भिंतींवर सुंदर चित्रे काढलीआहेत. राजस्थानमधील सवाई माधोपूरमधल्या एका प्रेरणादायी उदाहरणाची माहितीही मला मिळाली आहे. तिथल्या तरुणांनी रणथंबोरमध्ये 'मिशन बीट प्लास्टिक' नावाची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत रणथंबोरच्या जंगलातून प्लास्टिक आणि पॉलिथिन हद्दपार करण्यात आले आहे.प्रत्येकाने प्रयत्न करावेत, या भावनेतून देशात लोकसहभाग मजबूत होतो आणि जेव्हा लोकसहभाग असतो, तेव्हा मोठी उद्दिष्टे नक्कीच पूर्ण होतात.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आजपासून अवघ्या काही दिवसांनी 8 मार्च रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय महिला दिन'साजरा केला जाणार आहे. 'मन की बात' च्या माध्यमातून आम्ही महिलांच्या साहसाशी, कौशल्यांशी आणि प्रतिभेशी संबंधित अनेक उदाहरणे आपल्यासमोर आणत आहोत. आज स्किल इंडिया असो, सेल्फ हेल्प ग्रुप असो किंवा लहान-मोठे उद्योग असो, सर्व क्षेत्रात महिलांनी आघाडी घेतली आहे. जिथे पाहावे तिथे स्त्रिया जुने गैरसमज मोडीत काढत आहेत. आज आपल्या देशात संसदेपासून पंचायतीपर्यंत विविध क्षेत्रात महिला नवनवीन शिखरे गाठत आहेत. सैन्यातही आता मुली नव्या आणि मोठ्या भूमिकेत शिरून महत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत आणि देशाचे रक्षण करत आहेत. अत्याधुनिक लढाऊ विमाने अगदी लिलया उडवणाऱ्या मुली आपण गेल्याच महिन्यात प्रजासत्ताक दिनी पाहिल्या आहेत. सैनिक शाळांमधील मुलींच्या प्रवेशावरील बंदीही देशाने हटवली असून, देशभरातील सैनिक शाळांमध्ये मुली प्रवेश घेत आहेत. स्टार्ट-अपच्या विश्वाकडे एक नजर टाका.गेल्या काही वर्षांमध्ये देशात हजारो नवीन स्टार्टअप सुरू झाले. यापैकी निम्म्या स्टार्टअप्समध्ये संचालकाच्या भूमिकेत महिला आहेत. अलीकडच्या काळात महिलांसाठी प्रसूती रजा वाढवण्यासारखे निर्णय घेतले गेले. मुलांना आणि मुलींना समान अधिकार देऊन लग्नाचे वय समान करण्याचा देश प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे. देशात आणखी एक मोठा बदल होत असल्याचे तुम्ही पाहत असाल. हा बदल म्हणजे आपल्या सामाजिक मोहिमांचे यश आहे. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' उपक्रमाचे यश बघा.आज देशातील लिंग गुणोत्तर सुधारले आहे. शाळेत जाणाऱ्या मुलींच्या प्रमाणातही सुधारणा झाली आहे. अशा वेळीआपल्या मुलींनी मध्येच शाळा सोडू नये, ही आपलीही जबाबदारी आहे. त्याचबरोबर ‘स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत उघड्यावर शौचास जावे लागण्यापासून देशातील महिलांची सुटका झाली आहे. तिहेरी तलाकसारख्या सामाजिक कुप्रथाही संपुष्टात येत आहेत. तिहेरी तलाकविरोधात कायदा अस्तित्वात आल्यापासून देशात तिहेरी तलाकच्या प्रकरणांमध्ये 80 टक्के घट झाली आहे. इतक्या कमी वेळात हे सर्व बदल कसे घडत आहेत? हा बदल होतो आहे कारण आता आपल्या देशातील बदलाचे आणि प्रगतीशील प्रयत्नांचे नेतृत्व महिला स्वतः करत आहेत.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, उद्या 28 फेब्रुवारी हा 'राष्ट्रीय विज्ञान दिन' आहे. हा दिवस रामन इफेक्टच्या शोधासाठी देखील साजरा केला जातो. वैज्ञानिक क्षेत्रातील आपला प्रवास समृद्ध करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे सीव्ही रमण यांच्या बरोबरीने मी अशा सर्वच शास्त्रज्ञांना आदरांजली वाहतो. मित्रहो, तंत्रज्ञानाने आपले आयुष्य अधिक सोपे आणि सुलभ करून आपल्या आयुष्यात मोलाचे स्थान प्राप्त केले आहे. कोणते तंत्रज्ञान चांगले आहे, कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर अधिक चांगला आहे, हे आपल्याला अगदी चांगले माहिती असते. पण त्या तंत्रज्ञानाला कशाचा आधार आहे, त्यामागचे शास्त्र काय आहे, हे आपल्या कुटुंबातील मुलांना समजले पाहिजे,याकडे आपले फारसे लक्ष जात नाही, हेही तितकेच खरे. या विज्ञान दिनानिमित्त मी सर्व कुटुंबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मुलांमध्ये वैज्ञानिक वृत्ती विकसित करण्यासाठी लहान प्रयत्नांपासून आवर्जून सुरूवात करावी.एखाद्याला दृष्टीदोष असेल आणि चष्मा लावल्यावर चांगले दिसू लागेल.मग अशा वेळी त्यामागे काय शास्त्र आहे, हे मुलांना सहज समजावून सांगता येईल. चष्मा लावला, आनंद झाला, इतके पुरेसे नाही. एका छोट्या कागदाचा वापर करून तुम्ही त्याला सांगू शकता. आता मुले मोबाईल फोन वापरतात, कॅल्क्युलेटर कसे काम करतो, रिमोट कंट्रोल कसे काम करते, सेन्सर्स म्हणजे काय, अशा विज्ञानाधारित गोष्टींचीही घरात चर्चा होते का? कदाचित घरातील रोजच्या वापरातील या गोष्टी आपण सहजपणे समजावून सांगू शकतो, आपण जे काही करत आहोत, त्यामागील शास्त्र काय आहे, ते सांगू शकतो. त्याचप्रमाणे, आपण मुलांना सोबत घेऊन आकाश पाहिले आहे का? रात्रीच्या वेळी ताऱ्यांबद्दल गप्पा झाल्याअसतील. आकाशात वेगवेगळी प्रकारची नक्षत्रे दिसतात, त्यांच्याबद्दल सांगा. असे करून तुम्ही मुलांमध्ये भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्राबद्दल उत्सुकता निर्माण करू शकता. आजकाल अनेक अॅप्स देखील आहेत, ज्यावरून तुम्ही तारे आणि ग्रह शोधू शकता किंवा आकाशात दिसणारा तारा ओळखू शकता, त्याबद्दल अधिक जाणून घेऊ शकता. आपल्या स्टार्ट-अप्सनी त्यांची कौशल्ये आणि वैज्ञानिक निपुणतेचा वापर राष्ट्र उभारणीशी संबंधित कामात करावा, असे मी सांगू इच्छितो. ही देशाप्रती आपली सामूहिक वैज्ञानिक जबाबदारी आहे. आभासी सत्याच्या आजच्या जगात आपले स्टार्टअप्स खूपच छान काम करत आहेत, हे मी पाहतो आहे. आभासी वर्गांच्या आजच्या या काळात मुलांना डोळ्यासमोर ठेवून अशीच एक आभासी प्रयोगशाळाही बनवता येईल. अशा आभासी विकल्पाच्या माध्यमातून आपण मुलांना रसायनशास्त्र प्रयोगशाळेचा अनुभव घरबसल्या देऊ शकतो. शिक्षकांनी आणि पालकांनी सर्व विद्यार्थ्यांना आणि मुलांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन द्यावे आणि त्यांच्यासोबत मिळून प्रश्नांची योग्य उत्तरे शोधावीत अशी विनंती मी करतो. कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारतीय शास्त्रज्ञांच्या भूमिकेचे आज मला कौतुक करायचे आहे. त्यांच्या कठोर परिश्रमांमुळेच भारतीय बनावटीची लस तयार करणे शक्य झाले, जी अवघ्या जगाच्या कामी आली. ही विज्ञानाने मानवाला दिलेली देणगी आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, यावेळीही आपण अनेक विषयांवर चर्चा केली. येत्या मार्च महिन्यात अनेक सण येत आहेत - महाशिवरात्र आहे आणि आता काही दिवसांनी तुम्ही सर्वजण होळीच्या तयारीला लागाल. होळी हा सण आपल्याला एकत्र आणणारा सण आहे. या सणात आप-पर, राग-लोभ, लहान-मोठे असे सर्व भेदभाव विसरून लोक एकत्र येतात. त्यामुळेच होळीच्या रंगापेक्षा होळीच्या प्रेमाचा आणि समरसतेचा रंग अधिक गहिरा असतो, असे म्हटले जाते. होळीमध्ये मिष्टान्नांबरोबरच नात्यांचाही अनोखा गोडवा वाढीला लागतो. ही नाती आपल्याला आणखी दृढ करायची आहेत. आणि केवळ आपल्या कुटुंबातील लोकांशीच नाहीत तर आपल्या विशाल कुटुंबाचा भाग असणाऱ्या सर्वांबरोबरची नाती आपल्याला दृढ करायची आहेत. हे करण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. 'व्होकल फॉर लोकल' च्या माध्यमातून आपण आपले सण साजरे करायचे आहेत. आपण सण-उत्सवांच्या काळात स्थानिक उत्पादने खरेदी केली पाहिजेत, त्यामुळे आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या जीवनातही रंग भरले जातील, त्यांनाही चैतन्य लाभेल. ज्या उमेदीने आपला देश कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहे आणि पुढे जात आहे, त्यामुळे सण साजरे करण्याचा उत्साहही अनेक पटींनी वाढला आहे. याच उमेदीसह आपण आपले सण साजरे करायचे आहेत आणि त्याच बरोबर पुरेशी काळजीही घ्यायची आहे. मी आपणा सर्वांना येणाऱ्या सणांच्या अनेक शुभेच्छा देतो. तुमच्यागोष्टींची, पत्रांची, संदेशांची मी नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतो. खूप खूप धन्यवाद.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार ! यावेळी आपण सगळे 2021 ला निरोप आणि 2022 च्या स्वागताच्या तयारीत गुंतले असाल. नव्या वर्षात प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संस्था, पुढच्या वर्षात आणखी काही अधिक उत्तम करण्याचा संकल्प करतात. गेल्या सात वर्षात, आपला हा ‘मन की बात’ कार्यक्रम देखील, व्यक्तीच्या, समाजातल्या, देशातल्या चांगुलपणाच्या, सकारात्मकतेच्या कथा सांगत, आपल्याला आणखी काही चांगले करण्याची, अधिक चांगले बनण्याची, प्रेरणा देत आला आहे. या सात वर्षात मी ‘मन की बात’ कथन करत असतांना, सरकारच्या कामगिरीवरही चर्चा करु शकलो असतो. कदाचित आपल्यालाही ते आवडलं असतं, आपणही त्याचं कौतुक केलं असतं. मात्र, माझा हा अनेक दशकांचा अनुभव आहे, की प्रसारमाध्यमांच्या झगमगाटापासून दूर, वर्तमानपत्रांच्या मथळ्यांपासून दूर, कोटी कोटी लोक आहे, जे फार उत्तम कामे करत आहेत.हे लोक देशाच्या उद्याच्या भविष्यासाठी, आपला ‘आज’ खर्च करत आहेत. ते देशाच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आज आपल्या कामांमध्ये आपले आयुष्य वेचत आहेत. अशा लोकांच्या कथा आपल्याला खूप समाधान देऊन जातात. खूप खोलवर प्रेरित करतात. माझ्यासाठी ‘मन की बात’ कायमच, अशाच लोकांच्या प्रयत्नांनी भरलेला, बहरलेला, सजलेला एक सुंदर बगिचा आहे. आणि ‘मन की बात’ मध्ये तर दर महिन्यात मला यावर विचार करावा लागतो, की या बागेतली कोणती फुले आज तुमच्यासाठी घेऊन येऊ.
मला आनंद आहे की आपल्या या बहुरत्ना वसुंधरेच्या पुण्य कार्यांचा अखंड प्रवाह निरंतर वाहता असतो. आणि आज जेव्हा देश ‘अमृत महोत्सव’ साजरा करत आहे, त्यावेळी ही जी लोकशक्ती आहे, एकेका माणसाची शक्ती आहे, त्या शक्तीचा उल्लेख, त्यांचे प्रयत्न, त्यांचे परिश्रम, भारताच्या आणि एकूणच मानवतेच्या उज्ज्वल भविष्याची, एका अर्थाने हमी देणारे आहेत.
मित्रांनो, हे लोकशक्तीचेच सामर्थ्य आहे, सर्वांचे प्रयत्नच आहेत, ज्यामुळे भारत, 100 वर्षातल्या या सर्वात मोठ्या महामारीचा सामना करु शकला. आपण प्रत्येक संकटात, एकमेकांसोबत, एका कुटुंबासारखे उभे राहिलो. आपल्या वस्तीत किंवा शहरात, कोणाची मदत करायची असेल, तर ज्याला जे जे शक्य झाले, त्याने त्यापेक्षा अधिक करण्याचा प्रयत्न केला. आज जगात लसीकरणाचे जे आकडे आहेत, त्यांची भारताशी तुलना केली तर लक्षात येईल, की आपल्या देशाने किती अभूतपूर्व कामगिरी केली आहे. किती मोठे उद्दिष्ट पार केले आहेत. लसींच्या 140 कोटी मात्रा देण्याचा टप्पा पार करणे, हे प्रत्येक भारतीयाचे स्वतःचे यश आहे. हा प्रत्येक भारतीयांचा, व्यवस्थेवर असलेला विश्वास दर्शवणारे आहे. आपल्या वैज्ञानिकांवर आपला विश्वास दर्शवणारे आहे. आणि समाजाच्या प्रति असलेली आपली जबाबदारी आपण कशाप्रकारे पार पाडत आहोत, या आपल्या इच्छाशक्तीचा हा पुरावाच आहे.
मित्रांनो,
आपल्याला हे ही लक्षात ठेवायचे आहे, की कोरोनाच्या आणखी एका नव्या प्रकारच्या विषाणूने आपल्या दारावर थाप दिली आहे. गेल्या दोन वर्षातला आपला अनुभव असा आहे, की या जागतिक महामारीचं पराभव करण्यासाठी, एक नागरिक म्हणून आपले प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. हा जो नव्या स्वरूपाचा ओमायक्रॉन विषाणू आला आहे, आपले वैज्ञानिक सातत्याने त्याचे अध्ययन करत आहेत. त्यातून त्यांना योज नवी माहिती मिळते आहे. त्यांनी दिलेल्या सूचनांनंतर त्यावर काम केले जात आहे. अशावेळी,स्वयं सजगता, स्वयंशिस्त, ही कोरोनाच्या या स्वरूपाशी लढण्यासाठी, देशाची खूप मोठी ताकद आहे. आपली सामूहिक शक्ती कोरोनाचा पराभव करेल, याच जबाबदारीच्या जाणिवेसह, आपल्या सर्वांना 2022 या वर्षात प्रवेश करायचा आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
महाभारताच्या युद्धकाळात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटले होते--नभः स्पृशं दीप्तम्’ म्हणजे अभिमानाने आकाशाला गवसणी घालणे. हे भारतीय नौदलाचे ब्रीदवाक्यही आहे. भारतमातेच्या सेवेत गुंतलेले अनेक लोक रोज असेच अभिमानाने आकाश कवेत घेतात. असेच एक आयुष्य होते, ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे. वरुण सिंह त्या हेलिकॉप्टरचे वैमानिक होते, ज्याला या महिन्यात तामिळनाडू इथे अपघात झाला. या भीषण अपघातात, आपण देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह अनेक वीरांना गमावले. वरुण सिंह यांनी देखील मृत्यूशी अनेक दिवस धैर्याने झुंज दिली. मात्र, नंतर तेही आपल्याला सोडून निघून गेले. वरुण जेव्हा रुग्णालयात होते,त्यावेळी मी सोशल मीडियावर असे काही पहिले, जे माझ्या मनाला स्पर्शून गेले.
या वर्षी, ऑगस्ट महिन्यातच त्यांना शौर्य चक्र दिले गेले होते. हा सन्मान मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना एक पत्र लिहिले होते. हे पत्र वाचल्यावर माझ्या मनात पहिला विचार हाच आला की यशाची शिखरे गाठल्यानंतरही ते आपल्या मूळाची जपणूक करायला विसरले नव्हते. दुसरे, जेव्हा त्यांची आनंद साजरा करण्याची वेळ होती, तेव्हा त्यांनी आपल्या येणाऱ्या पिढ्यांची चिंता केली. त्यांची इच्छा होती, की ज्या शाळेत ते शिकले, तिथल्या विद्यार्थ्यांचे आयुष्यही एक ‘उत्सव’ बनावे. आपल्या पत्रात , वरुण जी यांनी आपल्या पराक्रमाचे वर्णन केलेले नही, तर आपल्या अपयशांविषयी ते बोलले आहेत. आपल्या कमतरतांना त्यांनी आपल्या यशात कसे रूपांतरित केले, याविषयी त्यांनी लिहिलं आहे. या पत्रात एके ठिकाणी त्यांनी लिहिलं आहे—“एक सामान्य व्यक्ती असण्यात काहीही गैर नाही. प्रत्येक व्यक्ती शाळेत सर्वोत्तम कामगिरी करु शकत नाही. आणि प्रत्येक विद्यार्थी 90 टक्के गुण मिळवू शकत नाही. जर आपण हे करु शकलो, तर ती विलक्षण कामगिरी असेल आणि त्याचे कौतूक केलंच पाहिजे. मात्र, जर आपण ते करु शकलो नाही, तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आयुष्यभर सर्वसामान्य व्यक्तीच राहणार आहात. कदाचित शाळेत तुम्ही एक सामान्य विद्यार्थी असाल, मात्र त्यावरून तुमच्या पुढच्या आयुष्याचे कुठल्याही अर्थाने मोजमाप केले जाऊ शकत नाही. तुमच्या अंतःप्रेरणेचा शोध घ्या; ती कदाचित एखादी कला असू शकेल, संगीत, ग्राफीक डिझाईन, साहित्य असं काहीही.. जे काही काम तुम्ही कराल, त्यात संपूर्ण समर्पण द्या. तुमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. कधीही नकारात्मक विचार करु नका, की मी आणखी प्रयत्न करु शकलो असतो.”
–(“It is ok to be mediocre. Not everyone will excel at school and not everyone will be able to score in the 90s. If you do, it is an amazing achievement and must be applauded. However, if you don’t, do not think that you are meant to be mediocre. You may be mediocre in school but it is by no means a measure of things to come in life. Find your calling; it could be art, music, graphic design, literature, etc. Whatever you work towards, be dedicated, do your best. Never go to bed thinking, I could have put-in more efforts.)
मित्रांनो सामान्यापासून असामान्य बनण्याचा जो मंत्र त्यांनी दिला आहे, तो देखील तितकाच महत्वाचा आहे. याच पत्रात वरुण सिंग यांनी लिहिलं आहे–
“कधीच आशा सोडू नका. कधीच असा विचार करू नका की तुम्हाला जे करायचं आहे त्यात तुम्ही कमी पडाल. ते सोपं असणार नाही, त्यासाठी वेळ द्यावा लागेल आणि परिश्रम करावे लागतील. मी अतिसामान्य होतो, आणि आज, मी माझ्या कारकीर्दीत अनेक मैलाचे दगड पार केले आहेत. हा विचार करू नका की 12वी बोर्ड परीक्षेचे गुण हे ठरवतील की तुम्ही आयष्यात काय मिळवू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा आणि यासाठी मेहनत करा.”
“Never lose hope. Never think that you cannot be good at what you want to be. It will not come easy, it will take sacrifice of time and comfort. I was mediocre, and today, I have reached difficult milestones in my career. Do not think that 12th board marks decide what you are capable of achieving in life. Believe in yourself and work towards it.”
वरुण यांनी लिहिलं होतं की ते एका जरी विद्यार्थ्याला जरी प्रेरणा देऊ शकले, तरी ते देखील खूप असेल. मात्र, आज मी सांगू इच्छितो – त्यांनी संपूर्ण देशाला प्रेरणा दिली आहे. त्यांच्या पत्रात ते भलेही फक्त विद्यार्थ्यांशी बोलत आहे, पण त्यांनी आपल्या संपूर्ण समाजाला संदेश दिला आहे.
मित्रांनो, दर वर्षी मी अशाच विषयांवर विद्यार्थ्यांशी परीक्षेवर चर्चा करतो. या वर्षी देखील परीक्षांपुर्वी मी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा विचार करतो आहे. या कार्यक्रमासाठी दोन दिवसानंतर mygov.in वर नोंदणी देखील सुरु होणार आहे. ही नोंदणी 28 डिसेंबर पासून 20 जानेवारी पर्यंत चालेल. यात 9वी ते 12वी चे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी ऑनलाईन स्पर्धा देखील आयोजित केली जाईल. माझी इच्छा आहे की आपण सर्वांनी यात नक्की भाग घ्यावा. आपल्याला भेटण्याची संधी मिळेल. आपण सर्व मिळून परीक्षा, कारकीर्द, यश आणि विद्यार्थी जीवनाशी निगडीत अनेक पैलूंवर मंथन करू.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, ‘मन की बात’ मध्ये मी आपल्या सर्वांना काही तरी ऐकवणार आहे, जे सीमेपलीकडून खूप दुरून आलं आहे. ते आपल्याला आनंदितही करेल आणि आश्चर्यचकित देखील करेल:
Vocal #(VandeMatram)
वन्दे मातरम् । वन्दे मातरम्
सुजलां सुफलां मलयजशीतलाम्
शस्यशामलां मातरम् । वन्दे मातरम्
शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीं
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं
सुहासिनीं सुमधुर भाषिणीं
सुखदां वरदां मातरम् ।। १ ।।
वन्दे मातरम् । वन्दे मातरम् ।
मला खात्री आहे की, हे ऐकून तुम्हाला खूप चांगलं वाटलं असेल अभिमान वाटला असेल. वन्दे मातरम् मध्ये जो भाव दडलेला आहे, तो आपल्यात अभिमान आणि जोश जागवतो.
मित्रांनो, आपण नक्कीच हा विचार करत असाल, की हा सुंदर व्हिडीओ आहे तरी कुठला, कुठल्या देशातून आला आहे? याचं उत्तर तुम्हाला आणखी आश्चर्यचकित करेल. वन्दे मातरम् सादर करणारे हे विद्यार्थी ग्रीसचे आहेत. तिथे ते इलियाच्या उच्च माध्यमिक शाळेत शिकतात. त्यांनी ज्या सुंदरतेने आणि भावनेने ‘वंदे मातरम्’ गायलं आहे, ते अद्भुत आणि प्रशंसनीय आहे. असेच प्रयत्न दोन देशांच्या लोकांना आणखी जवळ आणतात. मी ग्रीसच्या या विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या शिक्षकांचं अभिनंदन करतो. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान केलेल्या त्यांच्या या प्रयत्नाची मी प्रशंसा करतो.
मित्रांनो, लखनौला राहणाऱ्या निलेशजींच्या एका पोस्टची देखील चर्चा करायची इच्छा आहे. निलेशजींनी लखनौ इथं झालेल्या एका आगळ्यावेगळ्या ड्रोन शो ची खूप प्रशंसा केली आहे. हा ड्रोन शो लखनौच्या रेसिडेन्सी भागात आयोजित केला गेला होता. 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामाची साक्ष रेसिडेन्सीच्या भिंतींवर आजही बघायला मिळते. रेसिडेन्सी मध्ये झालेल्या ड्रोन शो मध्ये भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे वेगवेगळे पैलू जिवंत केले गेले. मग ते ‘चौरी चौरा आन्दोलन’ असो, ‘काकोरी ट्रेन’ ची घटना असो किंवा मग नेताजी सुभाष यांचे दुर्दम्य साहस आणि पराक्रम असो, या ड्रोन शो ने सर्वांची मनं जिंकली. आपणही याप्रमाणे आपल्या शहरातील, गावातील, स्वातंत्र्य आंदोलनाशी निगडीत वैशिष्ट्यपूर्ण पैलू समोर आणू शकता. यात तंत्रज्ञानाची खूप मदत घेऊ शकता. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, आपल्याला स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृति जाग्या करण्याची संधी देतो, त्या अनुभवण्याची संधी देतो. देशासाठी नवे संकल्प करण्याची, काही तरी करण्याची इच्छाशक्ती दाखविण्याची हे प्रेरणादायी वेळ आहे, प्रेरणादायी उत्सव आहे. चला स्वातंत्र्यसंग्रामातल्या महान व्यक्तिमत्वांपासून प्रेरणा घेत राहू, देशासाठी आपले प्रयत्न आणखी मजबूत करूया.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपला भारत देश कितीतरी असामान्य प्रतिभांची खाण आहे, ज्यांचे कर्तृत्व इतरांना देखील काही तरी करून दाखविण्याची प्रेरणा देते. अशीच एक व्यक्ती आहे तेलंगणाचे डॉक्टर कुरेला विट्ठलाचार्य जी. त्याचं वय 84 वर्ष आहे. विट्ठलाचार्य जी याचं उदाहरण आहेत, की जेव्हा आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायची जिद्द असते, तेव्हा वय आडवं येत नाही. मित्रांनो, विट्ठलाचार्यजींची लहानपणापासून एक इच्छा होती की एक मोठं वाचनालय सुरु करावं. देश तेव्हा गुलामीत होता, काही परिस्थितीमुळे त्यांचं ते स्वप्न तेव्हा स्वप्नच राह्यलं. काळ पुढे सरकत गेला तसे विट्ठलाचार्य जी प्राध्यापक झाले, त्यांनी तेलगु भाषेचा सखोल अभ्यास केला आणि त्यातच अनेक रचनांची निर्मिती देखील केली. 6-7 वर्षांपूर्वी ते पुन्हा एकदा आपलं स्वप्न साकार करण्याच्या कामाला लागले. त्यांनी स्वतःची पुस्तकं वापरून वाचनालय सुरु केलं. आपली आयुष्याची सगळी कमाई त्यांनी या कामात लावली. हळूहळू लोक सोबत येत गेले आणि योगदान देऊ लागले. यदाद्रि-भुवनागिरी जिल्ह्याच्या रमन्नापेट भागातल्याया वाचनालयात आज जवळजवळ २ लाख पुस्तकं आहेत. विट्ठलाचार्य जी म्हणतात अभ्यास करताना त्यांना ज्या समस्यांना तोंड द्यावं लागलं ती वेळ कुणावरही यायला नको. त्यांना हे बघून आज खूप आनंद होतो की मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत आहे. त्यांच्या प्रयत्नांतून प्रेरणा घेऊन इतर गावातील लोक देखील वाचनालय उभारण्याच्या कामी लागले आहेत.
मित्रांनो, पुस्तकं -ग्रंथ काही फक्त ज्ञान देतात असं नाही तर व्यक्तिमत्व घडवण्याचं, आयुष्य घडवण्याचंही काम करतात, पुस्तक वाचण्याच्या छंदामुळं एका अवर्णनीय आनंदाची अनुभूती मिळते. आजकल मी पाहतो की, अनेक लोक आपण यावर्षी किती पुस्तकं वाचली हे अतिशय अभिमानानं सांगत असतात. तसंच आता यापुढे मला अमूक पुस्तकं वाचायची आहेत, असंही सांगतात. हा एक चांगला कल आहे आणि तो वाढला पाहिजे. मी ही ‘मन की बात’च्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही या वर्षात वाचलेल्या, आपल्याला आवडलेल्या पाच पुस्तकांविषयी सांगावं. यामुळे 2022मध्ये इतर वाचकांना चांगली पुस्तकं निवडण्यासाठी तुमची मदत होऊ शकेल. सध्याच्या काळामध्ये आपला ‘स्क्रिन टाइम’ थोडा जास्तच वाढतोय, त्यामुळे पुस्तक वाचन जास्तीत जास्त लोकप्रिय बनलं पाहिजे, यासाठीही आपण सर्वांनी मिळून, एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
अलिकडेच माझं लक्ष एका संस्थेनं सुरू केलेल्या वेगळ्या प्रयत्नाकडे वेधलं गेलं. हा प्रयत्न आपल्या प्राचीन ग्रंथांना आणि सांस्कृतिक मूल्यांना केवळ भारतामध्येच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये लोकप्रिय बनविण्यासाठी केला गेला आहे. पुण्यामध्ये भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही संस्था आहे. या संशोधन केंद्रामार्फत इतर देशांच्या लोकांना महाभारताच्या महत्वाविषयी परिचय करून देण्यासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केला आहे. तुम्हा लोकांना जाणून आश्चर्य वाटेल, हा अभ्यासक्रम अलिकडेच सुरू झालाय, मात्र यामध्ये जो अभ्यासक्रम शिकवला जातोय, तो तयार करण्याला प्रारंभ तर 100 वर्षांपूर्वी झाला होता. ज्यावेळी भांडारकर संस्थेने यासंबंधित अभ्यासक्रम सुरू केला, त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या अभिनव उपक्रमाविषयी मी इथं चर्चा करतोय, याचं कारण म्हणजे, लोकांना समजलं पाहिजे की, आपल्या परंपरेमधले वेगवेगळे पैलू कशाप्रकारे आधुनिक पद्धतीने प्रस्तुत केले जात आहेत. सातासमुद्रापल्याडच्या लोकांपर्यंत त्याचा लाभ कसा मिळू शकेल, यासाठीही नवोन्मेषी कल्पना, प्रत्यक्षात आणल्या जात आहेत.
मित्रांनो, आज संपूर्ण विश्वामध्ये भारतीय संस्कृतीविषयी अधिकाधिक माहिती घेण्यामध्ये लोकांची उत्सुकता वाढतेय. वेगवेगळ्या देशांच्या लोकांना फक्त आपली संस्कृती जाणून घेण्यामध्येच उत्सुकता आहे असे नाही, तर तिचा विस्तार करण्यासाठीही हे लोक मदत करीत आहेत. अशीच एक व्यक्ती आहे- सर्बियन स्कॉलर डॉक्टर मोमिर निकिच ! यांनी एक व्दिभाषी संस्कृत -सर्बियन शब्दकोश तयार केला आहे. या शब्दकोशामध्ये समाविष्ट केलेल्या संस्कृत 70 हजारपेक्षा जास्त शब्दांचा सर्बियन भाषेत अनुवाद केला गेला आहे. आपल्याला आणखी एक गोष्ट जाणून खूप नवल वाटेल, ते म्हणजे डॉक्टर निकिच यांनी वयाच्या 70 व्या वर्षी संस्कृत भाषा शिकली आहे. ते सांगतात की, त्यांनी महात्मा गांधी यांचे लेख वाचल्यामुळे, त्यांना संस्कृत भाषा शिकण्याची प्रेरणा मिळाली. अशाच प्रकारचं उदाहरण मंगोलियाचे 93 वर्षांचे प्राध्यापक जे गेंदेधरम यांचंही देता येईल. गेल्या चार दशकांमध्ये त्यांनी भारतातल्या जवळपास 40 प्राचीन ग्रंथ, महाकाव्ये आणि रचना यांचा मंगोलियन भाषेत अनुवाद केला आहे. आपल्या देशातही अशाप्रकारची जिद्द दाखवून कार्यरत असणारे अनेक लोक आहेत. मला गोव्यातल्या सागर मुळे जी यांच्या कामाविषयी, त्यांच्या प्रयत्नांविषयी माहिती घेण्याची संधी मिळाली. शेकडो वर्षांपूर्वीची प्राचीन ‘कावी’ ही चित्रशैली लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, त्या ‘कावी’ चित्रशैलीचं जतन करण्याच्या कामाला त्यांनी जणू स्वतःला वाहून घेतलं आहे. भारताचा प्राचीन इतिहास पाहिला तर आपल्याला ‘कावी’ चित्रकला दिसून येते, परंतु आता ही चित्रशैली लूप्तप्राय झाली आहे. वास्तविक ‘काव’ याचा अर्थ आहे लाल माती! प्राचीन काळामध्ये या कलेत लाल मातीचा उपयोग केला जात होता. गोव्यामध्ये पोर्तुगाल शासनकाळात तिथून पलायन करणा-या लोकांनी इतर राज्यांमध्ये या अद्भूत चित्रकलेचा परिचय इतरांना करून दिला. काळाच्या ओघात ही चित्रकला लुप्त होत होती. मात्र सागर मुळे यांनी या कलेला आता नवसंजीवनी दिली आहे. त्यांच्या या प्रयत्नांचं खूप कौतुकही होत आहे. मित्रांनो, एक अल्पसा प्रयत्न, आपण उचललेलं एक छोटं पाऊलसुद्धा आपल्या समृद्ध कलांचं संरक्षण करण्यासाठी मोठं योगदान देवू शकतं. जर आपल्या देशातल्या लोकांनी दृढ निश्चय केला तर आपल्या प्राचीन समृद्ध कलांचे संवर्धन, जतन करण्यासाठी या प्रयत्नांना देशभरामध्ये एक जन आंदोलनाचं स्वरूप येवू शकतं. देशभरामध्ये अशा प्रकारे अनेक प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही याविषयी तुम्हाला असलेली माहिती नमो अॅपच्याव्दारे माझ्यापर्यंत जरूर पोहोचवावी.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, अरूणाचल प्रदेशातल्या लोकांनी एक वर्षापासून एक आगळं –वेगळं अभियान चालवलं आहे. आणि त्याला नाव दिले आहे ‘‘ अरूणाचल प्रदेश एयरगन सरेंडर अभियान’ या मोहिमेमध्ये लोक आपण स्वतःहून, स्वमर्जीनं आपली एयरगन समर्पित करीत आहेत. यामागे कारण काय आहे, माहिती आहे? अरूणाचल प्रदेशात होणारी पक्षांची बेहिशेबी शिकार रोखली जावी, हे यामागचे कारण आहे. मित्रांनो, अरूणाचल प्रदेशात 500 पेक्षांही अधिक प्रकारच्या पक्ष्यांचा अधिवास असतो. यापैकी काही प्रजातीचे पक्षी तर जगामध्ये इतरत्र कोणत्याही स्थानी सापडत नाहीत. मात्र हळूहळू आता जंगलांमध्ये पक्ष्यांची संख्या कमी होत चालली आहे. यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ‘एयरगन सरेंडर’ मोहीम सुरू आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये डोंगराळ भागापासून ते पठारी प्रदेशापर्यंत एका समाजापासून ते दुस-या समाजापर्यंत, राज्यामध्ये चौहो बाजूंच्या लोकांनी या अभियानाला अगदी मनापासून पाठिंबा, समर्थन दिलं आहे. अरूणाचलच्या लोकांनी स्वखुशीने आत्तापर्यंत 1600 पेक्षा जास्त एअरगन समर्पित केल्या आहेत. या कार्यासाठी मी अरूणाचलच्या लोकांचे कौतुक करतो. त्यांचे अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आपल्या सर्वांकडून 2022 या वर्षासंबंधित असंख्य संदेश आणि शिफारसी, सल्लेही आले आहेत. एक विषय प्रत्येकवेळेप्रमाणे अधिकांश लोकांनी पाठवलेल्या संदेशांमध्ये आहे. हा विषय आहे, स्वच्छता आणि स्वच्छ भारताचा. स्वच्छतेचा हा संकल्प स्वयंशिस्तीनं , सजगतेनं आणि समर्पणानंच पूर्ण होवू शकणार आहे. आपण एनसीसीम्हणजेचराष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या पुनीत सागर अभियानमध्ये याची झलक पाहू शकता. या अभियानामध्ये 30 हजारांपेक्षा जास्त एनसीसी कॅडेटस् सहभागी झाले आहेत. एनसीसीच्या या छात्रांनी अनेक ठिकाणी ......सफाई केली, प्लास्टिक कचरा काढून तो रिसायकलिंगसाठी एकत्रित केला. आपले ... आपले डोंगर, जर स्वच्छ असतील तरच ते फिरायला जाण्यालायक असतात. अनेक लोक काही विशिष्ट ठिकाणी फिरायला जाण्याचं स्वप्न आयुष्यभर पहात असतात. मात्र ज्यावेळी तिथं जातात, त्यावेळी समजून किंवा न समजून तिथे कचरा करून येतात. वास्तविक ही प्रत्येक देशवासियाची जबाबदारी आहे की, ज्या स्थानी गेल्यानंतर आपल्याला खूप आनंद मिळतो, ते स्थान आपल्याकडून तरी अस्वच्छ, घाण केलं जावू नये.
मित्रांनो, मला ‘साफवॉटर’ या नावाच्या एका स्टार्टअपविषयी माहिती मिळाली आहे. हे स्टार्टअप काही युवकांनी सुरू केलं आहे. याचं काम आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्सच्या मदतीनं चालतं. लोकांना त्यांच्या परिसरातल्या पाण्याची शुद्धता आणि गुणवत्ता यांच्यासंबंधी माहिती यातून मिळू शकते. ही गोष्ट म्हणजे स्वच्छता अभियानातला पुढचा टप्पा आहे. लोकांच्या स्वच्छ आणि आरोग्यदायी भविष्यासाठी या स्टार्टअपचं महत्व लक्षात घेवून त्याला एक जागतिक पुरस्कारही मिळाला आहे.
मित्रांनो, ‘एक पाऊल स्वच्छतेच्या दिशेने’ या प्रयत्नांमध्ये संस्था असो अथवा सरकार, सर्वांची भूमिका महत्वपूर्ण आहे. तुम्ही सर्व मंडळी जाणताच की, आधी सरकारी कार्यालयांमध्ये जुन्या फायली आणि कागदपत्रांचा कितीतरी मोठा ढीग रचून ठेवलेला असायचा. ज्यावेळेपासून सरकारने जुनी कामाची पद्धत बदलण्यास प्रारंभ केला आहे, त्यावेळेपासून या फायली आणि कागदपत्रांचे ढीग डिजिटाईज होवून संगणकाच्या ‘फोल्डर’ मध्ये सामावले जात आहेत. जे काही जुने आणि प्रलंबित कामांचे साहित्य , कागदपत्रे आहेत, ते सर्व हटविण्यासाठी मंत्रालये आणि विभागांमध्ये विशेष मोहिमा राबविल्या जात आहेत. या सफाई मोहिमांमुळे काही रंजक गोष्टीही घडल्या आहेत. टपाल विभागानं ज्यावेळी असं स्वच्छता अभियान सुरू केलं त्यावेळी ‘जंकयार्ड’ पूर्णपणे मोकळं झालं. आता या जंकयार्डचं रूपांतर कोर्टयार्ड आणि कॅफेटेरिया मध्ये झालं आहे. आणखी एक जंकयार्ड मोकळं झाल्यानं ती जागा दुचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी वापरली जावू लागली. याचप्रमाणं पर्यावरण मंत्रालयानं आपल्याकडे मोकळ्या झालेल्या जंकयार्डच्या जागेचं वेलनेस केंद्रामध्ये रूपांतर केलं आहे. शहरी कार्य मंत्रालयानं तर एक स्वच्छ एटीएमही लावलं आहे. यामागे उद्देश असा आहे की, लोकांनी कचरा द्यावा आणि त्या बदल्यात रोख रक्कम घेवून जावी. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या विभागांनी झाडांची पडणारी सुकलेली पाने आणि जैविक कचरा यांचं जैविक खत बनवण्यास प्रारंभ केला आहे. या विभागांनी वाया जाणा-या कागदांपासून लागणारी स्टेशनरीही बनवण्याचं काम सुरू केलं आहे. आमच्या सरकारी विभागांमध्येही स्वच्छतेसारख्या विषयांवर असंख्य प्रकारच्या नवसंकल्पना राबविल्या जावू शकतात, हे दिसून येतंय. काही वर्षांपूर्वी तर असे काही होवू शकेल, याविषयी कोणाला भरवसाही नव्हता. मात्र आज या सर्व गोष्टी व्यवस्थेचा हिस्सा बनत चालल्या आहेत. हाच तर देशाचा नवीन विचार आहे, आणि या विचाराचे नेतृत्व सर्व देशवासी मिळून करीत आहेत.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, ‘मन की बात’मध्ये यावेळी आपण अनेक विषयांवर चर्चा केली. प्रत्येकवेळे प्रमाणे एक महिन्यानंतर, आपण पुन्हा भेटणार आहोत. परंतु 2022 मध्ये! प्रत्येकवेळी नव्याने प्रारंभ करताना आपल्याला स्वतःचे सामर्थ्य ओळखण्याची एक संधी मिळत असते. जे लक्ष्य आपण गाठू अशी आपला आधी कल्पनाही करू शकलो नव्हतो, आज देश त्यासाठी प्रयत्न करीत आहे. आपल्याकडे असे म्हटले आहे की –
क्षणश: कणशश्चैव, विद्याम् अर्थं च साधयेत् |
क्षणे नष्टे कुतो विद्या, कणे नष्टे कुतो धनम् ||
याचा अर्थ असा आहे की, ज्यावेळी आपल्याला विद्यार्जन करायचे असते, नवीन काही शिकायचे आहे, करायचे आहे, तर आपल्याला प्रत्येक क्षणाचा उपयोग केला पाहिजे. आणि ज्यावेळी आपल्यला धर्नाजन करायचे आहे, म्हणजेच आपल्याला उन्नती- प्रगती करायची असेल तर प्रत्येक कणाचा याचा अर्थ प्रत्येक स्त्रोतांचा, साधनांचा योग्यप्रकारे उपयोग केला पाहिजे. कारण क्षण वाया गेला तर विद्या आणि ज्ञान निघून जाईल आणि कण नष्ट झाला तर धन नष्ट होईल आणि प्रगतीचे मार्ग बंद होतील. ही गोष्ट आपणा सर्व देशबांधवांसाठी प्रेरणा देणारी आहे. आपल्याला तर आणखी खूप काही शिकायचं आहे. नवनवीन संकल्पना, नवोन्मेषी कल्पना राबवायच्या आहेत, नवनवीन लक्ष्य प्राप्त करायची आहेत. म्हणूनच आपल्याला एक क्षणही वाया घालवून चालणार नाही. आपल्याला देशाला विकासाच्या नवीन उंचीवर घेवून जायचे आहे. म्हणूनच आपल्याला प्रत्येक स्त्रोतांचा, साधनसामुग्रीचा वापर करायचा आहे. हा तर एका दृष्टीने आत्मनिर्भर भारताचाही मंत्र आहे. कारण आपण ज्यावेळी आपल्या स्त्रोतांचा योग्यप्रकारे वापर करू, त्यांना वाया जावू देणार नाही, त्याचवेळी आपण स्थानिक गोष्टींची ताकद ओळखू शकणार आहोत. त्याचवेळी देश आत्मनिर्भर होणार आहे. म्हणूनच, चला तर मग, आपण आपल्या संकल्पांचे पुनरूच्चारण करू या. खूप भव्य, मोठा विचार करूया, मोठी स्वप्ने पाहूया आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करूया! आणि आपली स्वप्ने काही केवळ आपल्यापुरती मर्यादित असणार नाहीत. आपली स्वप्ने अशी असतील की, त्याच्याशी आपल्या समाजाचा आणि देशाचा विकास जोडला गेला पाहिजे. आपली प्रगती म्हणजे देशाच्या प्रगतीचे मार्ग मोकळे करणारी असली पाहिजे. म्हणूनच आपल्याला आजच कामाला लागले पाहिजे. अगदी एक क्षण आणि एक कणही आपण गमावून चालणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे की, या संकल्पाबरोबरच आगामी वर्षामध्ये देश खूप पुढे जाईल आणि 2022 हे वर्ष एका नव्या भारताच्या निर्माणाचे स्वर्णिम पृष्ठ बनेल. याच विश्वासाबरोबर आपल्या सर्वांना 2022 वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा! खूप खूप धन्यवाद!!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा मन की बात साठी एकमेकांसमोर आलो आहोत. अवघ्या दोन दिवसानंतर डिसेंबर महिना सुरू होणार आहे आणि डिसेंबर महिना आला की मनाला असे वाटू लागते की चला, हे वर्ष संपले. हा वर्षाचा शेवटचा महिना आहे आणि या महिन्यात आपण नव्या वर्षासाठीचे संकल्प विचारात घेऊ लागतो. या महिन्यात आपला देश नौदल दिवस आणि सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करतो. येत्या 16 डिसेंबर रोजी आपला देश 1971च्या युद्धाचे स्वर्ण जयंती वर्ष साजरे करत आहे, हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. या सर्व दिनविशेषांनिमित्त मी देशाच्या संरक्षण दलांचे स्मरण करतो, आपल्या वीरांचे स्मरण करतो. आणि विशेष म्हणजे अशा वीरांना जन्म देणाऱ्या वीर मातांचे स्मरण करतो. नेहमीप्रमाणेच या वेळीसुद्धा मला नमो ॲप आणि माय गव्ह वर आपणा सर्वांकडून अनेक सूचना प्राप्त झाल्या आहेत. आपण सर्वांनीच मला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानले आहे आणि आपल्या आयुष्यातली सुख-दुःखे माझ्यासोबत वाटून घेतली आहेत. या सर्वांमध्ये अनेक युवा आहेत, विद्यार्थी- विद्यार्थिनी आहेत. मन की बात चे आपले हे कुटुंब सातत्याने वाढते आहे, मनांशीही जोडले जाते आहे, उद्दिष्टांनीही जोडले जाते आहे आणि परिणामी दृढ होणाऱ्या आपल्या या नात्यामुळे आपल्या अंतर्मनात सातत्याने सकारात्मकतेचा एक प्रवाह खेळता राहतो आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, सीतापूरच्या ओजस्वींनी मला लिहिले आहे की, अमृत महोत्सवाशी संबंधित चर्चा त्यांना खूप आवडते. ते आपल्या मित्रांसोबत 'मन की बात' ऐकतात आणि स्वातंत्र्यलढ्याबद्दल खूप काही जाणून घेण्याचा, शिकण्याचा सतत प्रयत्न करत करत असतात. मित्रांनो, अमृत महोत्सव हा शिकण्यासोबतच देशासाठी काहीतरी करण्याचीही प्रेरणा देतो आणि आता तर देशभरातील सामान्य जनता असो वा सरकारे असो, पंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वत्र अमृत महोत्सवाचाच गाजावाजा सुरू आहे आणि या उत्सवाशी जोडलेले कार्यक्रम सतत सुरू आहेत. असाच एक रंजक कार्यक्रम नुकताच दिल्लीत पार पडला. “आजादी की कहानी-बच्चों की जुबानी” असे नाव असणाऱ्या या कार्यक्रमात मुलांनी स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित कथा अगदी मनापासून सादर केल्या. विशेष म्हणजे यात भारताबरोबरच नेपाळ, मॉरिशस, टांझानिया, न्यूझीलंड आणि फिजी येथील विद्यार्थीही सहभागी झाले. ओएनजीसी ही आपल्या देशातील महारत्न कंपनी. ही ओएनजीसी कंपनीसुद्धा अभिनव पद्धतीनेअ मृत महोत्सव साजरा करत आहे. अलिकडे ओएनजीसी आपल्या विद्यार्थ्यांसाठी तेल क्षेत्रात अभ्यास दौरे आयोजित करत आहे. या दौऱ्यांमध्ये तरुणांना ओएनजीसी तेल क्षेत्रातील कामांबद्दल माहिती दिली जात आहे. आमच्या नवोदित अभियंत्यांना राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नांमध्ये उत्साहाने आणि उत्कटतेने यात योगदान देता यावे, हा यामागचा उद्देश आहे.
मित्रहो, आदिवासी समाजाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान लक्षात घेत देशाने आदिवासी गौरव सप्ताहसुद्धा साजरा केला आहे. देशाच्या विविध भागांत यासंबंधीचे कार्यक्रम सुद्धा झाले. अंदमान आणि निकोबार बेटांवर, जारवा आणि ओंगे अशा आदिवासी समुदायांच्या लोकांनी त्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. हिमाचल प्रदेशातील उना येथील लघुलेखक राम कुमार जोशी यांनी सुद्धा एक अद्भुत काम केले आहे. त्यांनी टपाल तिकिटांवरच, म्हणजे इतक्या लहान टपाल तिकिटांवरच नेताजी सुभाषचंद्र बोस आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची अनोखी रेखाचित्रे रेखाटली आहेत. हिंदीत लिहिलेल्या 'राम' या शब्दावर त्यांनी रेखाटने केली असून त्यात दोन्ही महापुरुषांचे चरित्रही थोडक्यात नोंदवले आहे. मध्य प्रदेशातील कटनी येथील काही सहकाऱ्यांनीसुद्धा एका अविस्मरणीय दास्तानगोई कार्यक्रमाची माहिती दिली आहे. यामध्ये राणी दुर्गावतीच्या दुर्दम्य साहसाच्या आणि त्यागाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. असाच एक कार्यक्रम काशीमध्ये सुद्धा आयोजित करण्यात आला. गोस्वामी तुलसीदास, संत कबीर, संत रविदास, भारतेंदू हरिश्चंद्र, मुन्शी प्रेमचंद आणि जयशंकर प्रसाद या महान व्यक्तींच्या स्मरणार्थ तीन दिवस चालणाऱ्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वांनी वेगवेगळ्या काळात देशात जनजागृती घडवून आणण्यात मोठी भूमिका निभावली आहे. तुम्हाला आठवत असेल की, 'मन की बात'च्या मागच्या भागात मी तीन स्पर्धांचा उल्लेख केला होता, पहिली म्हणजे देशभक्तीपर गीत लेखन, दुसरी म्हणजे देशभक्तीशी संबंधित, स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित घटनांवर आधारित रांगोळ्या काढणे आणि तिसरी म्हणजे आपल्या मुलांच्या मनात भव्य भारताची स्वप्ने जागवण्यासाठी अंगाई लिहिणे. या स्पर्धेसाठी तुम्ही सुद्धा निश्चितच प्रवेशिका पाठवल्या असतील, अशी आशा मला वाटते. तुम्ही विचार केला असेल आणि तुमच्या सहकाऱ्यांसोबत सुद्धा चर्चा केली असेल. भारताच्या कानाकोपऱ्यात तुम्ही हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने नक्कीच पुढे न्याल, अशी आशा मला वाटते.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, या चर्चेतून आता मी तुम्हाला थेट वृंदावनात घेऊन जाणार आहे. वृंदावनाबद्दल असे म्हटले जाते की ते भगवंताच्या प्रेमाचे प्रत्यक्ष स्वरूप आहे. आपल्या संतांनीही म्हटले आहे,
यह आसा धरि चित्त में, यह आसा धरि चित्त में,
कहत जथा मति मोर |
वृंदावन सुख रंग कौ, वृंदावन सुख रंग कौ,
काहु न पायौ और |
म्हणजे वृंदावनाची महती, आपण सगळे आपापल्या कुवतीनुसार वर्णन करतो, पण वृंदावनाचे जे सुख आहे, इथला जो रस आहे, त्याचा अंत कोणालाही जाणता येणार नाही. येथील सुख अमर्याद आहे. त्यामुळेच वृंदावन जगभरातील लोकांना आकर्षित करत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला त्याचा प्रभाव दिसून येईल.
पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये पर्थ नावाचे एक शहर आहे. क्रिकेटप्रेमी या जगताशी चांगलेच परिचित असतील, कारण पर्थमध्ये वरचेवर क्रिकेटचे सामने होत असतात. पर्थमध्ये 'सॅक्रेड इंडिया गॅलरी' या नावाचे एक कलादालनही आहे. स्वान नामक दरीच्या सुंदर परिसरात हे कलादालन तयार करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियातील रहिवासी जगत तारिणी दासी यांच्या प्रयत्नांचे हे फळ आहे. जगत तारिणी खरे तर ऑस्ट्रेलियाच्या आहेत. त्यांचा जन्मही तिथेच झाला, तिथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. पण त्यांनी 13 वर्षांपेक्षा जास्त काळ वृंदावनात व्यतीत केला. त्या म्हणतात की त्या ऑस्ट्रेलियात परतल्या, आपल्या देशात परतल्या, पण त्या वृंदावनाला विसरू शकल्या नाहीत. त्याचमुळे वृंदावन आणि तिथल्या आध्यात्मिक भावनेशी जुळल्यासारखे वाटत राहावे, या भावनेतून त्यांनी ऑस्ट्रेलियातच वृंदावन वसवले. आपल्या कलेच्याच माध्यमातून त्यांनी अद्भूत असे वृंदावन घडवले. येथे येणाऱ्या लोकांना विविध प्रकारच्या कलाकृती पाहण्याची संधी मिळते. त्यांना भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांचे - वृंदावन, नवाद्वीप आणि जगन्नाथपुरी येथील परंपरांचे आणि संस्कृतीचे दर्शन घडते. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाशी संबंधित अनेक कलाकृतीही येथे प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. एका कलाकृतीमध्ये भगवान श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला आहे आणि त्याच्या खाली वृंदावनातील लोकांनी आश्रय घेतला आहे. जगत तारिणीजींचा हा अप्रतिम प्रयत्न, खरोखरच, आपल्याला कृष्णभक्तीच्या सामर्थ्याचे दर्शन घडवतो. या प्रयत्नाबद्दल मी त्यांना अनेकानेक शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आताच मी ऑस्ट्रेलियामध्ये पर्थ येथील वृंदावनबद्दल बोलत होतो. इतिहासातील आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि आपल्या बुंदेलखंडच्या झाशीचेही एक वेगळे नाते आहे. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध कायदेशीर लढा देत होत्या तेव्हा त्यांचे वकील जॉन लँग होते. हे जॉन लँग मूळचे ऑस्ट्रेलियाचे रहिवासी होते. भारतात राहून त्यांनी राणी लक्ष्मीबाईंचा खटला लढवला होता. आपल्या स्वातंत्र्यलढ्यात झाशी आणि बुंदेलखंडचे योगदान आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. राणी लक्ष्मीबाई, झलकारीबाई यांसारख्या विरांगनाही येथे घडल्या आणि मेजर ध्यानचंद यांच्यासारखी क्रीडारत्नेही या प्रदेशाने देशाला दिली आहेत.
मित्रांनो, शौर्य केवळ रणांगणावरच गाजवले जाते, असे नाही. शौर्य हे व्रत म्हणून स्वीकारले जाते आणि त्याचा विस्तार होत जातो, तेव्हा प्रत्येक क्षेत्रात अनेक कामे मार्गी लागतात. अशा शौर्याबाबत श्रीमती ज्योत्स्ना यांनी मला पत्र लिहिले आहे. जालौनमध्ये पुरातन काळापासून नून नावाची एक नदी होती. ही नदीच येथील शेतकर्यांसाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत होती. मात्र कालांतराने ही नून नदी नामशेष होईल, असे चित्र दिसू लागले. या नदीचे जे लहानसे पात्र उरले होते, ते नाल्यासारखे होऊ लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला होता. ही परिस्थिती बदलण्यासाठी जालौनच्या लोकांनी पुढाकार घेतला. याच वर्षी मार्चमध्ये यासाठी समिती स्थापन करण्यात आली. या मोहिमेत हजारो ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. येथील पंचायतींनी ग्रामस्थांच्या सहकार्याने काम सुरू केले आणि आज एवढ्या कमी वेळात आणि अत्यंत कमी खर्चात नदीला पुन्हा जीवदान मिळाले आहे. अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ होतो आहे. रणांगणाव्यतिरिक्त गाजवलेल्या शौर्याचे हे उदाहरण आपल्या देशवासीयांच्या संकल्प शक्तीचे दर्शन घडवते. आपण दृढनिश्चय केला तर अशक्य असे काहीच नाही, हेच यातून दिसून येते आणि यालाच मी म्हणतो - सर्वांचे प्रयत्न, सबका प्रयास.
माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा आपण निसर्गाचे रक्षण करतो, त्या बदल्यात निसर्गही आपले संरक्षण करतो, आपल्याला सुरक्षा प्रदान देतो. अनेकदा वैयक्तिक आयुष्यातही आपल्याला हे अनुभवता येते. तामिळनाडूच्या जनतेने असाच एक आदर्श घालून दिला आहे. तामिळनाडूच्या तुतूकुडी जिल्ह्यातले हे उदाहरण आहे. आपल्याला ठाऊक आहे की किनारपट्टीच्या भागातील जमीन काही वेळा पाण्याखाली जाण्याची शक्यता असते. तुतूकुडीमध्येही अनेक छोटी बेटे आणि भूभाग होते, ज्यांना समुद्रात बुडण्याचा धोका वाढत होता. निसर्गाच्याच माध्यमातून या नैसर्गिक आपत्तीपासून कसा बचाव करायचा, हे येथील लोकांनी आणि तज्ज्ञांनी शोधून काढले. हे लोक आता या बेटांवर पाल्मिराची झाडे लावत आहेत. ही झाडे चक्रीवादळे आणि वादळातही ठाम उभी राहतात आणि जमिनीचे संरक्षण देतात. त्यामुळे आता हा परिसर वाचवता येईल, असा नवा विश्वास निर्माण झाला आहे.
मित्रहो, जेव्हा आपण निसर्गाचे संतुलन बिघडवतो किंवा त्याचे पावित्र्य नष्ट करतो, तेव्हाच आपल्याला निसर्गापासून धोका उद्भवतो. मातेप्रमाणे निसर्गही आपले पालन पोषण करतो आणि आपल्या जगात नवनवे रंग भरतो. अलिकडेच मी सोशल मीडियावर पाहत होतो. मेघालयातील एका होडीचा फोटो खूप व्हायरल होतो आहे. हे छायाचित्र आपले लक्ष वेधून घेते. तुमच्यापैकी बहुतेकांनी ते ऑनलाइन पाहिले असेल. हवेत तरंगणारी ही बोट जवळून पाहिल्यावर लक्षात येते की ती नदीच्या पाण्यात फिरते आहे. नदीचे पाणी इतके स्वच्छ आहे की आपल्याला तिचा तळ दिसतो आणि बोट हवेत तरंगत असल्याप्रमाणे दिसू लागते. आपल्या देशात अनेक राज्ये आहेत, अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे लोकांनी आपल्या नैसर्गिक वारशाच्या रंगांची जोपासना केली आहे. निसर्गाशी तादात्म्य पावणारी जीवनशैली या लोकांनी आजही जिवंत ठेवली आहे. आपल्या सर्वांसाठीही हे प्रेरक आहे. आपल्या आजूबाजूला जे नैसर्गिक स्रोत आहेत, ते आपण जपले पाहिजेत, त्यांना पुन्हा मूळ स्वरूपात आणले पाहिजे. यातच आपल्या सर्वांचे हित आहे, जगाचे हित आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा सरकार योजना बनवते, अर्थसंकल्पातून खर्च करते, प्रकल्प वेळेवर पूर्ण करते, तेव्हा लोकांना वाटते की ते काम करत आहे. मात्र अनेक सरकारी कामांमध्ये, विकासाच्या अनेक योजना राबविताना मानवी संवेदनांशी निगडित कामे नेहमीच अनोखा आनंद देतात. सरकारच्या प्रयत्नांमुळे, सरकारच्या योजनांमुळे जीवनात कसे बदल झाले, त्या बदललेल्या जगण्याचा अनुभव काय? हे ऐकून आपणही भावविभोर होतो. त्यातून मनाला समाधानही मिळते आणि ती योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणाही मिळते. म्हणजेच असे करणे एका अर्थाने 'स्वांत: सुखाय' आहे आणि म्हणूनच आज "मन की बात" मध्ये दोन सहकारी आज आपल्यासोबत आहेत जे निव्वळ हिमतीच्या बळावर एक नवे आयुष्य जिंकून आले आहेत. आयुष्मान भारत योजनेच्या सहाय्याने त्यांनी उपचार केले आणि नव्या आयुष्याला सुरूवात केली. आमचे पहिले सहकारी आहेत, राजेश कुमार प्रजापती आहे, जे हृदयरोगाने त्रासले होते.
चला तर मग, राजेश जीं सोबत गप्पा मारूया -
पंतप्रधान – राजेश जी नमस्कार.
राजेश प्रजापती – नमस्कार सर नमस्कार.
पंतप्रधान – राजेश जी तुम्ही कशामुळे आजारी होता? मग तुम्ही कुठल्यातरी डॉक्टरकडे गेला असाल. जरा मला समजावून सांगा, स्थानिक डॉक्टरांनी काही सांगितले असले, मग तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे गेला असाल? मग तुम्हाला निर्णय घेता येत नसता, किंवा निर्णय देता आला असता तर काय केले असते? काय विचार केला होता तुम्ही?
राजेश प्रजापती – सर, माझ्या हृदयात दोष निर्माण झाला होता. माझ्या छातीत जळजळ होत असे. डॉक्टरना दाखवले तर आधी ते म्हणाले की बाळा, तुला पित्ताचा त्रास होत असे. मग त्यानंतर अनेक दिवस मी पित्ताच्या गोळ्या घेतल्या. पण मला त्याचा काहीच फायदा झाला नाही. मग डॉक्टर कपूर यांना दाखवले तर ते म्हणाले की तुझी जी लक्षणे आहेत, त्यानुसार angiography केली तर दोष कळून येईल. त्यांनी मला श्री राम मूर्ति यांच्याकडे पाठवले. त्यानंतर अमरेश अग्रवाल यांची भेट घेतली आणि त्यांनी माझी angiography केली. ते म्हणाले की तुझ्या रक्तवाहिनीत ब्लॉकेज आहे. आम्ही विचारले की साहेब किती खर्च येईल? तर त्यांनी विचारले की आयुष्मान कार्ड आहे का तुझ्याकडे, जे पंतप्रधानांनी दिले आहे. मग मी म्हणालो की हो, माझ्याकडे कार्ड आहे. मग त्यांनी माझे ते कार्ड घेतले आणि माझे सर्व उपचार त्या कार्डाच्या माध्यमातूनच केले. सर आणि तुम्ही हे कार्ड खूप चांगल्या पद्धतीने बनवले आहे आणि ते आमच्यासारख्या गरीब लोकांसाठी खूपच सोयीचे आहे. मी तुमचे आभार कसे मानू...
पंतप्रधान – राजेश जी, तुम्ही काय करता?
राजेश प्रजापती – सर, सध्या मी खाजगी नोकरी करतो.
पंतप्रधान – आणि तुमचे वय किती?
राजेश प्रजापती – मी एकोणपन्नास वर्षांचा आहे सर.
पंतप्रधान– इतक्या लहान वयात तुम्हाला हृदयाशी
संबंधित आजार झाला..
राजेश प्रजापती – हो सर. आता काय बोलायचे
पंतप्रधान – तुमच्या कुटुंबात तुमच्या आईला, वडीलांना
किंवा इतर कोणाला असा आजार होता का?
राजेश प्रजापती – नाही सर, कोणालाच नव्हता. मलाच पहिल्यांदा हा आजार झाला.
पंतप्रधान – हे आयुष्मान कार्ड. भारत सरकार हे कार्ड देते, गरीबांसाठी ही एक फार मोठी योजना आहे. तुम्हाला त्याबद्दल कसे समजले
राजेश प्रजापती – सर, ही एवढी मोठी योजना आहे, गरिबांना याचा खूप फायदा होतो आणि खूप आनंद होतो सर, या कार्डचा लोकांना किती फायदा होतो, हे आम्ही हॉस्पिटलमध्ये पाहिले आहे. जेव्हा रूग्ण डॉक्टरला सांगतात की माझ्याकडे कार्ड आहे, तेव्हा, सर, डॉक्टर म्हणतात ठीक आहे ते कार्ड घेऊन या. त्याच कार्डचा वापर करून मी तुमच्यावर उपचार करीन.
पंतप्रधान – बरं. कार्ड नसतं तर डॉक्टरने तुम्हाला किती खर्च सांगितला होता?
राजेश प्रजापती – डॉक्टर म्हणाले होते की बेटा खूप खर्च येईल. कार्ड नसेल तर. मग मी म्हणालो की सर माझ्याकडे एक कार्ड आहे. तर ते म्हणाले, लगेच दाखवा बरे. मग मी लगेच ते कार्ड दाखवले आणि त्याच कार्डवर सगळे उपचार झाले. माझा एक पैसाही खर्च झाला नाही, सर्व औषधेसुद्धा त्याच कार्डवरून मिळाली आहेत.
पंतप्रधान– मग राजेश, आता तुम्ही खुश आहात, तब्येत ठीक आहे तुमची?
राजेश प्रजापती – हो सर. तुमचे मनापासून आभार. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. तुम्हीच सतत सत्तेवर राहा. आणि आमच्या कुटुंबातले लोक सुद्धा तुमच्यावर इतके खुश आहेत की तुम्हाला काय सांगू?
पंतप्रधान - राजेशजी, तुम्ही मला सत्तेत राहण्यासाठी शुभेच्छा देऊ नका, मी आजही सत्तेत नाही आणि भविष्यातही सत्तेमध्ये जायची माझी इच्छा नाही. मला केवळ सेवेत रहायचे आहे, माझ्या साठी हे पद, हे पंतप्रधान या सर्व गोष्टी सत्तेसाठी नाहीत, तर सेवेसाठी आहेत.
राजेश प्रजापति - आम्हा लोकांना सेवाच तर हवी आहे आणि काय
पंतप्रधान - बघा, गरीबांसाठीही आयुष्मान भारत योजना
राजेश प्रजापति - हो, सर, खूप चांगली गोष्ट आहे
पंतप्रधान - मात्र हे पहा, राजेशजी, तुम्ही आमचे एक काम कराल ?
राजेशप्रजापति - हो, नक्की करेन, सर
पंतप्रधान - हे पहा, होतं काय की लोकांना याची माहिती नसते, तुम्ही एक जबाबदारी पार पाडा,तुमच्या आजूबाजूला अशी जितकी गरीब कुटुंबे आहेत, त्यांना तुम्ही सांगा,तुम्हाला याचा कसा लाभ झाला, कशी मदत झाली ?
राजेश प्रजापति - हो, नक्की सांगेन, सर .
पंतप्रधान - आणि त्यांना सांगा की तुम्ही देखील असं कार्ड बनवून घ्या, कारण कुटुंबावर कधी कसे संकट कोसळेल सांगता येत नाही आणि आजच्या स्थितीत गरीब माणूस औषधांपासून वंचित राहणे हे बरोबर नाही. आता पैशांमुळे तो औषधे घेत नसेल किंवा आजारावर उपचार घेत नसेल तर ती मोठी चिंतेची बाब आहे. आणि गरीबांचे काय असतं, उदा. तुम्हाला हृदयरोगाचा त्रास आहे, तर किती महिने तुम्ही काम करू शकला नसाल.
राजेश प्रजापति - मी तर दहा पावलं देखील चालू शकत नव्हतो, जिने चढू शकत नव्हतो, सर .
पंतप्रधान - तर मग राजेशजी, तुम्ही माझे एक चांगले सहकारी बनून किती गरीबांना तुम्ही या आयुष्मान भारत योजने बाबत समजावू शकाल, अशा आजारी लोकांची मदत करू शकाल हे पहा, तुम्हालाही आनंद होईल आणि मला खूप आनंद होईल कि चला, राजेशजींची तब्येत तर सुधारली मात्र राजेशजींनी शेकडो लोकांची तब्येत सुधारण्यात मदत केली, ही आयुष्मान भारत योजना, ही
गरीबांसाठी आहे, मध्यमवर्गासाठी आहे, सामान्य कुटुंबासाठी आहे, त्यामुळे ती घरोघरी तुम्ही पोहचवाल.
राजेश प्रजापति – नक्की पोहचवेन, सर. मी तिथे रुग्णालयात तीन दिवस होतोना, तेव्हा सर, गरीब बिचारे खूप लोक तिथे आले होते, त्यांना सगळे फायदे सांगितले, कार्ड असेल तर मोफत उपचार होतील.
पंतप्रधान - चला, राजेशजी,तुम्ही स्वतःची तब्येत सांभाळा, थोडी शरीराची काळजी घ्या, मुलांची काळजी घ्या आणि खूप प्रगती करा, माझ्या कडून तुम्हाला खूप शुभेच्छा.
मित्रांनो, आपण राजेशजी काय म्हणाले ते ऐकलं, चला आता आपल्याबरोबर सुखदेवीजी सहभागी होत आहेत, गुडघ्याच्या दुखण्याने त्या त्रस्त होत्या, चला आपण सुखदेवीजी यांच्याकडून त्यांच्या वेदना जाणून घेऊया आणि मग कसे बरं वाटलं ते समजून घेऊया.
मोदीजी – सुखदेवीजी नमस्कार! तुम्ही कुठून बोलत आहात ?
सुखदेवीजी – दानदपरा इथून .
मोदीजी – हे कुठे येतं ?
सुखदेवीजी – मथुरा मध्ये.
मोदीजी – मथुरा मध्ये, मग तर सुखदेवीजी, तुम्हाला नमस्कार देखील म्हणावं लागेल आणि त्याच बरोबर राधे-राधे देखील म्हणावं लागेल.
सुखदेवीजी – हो, राधे-राधे
मोदीजी – अच्छा आम्ही असे ऐकलं की तुम्हाला त्रास होत होता. तुमची कुठली शस्त्रक्रिया झाली का? जरा सांगाल का काय झालं होतं ?
सुखदेवीजी – हो, माझा गुडघा खराब झाला होता, त्यामुळे माझी शस्त्रक्रिया झाली. प्रयागरुग्णालयात.
मोदीजी – मचं वय किती आहे सुखदेवीजी ?
सुखदेवीजी – वय 40वर्षे.
मोदीजी – 40 वर्ष आणि सुखदेव नाव,आणि सुखदेवीला आजार जडला.
सुखदेवीजी – आजारतर मला 15-16 वर्षांपासून जडला होता.
मोदीजी – अरे बापरे! एवढ्या कमी वयात तुमचे गुडघे खराब झाले.
सुखदेवीजी – सांधे दुखी म्हणतात याला, सांध्यातील वेदनांमुळे गुडघे खराब झाले.
मोदीजी – म्हणजे 16 वर्ष ते 40 वर्षे वयापर्यंत तुम्ही यावर उपचार करून घेतले नाहीत.
सुखदेवीजी – नाही करून घेतले. वेदना शमवण्यासाठी गोळ्या खात राहिले, छोट्या-मोठ्या डॉक्टरांनी तर देशी औषधे आहेत, विदेशी औषधे आहेत असं सांगितलं. अशाने गुडघेच नव्हे तर पायदेखील दुखायला लागले. 1-2 किलोमीटर पायी चालले तर माझा गुडघा दुखावला गेला.
मोदीजी – तर सुखदेवीजी, शस्त्रक्रिया करून घेण्याचा विचार कसा आला? त्यासाठी पैशाची व्यवस्था कशी केली? कसे झालं हे सगळं ?
सुखदेवीजी – मी त्या आयुष्मान कार्डा द्वारे इलाज करून घेतला आहे.
मोदीजी – म्हणजे तुम्हाला आयुष्मान कार्ड मिळाले होतं ?
सुखदेवीजी – हो.
मोदीजी – आणि आयुष्मान कार्ड द्वारे गरीबांना मोफत उपचार मिळतात. हे माहित होतं ?
सुखदेवीजी – शाळेत बैठक सुरु होती. तिथे माझ्या नवऱ्याला समजले तेव्हा माझ्या नावाचं कार्ड बनवून घेतलं.
मोदीजी – अच्छा.
सुखदेवीजी – मग कार्ड वापरून इलाज करून घेतला आणि मला एकही पैसा द्यावा लागला नाही. कार्ड द्वारेच माझ्यावर उपचार झाले. खूप छान उपचार झाले आहेत.
मोदीजी – अच्छा, डॉक्टरांनी आधी कार्ड नव्हतं तेव्हा किती खर्च सांगितला होता ?
सुखदेवीजी – अडीच लाख रुपये, तीन लाख रुपये. 6-7 वर्षांपासून बिछान्यावर पडून आहे, देवाला म्हणत होते की मला घेऊन जा, मला जगायचं नाही.
मोदीजी – 6-7 वर्षांपासून बिछान्यावर होतात. बाप-रे-बाप.
सुखदेवीजी – हो.
मोदीजी – ओह.
सुखदेवीजी –अजिबात उठता-बसता येत नव्हतं.
मोदीजी – तर मग आता तुमचा गुडघा पूर्वीपेक्षा बरा झाला आहे ना ?
सुखदेवीजी – मी खूप फिरते. स्वयंपाक घरात काम करते. मुलांना जेवण बनवून वाढते.
मोदीजी – म्हणजे आयुष्मान भारत कार्डाने तुम्हाला खरोखरच आयुष्मान बनवलं.
सुखदेवीजी – खूप-खूप धन्यवाद. तुमच्या योजनेमुळे बरी झाले, आपल्या पायावर उभी राहिले .
मोदीजी – तर मग आता मुले देखील खूष असतील
सुखदेवीजी – हो. मुलांना तर खूपच त्रास व्हायचा. आई दुःखी असेल तर मुलंदेखील दुखी असतात.
मोदीजी – हे पहा, आपल्या आयुष्यात सर्वात मोठं सुख आपलं आरोग्य हेच असतं. हे सुखी जीवन सर्वांना मिळावं हीच आयुष्मान भारतची भावना आहे, चला,सुखदेवीजी, माझ्या तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा तुम्हाला राधे-राधे.
सुखदेवीजी- राधे- राधे, नमस्कार !
माझ्या प्रिय देशबांधवांनो, युवकांनी समृद्ध प्रत्येक देशात तीन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि त्याच कधी-कधी युवकांची खरी ओळख बनतात. पहिली गोष्ट आहे– कल्पना आणि नाविन्य पूर्ण संशोधन. दुसरी आहे- जजोखीम घेण्याची भावना आणि तिसरी आहे मी करू शकते म्हणजे कुठलंही काम पूर्ण करण्याची जिद्द , मग परिस्थिती कितीही विपरीत का असेना जेव्हा या तीन गोष्टी परस्परांशी मिळतात,तेव्हा अभूतपूर्व परिणाम मिळतात.चमत्कार होतात.आजकाल आपण चोहो बाजुंनी ऐकत असतो Start-Up,Start-Up, Start-Up. खरी गोष्टही आहे हे Start-Upचं युग आहे, आणि हे देखील खरं आहे की Start-Upच्या जगात आज भारत जगात एक प्रकारे नेतृत्व करत आहे. वर्षानुवर्षे Start-Upला विक्रमी गुंतवणूक मिळत आहे. हे क्षेत्र अतिशय वेगाने पुढे जात आहे. इथपर्यंत की देशातल्या छोट्या-छोट्या शहरातदेखील Start-Upची व्याप्ती वाढली आहे. आजकाल ‘Unicorn’ शब्द खूप चर्चेत आहे. तुम्ही सर्वांनी याबाबत ऐकलं असेल. ‘Unicorn’ एक असा Start-Up असतो ज्याचं मूल्य किमान 1 अब्ज डॉलर असतं म्हणजे अंदाजे सात हज़ार कोटी रुपयांहून अधिक असतं.
मित्रांनो, वर्ष 2015 पर्यंत देशात मोठ्या मुश्किलीनं नऊ किंवा दहा Unicorns असायचे. तुम्हाला हे ऐकून खूप आनंद झाला असेल की आता Unicorns च्या जगातही भारत वेगाने भरारी घेत आहे. एका अहवालानुसार याच वर्षी एक मोठा बदल घडून आला आहे. केवळ दहा महिन्यातच भारतात प्रत्येक दहा दिवसात एक युनिकॉर्न तयार झाला आहे. ही यासाठी देखील मोठी गोष्ट आहे कारण आपल्या युवकांनी हे यश कोरोना महामारीच्या काळात प्राप्त केलं आहे. आज भारतात 70 हून अधिक Unicorns झाले आहेत. म्हणजे 70 पेक्षा अधिक Start-Up असे आहेत ज्यांनी 1 अब्जा पेक्षा अधिक मूल्य पार केले आहेत. मित्रांनो, Start-Upच्या यशामुळे प्रत्येकाचे त्याकडे लक्ष गेलं आणि ज्याप्रकारे देशातून, विदेशातून गुंतवणूकदारांचा त्याला पाठिंबा मिळत आहे. कदाचित काही वर्षांपूर्वी कुणी त्याची कल्पनाही करू शकलं नसतं. मित्रांनो, Start-Upsच्या माध्यमातून भारतीय युवा जागतिक समस्येवर तोडगा काढण्यात आपलं योगदान देत आहेत. आज आपण एक युवक मयूर पाटील यांच्याशी बोलूया. त्यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने प्रदूषणाच्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
मोदीजी – मयूरजी नमस्कार.
मयूर पाटील – नमस्ते सरजी
मोदीजी – मयूरजी तुम्ही कसे आहात ?
मयूर पाटील – एकदम छान, सर तुम्ही कसे आहात.
मोदीजी – मी खूप आनंदी आहे. अच्छा मला सांगा की आज तुम्ही एका Start-Upच्या जगात आहात.
मयूर पाटील – हो.
मोदीजी – आणि कचऱ्या पासून संपत्ती देखील निर्माण करत आहात.
मयूर पाटील – हो.
मोदीजी - पर्यावरणासाठी देखील करत आहात. मला थोडं स्वतःविषयी सांगा. तुमच्या कामा बद्दल सांगा आणि हे काम करण्याचा विचार कसा आला ?
मयूर पाटील – सर, जेव्हा महाविद्यालयात होतो तेव्हाच माझ्याकडे मोटर सायकल होती. ज्याचे मायलेज खूप कमी होतं आणि उत्सर्जन खूप जास्त होतं. ती Two stroke Motorcycle होती. त्यामुळे उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि तिचे मायलेज थोडे वाढवण्यासाठी मी प्रयत्न सुरु केले होते. साधारण 2011-12 मध्ये मी तिचे मायलेज अंदाजे 62 किलोमीटर प्रतिलिटर पर्यंत वाढवलं होतं. तर त्यातून मला प्रेरणा मिळाली कि एखादी अशी गोष्ट बनवावी जिचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करता येईल जेणेकरून इतरांनादेखील त्याचा फायदा होईल, तर 2017-18 मध्ये आम्ही मित्रांनी त्याचे तंत्रज्ञान विकसित केलं आणि प्रादेशिक परिवहन महामंडळात आम्ही 10 बसेस मध्ये ते वापरलं. त्याचे परिणाम तपासण्यासाठी आणि आम्ही त्यांचे सुमारे चाळीस टक्के उत्सर्जन कमी केलं, बस मधले.
मोदीजी – हम्म! आता हे तंत्रज्ञान जे तुम्ही शोधले आहे, त्याचे पेटंट करून घेतलं का?
मयूर पाटील – हो. पेटन्ट झालं आहे. यावर्षी आम्हाला पेटंट मिळालं.
मोदीजी – आणि पुढे त्याचा विस्तार करण्याची तुमची काय योजना आहे? कशा प्रकारे करत आहात? जसे बसचे निष्कर्ष आले, त्याच्याही सर्व गोष्टी समोर आल्या असतील. तर पुढे काय विचार आहे?
मयूरपाटिल – सर, Start-Up India अंतर्गत नीति आयोगाचे अटल न्यू इंडिया चॅलेंजजे आहे त्यातून आम्हाला अनुदान मिळालं आहे आणि त्याअनुदानाच्या आधारे आम्ही मित्रांनी आता कारखाना चालू केला आहे जिथे आम्ही एअर फिल्टर्सची निर्मिती करू शकतो.
मोदीजी– तर भारत सरकारच्या वतीनं तुम्हाला किती अनुदान मिळालं?
मयूर पाटील – 90 लाख रुपये.
मोदीजी – 90 लाख .
मयूरपाटिल – हो सर.
मोदीजी – आणि त्यातून तुमचं काम झालं?
मयूर पाटील – हो आता तर चालू झालं आहे, प्रक्रिया सुरु आहे.
मोदीजी – तुम्ही किती मित्र मिळून करत आहात हे सगळं?
मयूरपाटिल – आम्ही चार मित्र आहोत,सर
मोदीजी – आणि चारही मित्र आधी पासून एकत्र शिकत होतात आणि त्यातूनच तुमच्या मनात एक विचार आला पुढेजाण्याचा.
मयूर पाटील – हो,हो. आम्ही महाविद्यालयातच एकत्र होतो आणि तिथेच आम्ही सर्वानी यावर विचार केला आणि ही माझी कल्पना होती की माझ्या मोटरसायकलमुळे किमान प्रदूषण कमी व्हावं आणि तिचं मायलेज वाढावं.
मोदीजी – अच्छा, प्रदूषण कमी करता आणि मायलेज वाढवता तर सरासरी खर्चाची किती बचत होईल ?
मयूर पाटील – सर, आम्ही लोकांनी मोटर सायकल वर चाचणी घेतली, तिचे मायलेज 25 किलोमीटर प्रति लिटर होतं, ते आम्ही 39 किलोमीटर प्रतिलिटर पर्यंत वाढवलं म्हणजे अंदाजे 14 किलोमीटरचा फायदा झाला आणि त्यातलं 40 टक्के कार्बन उत्सर्जन कमी झालं आणि जेव्हा बसेस मध्ये केलं तेव्हा तिथं 10 टक्के इंधन कार्यक्षमतेत वाढ झाली आणि त्यातही 35-40 टक्के उत्सर्जन कमी झालं.
मोदीजी – मयूर, मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुमच्या मित्रांचे माझ्या वतीनं अभिनंदन करा. महाविद्यालयीन जीवनात तुमची जी समस्या होती त्यावर तुम्ही तोडगा काढलात आणि त्यातून जो मार्ग निवडला त्याद्वारे पर्यावरण समस्या सोडवण्याचा विडा तुम्ही उचलला. आणि हे आपल्या देशातील युवकांचं सामर्थ्य आहे की कुठलंही मोठं आव्हान स्वीकारतात आणि मार्ग शोधतात. माझ्या कडून तुम्हाला खूप शुभेच्छा. खूप-खूप धन्यवाद .
मयूर पाटील – धन्यवाद ,सर ! आभारी आहे !
मित्रांनो, काही वर्षांपूर्वी जर कुणी म्हटले असतं की त्याला व्यवसाय करायचा आहे किंवा एक नवी कंपनी सुरु करायची आहे, तर त्यावर कुटुंबातील वडीलधाऱ्यामंडळींचे उत्तर असायचं की – “तुला नोकरी का करायची नाही, नोकरी कर. नोकरीत सुरक्षितता असते, पगार मिळतो. कटकटी कमी असतात, मात्र आज जर कुणी स्वतःची कंपनी सुरु करू इच्छित असेल तर त्याच्या आसपासचे सगळेजण खूप उत्साहित होतात आणि यात त्याला सर्वतोपरी मदतही करतात.
मित्रांनो, भारताच्या विकास गाथेला इथेच वळण मिळालं आहे जिथे आता लोक केवळ नोकरी शोधण्याचे स्वप्न पाहत नाही तर रोजगार देणारे देखील बनत आहेत. यामुळे जागतिक पटलावर भारताची स्थिती आणखी मजबूत होईल.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज ‘मनकीबात’ मध्ये आपण अमृत महोत्सवा बद्दल बोललो. अमृत काळात आपले देशबांधव कशा प्रकारे नवनवीन संकल्प पूर्ण करत आहेत, याची चर्चा केली आणि त्याचबरोबर डिसेंबर महिन्यात सैन्याच्या शौर्याशी निगडित प्रसंगांचा देखील उल्लेख केला. डिसेंबर महिन्यातच एक आणखी मोठा दिवस आपल्या समोर येतो ज्या पासून आपण प्रेरणा घेतो. हा दिवस आहे 6 डिसेंबर. बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथि. बाबासाहेबानी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी आणि समाजासाठी आपली कर्तव्ये बजावण्यात समर्पित केलं होतं. आपण देशवासियांनी हे कधीही विसरता कामा नये की आपल्या संविधानाची मूळ भावना, आपले संविधान आपणा सर्व देशवासियांकडून आपापली कर्तव्ये पार पाडण्याची अपेक्षा करतं - चला, आपणही संकल्प करू या कि अमृतमहोत्सवात आपण पूर्ण निष्ठेने कर्तव्य बजावण्याचा प्रयत्नकरू. हीच बाबासाहेबांप्रति आपली खरी श्रद्धांजली असेल.
मित्रांनो, आता आपण डिसेंबर महिन्यात प्रवेश करत आहोत, स्वाभाविक आहे, पुढली ‘मन की बात’ 2021 ची यावर्षाची अखेरची ‘मन की बात’ असेल. 2022 मध्ये पुन्हा प्रवास सुरु करू. आणि माझी तुमच्या कडून भरपूर सूचना आणि मते जाणून घेण्याची अपेक्षा असते आणि यापुढेही असेल. तुम्ही यावर्षाला कसा निरोप देत आहात, नव्या वर्षात काय करणार आहात हे देखील अवश्य सांगा आणि हो, हे कधीही विसरू नका की कोरोना अजून गेलेला नाही. सावधगिरी बाळगणेही आपली सर्वांची जबाबदारीआहे.
खूप-खूप धन्यवाद !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या सर्वाना नमस्कार| कोटी कोटी नमस्कार, आणि मी कोटी कोटी नमस्कार यासाठी म्हणत आहे कारण 100 कोटी कोविडविरोधी लसीच्या डोसनंतर आज देश एक नवा उत्साह, नव्या उर्जेसह पुढे निघाला आहे. आमच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला लाभलेलं यश, भारताच्या सामर्थ्याचं प्रदर्शन करत आहे, सर्वाच्या प्रयत्नांच्या मंत्रशक्तिचं प्रत्यंतर दाखवत आहे.
मित्रांनो, 100 कोटीचा आकडा खूप मोठा अवश्य आहे, परंतु त्याच्याशी अनेक लाखो लहान लहान प्रेरक आणि अभिमानास्पद असे अनेक अनुभव, उदाहरणं जोडली गेली आहेत. खूप लोक मला पत्र लिहून विचारतात की, लसीकरणाच्या सुरूवातीलाच या अभियानाला इतकं मोठं यश मिळेल, असा विश्वास आपल्याला कसा वाटत होता? मला हा विश्वास यासाठी वाटत होता कारण, मला आपला देश, आपल्या देशाच्या लोकांची क्षमता अगदी चांगली माहित आहे. मला माहित होतं की, आमचे आरोग्य कर्मचारी देशवासियांच्या लसीकरणात कोणतीही कसर शिल्लक ठेवणार नाहीत. आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपले अथक परिश्रम आणि निर्धारानं एक नवीन उदाहरण समोर ठेवलं. त्यांनी नाविन्यपूर्णतेसह आपल्या दृढ निश्चयानं मानवतेच्या सेवेचा एक नवीन निकष स्थापित केला. त्यांच्या बाबतीत तर अशी असंख्य उदाहरणं आहेत जी, त्यांनी कशी सर्व आव्हानांना पार करून जास्तीत जास्त लोकांना सुरक्षा कवच प्रदान केलं, हे सांगतात. आम्ही अनेकदा वर्तमानपत्रांमध्ये वाचलं आहे, बाहेरही ऐकलं आहे की हे काम करण्यासाठी आमच्या लोकांनी किती कष्ट केले आहेत, एकापेक्षा एक प्रेरक उदाहरणं आमच्या समोर आहेत. मी आज मन की बातच्या श्रोत्यांची भेट उत्तराखंडच्या बागेश्वर इथली एक आरोग्य कर्मचारी पूनम नौटियाल हिच्याशी घडवू इच्छितो. मित्रांनो, बागेश्वर उत्तराखंडच्या त्या धरतीवर आहे. ज्या उत्तराखंडने शंभर टक्के पहिला डोस देण्याचे काम पूर्ण केलं आहे. उत्तराखंड सरकारही अभिनंदनाचं पात्र आहे कारण खूप दुर्गम क्षेत्र आहे, अतिशय अवघड आहे. तसंच, हिमाचलनंही अशा अडचणींवर मात करत शंभर टक्के डोस देण्याचं काम पूर्ण केलं आहे. मला असं सांगण्यात आलं आहे की, पूनमजींनी आपल्या क्षेत्रातल्या लोकांच्या लसीकरणासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे.
प्रधानमंत्रिजीः पूनम जी, नमस्ते|
पूनम नौटियालः सर, प्रणाम|
प्रधानमंत्रिजीः पूनम जी, देशातल्या श्रोत्यांना जरा आपल्याबाबतीत थोडं सांगा.
पूनम नौटियालः सर, मी पूनम नौटियाल| सर, मी उत्तराखंडच्या बागेश्वर जिल्ह्यातल्या चानी कोराली केंद्रात कार्यरत आहे. मी ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (एएनएम) आहे, सर|
पंतप्रधान: पूनमजी, माझं सद्भाग्य आहे की मला बागेश्वर येण्याची संधी मिळाली होती. ते एक प्रकारे तीर्थक्षेत्रच आहे. तिथं प्राचीन मंदिर वगैरे आहे. मी ते पाहून खूप प्रभावित झालो. युगांपूर्वी कसं लोकांनी काम केलं असेल.
पूनम नौटियालः हांजी, सर
पंतप्रधान: पूनम जी, आपण आपल्या क्षेत्रातल्या सर्वच लोकांचं लसीकरण करून घेतलं आहे का?
पूनम नौटियालःहांजी, सर. सगळ्या लोकांचं लसीकरण झालं आहे.
पंतप्रधान: आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागलं का?
पूनम नौटियालःहांजी, सर. जेव्हा पाऊस पडत असे तेव्हा रस्ता बंद होत असे आणि तेव्हा नदी पार करून गेलो आहोत आम्ही सर. आणि सर, आम्ही घरोघर गेलो आहोत जसे एनएचसीव्हीसीच्या अंतर्गत लोक घरोघर गेले होते. जे लोक वृद्ध आहेत, दिव्यांग लोक, तसेच गर्भवती महिला, या लोकांच्या घरी गेलो.
पंतप्रधान: परंतु तिथं तर पहाडी प्रदेशात खूप दूरदूर घरं असतात.
पूनम नौटियालः जी.
पंतप्रधान: एका दिवसात किती मजल मारू शकत होतात आपण|
पूनम नौटियालः सर, किलोमीटरचा हिशोब पाहिला तर 10 किलोमीटर तर कधी 8 किलोमीटर.
पंतप्रधान: असो, हे तर मैदानी प्रदेशात रहाणारे लोक आहेत, त्यांना 8 ते 10 किलोमीटर काय असतं ते समजणार नाही . मला माहित आहे की, पहाडी प्रदेशात 8-10 किलोमीटर म्हणजे पूर्ण दिवस त्यातच जातो.
पूनम नौटियालः हांजी.
पंतप्रधान: परंतु एका दिवसात एवढं अंतर चालणं खूप मेहनतीचं काम आहे आणि त्यात पुन्हा लसीकरणाचं सामान उचलून बरोबर न्यायचं. आपल्या बरोबर कुणी सहाय्यक असायचे की नाही ?
पूनम नौटियालः हांजी. आमच्या पथकाचे सदस्य, आम्ही पाच लोक असायचो सर.
पंतप्रधान: हां.
पूनम नौटियालः त्यात डॉक्टर आले, मग एएनएम आले, आशा अंगणवाडी सेविका आली, औषधी तज्ञ असायचा आणि डेटा एंट्री ऑपरेटर असे.
पंतप्रधान: अच्छा त्या डेटा एंट्रीसाठी तिथं इंटरनेट कनेक्शन मिळत असे की बागेश्वरला परतल्यावर करत असायचा?
पूनम नौटियालः सर, कधी कधी मिळत असे नाही तर बागेश्वरला आल्यावर करत होतो आम्ही.
पंतप्रधान: पूनम जी, आपण अगदी चाकोरीच्या बाहेर जाऊन लोकांना लस दिली. ही कशी कल्पना आली, आपल्या मनात हा विचार कसा आला आणि कसं केलं आपण हे सर्व?
पूनम नौटियालः आम्ही लोकांनी, पूर्ण पथकानं एक निर्धार केला होता की कोणतीही व्यक्ति यातून सुटायला नको. आमच्या देशातनं कोरोना आजार दूर पळाला पाहिजे. मी आणि आशा वर्करनं प्रत्येक लसीकरणातून राहिलेल्या व्यक्तिची गावनिहाय एक यादी बनवली, मग त्यानुसार जे लोक केंद्रात आले, त्यांना केंद्रातच लस टोचली. जे लोक राहिले होते, केंद्रात येऊ शकत नव्हते त्यांच्या घरोघरी जाऊन दिली सर.
पंतप्रधान: अच्छा, लोकांना समजावून सांगावं लागत होतं?
पूनम नौटियालः हांजी, समजावून सांगितलं.
पंतप्रधान: लोकांमध्ये अजूनही लस घेण्यासाठी उत्साह आहे?
पूनम नौटियालः हांजी सर, हांजी. आता तर लोकांना कळलं आहे. पहिल्यांदा आम्हा लोकांना खूप अडचणी आल्या. लोकांना ही लस सुरक्षित आहे, प्रभावी आहे, आम्ही ही घेतली आहे, आम्ही अगदी ठीक आहोत, आपल्या समोर आहोत, आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
पंतप्रधान: लस घेतल्यावर नंतर कुठून तक्रार आली?
पूनम नौटियालः नाही सर. असं तर काहीही झालं नाही .
पंतप्रधान: काहीही झालं नाही
पूनम नौटियालः जी.
पंतप्रधान: सर्व समाधानी होते की ठीक झालं आहे.
पूनम नौटियालः हांजी
पंतप्रधान: आपण एक खूप मोठं काम केलं आहे आणि मला माहित आहे, ते संपूर्ण क्षेत्र, पहाडी प्रदेशात पायी चालणं किती अवघड आहे. एका पहाडावर चढा, पुन्हा खाली उतरा, पुन्हा दुसरा पहाड चढा. घरंही पुन्हा दूरदूरच्या अंतरावर आहेत. असं असूनही आपण इतकं चांगलं काम केलं.
पूनम नौटियालःधन्यवाद सर. माझं सद्भाग्य आहे की आपल्याशी मी बोलू शकले.
आपल्यासारख्या लाखो आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमांमुळेच भारत 100 कोटीचा लसीकरणाचा टप्पा गाठू शकला आहे. आज मी केवळ आपले आभार मानत नाही तर प्रत्येक त्या भारतवासियाचे आभार मानतो,ज्यानं सर्वाना लस, विनामूल्य लस या अभियानाला इतक्या उंचीवर नेलं, यश दिलं. आपल्याला, आपल्या परिवाराला माझ्या खूप खूप शुभेच्छा.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपल्याला माहित असेल की पुढच्या रविवारी ३१ ऑक्टोबरला सरदार पटेल यांची जयंती आहे. मन की बातच्या वतीनं आणि माझ्याही वतीनं, मी लोहपुरूषाला नमन करतो. मित्रांनो, ३१ ऑक्टोबर हा दिवस आपण राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करतो. एकतेचा संदेश देणाऱ्या कोणत्या नं कोणत्या उपक्रमाशी आपण जोडलं जावं, ही आपली जबाबदारी आहे. आपण पाहिलं असेल, नुकतंच गुजरात पोलिसांनी कच्छच्या लखपत किल्ल्यापासून स्टॅच्यु ऑफ युनिटीपर्यंत बाईक रॅली काढली. त्रिपुरा पोलिसांचे जवान तर एकता दिन साजरा करण्यासाठी त्रिपुराहून स्टॅच्यु ऑफ यूनिटीपर्यंत बाईक रॅली काढत आहेत. म्हणजे, पूर्वेक़डून निघून पश्चिमेपर्यंत देशाला जोडण्याचं काम करत आहेत. जम्मू काश्मीर पोलिसांचे जवानही उरीहून पठाणकोटपर्यंत बाईक रॅली काढून देशाच्या एकतेचा संदेश देत आहेत. मी या सर्व जवानांना प्रणाम करतो. जम्मू काश्मीरच्याच कुपवाडा जिल्ह्यातल्या अनेक भगिनींच्या बाबतीत मला माहिती मिळाली आहे. या भगिनी कश्मिरात लष्कर आणि सरकारी कार्यालयांसाठी तिरंगा शिवण्याचं काम करत आहेत. हे काम देशभक्तिच्या भावनेनं भरलेलं आहे. मी त्या भगिनींच्या उत्कट भावनांची प्रशंसा करतो. आपल्यालाही भारताची एकता, भारताचं श्रेष्ठत्व यासाठी काही नं काही अवश्य केलं पाहिजे. पहा, आपल्या मनाला किती आनंद मिळतो.
मित्रांनो, सरदार साहेब म्हणत असत की, आपण आपल्या एकजुटीनंच देशाला नव्या महान उंचीपर्यंत पोहचवू शकतो. जर आमच्यात ऐक्य झालं नाही तर आपण स्वतःला नवनवीन संकटांमध्ये ढकलून दिल्यासारखं होईल. म्हणजे राष्ट्रीय एकता आहे तरच उंची आहे, विकास आहे. आम्ही सरदार पटेल यांच्या जीवनातनं, विचारांपासून खूप काही शिकू शकतो. देशाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सरदार पटेल यांच्या जीवनावर एक चित्रमय चरित्रही प्रसिद्ध केलं आहे. माझी इच्छा आहे की आमच्या सर्व युवामित्रांनी ते जरूर वाचावं. त्यातनं आपल्याला सरदार साहेबांचं जीवनाविषयी माहिती अत्यंत मनोरंजनात्मक पद्धतीनं घेण्याची संधी मिळेल.
प्रिय देशवासियांनो, जीवनाला निरंतर प्रगति हवी असते, विकास हवा असतो, नवनव्या उंची पार करायची असते. विज्ञान कितीही पुढे जाओ, प्रगतीची गती कितीही वाढो, भवन कितीही भव्य तयार होओत, परंतु जीवनात अपूर्णतेचा अनुभव येत असतो. परंतु जेव्हा यात गीत-संगीत, कला, नाट्य-नृत्य, साहित्य जोडलं जातं, तेव्हा त्याचा प्रकाश, जिवंतपणा अनेक पटींनी वाढत जातो. जीवनाला एक प्रकारे सार्थक बनवायचं असेल तर हे सर्व असणं तितकंच आवश्यक आहे, म्हणून असं म्हटलं जातं की, या साऱ्या कला आमच्या जीवनात एक उत्प्रेरकाचं काम करतात, आमची उर्जा वाढवण्याचं काम करतात. मानवी मनाच्या अंतर्मनाला विकसित करण्यात, आमच्या अंतर्मनाच्या प्रवासाचा मार्ग निश्चित करण्यातही गीत-संगीत आणि वेगवेगळ्या कलांची खूप मोठी भूमिका असते आणि यांची एक मोठी शक्ति ही असते की, यांना न काळ बांधू शकतो नं मतमतांतरे बांधू शकतात. अमृत महोत्सवात आपली कला, संस्कृती, गीत, संगीत यांचे रंग अवश्य भरले पाहिजेत. मलाही आपल्याकडून अमृत महोत्सव आणि गीत संगीत कलेच्या या शक्तिशी जोडले गेलेले अनेक सूचना मिळत आहेत. या सूचना माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत. मी त्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे विचारार्थ पाठवल्या आहेत. मला याचा आनंद आहे की, मंत्रालयानं त्या गांभिर्यानं घेऊन त्यावर कामही केलं आहे. यातच एक सूचना अशी आहे की, देशभक्ति गीतांशी जोडली गेलेली स्पर्धा. स्वातंत्र्याच्या लढाईत वेगवेगळ्या भाषा, बोलीमधल्या देशभक्ति गीतांनी आणि भजनांनी पूर्ण देशाला एकत्र आणलं होतं. आता अमृतकाळात, आमचे युवक देशभक्तिवरील अशीच गीतं लिहून त्यांचं आयोजन करून उर्जा निर्माण करू शकतात. देशभक्तिची ही गीतं मातृभाषेत असू शकतील, राष्ट्रभाषेत असू शकतील किंवा इंग्रजीतही लिहू शकतात. परंतु या रचना नव्या भारताचा विचार असणारी, देशाच्या वर्तमानातील यशापासून प्रेरणा घेऊन भविष्यासाठी देशाला संकल्पित करणारी असली पाहिजेत, हे आवश्यक आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं तर तालुका स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत अशी स्पर्धा आयोजित करण्याची तयारी दर्शवली आहे.
मित्रांनो, मन की बातच्या एका श्रोत्यानं अशीही सूचना केली आहे की, अमृत महोत्सवाला रांगोळी कलेशीही जोडलं गेलं पाहिजे. आमच्याकडे रांगोळीच्या माध्यमातून सणांमध्ये रंग भरण्याची परंपरा तर शतकांपासून आहे. रांगोळीत देशाच्या विविधतेचं दर्शन होत असतं. वेगवेगळ्या राज्यांत, वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या कल्पनांवर रांगोळ्या काढल्या जातात. म्हणून सांस्कृतिक मंत्रालय याच्याशी जोडलेली एक राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणार आहे. आपण कल्पना करा, जेव्हा स्वातंत्र्याच्या आंदोलनाशी जोडलेली रांगोळी काढली जाईल, लोक आपल्या दारावर, भिंतीवर एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाचं चित्र काढतील, स्वातंत्र्याची घटना रंगांमध्ये दाखवतील, तर अमृत महोत्सवाच्या रंगांना आणखी बहार येईल.
मित्रांनो, आमच्याकडे अंगाईगीत ही ही एक पद्धत आहे. आमच्याकडे अंगाईगीताच्या माध्यमातून लहान मुलांवर संस्कार केले जातात, संस्कृतीशी त्यांचा परिचय करून दिला जातो. अंगाईगीतांची त्यांची स्वतःची विविधता आहे. तर, अमृतकाळात आम्ही या कलेलाही पुनर्जिवित करू आणि देशभक्तिशी जोडलेली अशी अंगाईगीतं,कविता, गीतं काही नं काही अवश्य लिहू जे प्रत्येक घरात माता अत्यंत सहजतेनं आपल्या लहान लहान मुलांना ऐकवू शकतील. या अंगाईगीतांमध्ये आधुनिक भारताचा संदर्भ असेल, २१ व्या शतकातल्या भारताच्या स्वप्नांचं दर्शन घडेल. आपल्या सर्व श्रोत्यांच्या सूचनांनंतर मंत्रालयानं याच्याशी जोडलेली स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
मित्रांनो, या तिन्ही स्पर्धा 31 ऑक्टोबरला सरदार साहेबांच्या जयंतीदिनापासून सुरू होत आहेत. येत्या काही दिवसात सांस्कृतिक मंत्रालय याच्याशी संबंधित सारी माहिती देईल. ही माहिती मंत्रालयाच्या वेबसाईटवर असेल आणि समाजमाध्यमांवरूनही दिली जाईल. माझी इच्छा आहे की आपण साऱ्यांनी यात सहभागी व्हावं. आमच्या युवा साथीदारांनी आपल्या कलेचं, आपल्या प्रतिभेचं प्रदर्शन अवश्य करावं. यातून आपल्या प्रदेशातली कला आणि संस्कृती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचेल आणि आपल्या कहाण्या सारा देश ऐकेल.
प्रिय देशवासियांनो, यावेळी आम्ही अमृत महोत्सवात देशाचे वीर पुत्र आणि कन्यांच्या महान पुण्यात्म्यांचं स्मरण करत आहोत. पुढल्या महिन्यात १५ नोव्हेंबरला आमच्या देशाचे असेच महापुरूष वीर योद्धा भगवान बिरसा मुंडाजी यांची जयंती आहे. भगवान बिरसा मुंडा यांना धरती आबा असं म्हटलं जातं. याचा अर्थ काय होतो, हे आपल्याला माहित आहे का? याचा अर्थ आहे धरती पिता. भगवान बिरसा मुंडा यांनी ज्या प्रकारे आपली संस्कृती, आपलं जंगल, आपल्या जमिनीच्या संरक्षणासाठी संघर्ष केला, तसा तो धरती आबाच करू शकत होते. त्यांनी आपल्याला आपली संस्कृती आणि मूळांबद्दल अभिमान बाळगायला शिकवलं. परदेशी राजसत्तेनं किती त्यांना धमक्या दिल्या, किती दबाव टाकला, पण त्यांनी आदिवासी संस्कृती सोडली नाही. निसर्ग आणि पर्यावरणावर जर आम्हाला प्रेम करायला शिकायचं असेल तर धरती आबा भगवान बिरसा मुंडा आमची खूप मोठी प्रेरणा आहे.
परकीय सरकारच्या ज्या गोष्टींमुळे पर्यावरणाला नुकसान पोहोचणार आहे, अशा प्रत्येक धोरणाला त्यांनी अगदी कडाडून विरोध केला. गरीब आणि अडचणी-समस्या यांच्या चक्रात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी भगवान बिरसा मुंडा नेहमीच आघाडीवर असायचे. त्यांनी सामाजिक कुरीती संपुष्टात आणण्यासाठी समाजाला जागृत करण्याचं काम केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं उलगुलान आंदोलन कोण विसरू शकते? या आंदोलनाने इंग्रजांना हलवून टाकलं होतं. त्यानंतर इंग्रजांनी भगवान बिरसा मुंडा यांच्यावर खूप मोठ्या रकमेचं बक्षीस ठेवलं होतं. ब्रिटीश सरकाने त्यांना कारागृहात टाकलं. आणि त्यांचा इतका छळ केला की, वयाने पंचविशी अद्याप पार केली नसतानाही इतक्या तरूण वयात ते आपल्याला सोडून गेले. ते आपल्याला सोडून गेले, ते केवळ शरीरानं!
जनसामान्यांमध्ये तर भगवान बिरसा मुंडा यांनी अढळ स्थान प्राप्त केलं आहे. लोकांसाठी त्यांचं जीवन म्हणजे एक प्रेरणा शक्ती बनले आहे. आजही त्यांची शौर्यगाथा आणि वीरतेने भरलेली लोकगीते आणि कथा मध्य भारतामध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. मी ‘धरती बाबा’ बिरसा मुंडा यांना वंदन करतो आणि युवकांना माझा आग्रह आहे की, त्यांनी बिरसा मुंडा यांच्याविषयी वाचन करून त्यांच्या कार्याची माहिती आणखी जाणून घ्यावी. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपल्या आदिवासी समूहाने दिलेल्या वैशिष्टपूर्ण योगदानाविषयी तुम्ही जितकी माहिती घ्याल, तितक्याच प्रमाणात त्यांचे कार्य गौरवपूर्ण असल्याची अनुभूती तुम्हाला होईल.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आज 24 ऑक्टोबरला यूएन डे म्हणजेच ‘संयुक्त राष्ट्र दिवस‘ साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राची स्थापना झालेला हा दिवस आहे. संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेपासून भारत त्याच्याशी जोडला आहे. भारताने स्वांतत्र्याआधी 1945 मध्येच संयुक्त राष्ट्राच्या चार्टरवर म्हणजेच सनदीवर स्वाक्षरी केली होती, याविषयी तुम्हाला माहिती आहे? संयुक्त राष्ट्राशी संबंधित एका वेगळा पैलू असा आहे की, संयुक्त राष्ट्राचा प्रभाव आणि त्याची शक्ती वाढविण्यासाठी भारताच्या नारीशक्तीने अतिशय महत्वाची- मोठी भूमिका बजावली आहे. 1947-48 मध्ये ज्यावेळी यूएन ह्मुमन राइटसचे- म्हणजेच संयुक्त राष्ट्राच्यावतीने मानवाधिकाराचा वैश्विक घोषणापत्र तयार करण्यात येत होते, त्या घोषणापत्रामध्ये लिहिण्यात येत होते की, ‘‘ ऑल मेन आर क्रिएटेड इक्वल’’ परंतु भारताच्या एका प्रतिनिधीने असे लिहिण्यावर आक्षेप घेतला आणि मग वैश्विक घोषणापत्रात नमूद करण्यात आले की - ‘‘ऑल ह्युमन बीईग्स आर क्रिएटेड इक्वल’’ !! ही गोष्ट म्हणजेच स्त्री-पुरूष समानतेची बाब भारताच्या दृष्टीने अनेक युगांपासून चालत आलेल्या जुन्या परंपरेला अनुसरून होती. श्रीमती हंसा मेहता असे नाव त्या प्रतिनिधीचे होते. त्यांच्यामुळे अशी समानता घोषणापत्रात नमूद करणे शक्य झाले, ही गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे? त्याच काळामध्ये आणखी एक सदस्य श्रीमती लक्ष्मी मेनन यांनी स्त्री-पुरूष समानतेच्या मुद्यावर आपले मत अतिशय स्पष्टपणे मांडले होते. इतकेच नाही तर, 1953 मध्ये श्रीमती विजया लक्ष्मी पंडित या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षही बनल्या होत्या.
मित्रांनो, आपण त्याच भूमीचे लोक आहोत. जे असा विश्वास ठेवतात, जे अशी प्रार्थना करतात.
ओम द्यौः शान्तिरन्तरिक्षँ शान्तिः,
पृथ्वी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः ।
वनस्पतयः शान्तिर्विश्र्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः,
सर्वशान्तिः शान्तिरेव शान्तिः, सा मा शान्तिरेधि।।
ओम शान्तिः शान्तिः शान्तिः ।।
भारताने सदैव विश्वाच्या शांतीसाठी काम केले आहे. 1950 च्या दशकापासून सातत्याने संयुक्त राष्ट्र शांती मोहिमेचा भारत एक हिस्सा बनला आहे, या गोष्टीचा भारताला अभिमान वाटतो. गरीबी हटविण्यासाठी, हवामान बदलाची समस्या आणि श्रमिकांसंबंधी प्रश्नांवर तोडगा काढण्याचा विषय असो, या सर्वांमध्ये भारताने अग्रणी भूमिका निभावत आहे. याशिवाय योग आणि आयुष यांना लोकप्रिय बनविण्यासाठी भारत डब्ल्यूएचओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेबरोबर काम करीत आहे. मार्च 2021 मध्ये डब्ल्यूएचओने घोषणा केली होती की, भारतामध्ये पारंपरिक औषधोपचार पद्धतीसाठी एक वैश्विक केंद्र स्थापन करण्यात येईल.
मित्रांनो, संयुक्त राष्ट्राविषयी बोलत असताना मला आज अटल जी यांचे शब्द आठवत आहेत. 1977 मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये हिंदीमध्ये भाषण करून इतिहास निर्माण केला होता. आज मी ‘‘मन की बात’’ मध्ये श्रोत्यांना, अटल जींच्या त्या भाषणातला काही भाग ऐकवू इच्छितो. श्रोत्यांनी, अटल जींची ती ओजस्वी वाणी ऐकावी -
‘‘ इथे मी राष्ट्रांची सत्ता आणि महत्ता यांच्याविषयी विचार करीत नाही. त्यापेक्षा सर्व सामान्य माणसाची प्रतिष्ठा आणि प्रगती माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे. अखेर, आपले यश आणि अपयश केवळ एकाच मापदंडाने मोजली गेली पाहिजे. आणि ते म्हणजे आपण संपूर्ण मानव समाज, वस्तूतः प्रत्येक नर-नारी आणि बालक यांना न्याय आणि प्रतिष्ठा देण्याविषयी आश्वस्त करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.’’
मित्रांनो, अटल जी यांचे हे वक्तव्य आपल्याला आजही मार्गदर्शन करणारे आहे. या भूमीला, पृथ्वीला अधिक चांगले आणि सुरक्षित ग्रह बनविण्याच्या कार्यात भारताचे योगदान, संपूर्ण विश्वासाठी एक खूप मोठी प्रेरणा देणारे आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
अलिकडेच काही दिवस आधी 21 ऑक्टोबरला आपण पोलिस स्मृती दिवस पाळला. पोलिस खात्यातल्या ज्या सहकारी मंडळींनी देशसेवेमध्ये आपल्या प्राणांचा त्याग केला, त्यांचे या दिवशी विशेषत्वाने स्मरण केले जाते. मी आज आपल्या या पोलिस कर्मचा-यांबरोबरच त्यांच्या परिवारांचेही स्मरण करू इच्छितो. परिवाराचे सहकार्य आणि त्याग यांच्याशिवाय पोलिसासारखी कठिण सेवा करणे खूप अवघड आहे. पोलिस सेवेसंबंधित आणखी एक गोष्ट आहे, ती मी ‘मन की बात’ च्या श्रोत्यांना सांगू इच्छितो. आधी अशी एक धारणा होती की, सेना-लष्कर आणि पोलिस यासारख्या सेवा केवळ पुरूषांसाठीच असतात. मात्र आज असे नाही. ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंटची आकडेवारी सांगते की, गेल्या काही वर्षांमध्ये महिला पोलिस कर्मचारी वर्गाची संख्या दुप्पट झाली आहे. डबल झाली आहे. 2014 मध्ये महिला पोलिसांची संख्या 1 लाख 5 हजारच्या जवळपास होती. तर 2020 पर्यंत ही संख्या वाढून ती दुपटीपेक्षा जास्त म्हणजे आता 2 लाख 15 हजारापर्यंत पोहोचली आहे. इतकंच नाही तर, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलामध्ये गेल्या सात वर्षांमध्ये महिलांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. आणि मी केवळ वाढलेल्या आकडेवारीविषयी बोलत नाही. आज देशाच्या कन्या अवघडात अवघड कामही संपूर्ण ताकदीनिशी, मोठ्या धाडसाने करीत आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर अनेक कन्या आता सर्वात कठिण असे मानले जाणारे प्रशिक्षण म्हणजे ‘स्पेशलाईज्ड जंगल वॉरफेअर कमांडोज’चे प्रशिक्षणही घेत आहेत. या प्रशिक्षणार्थी आपल्या ‘कोब्रा बटालियन’ चा हिस्सा बनणार आहेत.
मित्रांनो, आज आपण विमानतळांवर जातो, मेट्रो स्थानकांवर जातो, किंवा सरकारी कार्यालयातही पाहतो, सीआयएसएफच्या बहादूर महिला प्रत्येक संवेदनशील स्थानांवर सुरक्षा व्यवस्था पहात असताना दिसतात. याचा सर्वात सकारात्मक परिणाम आपल्या पोलिस दलाबरोबरच समाजाच्या मानसिकतेवरही पडत आहे. महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे लोकांमध्ये विशेषतः महिलांना एकप्रकारची सहजता वाटते, विश्वास निर्माण होतो. त्यांना स्वाभाविकपणे त्यांच्याविषयी आपलेपणा वाटतो, स्वतःला त्यांच्याबरोबर जोडतात. महिलांमध्ये असलेल्या संवेदनशीलतेमुळेही लोकांना त्यांच्याविषयी जास्त भरवसा वाटतो. आपल्या या महिला पोलिस कर्मचारी देशातल्या इतर लाखो मुलींसाठी ‘रोल मॉडेल’ बनत आहेत. मी महिला पोलिस कर्मचा-यांना सांगू इच्छितो की, शाळा सुरू झाल्या की, त्यांनी आपल्या भागातल्या शाळांना भेटी द्याव्यात आणि तिथल्या मुलींबरोबर संवाद साधावा. मला विश्वास आहे की, असा संवाद साधल्यामुळे आपल्या नवीन पिढीला एक वेगळी नवी दिशा मिळेल. इतकंच नाही तर यामुळे पोलिसांवर जनतेचा विश्वासही वाढेल. मी आशा करतो की, आगामी काळात आणखी जास्त संख्येने महिला पोलिस सेवेत सहभागी होतील, आपल्या देशाच्या ‘न्य एज पोलिसिंग’चे नेतृत्व करतील.
माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ज्या वेगाने वाढत आहे, त्याविषयी मी ‘मन की बात’ मध्ये बोलावं, असं अनेक श्रोते नेहमीच लिहीत असतात. आज मी अशाच एका विषयाची चर्चा तुमच्याबरोबर करू इच्छितो. हा विषय आपल्या देशात, विशेषतः आपल्या युवकांच्या आणि लहान-लहान मुलांच्याही कल्पनाविश्वात असतो. हा विषय आहे- ड्रोनचा ! ड्रोन तंत्रज्ञानाचा !! काही वर्षांपूर्वी जर कधी चर्चेत ड्रोनचं नाव आलं तर लोकांच्या मनात पहिला भाव काय येत होता? तर लष्कराचे, सेनेचे, हत्यार, शस्त्रे, युद्ध... असे विचार येत होते. परंतु आज मात्र आपल्याकडे कोणाचा विवाह समारंभ असेल, वरात काढली जाणार असेल किंवा असाच काही कार्यक्रम असेले तर आपण ड्रोनने छायाचित्रे काढतो आणि व्हिडिओ बनवताना पाहतोय. ड्रोनची व्याप्ती, त्याची क्षमता, ताकद केवळ इतकी मर्यादित नाही. ज्या देशांनी ड्रोनच्या मदतीने आपल्या गावांतल्या जमिनींची डिजिटल नोंदणी करण्याचे काम करणारे जे पहिले काही देश आहेत, त्यापैकीच भारत एक आहे. भारत ड्रोनचा वापर वाहतुकीसाठी करता यावा, यासाठी अतिशय व्यापक पद्धतीने काम करत आहे. मग त्यामध्ये गावातल्या शेती असो अथवा घरामध्ये सामान पोहोचवणे असो. संकटाच्या काळात मदत पोहोचवायची असो किंवा कायदा सुव्यवस्थेची निगराणी करायची असो. आपल्या अशा अनेक गरजांची पूर्तता करण्यासाठी ड्रोन काम करू शकतो, हे पाहण्यासाठी आता आपल्याला फार काळ वाट पहावी लागणार नाही. यामध्ये अनेक गोष्टी ड्रोनमार्फत करण्यास प्रारंभही झाला आहे. काही दिवसांपूर्वीच गुजरातमधल्या भावनगर इथे ड्रोनच्या मदतीने शेतांमध्ये नॅनो-युरिया शिंपडण्यात आला. कोविड लसीकरण मोहिमेमध्ये ड्रोनही आपली भूमिका बजावत आहेत. याचे एक छायाचित्र आपण मणिपूरमध्ये पहायला मिळाले होते. तिथं एका बेटावर ड्रोनच्या माध्यमातून लस पोहोचविण्यात आली. तेलंगणामध्ये ड्रोनच्या मदतीने लस पोहोचवली गेली. इतकेच नाही तर आता पायाभूत सुविधांसाठी अनेक मोठया प्रकल्पांची देखरेख करण्यासाठी ड्रोनचा वापर होत आहे. मी एका अशा युवा विद्यार्थ्याविषयी वाचले आहे की, त्यानं ड्रोनच्या मदतीने मच्छीमारांचे जीव वाचविण्याचं काम केलंय.
मित्रांनो, आधी या क्षेत्रामध्ये इतके नियम, कायदे आणि प्रतिबंध लावण्यात आले होेते की, ड्रोनची नेमकी, योग्य क्षमता वापरणेच अशक्य होते. ज्या तंत्रज्ञानाकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे, त्याकडे संकट म्हणून पाहिले जात होते. जर आपल्याला कोणत्याही कामासाठी ड्रोन उडवावा लागणार असेल तर, त्यासाठी परवाना आणि परवानगी घेणे अतिशय गुंतागुंतीचे, त्रासदायक काम होते. त्यामुळे लोक ड्रोन म्हटलं की, नको रे बाबा म्हणत होते. आम्ही आता निश्चय केला आहे की, ही मानसिकता बदलून टाकली पाहिजे. आणि नवीन गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे. म्हणूनच यावर्षी 15 ऑगस्टला देशाने एक नवीन ड्रोन धोरण जाहीर केलं आहे. ड्रोनशी संबंधित वर्तमान आणि भविष्यातल्या अनेक शक्यतांचा हिशेब लक्षात घेऊन हे धोरण निश्चित केले आहे. यामध्ये आता अनेक अर्ज भरावे लागणार नाहीत की, त्यांच्या मंजुरीसाठी फे-या माराव्या लागणार नाहीत. तसेच आधी द्यावी लागत होती, तितके शुल्कही लागणार नाही. मला एक गोष्ट आपल्याला सांगताना आनंद होताय की, नवीन ड्रोन धोरण आल्यानंतर अनेक ड्रोन स्टार्ट अप्समध्ये विदेशी आणि देशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे. अनेक कंपन्या ड्रोन निर्मितीचे प्रकल्पही उभे करीत आहेत. लष्कर, नौदल, वायूदलाने भारतीय ड्रोन कंपन्यांना 500 कोटी रूपयांपेक्षा जास्त मागणी नोंदवली आहे. आणि ही तर आत्ता कुठे सुरूवात झाली आहे. आपल्याला काही इथंच थांबायचं नाही. आपल्याला ड्रोन तंत्रज्ञानामध्ये देशाला अग्रणी बनवायचे आहे. म्हणूनच सरकार आवश्यक असणारी सर्व पावले उचलत आहे. मी देशाच्या युवकांनाही सांगू इच्छितो की, तुम्हीही ड्रोन धोरणानंतर निर्माण झालेल्या संधींचा लाभ उठविण्याच्या दृष्टीने जरूर विचार करा, त्यासाठी पुढे या.
माझ्या प्रिय देशवासियांनो, उत्तर प्रदेशातल्या मेरठ इथून ‘मन की बात’ च्या श्रोता श्रीमती प्रभा शुक्ला यांना मला स्वच्छतेसंबंधी एक पत्र पाठवले आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘‘भारतामध्ये सण-उत्सवांना आपण सर्वजण स्वच्छता साजरी करतो. तशाच प्रकारे जर आपण स्वच्छता, प्रत्येक दिवशी करून ती एक सवय बनवली तर संपूर्ण देश स्वच्छ होईल.’’ मला प्रभा जी यांचे म्हणणे अतिशय पसंत पडले. खरोखरीच जिथं स्वच्छता आहे, तिथं आरोग्य आहे. जिथं आरोग्य आहे, तिथं सामर्थ्य आहे, तिथं समृद्धी आहे. म्हणूनच तर देश स्वच्छ भारत मोहिमेवर इतका जोर देत आहे.
मित्रांनो, मला रांचीच्या अगदी जवळचे एक गाव आहे- सपारोम, नया सराय. इथली जी माहिती मिळाली, ती ऐकून खूप चांगले वाटले. या गावामध्ये एक तलाव होता. मात्र लोक या तलावाच्या जागेतच उघड्यावर शौच करीत होते. स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत ज्यावेळी सर्वांच्या घरांमध्येच शौचालये बनविण्यात आली तर गावकरी मंडळींनी विचार केला की, आपल्या गावाला स्वच्छ करण्याबरोबरच सुंदरही बनवू या. मग काय? सर्वांनी मिळून तलावाच्या मोकळ्या जागेत उद्यान बनवले. आज त्या जागी लोकांसाठी, मुलांसाठी, एक सार्वजनिक स्थान बनले आहे. यामुळे संपूर्ण गावाच्या जीवनमानातच खूप मोठे परिवर्तन घडून आले आहे. मी आपल्याला छत्तीसगडच्या देऊर गावातल्या महिलांविषयीही सांगू इच्छितो. इथल्या महिला एक स्वमदत समूह चालवतात. आणि सर्वजणी मिळून गावांतल्या चौक-चौरस्ते, इतर रस्ते आणि मंदिरांची सफाई करतात.
मित्रांनो, उत्तरप्रदेशच्या गाझियाबादच्या रामवीर तंवर जींना लोक पाँड मॅन (तलाव पुरूष) म्हणूनही ओळखतात. रामवीर जीं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरी करत होते. परंतु त्यांच्या मनात स्वच्छतेविषयी अशी चेतना निर्माण झाली की नोकरी सोडून ते तलाव स्वच्छ करण्याच्या कामात गुंतले. रामवीर जीनी आतापर्यत कितीतरी तलावांची स्वच्छता करून त्यांना पुनर्जिवित केलं आहे.
मित्रांनो, प्रत्येक नागरिक जेव्हा स्वच्छतेची आपली जबाबदारी ओळखेल, तेव्हाच स्वच्छतेचे प्रयत्न पूर्ण तर्हेनं यशस्वी होतात. आता दिवाळीला आम्ही आपल्या घराची साफसफाई करण्याच्या कामी तर लागणारच आहोत. परंतु या दरम्यान आम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की, आमच्या घराच्या बरोबरच आमचा शेजारही स्वच्छ राहिल. आम्ही आपलं घर तर स्वच्छ करू, पण आमच्या घरातील घाण आमच्या घराच्या बाहेर, आमच्या रस्त्यांवर जाईल, असं होऊ नये. आणि हां, मी जेव्हा स्वच्छतेविषयी बोलतो तेव्हा कृपा करून सिंगल युज प्लॅस्टिकपासून मुक्ति मिळवण्याची गोष्ट आपल्याला कधी विसरायची नाही. आम्ही हा निर्धार करू की, स्वच्छ भारत अभियानाचा उत्साह कमी होऊ देणार नाही . आम्ही सर्व मिळून आमचा देश संपूर्ण स्वच्छ करू आणि स्वच्छ राखू.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ऑक्टोबरचा पूर्ण महिना सणांच्या रंगात रंगला आहे आणि आता काही दिवसांनी दिवाळी तर येतच आहे. दिवाळी, त्यानंतर गोवर्धन पूजा, नंतर भाऊबीज, हे तीन सण तर होतीलच, पण याच दरम्यान छटपूजाही होईल. नोव्हेंबरमध्येच गुरू नानकदेवजी यांची जयंतीही आहे. इतके सण एकाच वेळेस होत असतात तर त्यांची तयारीही खूप अगोदरपासून सुरू होते. आपण सर्व जण खरेदीचे प्लॅन करत असाल, परंतु आपल्याला व्होकल फॉर लोकल हे लक्षात आहे नं...आपण लोकल वस्तु खरेदी केली तर आपला सण उजळून निघेल आणि एखादा गरीब भाऊ बहिण, एखादा कारागीर, एखाद्या विणकराच्या घरातही प्रकाश येईल. मला पूर्ण विश्वास आहे की, जी मोहिम आपण सर्वांनी मिळून सुरू केली आहे, ती या सणांच्या काळात आणखी मजबूत होईल. आपण आपल्या इथले जे स्थानिक उत्पादन खरेदी कराल, त्यांबद्दल समाजमाध्यमांमध्ये माहिती द्या. आपल्या बरोबरीच्या लोकांनाही सांगा. पुढच्या महिन्यात आम्ही पुन्हा भेटू आणि अशाच अनेक विषयांवर गप्पा मारू.
आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार!
तुम्हाला तर माहितीच आहे की एका आवश्यक कामासाठी मला अमेरिकेला जावे लागत आहे. म्हणून मी विचार केला की अमेरिकेला जाण्याच्या आधीच मी 'मन की बात' ध्वनिमुद्रित करून ठेवली तर चांगलं होईल.
सप्टेंबर मध्ये ज्या दिवशी 'मन की बात' आहे त्या तारखेलाच अजून एक महत्त्वपूर्ण दिवस असतो.
तसं तर आपण खूप सारे दिवस लक्षात ठेवतो, तऱ्हे तऱ्हेचे दिवस साजरे देखील करतो आणि जर आपल्या घरात तरुण मुलं- मुली असतील आणि त्यांना विचारलं तर वर्षभरात कुठला दिवस कधी येतो ह्याची संपूर्ण यादीच ते आपल्याला ऐकवतील, पण अजून एक दिवस असाही आहे की जो आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवा आणि हा दिवस असा आहे जो भारताच्या परंपरांशी खूप सुसंगत आहे. अनेक शतकांपासून ज्या परंपरांशी आपण जोडले गेलो आहोत, त्यांच्याशीच आपल्याला जोडून ठेवणारा आहे. हा आहे 'वर्ल्ड रिवर डे ' म्हणजेच 'विश्व नदी दिवस'.
आपल्याकडे म्हटलं गेलं आहे -
" पिबन्ति नद्यः, स्वयमेव नाम्भः"
अर्थात नद्या आपलं पाणी स्वतः पीत नाहीत पण परोपकारासाठी देतात. आमच्या इथे नदी एक भौतिक वस्तू नाही आहे, आमच्यासाठी नदी एक जिवंत एकक आहे आणि म्हणूनच, म्हणूनच तर नद्यांना आम्ही आई म्हणतो. आपले कितीतरी पर्व असतील, सण असतील, उत्सव असतील, आनंद असेल, हे सगळं आपल्या या आयांच्या कुशीतच तर होत असतात.
आपणा सर्वांना तर माहितीच आहे की माघ महिना येतो तेव्हा आपल्या देशातील बरेच लोक, संपूर्ण एक महिनाभर गंगा मातेच्या किंवा कुठल्या अन्य नदीच्या किनाऱ्यावर कल्पवास करतात.
आता अशी परंपरा तर नाही राहिली पण पूर्वीच्या काळी अशी परंपरा होती की घरात जरी स्नान करत असलो तरी नद्यांचे स्मरण करण्याची परंपरा, भलेही आज लुप्त झाली असेल किंवा क्वचितच कुठे अगदी लहान प्रमाणात, उरली असेल. पण एक खूप मोठी परंपरा होती जी प्रातःकाळी स्नान करतानाच विशाल भारताची एक यात्रा घडवत असे, मानसिक यात्रा!
देशातल्या कानाकोपऱ्यांशी जोडले जाण्याची प्रेरणा बनत असे. आणि काय होती ती? भारतात स्नान करण्याच्या वेळी एक श्लोक म्हणण्याची परंपरा होती-
" गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वति।
नर्मदे सिंधू कावेरी जले अस्मिन् सन्निधिं कुरु।।"
पूर्वी आमच्या घरातील कुटुंबातील मोठी माणसे हा श्लोक लहान मुलांकडून पाठ करून घेत असत आणि ह्या मुळे आपल्या देशातील नद्यांच्याविषयी आस्था उत्पन्न होत असे. विशाल भारताचा एक नकाशा मनात कोरला जात असे. .नद्यांशी एक नाते जोडले जात असे. ज्या नदीला एका आईच्या रूपात आपण ओळखतो, पाहतो, जगतो, त्या नदीच्या विषयी एक आस्थेची भावना निर्माण होत असे. ही एक संस्कार प्रक्रिया होती.
मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या देशातील नद्यांच्या गौरवाविषयी बोलतो आहोत तर स्वाभाविकपणे कोणीही एक प्रश्न विचारेल आणि प्रश्न विचारण्याचा हक्कही आहे आणि याचे उत्तर देणे ही आपली जबाबदारी आहे. कोणीही प्रश्न विचारेल की भाऊ, तुम्ही नद्यांच्या विषयी इतकं गुणगान गात आहात, नदीला आई म्हणत आहात तर मग या नद्या प्रदूषित का होत आहेत ?
आमच्या शास्त्रांनी तर नदीला थोडे देखील प्रदूषित करणे हे चुकीचं आहे असं सांगितलं आहे. आमची परंपरा देखील अशी आहे, आपल्याला माहिती आहे की आपल्या हिंदुस्थानचा जो पश्चिमी भाग आहे, विशेष करून गुजरात आणि राजस्थान, तिथे पाण्याची खूप टंचाई आहे. खूप वेळा दुष्काळ पडत असतो. म्हणून तेथील समाजजीवनात एक नवी परंपरा विकसित झाली आहे. जेव्हा गुजरातेत पावसाला सुरुवात होते तेव्हा गुजरातेत ' जल जीलनी एकादशी' साजरी केली जाते. याचा अर्थ असा - आजच्या काळात आपण ज्याला catch the rain वर्षाजलसंधारण म्हणतो तीच गोष्ट आहे की पाण्याचा एकेक/ प्रत्येक थेंब वाचवायचा -जल जीलनी.
त्याच प्रमाणे पावसाळ्याच्या नंतर बिहार आणि पूर्वेकडच्या भागात छठ चे महापर्व साजरे केले जाते. मला आशा आहे की छठपूजेची तयारी म्हणून नद्यांचे किनारे आणि घाटांची स्वच्छता आणि दुरुस्तीची तयारी सुरू झाली असेल.
आपण नद्यांच्या स्वच्छतेचे आणि त्यांना प्रदूषण मुक्त करण्याचे काम सर्वांच्या प्रयत्नांनी, सर्वांच्या सहकार्याने करूच शकतो. 'नमामि गंगे मिशन' पण आज प्रगती पथावर आहे, त्यात सर्व लोकांच्या प्रयत्नांची, एक प्रकारे जनजागृतीची, जनआंदोलनाची खूप मोठी भूमिका आहे.
मित्रांनो जेव्हा नदीविषयी बोलतो आहोत, गंगामातेविषयी बोलतो आहोत तेव्हा आणखी एका गोष्टीकडे देखील आपले लक्ष वेधले पाहिजे असे वाटते आहे.
जेव्हा 'नमामि गंगे' विषयीआपण बोलत होतो तेव्हा तर नक्कीच एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल आणि आमच्या तरुणांच्या तर अगदी नक्कीच लक्षात आली असेल. सध्या एक विशेष ई ऑक्शन, ई लिलाव चालू आहे. हा त्या वस्तूंचा इलेक्ट्रॉनिक लिलाव होतो आहे ज्या मला वेळोवेळी लोकांनी दिलेल्या होत्या. या लिलावातून जो पैसा मिळेल तो ' नमामि गंगे 'अभियानासाठी समर्पित केला जाईल. आपण ज्या आत्मीय भावनेने मला भेटवस्तू देता, तीच भावना हे अभियान आणखी बळकट करते आहे.
मित्रांनो देशभरातील नद्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी, पाण्याची स्वच्छता करण्यासाठी सरकार आणि समाजसेवी संघटना सतत काही ना काही तरी करत असतात. आजच नाही, अनेक दशकांपासून हे चालत आले आहे. काही लोकांनी तर अशा कामांसाठी स्वतःला समर्पित केलेले आहे आणि हीच परंपरा, हाच प्रयत्न, हीच आस्था आमच्या नद्यांचे रक्षण करते आहे. आणि हिंदुस्थानातील कोणत्याही कोपऱ्यातून जेव्हा अशी बातमी माझ्या कानांवर येते तेव्हा असे काम करणाऱ्यांच्या विषयी एक आदराचा भाव माझ्या मनात जागृत होतो आणि मलाही वाटतं की या बातम्या आपल्याला सांगाव्या.
आता बघा, तामिळनाडूच्या वेल्लोर आणि तिरुवन्नामलाई जिल्ह्याचे एक उदाहरण देऊ इच्छितो. इथे एक नदी वाहते, नागानधी. आता ही नागानधी अनेक वर्षांपासून कोरडी झालेली होती. या कारणामुळे तिथला जलस्तर देखील खूप खाली गेलेला होता. पण तिथल्या महिलांनी आपल्या नदीला पुनरुज्जीवित करण्याचा विडाच उचलला. मग काय.. त्यांनी लोकांना एकत्र केलं, लोकसहभागातून कालवे खोदले.Check dam बनवले, जल साठा करण्यासाठी विहिरी बांधल्या. आपल्या सगळ्यांना हे ऐकून आनंद होईल की मित्रांनो, आज ती नदी पाण्याने भरून गेली आहे! आणि जेव्हा नदी पाण्याने भरून जाते ना तेव्हा मनाला इतकी (शांतता), तृप्तता वाटते. मी प्रत्यक्ष याचा अनुभव घेतलेला आहे.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की ज्या साबरमती नदीच्या किनाऱ्यावर महात्मा गांधींनी साबरमती आश्रम स्थापन केला होता, ती साबरमती नदी गेल्या काही दशकांपासून आटत चालली होती, (कोरडी पडली होती.) वर्षातून सहा-आठ महिने तरी तिच्यात पाणी दिसतच नसे. पण नर्मदा नदी आणि साबरमती नदी जोडल्या गेल्या आणि आज आपण अहमदाबादला जाल तर साबरमती नदीतील पाणी आपले मन प्रसन्न करेल. याच प्रमाणे अनेक कामे, जशी तामिळनाडूतल्या आपल्या बहिणी करत आहेत तशी, देशातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात चालू आहेत. मला माहिती आहे की आमच्या धार्मिक परंपरांशी जोडलेले संत असतील, गुरुजन असतील, ते देखील आपल्या अध्यात्मिक यात्रेच्या सोबतच, पाण्यासाठी, नद्यांसाठी खूप काम करत आहेत. अनेक नद्यांच्या किनारी झाडे लावण्याचे अभियान चालू आहे तर कुठे नदीत सोडले जाणारे दूषित पाणी थांबवले जात आहे.
मित्रांनो, आज 'विश्व नदी दिवस" साजरा करताना, या कामासाठी स्वतःला समर्पित करून घेतलेल्या सर्वांचे मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. पण प्रत्येक नदीच्या जवळ राहणाऱ्या लोकांना, देशवासीयांना मी विनंती करेन की भारतात, ठिकठिकाणी, वर्षातून एक वेळा तरी नदी उत्सव साजरा केलाच पाहिजे.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, कधीच लहान गोष्टीला, लहान वस्तूला, लहान/ (क्षुल्लक) मानण्याची चूक करू नये. लहान लहान प्रयत्नातून कधी कधी खूप मोठे परिवर्तन घडून येते आणि महात्मा गांधींच्या आयुष्याकडे आपण पाहिले तर आपल्याला प्रत्येक क्षणी जाणवेल की लहान लहान गोष्टींना त्यांच्या आयुष्यात किती महत्त्व होते आणि लहान लहान गोष्टींना घेऊनच मोठे मोठे संकल्प त्यांनी कसे साकार केले. आमच्या आजच्या नौजवानांना हे नक्की माहिती असलं पाहिजे की स्वच्छता अभियानाने, स्वातंत्र्य आंदोलनाला, सतत एक ऊर्जा दिली होती. ते महात्मा गांधीच तर होते की ज्यांनी स्वच्छतेला जनआंदोलन बनवण्याचे काम केले. महात्मा गांधींनी स्वच्छतेला स्वातंत्र्याच्या स्वप्नाशी जोडण्याचे काम केले. आज इतक्या दशकानंतर, पुन्हा एकदा, स्वच्छता आंदोलनाने देशाला, नव्या भारताच्या स्वप्नाशी जोडण्याचे काम केले आहे आणि हे आमच्या सवयी बदलण्याचे देखील एक अभियान बनते आहे.
आम्हाला हे विसरून चालणार नाही की स्वच्छता केवळ एक कार्यक्रम नाही, स्वच्छता ही एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संस्कार संक्रमण करण्याची जबाबदारी आहे आणि पिढ्यानपिढ्या स्वच्छता अभियान चालते तेव्हाच संपूर्ण समाजजीवनाचा स्वच्छता हा स्वभाव बनतो.
आणि म्हणूनच वर्ष- दोन वर्ष, एक सरकार- दुसरे सरकार असा हा विषय नाही तर पिढ्यान पिढ्या आम्हाला स्वच्छतेच्या विषयी जागरूक राहून, अविरत, न थकता, न थांबता, श्रद्धापूर्वक काम करत राहायचे आहे आणि स्वच्छतेचे अभियान चालवायचे आहे.
आणि मी तर आधी देखील म्हटलं होतं की स्वच्छता ही पूज्य बापूंना, ह्या देशाने वाहिलेली, खूप मोठी श्रद्धांजली आहे आणि ही श्रद्धांजली आम्हाला दर वेळी द्यायची आहे, सतत देत राहायची आहे.
मित्रांनो, लोकांना माहिती आहे की स्वच्छतेच्या विषयी बोलण्याची संधी मी कधीच सोडत नाही आणि म्हणूनच, आपल्या ' मन की बात ' चे एक श्रोते, श्रीमान रमेश पटेलजी, यांनी लिहिले की आम्हाला बापूंकडून शिकवण घेऊन, स्वातंत्र्याच्या 'अमृत महोत्सवात' आर्थिक स्वच्छतेचा देखील संकल्प करायला हवा. ज्याप्रमाणे शौचालये निर्माण झाल्याने गरिबांची प्रतिष्ठा वाढली त्याप्रमाणे आर्थिक स्वच्छता गरिबांच्या अधिकारांची सुनिश्चिती करते, त्यांचे आयुष्य सोपे बनवते. आता आपल्याला माहिती आहे की जनधन खात्यांच्या विषयी देशाने अभियान सुरू केले. त्यामुळे आज गरिबांचा, त्यांच्या हक्काचा पैसा, थेट, सरळ त्यांच्याच खात्यात जातो आहे, त्यामुळे भ्रष्टाचारासारखे व्यत्यय, खूप प्रमाणात कमी झाले आहेत. ही गोष्ट खरीच आहे की आर्थिक स्वच्छतेत तंत्रज्ञानाची खूप मदत होऊ शकते. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की आज गावातून, खेड्यातून देखील फिन टेक युपीआय ( fin- tech UPI) ने डिजिटल देवाण घेवाण करण्यासाठी सामान्य लोक पण सामील होत आहेत. त्याचा वापर वाढत आहे.
आपल्याला मी एक आकडा सांगतो, आपल्याला पण अभिमान वाटेल. गेल्या ऑगस्ट महिन्यात, एका महिन्यात, युपीआय द्वारे 355 कोटी व्यवहार झाले. म्हणजेच जवळजवळ 350 कोटींपेक्षा जास्त व्यवहार. म्हणजे आपण म्हणू शकतो की ऑगस्ट महिन्यात तीनशे पन्नास कोटी पेक्षा जास्त वेळा, डिजिटल देवाण घेवाणीसाठी, यूपीआयचा वापर केला गेला. आज सरासरी सहा लाख कोटी रुपयांहून जास्त डिजिटल पेमेंट, UPI द्वारा होते आहे. ह्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत स्वच्छता आणि पारदर्शिता येते आहे आणि आम्हाला माहिती आहे की आता fin-tech चे महत्व खूप वाढते आहे.
मित्रांनो जसे बापूंनी स्वच्छतेला स्वातंत्र्याशी जोडले होते तसेच खादीला स्वातंत्र्याची ओळख बनवलं होतं. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी, आज आपण जेव्हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतो आहोत, आज आपण आनंदाने म्हणू शकतो की स्वातंत्र्य आंदोलनात जसा खादीचा गौरव होता, तसाच गौरव, आज आमची युवा पिढी खादीला देते आहे.
आज खादी आणि हातमागाचे उत्पादन अनेक पटींनी वाढले आहे आणि मागणी देखील वाढली आहे. आपल्याला पण माहिती आहे की असे कितीतरी प्रसंग आले जेव्हा दिल्लीच्या खादी शोरुम मध्ये एका दिवसात, एक कोटीपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार झाले. मी देखील पुन्हा आपल्याला सांगेन, की दोन ऑक्टोबर ला पूज्य बापूंच्या जयंतीच्या दिवशी आपण सगळे मिळून पुन्हा एकदा, एक नवा विक्रम स्थापित करू या. आपण आपल्या शहरात जिथे खादी विकली जात असेल, हातमाग उत्पादन विकले जात असेल, हस्तकला वस्तू विकल्या जात असतील, आणि दिवाळीचा सण जवळ आला आहे, सणांच्या दिवसातील आपली खादी, हातमाग आणि कुटिरोद्योग संबंधी सर्व खरेदी vocal for local ह्या अभियानाला बळकट करणारी असेल. जुने सर्व विक्रम मोडणारी असेल.
मित्रानो, अमृत महोत्सवाच्या ह्या काळात, देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील, आत्तापर्यंत सांगितल्या न गेलेल्या गाथा, माणसा माणसा पर्यंत पोचविण्याचे देखील एक अभियान सुरू आहे. ह्या साठी नवोदित लेखकांना, देशातील आणि जगातील युवकांना आवाहन केले होते.
ह्या अभियानासाठी आत्तापर्यंत 13 हजाराहून जास्त लोकांनी नाव नोंदवले आहे, ते देखील 14 वेगवेगळ्या भाषांमध्ये. माझ्यासाठी आनंदाची गोष्ट अशी आहे की 20 हून जास्त देशातील, कितीतरी अप्रवासी भारतीयांनी देखील ह्या अभियानात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एक अजून आकर्षक माहिती अशी आहे की 5000 हून जास्त नवोदित लेखक स्वातंत्र्य लढ्याच्या कथा शोधत आहेत. त्यांनी unsung heroes, अनाम वीरांच्या, ज्यांची नावे इतिहासाच्या पानांवर दिसत नाहीत, अशा अनाम वीरांच्या संकल्पनेवर, त्यांच्या आयुष्यावर, त्या घटनांवर काही लिहिण्याचा विडा उचलला आहे. म्हणजेच, त्या स्वातंत्र्य सेनानींचा, ज्यांच्या विषयी गेल्या 75 वर्षात काही बोललेच गेले नाही, त्यांचा इतिहास, देशासमोर आणण्याचा युवकांनी निश्चय केला आहे. सर्व श्रोत्यांना माझी विनंती आहे, शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वांना माझी विनंती आहे. आपण देखील युवकांना प्रेरित करा. आपण पण पुढे व्हा आणि मला पक्का विश्वास आहे की स्वातंत्र्याचा इतिहास लिहिण्याचे काम करणारे लोक इतिहास घडवणारे देखील आहेत.
माझ्या प्रिय देशबांधवांनो ,
सियाचीन ग्लेशियरबद्दल आपण सगळे जाणतोच. तिथली थंडी इतकी भयानक असते की, तिथे राहणं सामान्य माणसाला शक्य नाही. दूरवर पसरलेला बर्फच बर्फ आणि झाडाझुडपांचा काहीच पत्ता नाही. तिथलं तापमान उणे 60 डिग्री पर्यंत देखील जातं. मात्र, काही दिवसांपूर्वीच दिव्यांग व्यक्तींच्याएका चमूने जो पराक्रम करून दाखवला आहे, तो प्रत्येक देशबांधवासाठी अभिमानास्पद आहे. या चमूने सियाचीन ग्लेशियरच्या 15 हजार फुटांपेक्षा देखील जास्त उंचीवर असलेल्या 'कुमार पोस्ट' वर आपला झेंडा फडकवून जागतिक विक्रम केला आहे. शारीरिक आव्हानं असून देखील आपल्या या दिव्यांग मित्रांनी जी कामगिरी करून दाखवली, ती संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे आणि जेव्हा या चमूबद्दल तुम्हाला माहिती मिळेल तेव्हा माझ्याप्रमाणेच तुमच्यात देखील हिंमत आणि आत्मविश्वास जागृत होईल. या शूर दिव्यांग मित्रांची नावं आहेत, महेश नेहरा, उत्तराखंडचे अक्षत रावत, महाराष्ट्राचे पुष्पक गवांडे, हरियाणाचे अजय कुमार, लडाखचे लोब्सांग चोस्पेल, तामिळनाडूचे मेजर द्वारकेश, जम्मू - कश्मीरचे इरफान अहमद मीर आणि हिमाचल प्रदेशचे चोंजिन एन्गमो. सियाचीन ग्लेशियर सर करण्याची ही मोहीम भारतीय सेनेच्या विशेष दलांच्या माजी अधिकाऱ्यांमुळे यशस्वी होऊ शकली. मी या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व कामगिरीसाठी या चमूचे कौतुक करतो. ही कामगिरी आपल्या देशबांधवांची, "Can Do Culture", "Can Do Determination" "Can Do Attitude" (मी हे करू शकतो संस्कृती, करण्याचा निश्चय आणि करण्याची प्रवृत्ती) अशी प्रत्येक आव्हान पेलण्याची प्रवृत्ती दर्शवणारी आहे.
मित्रांनो, आज देशात दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी अनेक प्रयत्न होत आहेत. मला उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या अशाच एका One Teacher, One Call (वन टीचर-वन कॉल) उपक्रमाबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली. बरेली येथे सुरू असलेली ही नावीन्यपूर्ण मोहीम दिव्यांग मुलांना नव्या वाटा दाखवत आहे. या मोहिमेचे नेतृत्व करत आहेत डभौरा, गंगापूर इथल्या एका शाळेच्या मुख्याध्यापिका दीपमाला पांडेयजी. कोरोना काळात, या मोहिमेमुळे मोठ्या संख्येने मुलांना शाळेत प्रवेश घेणं शक्य झालं, एवढच नाही, तर यामुळे जवळपास 350 पेक्षा जास्त शिक्षक देखील या सेवाकार्याशी जोडले गेले आहेत. हे शिक्षक गावोगावी जाऊन दिव्यांग मुलांना साद घालतात, त्यांचा शोध घेतात आणि त्यांना कुठल्या ना कुठल्या शाळेत प्रवेश मिळवून देतात. दिव्यांग व्यक्तींसाठी दीपमालाजी आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांच्या या प्रामाणिक प्रयत्नांची मी मनापासून प्रशंसा करतो. शिक्षणाच्या क्षेत्रातला असा प्रत्येक प्रयत्न आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल करणार आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आज आपलं आयुष्य असं झालं आहे, की दिवसातून हजारोवेळा कोरोना हा शब्द कानावर पडतो, 100 वर्षांनी आलेली ही जागतिक महामारी, कोविड-19 ने प्रत्येक देशबांधवाला खूप काही शिकवलं आहे. आरोग्य आणि निरामयता (wellness) याबद्दल आपली उत्सुकता वाढली आहे आणि जागरूकता देखील. आपल्या देशात पारंपरिक रुपात अशा नैसर्गिक वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, ज्या सुदृढ आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहेत. ओडिशाच्या कालाहांडीच्या नांदोल येथे राहणारे पतायत साहूजी या क्षेत्रात अनेक वर्षांपासून वैशिष्ट्यपूर्ण काम करत आहेत. त्यांनी दीड एकर जमिनीवर औषधी झाडे लावली आहेत. इतकंच नाही, तर साहूजींनी या औषधी वनस्पतींच्या नोंदी देखील ठेवल्या आहेत. मला रांचीच्या सतीशजींनी पत्र लिहून अशीच आणखी एक माहिती दिली आहे. सतीशजींनी झारखंडच्या एका कोरफड गावाकडे माझं लक्ष वेधलं आहे. रांचीजवळच्या देवरी गावच्या महिलांनी मंजू कच्छपजी यांच्या नेतृत्वाखाली बिरसा कृषी विद्यापीठातून अॅलोव्हेरा म्हणजेच कोरफड शेतीचं प्रशिक्षण घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी कोरफडीची शेती सुरू केली. या शेतीने आरोग्य क्षेत्रालाच फायदा मिळाला नाही, तर या महिलांचे उत्पन्न देखील वाढले. कोविड महामारीच्या काळात देखील यांनी उत्तम कमाई केली. याचं एक मोठं कारण हे होतं की सॅनिटायझर बनविणाऱ्या कंपन्या थेट यांच्याकडून कोरफड खरेदी करत होत्या. आज सुमारे चाळीस महिलांचा चमू या कामात गुंतला आहे आणि अनेक एकरांवर कोरफडीची लागवड केली जात आहे. ओदिशाचे पतायत साहूजी असोत, किंवा मग देवरीतला या महिलांचा चमू, यांनी शेतीची ज्याप्रकारे आरोग्याशी सांगड घातली आहे, ते एक मोठं उदाहरण आहे.
मित्रांनो, येत्या दोन ऑक्टोबरला, लाल बहादूर शास्त्री यांचीही जयंती आहे. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आपल्याला हा एक दिवस शेतीमध्ये नवनवे प्रयोग करणाऱ्यांची आठवण करण्याचीही प्रेरणा देतो. औषधी वनस्पतींच्या क्षेत्रात, स्टार्ट अप्सना प्रोत्साहन देण्यासाठी, मेडी-हब- टीबीआय च्या नावाने एक इन्क्युबेटर गुजरातच्या आणंद इथं कार्यरत आहे. औषधी आणि सुगंधी वनस्पतींशी संबंधित या इनक्यूबेटरच्या मार्फत अगदी थोड्या कालावधीत, 15 स्वयंउद्योजकांच्या उद्योगविषयक कल्पनांना पाठबळ देण्यात आले आहे. या इनक्यूबेटरच्या मदतीनेच, सुधा चेब्रोलू जी यांनी आपली स्टार्ट अप कंपनी सुरु केली. त्यांच्या कंपनीत महिलांना प्राधान्य दिले जाते आणि त्यांच्यावरच, वनौषधीची अभिनव सूत्रे तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आणखी एक स्वयंउद्योजिका, सुभाश्री जी यानांही याच औषधी आणि सुगंधी वनस्पती इन्क्यूबेटर केंद्रातून मदत मिळाली आहे. सुभाश्री जी यांची कंपनी, वनौषधींपासून तयार केलेल्या गृह आणि कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या फ्रेशनरचे उत्पादन आणि व्यवसाय करतात. त्यांनी वनौषधींचे एक टेरेस गार्डनही तयार केले आहे, ज्यात 400 पेक्षा अधिक औषधी वनस्पती आहेत.
मित्रांनो,
मुलांमध्ये औषधी आणि हर्बल वनस्पतींबाबत जागृती वाढावी, त्यांना माहिती मिळावी यासाठी आयुष मंत्रालयाने एक फारच रोचक उपक्रम सुरु केला आहे. आणि या उपक्रमाची जबाबदारी घेतली आहे, आपले प्राध्यापक आयुष्मान जी यांनी ! कदाचित तुम्ही विचार करत असाल, की हे प्रोफेसर आयुष्मान महोदय आहेत तरी कोण? तर प्रोफेसर आयुष्मान एका कॉमिक पुस्तकाचं नाव आहे. यात वेगवेगळ्या कार्टून व्यक्तिरेखांच्या माध्यमातून छोट्या-छोट्या गोष्टी रचण्यात आल्या आहेत. त्यासोबतच, कोरफड, तुळस, आवळा, गुळवेल, कडुलिंब, अश्वगंधा आणि ब्राह्मी अशा सुदृढ आरोग्यासाठी उपयुक्त औषधी वनस्पतींचे उपयोगही सांगितले आहे.
मित्रांनो, आजच्या परिस्थितीत, ज्या पद्धतीने, औषधी वनस्पती आणि इतर वनौषधींकडे, जगभरातल्या लोकांचा कल वाढतांना दिसतो आहे, त्यात भारतासाठी अमर्याद संधी निर्माण झाल्या आहेत. गेल्या काही काळात, आयुर्वेदिक आणि वनौषधींच्या निर्यातीतही खूप मोठी वाढ झाली आहे.
मी वैज्ञानिक, संशोधक आणि स्टार्ट अप्सच्या जगाशी संबंधित सर्व लोकांचे लक्ष अशा काही उत्पादनांकडे वेधू इच्छितो, जे लोकांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती तर वाढवतातच; शिवाय आपले शेतकरी आणि युवकांचे उत्पन्न वाढण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरु शकतात.
मित्रांनो, पारंपरिक शेतीच्या पलीकडे जात, शेतीतच होणारे नवे प्रयोग, नवे पर्याय, सातत्याने स्वयंरोजगाराची साधने निर्माण करत आहेत. पुलवामा इथल्या दोन बंधूंची कथा देखील याचेच एक उत्तम उदाहरण आहे. जम्मू-कश्मीरच्या पुलवामा इथले बिलाल अहमद शेख आणि मुनीर अहमद शेख, यांनी ज्याप्रकारे आपल्यासाठी नव्या वाटा चोखाळल्या आहेत, ते म्हणजे नव्या भारताचेच एक मूर्तिमंत उदाहरण आहे. 39 वर्षांचे बिलाल अहमद जी उच्चशिक्षित आहेत, त्यांनी अनेक पदव्या संपादन केल्या आहेत. आपल्या उच्चशिक्षणातून मिळालेल्या अनुभवांचा वापर करत त्यांनी, कृषीक्षेत्रात, स्वत:ची स्टार्ट अप कंपनी सुरु केली आहे. बिलालजी यांनी आपल्या घरातच गांडूळ खताचा छोटासा प्रकल्प सुरु केला आहे. या प्रकल्पातून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताचा शेतीत तर फायदा होतो आहेच, त्याशिवाय, यातून काही रोजगारांच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. दर वर्षी या दोन्ही बंधूंच्या खत प्रकल्पातून शेतकऱ्यांना सुमारे तीन हजार क्विंटल गांडूळ खत मिळत आहे. आज त्यांच्या या गांडूळ खत निर्मिती प्रकल्पात, 15 जण काम करतात. त्यांचा हा प्रकल्प बघण्यासाठी दूरदुरून अनेक लोक येतात, आणि विशेष म्हणजे त्यात अशा युवकांचे प्रमाण अधिक आहे, ज्यांना कृषीक्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा आहे. पुलवामा इथल्या या शेख बंधूंनी ‘नोकरी शोधणारे’ होण्यापेक्षा ‘नोकऱ्या निर्माण करणारे’ होण्याचा संकल्प केला, आणि ते केवळ जम्मू-काश्मीरच नाही, तर संपूर्ण देशालाच एक नवा मार्ग दाखवत आहेत, हा मार्ग इतर युवकांना प्रेरणा देतो आहे.
माझ्या प्रिय देशबांधवानो,
25 सप्टेंबरला देशाचे थोर सुपुत्र पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती असते. दीनदयाल जी, गेल्या शतकातील सर्वात मोठ्या विचारवंतांपैकी एक होते. अर्थशास्त्र, समाजाला सक्षम करण्यासाठी त्यांनी आखलेली धोरणे, त्यांनी दाखवलेला अंत्योदयाचा मार्ग आजही तेवढाच प्रासंगिक तर आहेच, शिवाय अत्यंत प्रेरणादायी देखील आहे.
तीन वर्षांपूर्वी, 25 सप्टेंबर रोजी त्यांच्या जयंतीचे औचित्य साधत, जगातली सर्वात मोठी आरोग्य विमा योजना- आयुष्मान भारत लागू करण्यात आली होती. आज देशातील दोन सव्वा दोन कोटींपेक्षा अधिक गरिबांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत, रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळाले आहेत. गरिबांसाठीची ही इतकी मोठी योजना, दीनदयालजींच्या अंत्योदय तत्त्वज्ञानाला समर्पित आहे. आजच्या युवकांनी जर त्यांची मूल्ये आणि आदर्श प्रत्यक्ष आयुष्यात आचरणात आणली, तर त्याची त्यांना खूप आयुष्यात खूप मदत होऊ शकेल. एकदा लखनौ इथे दीनदयालजी यांनी म्हटले होते, “किती चांगल्या चांगल्या गोष्टी आहे, किती उत्तम गुण आहेत- हे सगळे आपल्याला समाजाकडूनच तर मिळत असते. आपल्याला समाजाचे ऋण फेडायचे आहे, अशाच प्रकारचा विचार करायला हवा.” म्हणजेच, दीनदयालजी यांनी आपल्याला शिकवण दिली, की आपण समाजाकडून सतत काही ना काही घेत असतो, अनेक गोष्टी घेत असतो. आपल्याकडे जे काही आहे, ते देशामुळेच तर आहे. म्हणूनच, देशाप्रति असलेले आपले ऋण कसे फेडता येईल, याचा विचार करायला हवा. हा आजच्या युवकांसाठी खूप मोठा संदेश आहे.
मित्रांनो, दीनदयालजी यांच्या आयुष्यातून आपल्याला आणखी एक शिकवण मिळते- ती म्हणजे, कधीही हार मानायची नाही. राजकीय आणि वैचारिक परिस्थिती विपरीत असतांनाही, भारताच्या विकासासाठी स्वदेशी मॉडेलचा वापर करण्याच्या आपल्या निश्चयापासून ते किंचितही ढळले नाहीत. आज खूप युवक-युवती मळलेल्या वाटेवरुन जाण्यापेक्षा स्वतःची वेगळी वाट निर्माण करण्यास इच्छुक आहेत, त्यांना परिस्थिती स्वतःला अनुकूल बनवायची आहे, अशा वेळी दीनदयालजी यांच्या आयुष्यातून खूप प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळू शकेल आणि म्हणूनच माझा युवकांना आग्रही सल्ला आहे, की त्यांच्याविषयीची माहिती नक्कीच जाणून घ्या.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपण आज अनेक विषयांवर चर्चा केली. आपण बोलत होतो, त्याप्रमाणे, पुढचा काही काळ सणवारांचा आहे. संपूर्ण देश, मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या ‘सत्याचा असत्यावर विजय’ सांगणारा विजयादशमीचा उत्सवही साजरा करणार आहे. मात्र, या उत्सवकाळातही आणखी एक लढा आपल्याला कायम लक्षात ठेवायचा आहे. आणि तो लढा आहे कोरोनाविरुद्धचा! या लढाईत टीम इंडिया रोज नवनवे विक्रम रचत आहे. लसीकरणात देशाने अनेक असे विक्रम प्रस्थापित केले आहेत, ज्यांची चर्चा सगळ्या जगभरात सुरु आहे. या लढाईत प्रत्येक भारतीयाची भूमिका महत्वाची आहे.
आपल्याला आपली वेळ आली की लस तर घ्यायची आहेच, पण त्यासोबतच आपल्याला याकडेही लक्ष द्यायचे आहे, की या सुरक्षा चक्रातून कोणीही सुटणार नाही. आपल्या आसपासच्या भागात, ज्या कोणाचे लसीकरण झालेले नाही, त्यांना लसीकरण केंद्रात घेऊन जायचे आहे. आणि लस घेतल्यानंतरही सर्व नियमांचे पालन करायचे आहे. मला आशा आहे की या लढाईत पुन्हा एकदा टीम इंडिया आपला झेंडा उंच फडकवणार आहे. आपण पुढच्या वेळी आणखी काही विषयांवर ‘मन की बात’ करुया. आपल्या सर्वांना, प्रत्येक देशबांधवाला येणाऱ्या सणवारांसाठी खूप खूप शुभेच्छा !
धन्यवाद !
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार!
आज मेजर ध्यानचंद जी यांची जयंती आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि आपला देश त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करीत आहे. माझ्या मनात विचार आला की, सध्या जिथं कुठं मेजर ध्यानचंद जी यांचा आत्मा असेल, तिथं त्यांना खूप प्रसन्न वाटत असणार. कारण संपूर्ण दुनियेमध्ये भारताच्या हॉकीचा डंका बजावण्याचं काम ध्यानचंद जी यांच्या हॉकीनं केलं होतं. आणि आज चार दशकांनंतर, जवळ-जवळ 41 वर्षांनी भारताच्या नवयुवकांनी, पुत्रांनी आणि कन्यांनी हॉकी खेळामध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकले आहेत. देशानं कितीही पदकांची कमाई केली तरी जोपर्यंत हॉकीमध्ये देशाला पदक मिळत नाही, तोपर्यंत कोणाही भारतीयांना विजयाचा आनंद घेता येत नाही. आणि यावेळच्या ऑलिंपिकमध्ये भारताला चार दशकांनंतर हॉकीचं पदक मिळालं. भारताच्या या विजयामुळं मेजर ध्यानचंद जी यांच्या हृदयाला, आत्म्याला, ते जिथं कुठं असतील, तिथं त्यांना किती आनंद वाटला असेल, त्यांचा आत्मा किती प्रसन्न झाला असेल, याची कल्पना तुम्ही मंडळी करू शकता. ध्यानचंद जीं नी आपलं संपूर्ण जीवन खेळाला समर्पित केलं होतं. आणि म्हणूनच, आज ज्यावेळी देशाचे नवयुवक, आपली मुलं-मुली, यांच्यामध्ये खेळाविषयी जे आकर्षण दिसून येतं, त्याचबरोबर मुलं जर खेळामध्ये चांगलं प्रदर्शन करून पुढं जात असताना मुलांचे आई-वडीलही आनंद व्यक्त करीत असतील, तर मला वाटतं की, आज मुलांमध्ये खेळाविषयी जो उत्साह दिसून येतोय, तो पाहिल्यावर मला वाटतं की, हीच मेजर ध्यानचंद जी यांना खूप मोठी श्रद्धांजली आहे.
मित्रांनो,
ज्यावेळी खेळाविषयी बोलणं होतं, त्यावेळी तर स्वाभाविकतेनं आपल्या डोळ्यासमोर तरूण पिढी येते. आणि ज्यावेळी तरूण पिढीकडे अगदी लक्षपूर्वक न्याहाळून पाहिलं तर किती मोठं परिवर्तन झाल्याचं दिसून येत. युवावर्गामध्ये मनपरिवर्तन झालंय. आणि आजचा युवावर्ग जुन्या- पुराण्या पद्धतींपेक्षाही काही तरी नवीन करू इच्छितोय. आजच्या युवकांना काहीतरी वेगळं, नवं, करण्याची इच्छा आहे. ही नवीन पिढी नवीन मार्ग तयार करू इच्छित आहेत. अगदी अनोळख्या क्षेत्रामध्ये आजच्या नवतरूणांना पावले टाकायची आहेत. त्यांच्यादृष्टीनं लक्ष्य नवं, शिखरही नवं आहे आणि त्यासाठी स्वीकारला जाणारा मार्गही नवा आहे. त्यांच्या मनामध्ये नवनवीन आशा-आकांक्षा आहेत. आणि एकदा का मनानं निश्चय केला केला ना, की युवक अगदी आपलं सर्वस्व पणाला लावून निश्चयपूर्तीसाठी रात्रं-दिवस परिश्रम करतात. काही दिवसांपूर्वी तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल, भारताने आपल्या अंतराळ क्षेत्राला मुक्त केलं आणि पाहता पाहता युवा पिढीनं ही संधी साधली. त्याचा लाभ उठवण्यासाठी महाविद्यालयांतले विद्यार्थी, विद्यापीठ, खाजगी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेलं नवतरूण अगदी हिरीरीनं पुढं आले आहेत. आगामी दिवसांमध्ये आमच्या युवकांनी, आमच्या विद्यार्थ्यांनी, आमच्या महाविद्यालयांनी, आमच्या विद्यापीठांनी, प्रयोगशाळांमध्ये विद्यार्थ्यांनी काम करून, असंख्य, म्हणजे- खूप मोठ्या संख्येनं उपग्रह बनवले आहेत, हे सर्वांना दिसून येईल, असा मला विश्वास आहे.
याचप्रमाणे, कुठंही पहा, कोणत्याही कुटुंबामध्ये गेलात, आणि कितीही संपन्न परिवार असो, शिक्षित कुटुंब असो, जर तुम्ही त्या कुटुंबातल्या युवा पिढीबरोबर बोललात तर आजच्या काळातला युवक म्हणतो की, त्याला परंपरागत जे काही चालून आलं आहे, त्यापेक्षा खूप काही वेगळं करायचं आहे. आजचा नवयुवक म्हणत असतो, मला स्टार्ट-अप करायचं आहे. स्टार्ट-अपमध्ये मी जाणार आहे. याचाच अर्थ असा की कोणताही धोका पत्करायला त्याचं मन तयार आहे. आज लहान-लहान शहरांमध्येही स्टार्ट-अप संस्कृतीचा विस्तार होतोय. आणि त्यामध्ये उज्ज्वल भविष्याचे संकेत मला स्पष्ट दिसत आहेत. अगदी काही दिवसांपूर्वीच आपल्या देशामध्ये खेळण्यांविषयी चर्चा होत होती. पाहता पाहता आपल्या देशातल्या युवकांचं लक्ष या विषयाकडं गेलं. त्यांनीही मनानं निश्चय केला की, दुनियेमध्ये भारताच्या खेळण्यांना स्वतंत्र ओळख निर्माण करून द्यायची. आणि नवनवीन प्रयोग सुरू केले आणि जगामध्ये खेळण्यांचं खूप प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. 6-7 लाख कोटींची ही बाजारपेठ आहे. त्यामध्ये भारताचा हिस्सा फारच कमी आहे. परंतु खेळणी कशी बनवली पाहिजेत, खेळण्यांमध्ये वैविध्य कसं असलं पाहिजे, खेळण्यांमध्ये तंत्रज्ञान नेमकं कसं, किती असावं, मुलांच्या मानसिकतेचा विचार करून, त्या अनुरूप खेळणं कसं असावं. या सर्व गोष्टींचा विचार आज आपल्या देशातले युवक करताहेत. आणि त्यावर लक्ष केंद्रीत करून काहीतरी भरीव कार्य करू इच्छित आहेत.
मित्रांनो, आणखी एक गोष्ट, मनाला खूप आनंद देणारी आहे. इतकंच नाही तर विश्वास अधिक दृढ करणारी आहे. ही गोष्ट कोणती, तुम्हा काही कधी जाणवलं का? सर्वसाधारणपणे आपला एक स्वभाव बनला होता, तो म्हणजे.... चालायचंच, असंच असतं.... परंतु मी आता या स्वभावामध्ये बदल घडून येत असल्याचं पाहतोय. माझ्या देशाचा युवक, आता सर्वश्रेष्ठतेच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी स्वतःचं मन केंद्रीत करत आहे. आपल्या देशाचे युवक आता सर्वोत्तम कार्य करू इच्छितात, तसंच कोणतंही काम सर्वोत्तम पद्धतीनं करू इच्छितात.हा ध्यास त्यांना लागला आहे, ही गोष्टही राष्ट्राच्या दृष्टीनं एक खूप मोठी शक्ती बनणार आहे.
मित्रांनो, यंदाच्या ऑलिंपिक स्पर्धांनी खूप मोठा प्रभाव निर्माण केला आहे. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा संपल्या आता दिव्यांगांच्या ऑलिपिंक स्पर्धा सुरू आहेत. क्रीडा जगतामध्ये आपल्या भारतानं जो काही पराक्रम केला तो विश्वाच्या तुलनेत भलेही कमी असो, परंतु या स्पर्धांनी आपल्या खेळाडूंमध्ये, युवापिढीमध्ये विश्वास निर्माण करण्याचं खूप मोठं काम केलं आहे. आज युवक फक्त खेळ, सामने फक्त पाहतोच असं नाही. तर त्याच्याशी संबंधित व्यवसायांमध्ये असलेल्या शक्यतांकडेही ते डोळसतेनं पहात आहेत. क्रीडा क्षेत्राशी संबंधित संपूर्ण इको सिस्टम अगदी बारकाईनं पहात आहे. या संपूर्ण व्यवस्थेचं सामर्थ्य किती आहे, हे युवक जाणून घेत आहेत. आणि कोणत्या ना कोणत्या रूपानं स्वतःला या व्यवस्थेशी जोडू इच्छित आहेत. आता ते पारंपरिक गोष्टींतून बाहेर पडून पुढे जावून नवीन व्यवस्था स्वीकारत आहेत. आणि माझ्या देशवासियांनो, आता इतकं परिवर्तन घडून आलं, इतकी चालना मिळाली आहे की, प्रत्येक परिवारामध्ये खेळ या विषयावर चर्चा सुरू झाली. आहे. आता मग, तुम्हीच मला सांगा, हे घडून आलेलं परिवर्तन, मिळत असलेली चालना थांबवली पाहिजे काय? अजिबात नाही! तुम्ही सर्वजणही माझ्याचप्रमाणं विचार करीत असणार. आता देशामध्ये खेळ, क्रीडा प्रकार, खिलाडूपणाचं चैतन्य, थांबून चालणार नाही. या परिवर्तनाला, चालनेला कौटुंबिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, राष्ट्राच्या जीवनामध्ये स्थायी बनवलं पाहिजे. यामध्ये अधिकाधिक ऊर्जा निर्माण केली पाहिजे, उत्साह आणला पाहिजे, क्रीडा विषयी सर्वांना निरंतर नव्यानं उत्साह वाटला पाहिजे. मग घरामध्ये असो, बाहेर असो, गाव असो, शहर असो, आपल्याकडची सर्व मैदानं खेळाडूंनी भरून गेली पाहिजेत. सर्वांनी खेळलं पाहिजे, आणि सर्वांनी फुललंही पाहिजे. आणि तुम्हा सर्वांना आठवत असेलही, मी लाल किल्ल्यावरून भाषण देताना म्हणालो होतो- ‘‘सबका प्रयास’’ - होय! ‘‘ सबका प्रयास’’ सर्वांच्या प्रयत्नांनीच भारत क्रीडा क्षेत्रामध्ये नवीन उंची प्राप्त करू शकेल. असा विक्रम निर्माण करण्याचा अधिकारही भारताला आहे. मेजर ध्यानचंद जी यांच्यासारख्या लोकांनी जो मार्ग दाखवला आहे, त्यावरून पुढची वाटचाल करण्याची जबाबदारी आपली आहे. अनेक वर्षांनी देश हा कालखंड पहात आहे, अनुभवत आहे. खेळ याविषयाच्याबाबतीत कुटुंब असो, समाज असो, राज्य असो, राष्ट्र असो - एक मनानं सर्व लोक जोडले जात आहेत.
माझ्या प्रिय नवयुवकांनो,
आपण सर्वांनी या संधीचा लाभ घेवून वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांमध्ये कौशल्य प्राप्त केलं पाहिजे. गावां-गावांमध्ये वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांचं निरंतर आयोजन केलं गेलं पाहिजे. अशा स्पर्धांमधूनच तर खेळाचा विस्तार होत असतो. खेळ विकसित होतो आणि खेळाडूही यामधूनच तयार होतात. चला तर मग, आपण सर्व देशवासीय या क्रीडा क्षेत्राशी निगडित झालेल्या परिवर्तनाला, जितकी चालना देता येईल, जितकं पुढं घेऊन जाता येईल तितकं जावूया. या परिवर्तनामध्येही आपण जितकं योगदान देऊ शकतो, तितकं देवून ‘सबका प्रयास’ हा मंत्र प्रत्यक्षात जगून दाखवू या!
माझ्या प्रिय देशवासियांनो, उद्या जन्माष्टमीचा सणही आहे. जन्माष्टमीचा काळ म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव. आपल्याला भगवान कृष्णाची सर्व रूपं चांगली ठाऊक आहेत. खोडकर कान्हापासून ते विराट रूप धारण करणा-या कृष्णापर्यंत, त्याच्या शास्त्र सामर्थ्यापासून ते शस्त्र सामर्थ्यापर्यंत! कला असो, सौंदर्य असो, माधुर्य असो, कुठं कुठं कृष्ण असतो. मात्र ही गोष्ट मी करतोय, याला कारण म्हणजे, जन्माष्टमीच्या अगदी काही दिवसच आधी, मी एका आगळ्या-वेगळ्या अनुभवाला सामोरा गेलो. हा अनुभव तुम्हाला सांगावा, असं माझ्या मनात आलंय. तुम्हा सर्वांना आठवत असेल, याच महिन्यात, 20 तारखेला भगवान सोमनाथ मंदिरानं केलेल्या काही विकास कामांचे लोकार्पण केलं गेलं. सोमनाथ मंदिरापासून 3-4 किलोमीटर अंतरावरच भालका तीर्थ नावाचं स्थान आहे. याच स्थानी भगवान श्रीकृष्णानं भूमीवरचे आपले अखेरचे क्षण व्यतीत केले होते. एक प्रकारे भूलोकी भगवंताच्या लीलांची समाप्ती या स्थानावर झाली, असं म्हणता येईल. सोमनाथ न्यासाच्यावतीनं या संपूर्ण क्षेत्रामध्ये अनेक विकास कामं केली आहेत. भालका तीर्थ आणि तिथं होत असलेल्या कामांविषयी मी विचार करत असतानाच माझं लक्ष एका सुंदरशा कलापुस्तकाकडे वेधलं गेलं. हे पुस्तक माझ्या निवासस्थानाबाहेर कोणीतरी माझ्यासाठी ठेवून गेलं होतं. या ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या अनेक रूपांची अनेक भव्य छायाचित्रे होती. सर्व छायाचित्रे अतिशय मोहक होती. विशेष म्हणजे ती अर्थपूर्णही होती. पुस्तकाची पानं उलटायला मी प्रारंभ केला, या पुस्तकानं पाहता पाहता माझी जिज्ञासा अधिकच जागृत झाली. ज्यावेळी ते पुस्तक पाहिलं आणि त्यातली सर्व छायाचित्रं माझी पाहून झाली, त्यावेळी तिथं शेवटी माझ्यासाठी एक संदेश लिहिलेला असल्याचं दिसलं. तो संदेश वाचल्यानंतर मात्र माझ्या मनात ते पुस्तक घ्यावं, असा विचार आला. आणि जो कोणी हे पुस्तक माझ्या निवासस्थानाबाहेर ठेवून गेला आहे, त्या व्यक्तीला आपण भेटलंच पाहिजे, असंही माझ्या मनाला वाटायला लागलं. मी इच्छा व्यक्त केल्यानंतर आमच्या कार्यालयाकडून त्या व्यक्तीशी संपर्क साधला गेला आणि दुस-याच दिवशी त्या व्यक्तीला बोलावण्यात आलं. श्रीकृष्णाच्या वेगवेगळ्या रूपांना दर्शवणारा तो कलाग्रंथ पाहताना माझ्या मनात जी जिज्ञासा जागृत झाली होती, त्याच जिज्ञासेमुळे मला त्या ग्रंथाचा जनक- जदुरानी दासी जी यांना भेटण्याची इच्छा होती. त्या अमेरिकी आहेत. दासी जी यांचा जन्म अमेरिकेतला. त्यांचं पालन-पोषणही अमेरिकेत झालंय. जदुरानी दासी जी ‘इस्कॉन’बरोबर जोडल्या गेल्या आहेत. हरे कृष्णा चळवळीशी त्या जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्याविषयी आणखी एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे त्या भक्ती कलेमध्ये निपुण आहेत. तुम्हाला माहितीच असेल, आता दोन दिवसांनीच म्हणजे, एक सप्टेंबरला इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद स्वामी जी यांची 125 वी जयंती आहे. जदुरानी दासी जी यासंबंधीच्या कार्यासाठीच भारतात आल्या होत्या. माझ्या मनामध्ये एक खूप मोठा प्रश्न उभा राहिला. ज्यांच्या जन्म अमेरिकेत झाला आहे, जी व्यक्ती भारतीय भाव, भारतीय मानस यांच्यापासून वास्तविक खूपच दूर आहे, तरीही त्या व्यक्तीनं भगवान श्रीकृष्णाची इतकी मनमोहक चित्र कशी काय बनवली असतील? मी त्यांच्याशी बराच वेळ बोललो. आमच्या चर्चेतला काही भाग तुम्हा मंडळींनीही ऐकावा, असं मला वाटतंय.
पंतप्रधान - जदुरानी जी, हरे कृष्ण!
भक्ती कला या विषयी मी थोडंफार वाचलं आहे, पण आमच्या श्रोत्यांना तुम्ही याविषयी आणखी थोडं सांगावं. भक्ती कलेविषयी तुम्हाला असलेली मनापासून आवड, त्यामधला रस हे सगळंच महान वाटतंय.
जदुरानी जी - भक्ती कला याविषयी मी एक लेखच लिहिला आहे. या कलेविषयी तपशीलात सांगायचं झालं तर असं म्हणता येईल की, ही कला काही मनातून किंवा कल्पनेतून साकारली जात नाही. परंतु याविषयी ब्रह्म संहितेसारख्या प्राचीन वेदिक शास्त्रातून ही भक्ती कला आली आहे, हे समजतं. ‘‘वें ओंकाराय पतितं स्क्लितं सिकंद. तसंच वृंदावनच्या गोस्वामींना प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी ही कला दिली आहे, असं मानतात.
ईश्वरः परमः कृष्णः सच्चिदानन्द विग्रहः
देव बासुरी कशा पद्धतीनं वाजवायचे, कशी वागवायचे, त्यांची सर्व इंद्रियं कशा पद्धतीनं कार्यरत असायची आणि श्रीमद् भागवत यांची माहिती, त्यामध्ये आहे.
बर्हापींड नटवरवपुः कर्णयोः कर्णिकारं... असं अगदी सर्वकाही म्हणजे, ईश्वर आपल्या कानावर फूल कसं लावायचे, त्यामागे अर्थ काय होता, त्यांनी आपल्या पदकमलांचे ठसे वृंदावनाच्या भूमीवर कसे उमटवले, गोमाता त्यांच्या नादमाधुर्यानं कशा मंत्रमुग्ध होत असत, कान्हाच्या बासुरीनं सर्वांना कसं मोहित केलं होतं, सर्वांच्या हृदयामध्ये, मनामध्ये कशा पद्धतीनं कृष्णाचा वास असतो ... हे सगळं सगळं काही आपल्या प्राचीन वेदिक शास्त्रात नमूद केलं आहे. आणि ही सगळी शक्ती अतींद्रिय जागृत असलेल्या व्यक्तींकडून आली आहे. अगदी सच्च्या भक्तांना ही कला अवगत झाली. ही काही माझ्यातल्या कलेची जादू नाही. तर कायाकल्प घडवणारी शक्ती आहे.
पंतप्रधान - मला तुम्हाला एक वेगळाच प्रश्न विचारायचा आहे. 1966 पासून तुमचा हा प्रवास सुरू आहे आणि 1976 मध्ये तुम्ही भारताशी प्रत्यक्ष जोडल्या गेल्या आहात. या दीर्घकाळाच्या अनुभवानंतर भारताचे तुमच्या दृष्टीने काय महत्त्व आहे, असं तुम्हाला वाटतं?
जदुरानी जी - पंतप्रधान जी, भारत माझ्यासाठी सर्वकाही, सर्वस्व आहे. काही दिवसांपूर्वीच मी माननीय राष्ट्रपतींना याविषयी बोलताना नमूद केलं असावं. आता भारत तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं खूपच आधुनिक होत आहे. आणि व्टिटर, इन्स्टाग्रॅम यांच्याबाबतीत म्हणायचं झालं तर भारत पश्चिमेचं अनुकरण करत आहे. आयफोन्स आणि मोठमोठ्या इमारती त्याचबरोबर खूप सा-या सुविधाही पश्चिमेसारख्या होत आहेत. परंतु मला पक्कं ठाऊक आहे की, हे काही भारताचं खरं वैभव नाही. या भारतभूमीमध्ये कृष्णासारख्या अवतारी पुरूषानं जन्म घेतला आहे, हेच खरं भारताचं वैभव आहे. विशेष म्हणजे एकच अवतार नाही तर अनेक अवतार या भूमीत अवतरले आहेत. इथं भगवान शिव अवतरले, इथं राम अवतरले, इथं पवित्र नद्या आहेत. वैष्णव संस्कृतीमधली अनेक पवित्र स्थानं इथं आहेत. त्यामुळंच संपूर्ण विश्वाच्या दृष्टीनं भारत विशेषतः वृंदावन हे सर्वात महत्वाचं स्थान आहे. वृंदावन हे संपूर्ण वैकुंठाचं स्त्रोत आहे. व्दारिका म्हणजेच भौतिक निर्मितीचं स्त्रोत आहे. त्यामुळंच मला भारत प्रिय आहे.
पंतप्रधान - जदुरानी जी आभार! हरे कृष्ण!!
मित्रांनो,
दुनियेतले लोक ज्यावेळी आज भारतीय अध्यात्म आणि तत्वज्ञान यांच्याविषयी इतका मोठा विचार करतात, तर आपलीही काही जबाबदारी आहे. आपण आपल्या या महान परंपरा अशाच पुढे नेल्या पाहिजेत. ज्या कालबाह्य परंपरा आहेत, त्या तर सोडल्याच पाहिजेत. मात्र ज्या कालातीत आहेत, त्यांना पुढे नेलेच पाहिजे. आपण आपले उत्सव, सण साजरे करताना, त्यामागचा वैज्ञानिक दृष्टीकोन समजून घेतला पाहिजे. इतकंच नाही तर प्रत्येक सण साजरा करण्यामागे कोणता ना कोणता संदेश आहे, कोणता ना कोणता संस्कार आहे. तो आपण जाणून घेतला पाहिजे. आणि तसंच वागलं, जगलंही पाहिजे. त्याचबरोबर आपल्या येणा-या पिढीकडे हा संस्कार वारसा म्हणून आपल्याला सोपवायचा आहे. सर्व देशवासियांना मी पुन्हा एकदा जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
या कोरोना कालखंडामध्ये स्वच्छतेविषयी मला जितकं काही सांगायचं, बोलायचं होतं, ते थोडं कदाचित कमी झालं असावं, असं वाटतंय. स्वच्छता अभियानाकडे आपल्याला जराही दुर्लक्ष करून चालणार नाही. राष्ट्रनिर्माणासाठी सर्वांच्या प्रयत्नांतूनच कसा सर्वांचा विकास होऊ शकतो, याचे उदाहरण आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरते आणि आपणही असेच काही करावं, यासाठी नवीन चैतन्यही निर्माण करते. नव्यानं विश्वास येतो. आणि हा विश्वासच आपल्या संकल्पाला नवसंजीवनी देत असतो. आता स्वच्छता अभियानाविषयी चर्चा सुरू झाली की इंदूरचं नाव घेतलं जातं, हे आपण सर्वजण चांगलंच जाणून आहोत. कारण इंदूरनं स्वच्छतेविषयी स्वतःची एक वेगळी आणि विशेष ओळख निर्माण केली आहे. त्याबद्दल इंदूरचे नागरिक अभिनंदनास पात्र आहेत. आपलं हे इंदूर शहर अनेक वर्षांपासून ‘स्वच्छ भारत क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. शहरानं आपलं पहिला क्रमांक कायम राखला आहे. आता इंदूरचे लोक स्वच्छ भारताच्या या क्रमवारीत पहिले येऊन आनंद मानून शांत बसू इच्छित नाहीत. तर त्यांना आणखी पुढं जायचं आहे. काही तरी नवीन करायचं आहे. आणि त्यांनी आता तसा मनोमन निश्चयही केला आहे. त्यांनी इंदूरला ‘वॉटर प्लस सिटी’ बनवायचं आहे. त्यासाठी इंदूरनिवासी सर्वतोपरी कार्य करत आहेत. ‘वॉटर प्लस सिटी’ याचा अर्थ असे शहर जिथं कोणत्याही प्रक्रियेविना कसल्याही प्रकारचे सांडपाणी कोणत्याही सार्वजनिक स्त्रोतांमध्ये सोडण्यात येणार नाही. इथल्या नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन आपल्या सांडपाणी वाहिन्या सांडपाणी प्रक्रिया करणा-या प्रकल्पांना जोडल्या आहेत. स्वच्छता अभियानही सुरू ठेवलं आहे. आणि आता या कारणांमुळे सरस्वती आणि कान्ह या नद्यांमध्ये सोडले जाणारे दूषित पाणीही ब-याच प्रमाणात कमी झाले आहे. आता सुधारणा दिसून येत आहेत.
आज आपला देश स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की स्वच्छ भारत मोहिमेचा संकल्प आपण पूर्णत्वाला न्यायचा आहे. आपल्या देशातील जितकी जास्त शहरे ‘Water Plus City’ असतील, त्याच प्रमाणात स्वच्छतेची व्याप्ती वाढेल, आपल्या नद्या स्वच्छ होतील आणि पाण्याची बचत करण्याची आपली जबाबदारी पार पाडण्याचे संस्कारसुद्धा आपसूक होतील.
मित्रहो, बिहारमधील मधुबनी येथील एक उदाहरण माझ्या समोर आले आहे. मधुबनी येथे डॉक्टर राजेंद्र प्रसाद कृषी विद्यापीठ आणि स्थानिक कृषी विज्ञान केंद्राने एकत्रितपणे एक चांगला उपक्रम राबवला आहे. शेतकऱ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळतो आहेच आणि त्याच बरोबर स्वच्छ भारत मोहिमेला सुद्धा चालना मिळते आहे. विद्यापीठाच्या या उपक्रमाचे नाव आहे "सुखेत मॉडेल". गावातले प्रदूषण कमी करणे हा या "सुखेत मॉडेल" चा उद्देश आहे. या मॉडेल अंतर्गत गावातल्या शेतकऱ्यांकडून शेण आणि शेतातला तसेच घरातला इतर कचरा गोळा केला जातो आणि त्याच्या मोबदल्यात गावकऱ्यांना स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरसाठी पैसे दिले जातात. गावातून जो कचरा गोळा केला जातो, त्यातून गांडूळ खत तयार केले जाते. म्हणजेच या "सुखेत मॉडेल" चे चार लाभ अगदी सहज दिसून येतात. एक तर गाव प्रदूषण मुक्त होते, दुसरे म्हणजे गाव घाणीपासून, कचऱ्यापासून मुक्त होते, तिसरे म्हणजे ग्रामस्थांना स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर साठी पैसे मिळतात आणि चौथा लाभ म्हणजे गावातल्या शेतकऱ्यांना जैविक खत उपलब्ध होतं. विचार करा, अशा उपक्रमांच्या माध्यमातून आपण आपल्या गावाला नक्कीच सक्षम करू शकतो. हीच खरी आत्मनिर्भरता आहे. देशातल्या प्रत्येक पंचायतीला मी आवाहन करतो की अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याबाबत तुम्ही नक्की विचार करा. आणि मित्रहो, जेव्हा आपण एखादे लक्ष्य निर्धारित करून ते साध्य करण्याचा प्रयत्न करू लागतो, तेव्हा आपल्याला त्याचे फळ मिळतेच. तामिळनाडूमधल्या शिवगंगा जिल्ह्यातल्या कांजीरंगाल पंचायतीचे उदाहरण बघा ना.या लहानशा ग्रामपंचायतीने काय केले ठाऊक आहे का..? या ठिकाणी तुम्हाला ‘वेल्थ फ्रॉम वेस्ट’ चा एक अनोखा उपक्रम बघता येईल. इथल्या ग्रामपंचायतीने स्थानिक लोकांच्या मदतीने कचऱ्यापासून वीज तयार करण्याचा एक स्थानिक प्रकल्प आपल्या गावात सुरू केला आहे. सगळ्या गावातल्या कचरा एकत्र केला जातो, त्यापासून वीज तयार केली जाते आणि उर्वरित उत्पादनाची विक्री कीटकनाशक म्हणून केली जाते. गावातल्या या ऊर्जा प्रकल्पात प्रतिदिन दोन टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. त्यापासून मिळणाऱ्या विजेचा वापर, गावातले पथदिवे आणि इतर गरजा भागवण्यासाठी केला जातो. या प्रकल्पामुळे पंचायतीच्या पैशांची बचत होते आहे आणि त्याचबरोबर तो पैसा विकासाच्या इतर कामी वापरला जातो आहे. आता मला सांगा, तमिळनाडू मधल्या शिवगंगा जिल्ह्यातल्या एका लहानशा पंचायतीने आपणा सर्व देशवासियांना काही नवे करण्याची प्रेरणा दिली आहे की नाही? त्यांनी खरोखरच कमाल करून दाखवली आहे.
माझ्या प्रिय देशवासीयांनो,
मन की बात कार्यक्रम आता भारताच्या सीमेपुरता मर्यादित राहिलेला नाही. जगाच्या कानाकोपऱ्यात मन की बात कार्यक्रमावर चर्चा केली जाते. परदेशात राहणारे आपल्या भारतीय समुदायाचे लोकसुद्धा मला वेगवेगळ्या प्रकारची नवनवीन माहिती देत असतात. आपल्या या मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून मलासुद्धा परदेशात सुरू असणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाबद्दल माहिती द्यायला मनापासून आवडते. आज सुद्धा मी तुमची ओळख अशाच काही लोकांशी करून देणार आहे. मात्र त्यापूर्वी मी तुम्हाला एक ऑडिओ ऐकवू इच्छितो. जरा लक्षपूर्वक ऐका.
##
[रेडियो युनिटी 90 एफ्.एम्.-2]
नमोनमः सर्वेभ्यः | मम नाम गङ्गा | भवन्तः शृण्वन्तु रेडियो-युनिटी-नवति-एफ्.एम् –‘एकभारतं श्रेष्ठ-भारतम्’ | अहम् एकतामूर्तेः मार्गदर्शिका एवं रेडियो-युनिटी-माध्यमे आर्.जे. अस्मि | अद्य संस्कृतदिनम् अस्ति | सर्वेभ्यः बहव्यः शुभकामनाः सन्ति| सरदार-वल्लभभाई-पटेलमहोदयः ‘लौहपुरुषः’ इत्युच्यते | २०१३-तमे वर्षे लौहसंग्रहस्य अभियानम् प्रारब्धम् | १३४-टन-परिमितस्य लौहस्य गलनं कृतम् | झारखण्डस्य एकः कृषकः मुद्गरस्य दानं कृतवान् | भवन्तः शृण्वन्तु रेडियो-युनिटी-नवति-एफ्.एम् –‘एकभारतं श्रेष्ठ-भारतम्’ |
[रेडियो युनिटी 90 एफ्.एम्.-2]
##
मित्रहो, ही भाषा तुम्ही नक्कीच ओळखली असेल. रेडिओवर संस्कृत भाषेत संवाद सुरू आहे आणि हा संवाद साधणाऱ्या आहेत आर जे गंगा. आर जे गंगा या गुजरातच्या रेडिओ जॉकी गटातल्या एक सदस्य आहेत. आर जे नीलम, आर जे गुरु आणि आर जे हेतल हे त्यांचे आणखी काही सहकारी आहेत. हे सर्वजण गुजरात मध्ये केवडिया इथे संस्कृत भाषेच्या सन्मानात भर घालायचे मोलाचे काम करत आहेत. केवडीया म्हणजे असे ठिकाण जिथे आपल्या देशाचा मानबिंदू असणारा जगातला सर्वात उंच पुतळा, स्टॅच्यू ऑफ युनिटी उभा आहे. त्या केवडिया बद्दल मी बोलतो आहे. हे सर्व रेडिओ जॉकी एकाच वेळी वेगवेगळ्या भूमिका निभावत असतात. ते मार्गदर्शक म्हणून सेवा देतात आणि त्याच बरोबर कम्युनिटी रेडिओ इनिशिएटिव्ह रेडिओ युनिटी 90 एफ एम सुद्धा चालवतात. हे आर जे आपल्या श्रोत्यांसोबत संस्कृत भाषेत संवाद साधतात आणि संस्कृत भाषेतच माहिती सुद्धा देत असतात.
मित्रहो, आपल्याकडे संस्कृत बद्दल,
अमृतम् संस्कृतम् मित्र, सरसम् सरलम् वचः |
एकता मूलकम् राष्ट्रे, ज्ञान विज्ञान पोषकम् |
,असे म्हटले जाते.
अर्थात आपली संस्कृत भाषा सरस सुद्धा आहे आणि सरळ अर्थात सोपी सुद्धा आहे.
संस्कृत भाषा आपल्या विचारांच्या आणि आपल्या साहित्याच्या माध्यमातून ज्ञान,विज्ञान आणि राष्ट्राच्या एकतेचं पोषण करते, सक्षमीकरण करते. संस्कृत साहित्यातील मानवतेचे आणि ज्ञानाचे दिव्य दर्शन कोणालाही आकर्षित करू शकते. परदेशात संस्कृत शिकवण्याचे प्रेरक कार्य करणाऱ्या काही लोकांबद्दल मला नुकतीच माहिती मिळाली. आयर्लंडमध्ये राहणारे श्रीयुत रटगर कोर्टेनहॉर्स्ट संस्कृतचे विद्वान आणि शिक्षक आहेतआणि ते तिथल्या मुलांना संस्कृत भाषा शिकवतात. आपल्याकडे पूर्वेला भारत आणि थायलंड यांच्यातील सांस्कृतिक संबंध सक्षम करण्यात संस्कृत भाषा महत्त्वाची भूमिका बजावते. डॉ. चिरापत प्रपंडविद्या आणि डॉ. कुसुमा रक्षामणी थायलंडमध्ये संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहेत. त्यांनी थाई आणि संस्कृत भाषेत तुलनात्मक साहित्याची रचना सुद्धा केली आहे. असेच आणखी एक प्रोफेसर आहेत श्रीयुत बोरीस जाखरीन. ते रशियामध्ये मॉस्को स्टेट विद्यापीठात संस्कृत शिकवतात. त्यांचे अनेक शोधनिबंध आणि पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी अनेक संस्कृत पुस्तकांचा रशियन भाषेत अनुवाद सुद्धा केला आहे. विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा शिकवणार्या अनेक महत्त्वाच्या संस्थांमध्ये ऑस्ट्रेलियामधल्या सिडनी संस्कृत स्कूलचा समावेश होतो. या सर्व संस्था मुलांसाठी संस्कृत व्याकरण शिबिरे, संस्कृत नाटक आणि संस्कृत दिवस अशा उपक्रमांचे आयोजन सुद्धा करत असतात.
मित्रहो, अलीकडच्या काळात संस्कृत भाषेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. आता आपणही त्यासाठी योगदान देण्याची वेळ आली आहे. आपला वारसा जोपासणे, सांभाळणे आणि नव्या पिढीकडे सोपवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे आणि भावी पिढीचा तो अधिकार आहे. या कामांसाठी सर्वांनीच एकत्रित प्रयत्न करण्याची आता गरज आहे. मित्रहो, अशाप्रकारचे प्रयत्न करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही ओळखत असाल, अशा एखाद्या व्यक्तीची माहिती तुमच्याकडे असेल तर #celebratingSanskrit सह सोशल मीडिया वर अशा व्यक्तीशी संबंधित माहिती नक्की शेअर करा.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, आपण लवकरच विश्वकर्मा जयंती साजरी करू. भगवान विश्वकर्मा यांना आपल्याकडे विश्वाच्या सृजनशक्तीचे प्रतीक मानले गेले आहे. आपल्या हाती असणार्या कौशल्यातून एखाद्या वस्तूची निर्मिती करणे, सृजन करणे, मग ते शिवणकाम किंवा विणकाम असो, सॉफ्टवेअर असो किंवा उपग्रहाशी संबंधित काम असो, या सर्वच कृतींमधून भगवान विश्वकर्मांचे अस्तित्व प्रतीत होत असते. जगात आज कौशल्यांचा उदोउदो केला जातो आहे. आपल्या ऋषी-मुनींनी मात्र हजारो वर्षांपूर्वीच कौशल्ये आणि प्रमाण या बाबींवर भर दिला होता. त्यांनी कौशल्ये आणि आस्था यांची सांगड घातली आणि कौशल्यांचा वापर हा आपल्या जगण्याचाच एक भाग झाला. आपल्या वेदांनीसुद्धा अनेक सूक्ते भगवान विश्वकर्मा यांना समर्पित केली आहेत. निसर्गातील कितीही मोठी रचना असो, जगात जी काही नवी आणि मोठी कामे झाली आहेत, त्या सर्वांचे श्रेय आपल्या शास्त्रांनी भगवान विश्वकर्मा यांनाच दिले आहे. जगात विकास आणि नाविन्याशी संबंधित जी काही कामे होतात, ती कौशल्यांच्याच माध्यमातून होतात, हे यावरून दिसून येते. भगवान विश्वकर्मा यांच्या जयंती आणि पुजेमागे हीच भावना आहे. आपल्या शास्त्रात म्हटले आहे,
विश्वम कृत सन्म कर्मव्यापारः यस्य सः विश्वकर्मा |
अर्थात सृष्टी आणि निर्मितीशी संबंधित सर्व कामे जो करतो, तो विश्वकर्मा आहे. आपल्या शास्त्रांच्या मते, आपल्या अवतीभवती निर्मिती आणि सृजनात गुंतलेले जे कुशल लोक आहेत, ते सगळेच भगवान विश्वकर्मा यांचा वारसा पुढे चालवत आहेत. त्यांच्याशिवाय जगण्याची कल्पनासुद्धा आपण करू शकणार नाही. विचार करून बघा. तुमच्या घरी विजेशी संबंधित काही अडचणी उद्भवल्या आहेत आणि त्या दुरुस्त करणारा भेटला नाही, तर काय होईल? तुम्ही किती त्रासून जाल. अशा अनेक कौशल्यपूर्ण लोकांमुळे आपले जगणे सुसह्य होत राहिले आहे. जरा आपल्या आजूबाजूला नजर टाका. लोहारकाम करणारे, मातीपासून भांडी तयार करणारे, लाकडी सामान तयार करणारे, विजेचे काम करणारे, घरात रंगकाम करणारे, स्वच्छता कर्मचारी किंवा मोबाईल लॅपटॉप दुरुस्त करणारे हे सर्वच घटक, आपल्या कौशल्यामुळे ओळखले जातात. हे सुद्धा आधुनिक विश्वकर्माच आहेत. मित्रहो, काळजी करण्यासारखा आणखी एक मुद्दा आहे. ज्या देशात, जिथल्या संस्कृतीमध्ये, परंपरेमध्ये, विचारांमध्ये, कौशल्य आणि कुशल मनुष्यबळाची सांगड भगवान विश्वकर्मा यांच्याशी घालण्यात आली आहे, तिथली परिस्थिती बदलत गेल्याचे दिसून आले आहे. आपले कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन, तसेच राष्ट्रीय जीवनावर कौशल्यांचा फार मोठा प्रभाव एके काळी होता. मात्र गुलामगिरीच्या प्रदीर्घ कालखंडात कौशल्यांकडे आदराने पाहण्याची भावना हळूहळू विस्मृतीत गेली. कौशल्यांवर आधारित कामांकडे तुच्छ भावनेने पाहिले जाऊ लागले. आणि आज बघा, अवघे जग कौशल्यांवरच भर देते आहे. भगवान विश्वकर्मा यांची पूजा निव्वळ औपचारिकता नाही. आपण कौशल्यांबाबत आदराची भावना बाळगली पाहिजे, कौशल्ये प्राप्त करण्यासाठी कष्ट केले पाहिजेत.आपल्या हाती कौशल्ये असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे. जेव्हा आपण काही नवे करू, नावीन्यपूर्ण करू, ज्यामुळे समाजाचे हित होईल, लोकांचे जगणे सोपे होईल, तेव्हा आपली विश्वकर्मा पूजा खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल. अंगी कौशल्ये असणाऱ्या लोकांसाठी आज जगात अनेक संधी उपलब्ध आहेत. अंगी कौशल्ये असणाऱ्यांसाठी प्रगतीचे अनेक मार्ग खुले झाले आहेत. चला तर मग, यावेळी आपण भगवान विश्वकर्मा यांच्या पूजेनिमित्त आस्थेच्या बरोबरीने त्यांचा संदेशही अंगीकारण्याचा संकल्प करूया. कौशल्यांचे महत्त्व ओळखू या, अंगी कौशल्य असणाऱ्या सर्वांना, कोणतेही काम कौशल्याने करणाऱ्या सर्वांना आदराची वागणूक देऊ, असा संकल्प आपण करूया.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीचे हे 75 वे वर्ष आहे. या वर्षभरात आपण रोजच नवा संकल्प करायचा आहे, नवा विचार करायचा आहे आणि काही नवे करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपला भारत लवकरच स्वातंत्र्यप्राप्तीची शंभर वर्षे पूर्ण करणार आहे. आपण आज केलेले संकल्प, हे तेव्हाच्या यशाची पायाभरणी करणारे ठरणार आहेत. हे लक्षात ठेवून आपण या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. यासाठी आपण जास्तीत जास्त योगदान द्यायचे आहे. हे प्रयत्न करताना आणखी एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. ती म्हणजे, दवाई भी, कडाई भी. देशभरात 62 कोटी पेक्षा जास्त लसींचे डोस देण्यात आले आहेत. मात्र तरीसुद्धा आपण काळजी घ्यायची आहे, सतर्क राहायचे आहे. आणि हो, नेहमीप्रमाणे जेव्हा तुम्ही काही नवे कराल, नवा विचार कराल, तेव्हा मलाही विश्वासात घ्या, मलाही त्याबद्दल सांगा. तुमच्या पत्रांची आणि संदेशाची मी वाट बघतो आहे. तुम्हा सर्वांना येणाऱ्या सर्व सणांनिमित्त अनेकानेक शुभेच्छा. मनापासून आभार.
नमस्कार.
माझ्या प्रिय देशबांधवानो, नमस्कार !
दोन दिवसांपूर्वीची काही अद्भुत छायाचित्रे, काही अविस्मरणीय क्षणांच्या ताज्या आठवणी आताही माझ्या डोळ्यांसमोर आहेत. त्यामुळे, यावेळच्या ‘मन की बात’ ची सुरुवात याच क्षणांनी करुया. टोक्यो ऑलिंपिक मध्ये भारतीय खेळाडूंना तिरंगा घेऊन चालतांना बघून केवळ मीच नाही, तर संपूर्ण देश रोमांचित झाला होता. त्याक्षणी, संपूर्ण देशाने जणू एकत्र येत, आपल्या या योद्ध्यांना म्हटले -
विजयी भव ! विजयी भव !
जेव्हा हे खेळाडू भारतातून गेले, त्याआधी मला त्यांच्याशी बोलण्याची, त्यांचे आयुष्य जाणून घेण्याची आणि देशालाही ते सांगण्याची संधी मिळाली होती. हे खेळाडू, आयुष्यातील अनेक आव्हानांवर मात करत, इथे पोहोचले आहेत.
आज त्यांच्याजवळ आपले प्रेम आणि सर्वांच्या पाठिंब्याची ताकद आहे- त्यामुळे चला, आपण सगळे मिळून आपल्या या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊया, त्यांचा उत्साह वाढवूया. सोशल मीडियावर देखील ऑलिंपिक खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी आता व्हिक्टरी पंच कॅम्पेन म्हणजेच विजयी ठोसा अभियान सुरु झाले आहे. आपणही आपल्या चमू सोबत आपला व्हिक्टरी पंच शेयर करा, भारतासाठी चीयर करा !
मित्रांनो, जो देशासाठी तिरंगा हातात घेतो, त्याच्या सन्मानार्थ आपल्या भावना अभिमानाने उचंबळून येणं स्वाभाविक आहे. देशभक्तीची हीच भावना आपल्या सर्वांना एकमेकांशी बांधून ठेवते. उद्या, म्हणजेच 26 जुलै रोजी, ‘कारगिल विजय दिवस’ही आहे. कारगिलचे युद्ध भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयमाचे असे प्रतीक आहे, जे संपूर्ण जगाने पहिले आहे. यावर्षी हा गौरवास्पद दिवस देखील अमृत महोत्सवाच्या दरम्यान साजरा केला जाणार आहे, त्यामुळे तो आणखीनच विशेष आहे. माझी अशी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी कारगिल युद्धाची रोमांचकारी कथा नक्की वाचा. कारगिलच्या योद्ध्यांना आपण सर्व आधी वंदन करूया.
मित्रांनो
यावर्षी, 15 ऑगस्ट रोजी देश आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश करत आहे. आपले हे खूप मोठे भाग्य आहे की जे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी , देशाने कित्येक शतके वाट पहिली, त्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असतांनाच्या क्षणांचे आपण साक्षीदार बनणार आहोत.
आपल्याला आठवत असेल, स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव आपण 12 मार्चपासून महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमातून केली होती. याच दिवशी, बापूंच्या दांडी यात्रेचे पुनरुज्जीवन करण्यात आले होते. तेव्हापासून, जम्मू-काश्मीर पासून ते पुडदूचेरीपर्यंत, गुजरातपासून ते ईशान्येकडील राज्यांपर्यंत अमृत महोत्सवासही संबंधित कार्यक्रम होत आहेत. अशा अनेक घटना, ज्यांचे योगदान तर खूप आहेच, मात्र त्यांची म्हणावी तेवढी चर्चा झाली नाही,- आज लोक त्यांच्याविषयीही जाणून घेत आहेत. आता जसे की मोईरांग डे चेच बघा ना! माणिपूरची छोटीशी वस्ती मोईरांग, कधीकाळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भारतीय राष्ट्रीय लष्कर म्हणजे आयएनएचे प्रमुख केंद्र होते. इथे स्वातंत्र्याच्या पहिल्याच लढाईआधी, आयएनएच्या शौकत मलिक जी यांनी भारताचा झेंडा फडकवला होता. या अमृत महोत्सवादरम्यान, 14 एप्रिल रोजी याच मोईरांग मध्ये पुन्हा एकदा तिरंगा फडकवण्यात आला. असे कितीतरी स्वातंत्र्य संग्राम सैनिक आणि महापुरुष आहेत ,ज्यांचे आपण यानिमित्ताने स्मरण करत आहोत. सरकार आणि सामाजिक संस्थांकडूनही सातत्याने याच्याशी संबंधित कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यंदाच्या 15 ऑगस्टलाही असेच एक आयोजन होणार आहे. हा एक प्रयत्न आहे- राष्ट्रगीताशी संबंधित. सांस्कृतिक मंत्रालयाचा प्रयत्न आहे की त्या दिवशी, जास्तीत जास्त भारतीयांनी एकाच वेळी राष्ट्रगीत गायचे. यासाठी एक संकेतस्थळ देखील तयार करण्यात आले आहे- Rashtragaan.in
या संकेतस्थळाच्या मदतीने आपण राष्ट्रगीत गाऊन ते ध्वनिमुद्रित करु शकाल आणि या अभियानात सहभागी होऊ शकाल. मला आशा आहे, आपण या विशेष उपक्रमात नक्की सहभागी व्हाल. अशाच प्रकारचे अनेक अभियान, अनेक उपक्रम आपल्याला येत्या काळात बघायला मिळणार आहेत. “अमृत महोत्सव’ हा कुठल्या सरकारचा कार्यक्रम नाही, तर हा कोट्यवधी भारतवासियांचा कार्यक्रम आहे. प्रत्येक स्वतंत्र आणि कृतज्ञ भारतीयाने आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना केलेले हे वंदन आहे. या महोत्सवाच्या मूळ भावनेचा विस्तार तर बराच मोठा आहे. –ही भावना आहे, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मार्गावरुन चालणे, त्यांच्या स्वप्नातल्या देशाची उभारणी करणे. जशाप्रकारे, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ते सगळे झपाटलेले लोक एकत्र होऊन लढले होते, तसेच आपल्याला देशाच्या विकासासाठी एकत्र यायचे आहे. आपल्याला देशासाठी जगायचे आहे, देशासाठी काम करायचे आहे. आणि या प्रवासात अगदी छोटी छोटी कामेदेखील मोठा प्रभाव पाडू शकतात. आपली दैनंदिन कामे करतांनाही आपण राष्ट्र निर्मितीचे काम करु शकतो. जसे की ‘व्होकल फॉर लोकल’. आपल्या देशातील स्थानिक उद्योजक, कलाकार, शिल्पकार, विणकर यांना आधार देणे, हे आपल्या रोजच्या सवयीचा भाग बनले पाहिजे. सात ऑगस्ट रोजी येणारा ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ आपल्यासाठी अशी एक संधी आहे ज्यावेळी आपण प्रयत्नपूर्वक हे काम करु शकतो. राष्ट्रीय हातमाग दिनामागेही खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.याच दिवशी, 1905 साली स्वदेशी आंदोलनाची सुरुवात झाली होती.
मित्रांनो,
आपल्या देशातील ग्रामीण आणि आदिवासी भागात, हातमाग, उत्पन्नाचे एक महत्त्वाचे साधन आहे. हे एक असे क्षेत्र आहे, ज्याच्याशी, लाखों महिला, लाखो विणकर, लाखो शिल्पकार जोडलेले आहेत. आपले छोटे छोटे प्रयत्न, वीणकरांमध्ये एक नवी उमेद जागवू शकतात. आपण स्वतः काही ना काही तरी खरेदी करा, आणि आपले अनुभव इतरांनाही सांगा. जेव्हा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, अशावेळी एवढे काम करणे आपली निश्चितच जबाबदारी आहे, मित्रांनो !
आपण पहिले असेल 2014 पासूनच आपल्या ‘मन की बात’ मध्ये आपण नेहमीच खादीवर चर्चा करतो. आपल्याच प्रयत्नांमुळे आज देशात खादीची विक्री कित्येक पटीने वाढली आहे. कोणी कधी विचार केला असेल का, की खादीच्या कुठल्या दुकानात एकाच दिवशी, एक कोटींपेक्षा अधिक विक्री होऊ शकते ! मात्र, आपण हे देखील करुन दाखवले आहे. आपण जेव्हाही कधी खादीचे कोणतेही उत्पादन खरेदी करता, तेव्हा त्याचा लाभ, आपल्या गरीब वीणकर बंधू-भगिनींना होतो.
यामुळेच, खादीची खरेदी करणे एकप्रकारे लोकसेवाही आहे आणि देशसेवाही आहे. माझी आपल्याला आग्रही विनंती आहे, की आपण सर्व, माझे प्रिय बंधू-भगिनी, ग्रामीण भागात तयार होणाऱ्या हातमागाच्या वस्तू जरूर खरेदी करा. आणि त्या वस्तू #MyHandloomMyPride वर शेयर करा.
मित्रांनो, जेव्हा आपण स्वातंत्र्य आंदोलन आणि खादीविषयी बोलतो आहोत, त्यावेळी बापूंचे स्मरण होणे स्वाभाविक आहे. जसे बापूंच्या नेतृत्वाखाली ‘भारत छोडो आंदोलन’ झाले होते, तसेच आज प्रत्येक भारतीयाला ‘भारत जोडो’ आंदोलनाचे नेतृत्व करायचे आहे. हे आपले कर्तव्य आहे, की आपण आपले काम अशाप्रकारे करावे, जे विविधतांनी भरलेल्या आपल्या भारताला एकत्र आणण्यासाठी उपयुक्त ठरेल. चल तर मग, आपण अमृत महोत्सवानिमित्त हा अमृत संकल्प घेऊया, की देशच कायम आपली सर्वात मोठी ‘आस्था’ आणि सर्वात मोठी प्राथमिकता असेल. “Nation First, Always First”, हा मंत्र घेऊनच आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज मी ‘मन की बात’ ऐकणाऱ्या माझ्या युवा मित्रांचे विशेष आभार मानू इच्छितो. अगदी काही दिवसांपूर्वी, माय गव्ह च्या वतीने ‘मन की बात’ च्या श्रोत्यांविषयी एक अध्ययन करण्यात आले होते. या अध्ययनात असे आढळले की ‘मन की बात’ साठी संदेश आणि सूचना पाठवणाऱ्या लोकांमध्ये प्रामुख्याने कोणते लोक आहेत?
तर अध्ययनातून ही माहिती पुढे आली की, मला संदेश आणि सूचना पाठवणाऱ्या लोकांमध्ये सुमारे 75 टक्के लोक 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. म्हणजेच, भारताच्या युवा शक्तिच्या सूचना ‘मन की बात’ ला दिशा देत आहेत. मी हा खूप चांगला संकेत आहे, असे मानतो. ‘मन की बात’ हे एक असे माध्यम आहे, जिथे सकारात्मकता आहे, संवेदनशीलता आहे. ‘मन की बात’ मध्ये आपण अनेक सकारात्मक गोष्टी करतो. या कार्यक्रमांचे स्वरूप एकोप्याचे आहे. सकारात्मक विचार आणि सूचनांसाठी, भारताच्या युवकांची सक्रियता मला आनंदीत करते आहे. मला याचाही आनंद आहे, की मन की बात च्या माध्यमातून मला युवकांचे मन जाणण्याची देखील संधी मिळते आहे.
मित्रांनो, आपल्याकडून मिळालेल्या सूचना, हीच ‘मन की बात’ ची खरी ताकद आहे. आपल्या सूचनाच, ‘मन की बात’ च्या माध्यमातून भारताची विविधता प्रकट करत असतात. भारतवासियांच्या सेवा आणि त्यागाचा सुगंध, चारी दिशांना पसरवत असतात. आपल्या परिश्रमी युवकांची संशोधने सर्वाना प्रेरित करत असतात. ‘मन की बात’ मध्ये आपण कितीतरी प्रकारच्या कल्पना पाठवत असता.आपण सर्वांवर तर चर्चा करु शकत नाही, मात्र त्यातील बहुतांश कल्पना मी संबंधित विभागांना नक्कीच पाठवत असतो. जेणेकरुन, त्या कल्पना प्रत्यक्षात अमलात आणल्या जाव्यात.
मित्रांनो, मी आज आपल्याला साई-प्रनीथ यांच्या प्रयत्नाविषयी सांगणार आहे. साई-प्रनीथ जी, एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, आंध्रप्रदेशचे रहिवासी आहेत. गेल्या वर्षी त्यांनी पहिले की त्यांच्या भागात खराब हवामानामुळे अनेक शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. हवामान शास्त्र विषयात त्यांना पूर्वीपासूनच रस होता, आणि म्हणूनच, त्यांनी आपल्या या रुचिचा आणि कौशल्याचा वापर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी घेण्याचा निर्णय घेतला. ते आता वेगवेगळ्या डेटा स्त्रोतांकडून हवामानाचा डेटा विकत घेतात, त्याचे विश्लेषण करतात आणि स्थानिक भाषेत, वेगवेगळ्या माध्यमांच्या मदतीने शेतकऱ्यांपर्यंत आवश्यक ती माहिती पोचवतात. हवामानाच्या माहितीशिवाय, प्रणीथजी वेगवेगळ्या हवामानात लोकांनी काय करायला हवे, याचेही मार्गदर्शन करतात. विशेषतः पूरापासून संरक्षण करण्यासाठी किंवा वादळ आणि वीज पडल्यावर, त्यापासून कसे संरक्षण करायचे, याची माहितीही ते लोकांना देतात.
मित्रांनो,
एकीकडे, या तरुण सॉफ्टवेअर अभियंत्याचा हा प्रयत्न मनाला स्पर्शून जाणारा आहे. तर दुसरीकडे आमच्या एका मित्राकडून होणारा तंत्रज्ञानाचा वापरही, आपल्याला थक्क करुन सोडेल.
हे मित्र आहेत, ओडिशाच्या संबलपूर जिल्ह्यात एका गावात राहणारे श्री इसाक मुंडा जी. ईसाक जी एकेकाळी रोजंदारी स्वरुपात काम करत होते, मात्र आता ते इंटरनेटवर गाजत आहेत. त्यांच्या यू ट्यूब चॅनेल मधून ते उत्तम पैसे कमावत आहेत. ते आपल्या व्हिडिओ मधून स्थानिक पदार्थ, पारंपरिक स्वयंपाक बनवण्याच्या पद्धती, आपले गाव, आपली जीवनशैली, कुटुंब आणि आहारविहाराच्या सवयी, अशा गोष्टी दाखवत असतात. एक YouTuber म्हणून त्यांनी आपला प्रवास, मार्च 2020 पासून सुरु केला होता. त्यावेळी, त्यांनी ओडिशातीळ सुप्रसिद्ध स्थानिक पदार्थ, ‘पखाल’ शी संबंधित, एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तेव्हापासून त्यांनी शेकडो व्हिडिओ पोस्ट केले आहेत. त्यांचा हा प्रयत्न अनेक कारणांनी सर्वात वेगळा आहे. विशेषतः यासाठी की या उपक्रमामुळे शहरात राहणाऱ्या लोकांना ती जीवनशैली बघण्याची संधी मिळते, ज्याविषयी त्यांना विशेष काही माहिती नसते. ईसाक मुंडा जी संस्कृती आणि पदार्थ या दोघांना एकत्रित घेऊन, त्याचा उत्सव साजरा करतात आणि त्यातून आपल्या सर्वांना प्रेरणाही देतात.
मित्रांनो, आता आपण जेव्हा तंत्रज्ञानाविषयी बोलतो आहोत, तेव्हा मी आणखी एका रोचक विषयावर चर्चा करु इच्छितो.
आपण अलीकडेच वाचले असेल, पहिले असेल की आयआयटी मद्रास च्या माजी विद्यार्थ्यानी स्थापन केलेल्या एक स्टार्ट-अप ने एक थ्री-डी प्रिंटेड हाऊस तयार केले आहे. या थ्री-डी प्रिंटिंग ने घराची निर्मिती कशी शक्य झाली? तर, या स्टार्ट अप ने सर्वात आधी, थ्री-डी प्रिंटर मध्ये एक त्रिमीतीय चित्र भरले आणि एका विशिष्ट प्रकारच्या काँक्रीटच्या माध्यमातून, थरावर थर चढवत, एक थ्री-डी संरचना तयार केली. आपल्याला हे जाणून अत्यंत आनंद होईल, की देशात अशाप्रकारचे अनेक प्रयोग सुरु आहेत. एक काळ असा होता, जेव्हा छोट्या छोट्या बांधकामालाही कित्येक वर्षे लागत असत. मात्र, आता तंत्रज्ञानामुळे भारतातील परिस्थिति बदलली आहे. काही काळापूर्वी, आपण जगभरातील अशा नवोन्मेषी कंपन्यांना आमंत्रित करण्यासाठी एक जागतिक गृहनिर्माण तंत्रज्ञान आव्हान स्पर्धा आयोजित केली होती. हा देशातील अशा वेगळ्या प्रकारचा पहिलाच प्रयोग होता, ज्याला आम्ही लाईट हाऊस प्रयोग असे नाव दिले होते. सध्या देशात सहा विविध ठिकाणी, लाईट हाऊस प्रकल्पांवर अत्यंत वेगाने काम सुरु आहे. या लाईट हाऊस प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अभिनव कार्यपद्धतींचा वापर केला जातो. यामुळे बांधकामाचा कालावधी कमी होतो. त्यासोबतच, जी घरे तयार होतात, ती अधिक टिकावू, किफायतशीर आणि आरामदायी असतात. मी अलिकडेच, ड्रोन च्या माध्यमातून या प्रकल्पांचा आढावा घेतला आणि त्यांच्या कामाची प्रगती देखील प्रत्यक्ष पाहिली.
इंदौरच्या प्रकल्पात विटा आणि सीमेंट काँक्रीटच्या भिंतीच्या ऐवजी प्री- फॅब्रिकेटेड सँडविच पॅनल सिस्टिमचा वापर केला जात आहे. राजकोट इथे, लाईट हाऊस फ्रेंच तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केले जात आहेत. ज्यात, बोगद्याच्या माध्यमातून, मोनोलिथिक काँक्रीट बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानाने तयार झालेली घरे, संकटांचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम असतील. चेन्नईत, अमेरिका आणि फिनलंडचे तंत्रज्ञान, प्री-कास्ट काँक्रीट सिस्टिमचा वापर होत आहे. त्यामुळे घरे लवकर बनतील आणि त्यासाठी खर्च देखील कमी येईल. रांची इथे जर्मनीच्या थ्री-डी बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करुन घरे बांधली जाणार आहेत. यात प्रत्येक खोली वेगवगेळया जागी बनवली जाईल. आणि त्यानंतर हे पूर्ण बांधकाम एकमेकांशी जोडले जाईल. अगरतला इथे न्यूझीलैंड च्या तंत्रज्ञानाचा वापर करत पोलादी चौकटी वापरुन घरे बनवली जात आहेत, ही घरे मोठ्या भूकंपाचाही सामना करु शकतील. तसेच, लखनौ इथे, कॅनडाच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहेत, यात प्लास्टर आणि पेंटची गरज पडत नाही. आणि जलद गतीने घरे तयार करण्यासाठी आधीपासूनच तयार असलेल्या भिंतींचा वापर केला जात आहे.
मित्रांनो, आज देशात हे सगळे जे प्रयोग होत आहेत, ते प्रकल्प मूळ, इनक्युबेशन केंद्र म्हणून कामी येतील. यामुळे आमचे गृहनिर्माण नियोजनकर्ते, स्थापत्यतज्ञ, अभियंते आणि विद्यार्थी नवे तंत्रज्ञान समजू शकतील आणि त्याचे प्रत्यक्ष प्रयोगही करु शकतील. मी मुद्दामच या सगळ्या गोष्टी, युवकांना सांगतो आहे, जेणेकरुन आमचे युवक, राष्ट्रहितासाठी तंत्रज्ञानाच्या नवनवीन क्षेत्रांना प्रोत्साहन देऊ शकतील.
मी या गोष्टी विशेषत आपल्या युवकांसाठी सांगत आहे , जेणेकरून आपले युवक राष्ट्रहितासाठी तंत्रज्ञानाच्या नवनवीन क्षेत्रांकडे प्रोत्साहित होऊ शकतील . माझ्या प्रिय देश बांधवांनो,
तुम्ही इंग्रजीत एक म्हण ऐकली असेल – “To Learn is to Grow” अर्थात शिकणं म्हणजेच पुढे जाणे आहे. जेव्हा आपण काही नवीन शिकतो , तेव्हा आपल्यासाठी प्रगतीचे नवनवीन मार्ग आपोआप खुले होतात. जेव्हा कधी काहीतरी वेगळं नवीन करण्याचा प्रयत्न झाला आहे, मानवतेसाठी नवीन कवाडे खुली झाली आहेत, एका नवीन युगाचा प्रारंभ झाला आहे . आणि तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा काही नवीन घडते, तेव्हा त्याचा परिणाम प्रत्येकालाच आश्चर्यचकित करतो. आता जसे की मी तुम्हाला विचारलं की असं कोणते राज्य आहे , ज्याचा संबंध तुम्ही सफरचंदाशी जोडाल? सर्वांनाच माहित आहे , तुमच्या मनात सर्वप्रथम हिमाचल प्रदेश , जम्मू-काश्मीर , उत्तराखंडचे नाव येईल. मात्र जेव्हा मी म्हणेन की या यादीत तुम्ही मणिपूरला देखील जोडा तेव्हा कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल . काही तरी नवीन करण्याची उर्मी घेऊन युवकांनी मणिपूरमध्ये ही कामगिरी करून दाखवली आहे. सध्या मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात सफरचंदाची शेती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. इथले शेतकरी आपल्या बागांमध्ये सफरचंद पिकवत आहेत. सफरचंद पिकवण्यासाठी इथल्या लोकांनी खास हिमाचल प्रदेशात जाऊन प्रशिक्षण देखील घेतले आहे. यापैकीच एक आहेत टी एस रिंगफामी योंग . योंग हे व्यवसायाने एरोनॉटिकल इंजिनीअर आहेत . त्यांनी पत्नी टी.एस. एंजेल यांच्या मदतीने सफरचंदाची शेती केली आहे . त्याचप्रमाणे अवुन्गशी शिमरे ऑगस्टीना यांनी देखील आपल्या बागांमध्ये सफरचंदाचे उत्पादन घेतले आहे . अवुन्गशी दिल्लीमध्ये नोकरी करत होत्या . ही नोकरी सोडून त्या आपल्या गावात परत गेल्या आणि सफरचंदाची शेती सुरू केली. मणिपूरमध्ये आज असे अनेक सफरचंद उत्पादक आहेत, ज्यांनी काही वेगळे आणि नवीन करून दाखवले आहे.
मित्रांनो आपल्या आदिवासी समुदायात बोरे खूप लोकप्रिय आहेत. आदिवासी समुदायाचे लोक नेहमीच बोरांची शेती करतात . मात्र कोविड -19 महामारी नंतर याची शेती विशेष वाढली आहे. त्रिपुराच्या उनाकोटी येथील असेच 32 वर्षांचे युवक मित्र आहेत विक्रमजीत चकमा. त्यांनी बोरांची लागवड करून खूप नफा कमावला आणि आता ते लोकांना बोरांचे पीक घेण्यासाठी देखील प्रेरित करत आहेत. राज्य सरकार देखील अशा लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आहे सरकारकडून यासाठी अनेक विशेष बागा तयार केल्या जात आहेत, जेणेकरून बोरांच्या लागवडी संबंधित लोकांची मागणी पूर्ण करता येईल. शेती मध्ये संशोधन होत आहे, तर शेतीच्या इतर दुय्यम उत्पादनांमध्ये देखील सर्जनशीलता पाहायला मिळत आहे.
मित्रांनो मला उत्तर प्रदेशच्या लखीमपुर-खीरी मध्ये करण्यात आलेल्या एका प्रयत्नाबद्दल माहिती समजली आहे . कोविडच्या काळात लखीमपुर-खिरी मध्ये एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला. तिथल्या महिलांना केळ्याच्या तणांपासून फायबर बनवण्याचे प्रशिक्षण देण्याचं काम सुरू करण्यात आले आहे . कचऱ्यापासून टिकाऊ सर्वोत्तम वस्तू बनवण्याचा मार्ग. केळ्यांचे तण कापून मशीनच्या मदतीने हे फायबर तयार केलं जातं , जे ज्यूट प्रमाणे असतं . या फायबरपासून हॅन्ड बॅग, सतरंजी असे कितीतरी वस्तू बनवल्या जातात .
यामुळे एक तर पिकांचा कचर्याचा वापर सुरू झाला आहे आणि दुसरीकडे गावात राहणाऱ्या आपल्या भगिनी आणि मुलींना उत्पन्नाचे एक साधन देखील मिळाले आहे . बनाना फायबरच्या या कामात एका स्थानिक महिलेची रोजची 400 ते 600 रुपये कमाई होते. लखीमपुर-खीरी मध्ये शेकडो एकर जमिनीवर केळ्याची शेती होते . केळ्यांचे पीक घेतल्यानंतर साधारणपणे शेतकऱ्यांना तण फेकण्यासाठी वेगळा खर्च करावा लागत होता . आता त्यांचे पैसे देखील वाचतात. म्हणजेच आम के आम , गुठलियो के दाम ही म्हण इथे अगदी चपखल बसते.
मित्रांनो एकीकडे बनाना फायबर पासून वस्तू बनवल्या जात आहेत तर दुसरीकडे केळ्याच्या पिठापासून डोसे आणि गुलाबजाम सारखे स्वादिष्ट पदार्थ देखील तयार होत आहेत. कर्नाटकच्या उत्तर कन्नड आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यांमध्ये महिला हे वैशिष्ट्यपूर्ण कार्य करत आहेत.
त्याची सुरुवात देखील कोरोना काळातच झाली . या महिलांनी केळ्याचा पिठापासून केवळ डोसा , गुलाबजाम सारखे पदार्थ नुसते बनवले नाहीत तर त्याची छायाचित्रे देखील सोशल मीडियावर शेअर केली आहेत . जेव्हा जास्तीत जास्त लोकांना या पीठाबाबत समजले तेव्हा त्यांची मागणी आणखी वाढली आणि या महिलांचे उत्पन्न देखील. लखीमपुर-खीरी प्रमाणेच इथेही ही नावीन्यपूर्ण कल्पना महिलाच राबवत आहेत.
मित्रांनो अशी उदाहरणे आयुष्यात काही तरी नवीन करण्याची प्रेरणा देतात . तुमच्या आसपास देखील असे अनेक लोक असतील. जेव्हा तुमचं कुटुंब मनातल्या गुजगोष्टी सांगत असेल तेव्हा तुम्ही या गोष्टीदेखील तुमच्या गप्पांमध्ये समाविष्ट करा.
कधीतरी वेळ काढून मुलांबरोबर असे उपक्रम पहायला जा आणि संधी मिळाली तर स्वतःदेखील असं काहीतरी करून दाखवा. आणि हो आणि हे सगळं तुम्ही माझ्याबरोबर NamoApp किंवा MyGov वर शेअर केलं तर मला खूप छान वाटेल.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या संस्कृत ग्रंथांमध्ये एक श्लोक आहे-
आत्मार्थम् जीव लोके अस्मिन्, को न जीवति मानवः |
परम् परोपकारार्थम्, यो जीवति स जीवति ||
अर्थात स्वतःसाठी या जगात प्रत्येक जण जगत असतो मात्र वास्तवात खरेतर ती व्यक्ती जगत असते जी परोपकारासाठी जगते. भारत मातेच्या सुपुत्रांच्या परोपकारी प्रयत्नांच्या गोष्टी हीच तर आहे मन की बात. आज देखील अशाच काही अन्य मित्रांबाबत आपण बोलणार आहोत . एक मित्र चंदीगड शहरातलेआहेत. चंदीगड मध्ये मी देखील काही वर्ष राहिलो आहे . खूपच आनंदी आणि सुंदर शहर आहे. तिथे राहणारे लोक देखील दिलदार आहेत . आणि हो, तुम्ही जर खाण्याचे शौकीन असाल तर इथे तुम्हाला आणखी मजा येईल. या चंदिगडमधील सेक्टर 29 मध्ये संजय राणा फुड स्टॉल चालवतात.
आणि सायकलवर छोले भटूरे विकतात. एक दिवस त्यांची मुलगी रिद्धिमा आणि भाची रिया एक कल्पना घेऊन त्यांच्याकडे आल्या. दोघींनीही त्यांना कोविड लस घेणाऱ्यांना मोफत छोले-भटूरे खायला द्यायला सांगितलं. ते आनंदाने तयार झाले आणि त्यांनी लगेच हे उत्तम आणि नेक कार्य सुरु केले. संजय राणा यांचे छोले-भटूरे मोफत खाण्यासाठी तुम्हाला दाखवावे लागेल कि तुम्ही त्यादिवशी लस घेतलेली आहे. लसीकरणाचा संदेश दाखवला की लगेचच ते तुम्हाला स्वादिष्ट छोले-भटूरे देतील. असे म्हणतात समाजाच्या कल्याणासाठी काम करण्यासाठी पैशांपेक्षा जास्त सेवाभाव, कर्तव्य भावनेची अधिक गरज असते . आपले संजय भाऊ हेच सिद्ध करत आहे.
मित्रांनो अशाच आणखी एका कामाची चर्चा मला करायची आहे. हे काम तामिळनाडूच्या निलगिरी मध्ये होत आहे. तिथे राधिका शास्त्री यांनी एम्बुरेक्स प्रकल्पाची सुरुवात केली आहे. डोंगराळ भागातल्या रुग्णांना उपचारासाठी सहजपणे वाहतुकीचे साधन उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. राधिका कून्नूरमध्ये एक कॅफे चालवतात . त्यांनी आपल्या कॅफेच्या सहकाऱ्यांच्या मदतीने एम्बुरेक्स साठी निधी जमा केला. निलगिरी डोंगरावर आज सहा एम्बुरेक्स कार्यरत आहे आणि दुर्गम भागातल्या आपत्कालीन स्थितीत रुग्णांसाठी उपयुक्त ठरत आहेत. एम्बुरेक्समध्ये स्ट्रेचर, ऑक्सीजन सिलेंडर , फर्स्ट एड बॉक्स यासारख्या अनेक गोष्टींची व्यवस्था केली आहे.
मित्रांनो संजय असोत किंवा राधिका , त्यांच्या उदाहरणातून असं दिसून येतं की आपण आपलं कार्य आपला व्यवसाय , नोकरी करता करता सेवाकार्य देखील करू शकतो.
मित्रांनो काही दिवसांपूर्वी एक खूपच रोचक आणि खूपच भावनिक घटना घडली, ज्यामुळे भारत जॉर्जिया मैत्रीला बळकटी मिळाली. या कार्यक्रमात भारताने सेंट क्वीन केटेवानच्या होली रेलिक म्हणजेच त्यांचे पवित्र स्मृतिचिन्ह जॉर्जियाचे सरकार आणि तिथल्या जनतेकडे सुपूर्द केले. यासाठी आपले परराष्ट्रमंत्री स्वतः तिथे गेले होते . अतिशय भावनिक वातावरणात झालेल्या कार्यक्रमात जॉर्जियाचे राष्ट्रपती, पंतप्रधान अनेक धर्मगुरू आणि मोठ्या संख्येने जॉर्जियाची जनता उपस्थित होती. या कार्यक्रमात भारताची प्रशंसा करताना जे गौरवोद्गार काढण्यात आले ते कायम स्मरणात राहतील . या एका कार्यक्रमाने दोन्ही देशांबरोबरच गोवा आणि जॉर्जिया दरम्यान संबंध देखील अधिक दृढ केले आहेत. असं यासाठी कारण सेंट क्वीन केटेवान यांचे हे अवशेष २००५ मध्ये गोव्याच्या सेंट ऑगस्टीन चर्च येथे सापडले होते .
मित्रानो, तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल हे सगळं काय आहे आणि हे सगळं केव्हा झाले? खरं तर ही चारशे पाचशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे .क्वीन केटेवान जॉर्जियाच्या राज परिवारातील मुलगी होती . दहा वर्षांच्या तुरुंगवासानंतर १६२४ मध्ये ती शहीद झाली होती . एका प्राचीन पोर्तुगाल दस्तावेनुसार सेंट क्वीन केटेवानच्या अस्थी जुन्या गोव्याच्या सेंट ऑगस्टीन कॉन्व्हेंट मध्ये ठेवण्यात आल्या होत्या. मात्र दीर्घकाळ असे मानले जात होते की गोव्यामध्ये दफन करण्यात आलेले तिचे अवशेष 1930 च्या भूकंपात गायब झाले होते .
भारत सरकार आणि जॉर्जियाचे इतिहासकार, संशोधक पुरातत्व शास्त्रज्ञ आणि जॉर्जियन चर्चच्या अनेक दशकांच्या अथक प्रयत्नानंतर 2005 मध्ये ते पवित्र अवशेष शोधण्यात यश मिळाले होते. हा विषय जॉर्जियाच्या लोकांसाठी खूपच भावनात्मक आहे . म्हणून त्यांचं ऐतिहासिक धार्मिक आणि अध्यात्मिक भावना लक्षात घेऊन भारत सरकारने या अवशेषांचा एक भाग जॉर्जियाच्या जनतेला भेट देण्याचा निर्णय घेतला. भारत आणि जॉर्जियाचा सामायिक इतिहासातील या बाबी जपून ठेवल्याबद्दल मी आज गोव्याच्या जनतेचे मनः पूर्वक आभार मानतो . गोवा अनेक महान आध्यात्मिक वारसांची भूमी आहे. सेंट ऑगस्टीन चर्च युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ (गोव्याचे चर्चेस आणि कॉन्व्हेंट) चा एक भाग आहे .
माझ्या प्रिय देश बांधवांनो, जॉर्जिया मधून आता मी तुम्हाला थेट सिंगापूरला घेऊन जातो , जिथे या महिन्याच्या सुरुवातीला आणखी एक गौरवशाली संधी समोर आली. पंतप्रधान आणि माझे मित्र ली सेन लुंग यांनी अलीकडेच नूतनीकरण केलेल्या सिलाट रोड गुरुद्वाराचे उद्घाटन केलं. त्यांनी पारंपारिक पगडी देखील घातली होती . हा गुरूद्वारा सुमारे शंभर वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. आणि तिथे भाई महाराज यांना समर्पित स्मारक देखील आहे. भाई महाराजजी भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी झाले होते. आणि हा क्षण स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करताना अधिक प्रेरक ठरतो. दोन्ही देशांदरम्यान लोकांमधील संबंध अशाच प्रयत्नांतून अधिक बळकट होतात. यातून हे देखील समजतं की सौहार्दपूर्ण वातावरणात राहणे आणि एक दुसऱ्याची संस्कृती समजून घेणे किती महत्त्वाचे आहे .
माझ्या देशबांधवांनो, आज मन की बात मध्ये आपण अनेक विषयांवर चर्चा केली. आणखी एक विषय आहे जो माझ्या मनाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे .
हा विषय आहे जलसंरक्षणाचा . माझं बालपण जिथे गेलं तिथे पाण्याची नेहमी टंचाई असायची. आम्ही पावसासाठी आसुसलेले असायचो आणि म्हणूनच पाण्याचा एक एक थेंब वाचवणे आमच्या संस्कारांचा एक भाग बनला आहे . आता 'जन भागीदारीतून जल संरक्षण ' या मंत्राने तिथले चित्र पालटून टाकले आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे आणि पाणी कुठल्याही प्रकारे वाया जाणार नाही याची काळजी घेणे हा आपल्या जीवनशैलीचा एक सहज भाग असायला हवा. आपल्या कुटुंबाची परंपरा बनायला हवी ज्याचा प्रत्येक सदस्यांना अभिमान वाटेल .
मित्रानो, निसर्ग आणि पर्यावरण संरक्षण भारताच्या सांस्कृतिक जीवनात आपल्या दैनंदिन जीवनात वसलेले आहे. पाऊस हा नेहमीच आपले विचार, आपलं तत्वज्ञान आणि आपल्या संस्कृतीला आकार देत आला आहे. ऋतुसंहार आणि मेघदूत मध्ये महाकवी कालिदास यांनी पावसाचे खूप सुंदर वर्णन केलं आहे . साहित्यप्रेमीमध्ये या कविता आजही खूप लोकप्रिय आहेत. ऋग्वेदातील पर्जन्यसूक्त मध्ये देखील पावसाच्या सौंदर्याचे खूप सुंदर वर्णन केलं आहे. त्याचप्रमाणे श्रीमद्भागवत मध्ये देखील काव्यात्मक स्वरूपात पृथ्वी, सूर्य आणि पाऊस यामधील संबंध विस्ताराने सांगितला आहे
अष्टौ मासान् निपीतं यद्, भूम्याः च, ओद-मयम् वसु |
स्वगोभिः मोक्तुम् आरेभे, पर्जन्यः काल आगते ||
अर्थात सूर्याने 8 महीने पाण्याच्या रूपात पृथ्वीच्या संपत्तीचा वापर केला होता. आता पावसाळ्याच्या ऋतूत सूर्य संचित संपत्ती पृथ्वीला परत करत आहे . खरंच पावसाचा ऋतू केवळ सुंदर आणि आनंददायी नाही तर पोषण देणारा, जीवन देणारा देखील असतो. पावसाचे पाणी जे आपल्याला मिळत आहे ते आपल्या भावी पिढ्यांसाठी आहे हे आपण कधीही विसरू नये .
आज माझ्या मनात हा विचार आला कि रोचक संदर्भानेच मी आज आपली आजची मन कि बात समाप्त करावी. तुम्हा सर्वांना आगामी सण -उत्सवांच्या खूप खूप शुभेच्छा . सण उत्सवांच्या काळात हे जरूर लक्षात ठेवा की कोरोना अजूनही आपल्यातून गेलेला नाही. कोरोनाशी संबंधित नियम विसरायचे नाहीत. तुम्ही सगळे निरोगी आणि प्रसन्न रहा . खूप खूप धन्यवाद!
नमस्कार माझ्या प्रिय देशवासियांनो! नेहमीच 'मन की बात' मध्ये, आपल्या प्रश्नांचा वर्षाव होत असतो. ह्या वेळी मला वाटले, काहीतरी वेगळे करावे, मी आपल्याला प्रश्न विचारावे. तर माझे प्रश्न काळजीपूर्वक ऐका!
.... ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण होता?
.... ऑलिम्पिकच्या कोणत्या खेळात भारताने आतापर्यंत सर्वाधिक पदक जिंकले आहेत?
... ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळाडूने सर्वाधिक पदके जिंकली आहेत?
मित्रांनो, उत्तरे मला पाठवू नका, परंतु मायगव्ह मध्ये जर आपण ऑलिंपिकवर प्रश्नोत्तरी मधील प्रश्नांची उत्तरे दिली तर आपण खूप सारी बक्षीसे जिंकू शकाल. मायगव्हच्या 'रोड टू टोकियो' ( टोकियो ला जाण्याचा मार्ग ) ह्या प्रश्नोत्तरीमध्ये असे अनेक प्रश्न आहेत. आपण 'रोड टू टोकियो’(टोकियो ला जाण्याचा मार्ग ) प्रश्नोत्तरी मध्ये भाग घ्या. भारताने यापूर्वी कशी कामगिरी केली आहे ? आता टोकियो ऑलिम्पिकसाठी आपली काय तयारी आहे? - हे सर्व स्वतः जाणून घ्या आणि इतरांनाही सांगा. मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण या प्रश्नोत्तरी स्पर्धेत नक्की भाग घ्या.
मित्रांनो, जेव्हा टोक्यो ऑलिम्पिकचा विचार आपण करत आहोत , तेव्हा मिल्खासिंगजीसारख्या दिग्गज खेळाडूला, (धावपटूला) कोण विसरु शकेल? काही दिवसांपूर्वीच कोरोनाने त्यांना आमच्यातून हिरावून नेले. जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये होते, तेव्हा मला त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली होती.
त्यांच्याशी बोलताना मी त्यांना एक विनंती केली होती. मी म्हणालो की तुम्ही तर १९६४ मधील टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. म्हणून, यावेळी, जेव्हा आमचे खेळाडू ऑलिम्पिकसाठी टोकियोला जात आहेत, तेव्हा आपण आपल्या खेळाडूंचे मनोबल वाढवावे, त्यांना आपल्या संदेशाद्वारे प्रेरित करावे. क्रीडा विषयासाठी ते इतके समर्पित आणि भावूक होते की आजारी असतानाही, त्यांनी त्वरित सहमती दर्शविली. पण दुर्दैवाने, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. मला आजही आठवते की ते २०१४ मध्ये सुरतला आले होते. आम्ही एका नाईट मॅरॅथॉनचे उद्घाटन केले होते. त्यावेळी त्यांच्याशी गप्पागोष्टी झाल्या, खेळाविषयी बोलणे झाले, त्यातून मला देखील खूप प्रेरणा मिळाली होती.
आपल्या सर्वांना माहिती आहेच की मिल्खा सिंहजी यांचे संपूर्ण कुटुंब खेळाविषयी समर्पित आहे, भारताचा गौरव वाढवत आहे.
मित्रांनो, जेव्हा प्रतिभा, निष्ठा, निश्चय आणि खिलाडू वृत्ती ( स्पोर्ट्समन स्पिरिट) एकत्र येते, तेव्हा कुठे एखादा ‘ विजेता’ तयार होतो. आपल्या देशात बहुतेक सगळे खेळाडू लहान शहरातून, भागातून ( कसब्यातून ),खेड्यातून येतात. आमचा जो ऑलिम्पिक चमू टोकियोला जात आहे, त्यात अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांचे आयुष्य खूप प्रेरणादायी आहे. जर तुम्ही आमच्या प्रवीण जाधवजींच्या बद्दल ऐकले तर तुम्हाला पण वाटेल की किती कठीण संघर्षानंतर प्रवीण जी इथे पोहोचले आहेत. प्रवीण जाधव जी, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका गावात राहतात.
ते तिरंदाजीतील उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांचे आईवडीलमजुरी करून कुटुंब चालवतात आणि आता त्यांचा मुलगा, आपल्या पहिल्या ऑलिंपिकसाठी टोकियोला जात आहे. ही फक्त त्यांच्या आईवडिलांसाठीच नव्हे, तर आपल्या सर्वांसाठीही अभिमानाची बाब/ गोष्ट आहे. तसंच,अजून एक खेळाडू आहेत, आमच्या नेहा गोयलजी. नेहा टोकियोला जाणाऱ्या महिला हॉकी संघाच्या सदस्य आहेत. त्यांची आई तसेच बहिणी सायकल कारखान्यात काम करून कुटुंबाचा खर्च चालवतात. नेहाप्रमाणेच दीपिका कुमारी ह्यांच्या आयुष्याचा प्रवासही चढउतारांनी भरलेला आहे. दीपिका ह्यांचे वडील ऑटो रिक्षा चालवितात आणि आई एक नर्स आहे, आणि आता बघा दीपिका, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतातर्फे भाग घेणाऱ्या एकमेव महिला तिरंदाज आहेत . पूर्वी संपूर्ण विश्वात प्रथम क्रमांकावर राहिलेल्या, दीपिका ह्यांना आपल्या सगळ्यांच्याच खूप खूप शुभेच्छा आहेत.
मित्रांनो, आपण जीवनात कुठेही पोहोचलो , कोणतीही उंची प्राप्त केली तरी मातीशी असलेले हे नातेच आपल्याला आपल्या मुळाशी जोडून ठेवते.
संघर्षाच्या दिवसांनंतर मिळालेल्या यशाचा आनंद काही आगळाच असतो. टोक्योला जाणाऱ्या आमच्या खेळाडूंनी, बालपणी असा साधना-संसाधनाच्या अभावाचा सामना केला, परंतु ते आपल्या निश्चयावर ठाम राहिले, कष्ट करत राहिले.
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरच्या प्रियंका गोस्वामीजी ह्यांचे जीवन देखील बरेच काही शिकवते. प्रियांका ह्यांचे वडील बस कंडक्टर आहेत. लहान असताना प्रियांकाला जी पदक जिंकणाऱ्या खेळाडूला मिळते ती बॅग खूप आवडायची. त्याच आकर्षणामुळे त्यांनी प्रथम रेस-वॉकिंग स्पर्धेत भाग घेतला. त्या आता आज, त्या खेळातील, मोठ्या विजेत्या बनल्या आहेत.
भाला फेकीत भाग घेणारे शिवपालसिंहजी बनारसचे रहिवासी आहेत. शिवपालजी यांचे संपूर्ण कुटुंब या खेळाशी जोडलेले आहे. त्यांचे वडील, काका आणि भाऊ, सर्वजण भालाफेकीत निष्णात आहेत. त्यांच्या परिवाराची ही परंपरा त्यांना टोकियो ऑलिम्पिकसाठी उपयोगी होणार आहे.
टोकियो ऑलिम्पिकला जाणाऱ्या चिराग शेट्टी आणि त्यांचा साथीदार सात्विक साईराज ह्यांची हिंमत पण प्रेरणादायक आहे. अलीकडेच, चिरागच्या आजोबांचे कोरोनामुळे निधन झाले. गेल्या वर्षी स्वत: सात्विकही कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. परंतु, या अडचणी असूनही, हे दोघे, पुरुष दुहेरी शटल स्पर्धेत आपले सर्वोत्तम योगदान देण्याची तयारी करत आहेत.
अजून एका खेळाडूशी मी आपली ओळख करून देऊ इच्छितो, ते आहेत, भिवानी, हरियाणा येथील मनीष कौशिक. मनीषजी शेतकरी कुटुंबातील आहेत. लहानपणी शेतात काम करता करता मनीष ह्यांना मुष्टियुद्धाची आवड निर्माण झाली. आज हीच आवड त्यांना टोकियोला घेऊन जात आहे.
आणखी एक खेळाडू आहेत सी.ए. भवानी देवी. नाव भवानी आहे आणि त्या तलवारबाजी मध्ये निष्णात आहेत. चेन्नईच्या रहिवासी असलेल्या भवानी ह्या ऑलिंपिकमध्ये पात्र ठरलेल्या पहिल्या तालवारबाज आहेत. मी कुठेतरी वाचले होते की भवानीजी यांचे प्रशिक्षण चालू राहावे म्हणून त्यांच्या आईने आपले दागिने सुद्धा गहाण ठेवले होते.
मित्रांनो, अशी बरीच नावे आहेत. पण 'मन की बात' मध्ये, आज त्यातील फक्त काही नावे मी सांगू शकलो आहे. टोक्योला जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा संघर्ष आहे, अनेक वर्षांची मेहनत आहे. ते केवळ स्वतःसाठीच नाही तर देशासाठी जात आहेत. ह्या खेळाडूंना भारताचा गौरव वाढवायचा आहे आणि लोकांचे हृदयही जिंकायचे आहे. आणि म्हणूनच मी माझ्या देशवासियांना सल्ला देऊ इच्छितो, की या खेळाडूंवर आपण जाणीवपूर्वक किंवा नकळत दबाव आणायचा नाही आहे तर खुल्या मनाने त्यांना पाठिंबा द्यायचा आहे, प्रत्येक खेळाडूचा उत्साह वाढवायचा आहे.
सामाजिक माध्यमांवर #cheer4India ह्या हॅशटॅग सह आपण सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊ शकता. ह्याशिवाय देखील आपल्याला काहीतरी वेगळं, नाविन्यपूर्ण करायचे असेल तर तेही नक्कीच करा. आपल्याकडे अशी काही कल्पना असेल, जी आपल्या खेळाडूंसाठी, संपूर्ण देशाने एकत्र येऊन करायाची असेल, तर तुम्ही ती मला नक्की पाठवा. आपण सर्वजण मिळून टोकियोला जाणाऱ्या खेळाडूंना समर्थन देऊ या. Cheer4India!!!Cheer4India!!!Cheer4India!!!-
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण सर्व देशवासीय कोरोनाविरूद्ध लढत आहोत, पण या लढ्यात आपण सर्वानी एकत्र येऊन, काही विलक्षण साध्य केले आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी आपल्या देशाने अभूतपूर्व काम केले आहे. 21 जूनला लसीकरण मोहिमेचा पुढील टप्पा सुरू झाला आणि त्याच दिवशी देशातील ८६ लाखांहून अधिक लोकांनी, विनामूल्य लस घेऊन विक्रम केला व तो देखील एका दिवसात! इतक्या मोठ्या संख्येने भारत सरकारने विनामूल्य लसीकरण उपलब्ध केले आणि तेही एका दिवसात! साहजिकच ह्याविषयी बरीच चर्चा झाली आहे.
मित्रांनो, एक वर्षापूर्वी सर्वांसमोर एक प्रश्न होता की लस कधी येणार? आज आम्ही एका दिवसात, लाखो लोकांसाठी, 'भारतात बनवलेली’ लस विनामूल्य देत आहोत आणि हेच नवीन भारताचे सामर्थ्य आहे.
मित्रांनो, देशातील प्रत्येक नागरिकास लसीची सुरक्षा मिळालीच पाहिजे, ह्या साठी आम्हाला सतत प्रयत्न करायचे आहेत. अनेक ठिकाणी लस घेण्याविषयीची, लोकांच्या मनातील दुविधा दूर करण्यासाठी अनेक संघटना, नागरी संस्थांतील लोक पुढे आले आहेत आणि ते सर्वजण मिळून खूप चांगले काम करत आहेत.
चला, आपण पण आज एका गावात जाऊ या आणि तेथील लोकांशी लसीविषयी बोलू या. आज जाऊया मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील डूलारिया गावात.
पंतप्रधान: हॅलो!
राजेश : नमस्कार !
पंतप्रधान : नमस्ते जी |
राजेश: माझे नाव राजेश हिरावे, ग्रामपंचायत दुलारिया, भीमपूर ब्लॉक |
पंतप्रधानः राजेश जी, आता आपल्या गावात कोरोनाची स्थिती काय आहे हे जाणून घ्यावे म्हणून मी फोन केला आहे.
राजेश: सर, इथे आता कोरोनाची परिस्थिती अशी काही नाही.
पंतप्रधान: सध्या लोक आजारी नाहीत?
राजेश: होय.
पंतप्रधान: गावाची लोकसंख्या किती? गावात किती लोक आहेत?
राजेश: गावात ४६२ पुरुष आणि 33२ महिला आहेत, सर.
पंतप्रधान: ठीक आहे! राजेश जी, तुम्ही लस घेतली आहे का?
राजेश: नाही सर, अजून घेतलेली नाही.
पंतप्रधान: अरे! का नाही घेतली?
राजेश: सर, इथल्या काही लोकांनी , व्हॉट्सअॅपवर काही खोटेनाटे पसरवले त्यामुळे लोक गोंधळात पडले आहेत, सर.
पंतप्रधान: मग तुमच्या मनात देखील भीती आहे का?
राजेश: हो सर, असा गोंधळ सगळ्या गावात पसरला होता सर.
पंतप्रधान: अरे रे, काय बोलता आहेत ? हे बघा राजेश जी ...
राजेश: होय.
पंतप्रधान: माझे तुम्हाला आणि गावातील सर्व बंधू भगिनींना
असे सांगणे आहे की जर मनात भीती असेल तर ती काढून टाका.
राजेश: होय.
पंतप्रधान: आपल्या संपूर्ण देशातील 31 कोटींपेक्षा जास्त लोकांनी लस टोचून घेतली आहे.
राजेश: होय.
पंतप्रधान: तुम्हाला माहिती आहे ना , मी स्वत: देखील दोन्ही डोस घेतले आहेत.
राजेश: हो सर.
पंतप्रधान: अरे माझी आई तर जवळजवळ 100 वर्षांची आहे. तिनेसुद्धा दोन्ही डोस घेतले आहेत. कधीकधी एखाद्याला ताप वगैरे येतो, परंतु हे अगदी किरकोळ आहे, काही तासांसाठीच होते. पण हे पहा, लस न घेणे खूप धोकादायक ठरू शकते.
राजेश: होय.
पंतप्रधान: ह्यामुळे तुम्ही स्वत: लाच केवळ धोक्यात टाकता असे नाही तर, तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आणि गावाला धोक्यात टाकता.
राजेश: होय.
पंतप्रधान: म्हणून राजेश जी, लवकरात लवकर लस घ्या आणि गावातील प्रत्येकाला सांगा की भारत सरकार विनामूल्य लसीकरण करत आहे आणि 18 वर्षांच्या वरील सर्व लोकांसाठी हे विनामूल्य लसीकरण आहे.
राजेश: हो ...
पंतप्रधान: तर हे गावात लोकांना सांगा. आणि गावात भीतीचे वातावरण असायचे तर काही कारणच नाही.
राजेश: त्याचे कारण सर, काही लोक अशा खोट्या अफवा पसरवतात, ज्याच्यामुळे लोक घाबरून जातात. उदाहरण म्हणजे लसीकरण झाल्यावर येणारा ताप आणि रोगाचा फैलाव म्हणजे माणसाच्या मृत्यूच होतो, इथपर्यंत देखील अफवा पसरवत आहेत.
पंतप्रधान: अरेरे ... आज बऱ्याच रेडिओवर , बऱ्याच टीव्ही वर पहा, इतक्या सगळ्या बातम्या मिळतात आणि म्हणूनच लोकांना समजावून सांगणे फार सोपे झाले आहे.
आणि हे पहा, मी तुम्हाला सांगतो, भारतातील बरीच गावे अशी आहेत की जेथे सर्व लोकांना लस मिळाली आहे, म्हणजेच गावातील सगळे, अगदी शंभर टक्के लोक.
असं मी तुम्हाला एक उदाहरण देतो ...
राजेश: होय.
पंतप्रधान: काश्मीरमध्ये बांदीपुरा जिल्हा आहे, या बांदीपुरा जिल्ह्यातल्या व्यवन (Weyan ) गावातील लोकांनी मिळून 100% लसीकरणाचे लक्ष्य ठरवले व ते पूर्णदेखील केले. आज काश्मीरच्या या गावातील 18 वर्षांवरील सर्व लोकांचे लसीकरण झालेलं आहे.
मला नागालँडच्या त्या तीन गावांविषयी देखील माहिती मिळाली आहे की जिथे सर्व लोकांचे, 100%लोकांचे लसीकरण झाले आहे.
राजेश - हो .. हो…
पंतप्रधान: राजेश जी, तुम्हीही तुमच्या आसपासच्या, आपल्या गावातल्या लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवली पाहिजे आणि जसं आपण भ्रम म्हणता. तर होय, हा फक्त एक भ्रम आहे.
राजेश: हो ...
पंतप्रधान: तर या गोंधळाचे उत्तर म्हणजे तुम्ही स्वत: चे लसीकरण करून घेऊनच प्रत्येकास समजावून सांगितले पाहिजे. कराल ना तुम्ही असे?
राजेश: हो सर.
पंतप्रधान: तुम्ही नक्की कराल का?
राजेश: हो सर, हो सर. मला तुमच्याशी बोलून मला असे वाटले की मी स्वतःही लस घेईन आणि लोकांनाही लस घ्यायला तयार करेन.
पंतप्रधान: बरं, गावात अजून कोणी आहे का ज्यांच्याशी मी बोलू शकेन?
राजेश: हो सर.
पंतप्रधान: कोण बोलणार?
किशोरीलाल: नमस्कार सर ...
पंतप्रधान: नमस्कार , आपण कोण बोलत आहात?
किशोरीलाल: सर, माझे नाव किशोरीलाल दुर्वे आहे.
पंतप्रधान: तर किशोरीलाल जी, मी आता राजेश जी यांच्याशी बोलत होतो.
किशोरीलाल : हो सर |
पंतप्रधान: आणि ते मोठ्या खिन्नतेने सांगत होते की लसीच्या विषयी लोक खूप वेगवेगळ्या गोष्टी बोलतात.
किशोरीलाल: होय.
पंतप्रधान: तुम्हीही ऐकलं आहे का?
किशोरीलाल: होय ... मी ऐकलं आहे सर ...
पंतप्रधान: तुम्ही काय ऐकले आहे?
किशोरीलाल: कारण हे सर … जवळच महाराष्ट्र आहे, तिथले काही नात्यातले, संबंधित लोक अशी अफवा पसरवत आहेत की लस घेतल्यावर लोक मरत आहेत, . कोणी आजारी पडत आहेत. खूप गोंधळ आहे सर, म्हणूनच लोक लस घेत नाहीत.
पंतप्रधान: नाही? .. मग काय म्हणतात?? आता कोरोना गेला आहे, असं म्हणतात का?
किशोरीलाल: होय.
पंतप्रधान: असं म्हणतात का की कोरोनाने काही होत नाही?
किशोरीलाल: नाही, कोरोना गेला आहे, असं नाही म्हणत सर, कोरोना तर आहे बोलतात. पण लस घेतली म्हणजे आजारपण येते, सगळे मरत आहेत, अशी परिस्थिती आहे असं म्हणतात ते सर.
पंतप्रधान: अच्छा? लसीमुळे मरत आहेत?
किशोरीलाल: आपले क्षेत्र आदिवासी-प्रदेश आहे, सर, तसेही येथील लोक घाबरतात, आणि अफवा पसरल्यामुळे लोक ते घेत नाहीत लस.
पंतप्रधान: हे पहा किशोरीलाल जी ...
किशोरीलाल: हो सर ...
पंतप्रधान: या अफवा पसरविणारे लोक सतत अफवा पसरवत राहतील.
किशोरीलाल: होय.
पंतप्रधान: आपल्याला तर आपले प्राण वाचवावे लागतील, ग्रामस्थांना वाचवावे लागेल, आपल्या देशवासीयांना वाचवावे लागेल. आणि असं कोणी म्हटलं की कोरोना गेला आहे तर या भ्रमात राहू नका.
किशोरीलाल: होय.
पंतप्रधान: हा रोग असा आहे, हा बहुरूपी आहे.
किशोरीलाल: हो सर.
पंतप्रधान: तो रूप बदलतो ... तो नवनवे रूप घेऊन पोहोचतो आहे.
किशोरीलाल: होय.
पंतप्रधान: आणि त्यातून सुटण्यासाठी आपल्याकडे दोन मार्ग आहेत. एकतर कोरोनासाठी बनविलेले नियम, मास्क घालायचा , साबणाने वारंवार हात धुवायचे, अंतर ठेवायचे आणि दुसरा मार्ग म्हणजे ह्या बरोबरच लस देखील टोचुन घ्यायची , ही लस देखील चांगले सुरक्षा कवच आहे. तर त्याच्याबद्दल चिंता करा.
किशोरीलाल: होय.
प्रधानमंत्री : अच्छा किशोरीलाल जी मला सांगा
किशोरीलाल : हो सर
प्रधानमंत्री :जेव्हा लोक आपल्याशी बोलतात तेव्हा आपण लोकांना कसं समजावून सांगता ? आपण समजावून सांगता की आपणही अफवांवर विश्वास ठेवता ?
किशोरीलाल : समजावू काय ? असे लोक जास्ती असतील तर सर मलाही भीती वाटते सर.
प्रधानमंत्री : हे बघा किशोरीलाल जी, आज आपण बोललो, आपण माझे मित्र आहात.
किशोरीलाल : हो सर
प्रधानमंत्री : आपण स्वतः घाबरायचं नाही आणि लोकांची भीतीही दूर करायची आहे. कराल ?
किशोरीलाल : हो सर. लोकांच्या मनातली भीती दूर करेन सर,मी स्वतः ही लस घेईन
प्रधानमंत्री : हे पहा, अफवांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही.
किशोरीलाल : हो
प्रधानमंत्री : आपल्याला माहित आहे, आपल्या वैज्ञानिकांनी किती परिश्रमाने ही लस तयार केली आहे.
किशोरीलाल : हो सर.
प्रधानमंत्री : वर्षभर, अहोरात्र मोठ-मोठ्या वैज्ञानिकांनी काम केलं आहे,म्हणूनच आपला विज्ञानावर विश्वास हवा,वैज्ञानिकांवर विश्वास हवा आणि हे अफवा पसरवणाऱ्या लोकांना वारंवार समजवायला पाहिजे की असे होत नाही, इतक्या लोकांनी लस घेतली आहे, काही होत नाही.
किशोरीलाल : हो
प्रधानमंत्री : आणि अफवांपासून सांभाळून राहायला हवं, त्यापासून दूर राहायला हवं आणि गावालाही अफवांपासून दूर ठेवत वाचवायला हवं.
किशोरीलाल : हो
प्रधानमंत्री : आणि राजेशजी,किशोरीलालजी,आपल्यासारख्या मित्रांना तर मी सांगेन की आपण केवळ आपल्या गावातच नव्हे तर आणखी इतर गावातही अशा अफवा रोखण्यासाठी काम करा आणि लोकांना सांगा की माझ्याशी याबाबत बोलणे झालं आहे म्हणून.
किशोरीलाल : हो सर.
प्रधानमंत्री : सांगा, माझं नाव सांगा त्यांना
किशोरीलाल : सांगू, सर आणि लोकांना सांगू आणि त्यांना समजावू आणि स्वतःही घेऊ
प्रधानमंत्री : पहा, आपल्या संपूर्ण गावाला माझ्याकडून शुभेच्छा द्या
किशोरीलाल : हो सर
प्रधानमंत्री : आणि सर्वाना सांगा, जेव्हा आपला नंबर येईल...
किशोरीलाल : हो ...
प्रधानमंत्री : लस नक्की घ्या.
किशोरीलाल : ठीक आहे सर
प्रधानमंत्री : गावातल्या महिलांना,आपल्या माता- भगिनींचा ...
किशोरीलाल : हो सर
प्रधानमंत्री : या कामात जास्तीत जास्त सहभागी करून घ्या आणि सक्रीय सहभागासह त्यांना आपल्या समवेत ठेवा
किशोरीलाल : हो
प्रधानमंत्री : कधी कधी माता- भगिनी जे सांगतात ना ते लोकांना लवकर पटते
किशोरीलाल : हो
प्रधानमंत्री : आपल्या गावात लसीकरण पूर्ण झाल्यानंतर मला सांगाल ना ?
किशोरीलाल : हो, सांगेन सर
प्रधानमंत्री :नक्की सांगाल ?
किशोरीलाल : हो
प्रधानमंत्री : आपल्या पत्राची मी प्रतीक्षा करेन
किशोरीलाल : हो सर
प्रधानमंत्री : चला, राजेश जी, किशोर जी खूप- खूप धन्यवाद. आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
किशोरीलाल : धन्यवाद सर, आपण आमच्याशी बोललात. आपल्यालाही खूप- खूप धन्यवाद.
मित्रानो, कधी ना कधी,जगासाठी हा अभ्यासाचा विषय ठरेल की भारतातल्या गावातल्या लोकांनी,आपल्या वनवासी-आदिवासी बंधू- भगिनींनी कशा प्रकारे आपल्या समंजसपणाची , सामर्थ्याची प्रचीती दिली. गावातल्या लोकांनी विलगीकरण केंद्रे तयार केली, स्थानिक गरजा लक्षात घेऊन कोविड प्रोटोकॉल तयार केले. गावातल्या लोकांनी कोणाला उपाशी राहू दिले नाही, शेतीची कामेही खोळंबू दिली नाहीत. जवळच्या शहरात दररोज दुध-भाज्या पोहोचत राहतील याची काळजी घेतली. म्हणजेच स्वतःबरोबरच दुसऱ्यालाही सांभाळले. लसीकरण अभियानातही आपल्याला असेच करायचे आहे. आपण जागरूक रहायचं आहे आणि जागरूक करायचंही आहे. गावातल्या प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करणे हे प्रत्येक गावाचे लक्ष्य असले पाहिजे. लक्षात ठेवा, आणि मी तर आपणाला विशेष करून सांगतो. आपण आपल्या मनाला एक प्रश्न विचारा – प्रत्येक जण यशस्वी होऊ इच्छितो मात्र निर्णायक यशस्वी होण्याचा मंत्र काय आहे ? निर्णायक सफलतेचा मंत्र आहे -निरंतरता. म्हणूनच आपल्याला शिथिल राहायचं नाही, कोणत्याही भ्रमात राहायचं नाही. आपल्याला अखंड प्रयत्न करत राहायचं आहे, कोरोनावर विजय मिळवायचा आहे.
माझ्या प्रिय देश बांधवानो,
आपल्या देशात आता मान्सूनचा हंगाम आला आहे. ढग बरसू लागतात तेव्हा ते केवळ आपल्यासाठीच नव्हे तर आपल्या भावी पिढीसाठीही बरसतात. पावसाचे पाणी जमिनीत मुरून साठते आणि भूगर्भातल्या पाण्याची पातळीही सुधारते. म्हणूनच जल संरक्षण म्हणजे देश सेवेचेच एक रूप आहे असे मी मानतो. आपण पाहिले असेल की आपल्यापैकी अनेक लोक या पुण्य कामाला आपली जबाबदारी मानून हे काम करत आहेत. अशीच एक व्यक्ती आहे उत्तराखंड मधल्या पौड़ी गढ़वाल इथले सच्चिदानंद भारती जी. भारती जी एक शिक्षक आहेत आणि त्यांनी आपल्या कार्यातूनही लोकांना अतिशय उत्तम शिक्षण दिले आहे. त्यांच्या परिश्रमातूनच पौड़ी गढ़वाल मधल्या उफरैंखाल भागातले पाण्याचं मोठ संकट शमलं आहे. जिथे लोक पाण्याकडे डोळे लावून बसले होते तिथे आता वर्षभर पाण्याचा पुरवठा होत आहे.
मित्रहो,
डोंगराळ भागात जल संधारणाची पारंपारिक पद्धत आहे त्याला ‘चालखाल’ असेही म्हटले जाते. म्हणजे पाणी जमा करण्यासाठी मोठा खड्डा खोडणे. या परंपरेशी भारती जी यांनी आणखी नव्या पद्धतीची सांगड घातली.त्यांनी सातत्याने लहान-मोठे तलाव तयार केले. यातून उफरैंखाल इथला डोंगराळ भाग हिरवागार तर झालाच शिवाय लोकांचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला. आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की भारती जी यांनी असे 30 हजार पेक्षा जास्त तलाव तयार केले आहेत. 30 हजार ! त्यांचं हे भगीरथ कार्य आजही सुरूच असून अनेक लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
मित्रहो,
अशाच प्रकारे उत्तर प्रदेशातल्या बाँदा जिल्ह्यातल्या अन्धाव गावातल्या लोकांनीही वेगळ्या प्रकारचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या अभियाना ला नावही मोठे मनोरंजक दिले आहे ,‘शेतातलं पाणी शेतात,गावाचं पाणी गावात.. या अभियानाअंतर्गत गावातल्या शंभर बिघा शेतात उंच- उंच बांध केले आहेत. यामुळे पावसाचे पाणी शेतात जमा व्हायला लागले आणि जमिनीत मुरायला लागले. आता हे लोक शेताच्या बांधावर झाडे लावण्याची योजना आखत आहेत. म्हणजेच आता शेतकऱ्याला पाणी, झाडे आणि पैसा तीनही मिळेल.आपल्या उत्तम कार्यामुळे त्यांच्या गावाची कीर्ती दूर-दूर पर्यंत पोहोचत आहे.
मित्रहो,
या सर्वांकडून प्रेरणा घेत आपण आपल्या आजू-बाजूला ज्या प्रकारे पाण्याची बचत करता येईल, आपण बचत करायला हवी. मान्सूनचा हा महत्वाचा काळ आपण वाया जाऊ देता कामा नये.
माझ्या प्रिय देश बांधवानो, आपल्या शास्त्रामध्ये म्हटल आहे,
“नास्ति मूलम् अनौषधम्” ||
म्हणजे या भूतलावर अशी कोणतीही वनस्पती नाही जिच्यामध्ये औषधी गुणधर्म नाही. आपल्या आजूबाजूला अशी अनेक झाडे- वनस्पती असतात ज्यांचे अद्भुत गुणधर्म असतात मात्र आपल्याला अनेकदा त्याबाबत माहिती नसते. नैनीताल मधून एका मित्राने भाई परितोष यांनी या विषयावर मला पत्र पाठवले आहे. त्यांनी लिहिले आहे की गुळवेल आणि दुसऱ्या आणखी काही वनस्पतींचे अद्भुत औषधी गुणधर्म आपल्याला कोरोना आल्यानंतरच समजले . आपण आपल्या आजूबाजूच्या वनस्पतीविषयी जाणून घ्यावे आणि दुसऱ्यांनाही त्याची माहिती द्यावी असे ‘मन की बात’ च्या सर्व श्रोत्यांना मी सांगावे असा आग्रह परितोष यांनी केला आहे. खर तर हा आपला शेकडो वर्षापासूनचा वारसा आहे आणि आपल्याला त्याची जोपासना करायची आहे. याच दिशेने मध्य प्रदेश मधल्या सतना इथले रामलोटन कुशवाहा जी,यांनी प्रशंसनीय काम केले आहे. रामलोटन यांनी आपल्या शेतात देशी संग्रहालय तयार केले आहे. या संग्रहालयात त्यांनी शेकडो औषधी वनस्पती आणि बियाण्यांचा संग्रह केला आहे. लांब-लांबच्या भागातून त्यांनी हे आणले आहे. याशिवाय ते दर वर्षी अनेक प्रकारच्या भारतीय भाज्याची लागवड करतात. रामलोटन यांची ही बाग, हे संग्रहालय बघायला लोक येतात आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टीही शिकतात. खरंच हा अतिशय उत्तम प्रयोग आहे आणि देशाच्या वेगवेगळ्या भागात असाच प्रयोग करता येऊ शकतो. आपणापैकी जे लोक अशा प्रकारचा प्रयत्न करू इच्छितात त्यांनी हा जरूर करावा अशी माझी इच्छा आहे. यातून उत्पन्नाचे नवे साधनही प्राप्त होऊ शकते. स्थानिक वनस्पतींच्या माध्यमातून आपल्या भागाची ओळख वाढेल असाही एक फायदा होऊ शकतो.
माझ्या प्रिय देशबांधवानो,
काही दिवसानंतर 1 जुलैला आपण राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करू. देशाचे थोर डॉक्टर बीसी राय यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. कोरोना काळात डॉक्टरांनी दिलेल्या योगदानाबद्दल आपण सर्वजण त्यांचे आभारी आहोत. आपल्या डॉक्टरांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता आपली सेवा केली आहे. म्हणूनच या वेळी राष्ट्रीय डॉक्टर दिन विशेष महत्वाचा आहे.
मित्रहो, औषध जगतातल्या सर्वात आदरणीय लोकांपैकी एक असलेल्या हिप्पोक्रेट्स यांनी म्हटले होते
“Wherever the art of Medicine is loved, there is also a love of Humanity.”
म्हणजे जिथे Art of Medicine साठी प्रेम असते तिथे मानवतेसाठीही प्रेम असते. प्रेमाच्या याच सामर्थ्याने डॉक्टर आपली सेवा करू शकतात. म्हणूनच आपली जबाबदारी आहे की तितक्याच प्रेमाने आपण त्यांचे आभार मानूया त्यांचा उत्साह वाढवूया. आपल्या देशात असे लोकही आहेत जे डॉक्टरांना सहाय्य करण्यासाठी पुढे येऊन काम करत आहेत. श्रीनगर मधल्या अशाच एका प्रयत्नाबाबत मला माहिती मिळाली. इथे दल सरोवरात नावेमध्ये बोट अॅम्ब्युलन्स सेवा सुरु करण्यात आली. श्रीनगरच्या तारिक अहमद पातलू जी हे हाउस बोटचे मालक असून त्यानी ही सेवा सुरु केली. त्यांनी स्वतः कोरोना-19 शी झुंज दिली आहे आणि त्यातूनच त्यांना ही प्रेरणा मिळाली. त्यांच्या या अॅम्ब्युलन्समधून जन जागृतीचे अभियान चालवण्यात येते आणि ते सातत्याने अम्ब्युलन्समधून घोषणाही करत असतात. लोकांनी मास्कचा वापर करण्यापासून ते कोरोना संदर्भात इतरही आवश्यक काळजी घ्यावी हा यामागचा उद्देश आहे.
मित्रहो, डॉक्टर दिनाबरोबरच 1 जुलै हा दिवस चार्टड अकाउंटड दिन म्हणजे सनदी लेखापाल दिन म्हणूनही साजरा केला जातो.काही वर्षांपूर्वी मी देशातल्या सनदी लेखापालांकडून जागतिक स्तरावरच्या भारतीय ऑडिट कंपन्या तयार करण्याची भेट मागितली होती. आज मी त्यांना याचे स्मरण करून देऊ इच्छितो. अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी सनदी लेखापाल चांगली आणि सकारात्मक भूमिका बजावू शकतात. सर्व सनदी लेखापाल आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देश बांधवानो,
कोरोना विरोधातल्या भारताच्या लढ्याचे एक मोठे वैशिष्ट्य आहे. या लढ्यात देशातल्या प्रत्येक व्यक्तीने आपली भूमिका बजावली आहे. “मन की बात” मध्ये मी याचा अनेकदा उल्लेख केला आहे. मात्र काही लोकांची तक्रार आहे की त्यांच्या बाबतीत मात्र तितकेसे बोलले जात नाही. बँकेचे कर्मचारी असोत, शिक्षक असोत, छोटे व्यापारी किंवा दुकानदार असोत, दुकानांमध्ये काम करणारे लोक असोत, फेरीवाले बंधू-भगिनी असोत, सुरक्षा कर्मचारी, पोस्टमन किंवा टपाल कार्यालयाचे कर्मचारी खर तर ही यादी खूपच मोठी आहे आणि प्रत्येकाने आपले काम चोखपणे बजावले आहे. शासन- प्रशासन स्तरावरही अनेक लोक वेगवेगळ्या स्तरावर कार्य करत आहेत.
मित्रहो, आपण कदाचित केंद्र सरकार मध्ये सचिव असणारे गुरु प्रसाद महापात्रा जी यांचे नाव ऐकले असेल. आज “मन की बात” मध्ये मी त्यांचाही उल्लेख करू इच्छितो. गुरुप्रसाद जी यांना कोरोना झाला होता आणि ते रुग्णालयात दाखल होते आणि आपले कर्तव्यही बजावत होते. देशात ऑक्सीजनचे उत्पादन वाढावे आणि दुर्गम भागापर्यंत ऑक्सीजन पोहोचावा यासाठी त्यांनी अहोरात्र काम केले. एकीकडे कोर्ट कचेरी, मिडीयाचा दबाव एकाच वेळी अनेक आघाड्यांवर ते लढत राहिले, आजारपणातही त्यांनी काम थांबवले नाही. येऊ नका असे सांगूनही ते हट्टाने ऑक्सीजन बाबतच्या पत्रकार परिषदाना उपस्थित राहत असत. इतकी त्यांना देशवासीयांची चिंता होती. रुग्णालयात असतानाही ते आपली चिंता न करता देशातल्या लोकांसाठी ऑक्सीजन पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात गुंतले होते. आपल्या सर्वांसाठी दुःखाची बाब आहे की या कर्मयोग्यालाही देशाने गमावलं आहे, कोरोनाने त्यांना आपल्यापासून हिरावलं आहे. असे असंख्य लोक आहेत ज्यांची कधी चर्चाही होऊ शकली नाही. कोविड विषयीच्या नियमांचं संपूर्ण पालन आणि लस घेणे हीच अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आपली श्रद्धांजली ठरेल.
माझ्या प्रिय देश बांधवानो,
“मन की बात’ ची सर्वात चांगली बाब ही आहे की यात माझ्यापेक्षा आपणा सर्वांचे योगदान जास्त असते. आताच मी चेन्नईच्या थिरु आर. गुरुप्रसाद जी यांची MyGov मध्ये एक पोस्ट पाहिली. त्यांनी लिहिले आहे, “मन की बात”कार्यक्रमाचे ते नियमित श्रोता आहेत. गुरुप्रसाद जी यांच्या पोस्टमधल्या काही ओळी मी सांगतो. त्यांनी लिहिले आहे,
आपण जेव्हा तामिळनाडू विषयी बोलता तेव्हा माझी रुची अधिक वाढते. आपण तमिळ भाषा,तमिळ संकृतीची थोरवी, तमिळ सण आणि तामिळनाडूच्या प्रमुख स्थानांची चर्चा केली आहे.
गुरु प्रसाद जी आणखी लिहितात, “मन की बात” मध्ये तामिळनाडू मधल्या लोकांच्या कामगिरी बाबतही अनेकदा सांगितले आहे. तिरुक्कुरल बाबत आपला स्नेह आणि तिरुवल्लुवर जी यांच्या प्रती आपला आदर याबाबत तर काय वर्णावे ! म्हणूनच ‘मन की बात’ मध्ये आपण तामिळनाडूविषयी जे सांगितले आहे ते सर्व संकलित करून त्याचे ई- बुक तयार केले आहे. आपण या ई- बुक विषयी काही बोलाल का आणि नमो ऐप ते प्रकाशित कराल का ? धन्यवाद
हे मी गुरुप्रसाद जी यांचे पत्र आपल्याला वाचून दाखवत होतो.
गुरुप्रसाद जी, आपली ही पोस्ट वाचून खूप आनंद झाला. आपण आपल्या ई- बुक मध्ये एक आणखी पान जोडा.
..’नान तमिलकला चाराक्तिन पेरिये अभिमानी |
नान उलगतलये पलमायां तमिल मोलियन पेरिये अभिमानी |..’
उच्चारात काही दोष नक्कीच असेलही मात्र माझा प्रयत्न आणि माझा स्नेह कधीच कमी होणार नाही. जे तमिळ भाषक नाहीत त्यांना मी सांगू इच्छितो की मी गुरुप्रसाद जी यांना सांगितले आहे-
मी तमिळ संस्कृतीचा खूप मोठा प्रशंसक आहे.
जगातली सर्वात प्राचीन भाषा तमिळ चा मी मोठा प्रशंसक आहे.
मित्रहो, प्रत्येक हिंदुस्तानी व्यक्तीने जगातली सर्वात प्राचीन भाषा आपल्या देशात आहे, याचा गुण गौरव करायलाच हवा, त्याचा अभिमान बाळगायला हवा. मलाही तमिळ बाबत अतिशय अभिमान आहे. गुरु प्रसाद जी, आपला हा प्रयत्न माझ्यासाठी नवा दृष्टीकोन देणारा आहे. कारण मी जेव्हा ‘मन की बात’ मधून संवाद साधतो तेव्हा सहज सोप्या पद्धतीने माझे म्हणणे मांडतो. मला माहितही नव्हते की याचा हा ही एक घटक होता. आपण सगळ्या जुन्या गोष्टीचा संग्रह केला तेव्हा मीही एकदा नव्हे तर दोनदा त्या वाचल्या.गुरुप्रसाद जी आपले हे पुस्तक मी नमो ऐपवर नक्कीच अपलोड करेन. भविष्यातल्या प्रयत्नांसाठी आपल्याला खूप-खूप शुभेच्छा !
माझ्या प्रिय देश बांधवानो,
आज आपण कोरोना काळातल्या अडचणी आणि खबरदारी याबाबत बोललो, देश आणि देशवासीयांच्या कामगिरी बाबतही चर्चा केली. आता एक आणखी संधी आपल्या समोर आहे. 15 ऑगस्ट येणार आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा अमृत-महोत्सव आपणा सर्वांसाठी एक मोठी प्रेरणा आहे. आपण देशासाठी जगण्याचे शिकलो.स्वातंत्र्याचा लढा – देशासाठी बलिदान देणाऱ्यांची कथा आहे. स्वातंत्र्यानंतर या काळाला आपल्याला देशासाठी जगणाऱ्यांची कथा करायची आहे. आपला मंत्र असायला हवा -India First.
आपला प्रत्येक निर्णय, प्रत्येक निर्णयाचा आधार असला पाहिजे
- India First
मित्रहो,
अमृत महोत्सवा साठी देशाने काही सामुहिक उद्दिष्टेही निश्चित केली आहेत. आपल्या स्वातंत्र्य सेनानीचे स्मरण करतानाच त्यांचा संलग्न इतिहास पुनर्जीवित करायचा आहे. आपल्या स्मरणात असेल ‘मन की बात’ मध्ये मी युवकांना, स्वातंत्र्य लढ्यावर संशोधन करून इतिहास लिहिण्याचे आवाहन केले होते. युवकांच्या प्रतिभेला वाव मिळावा, युवा विचार समोर यावेत, नव्या उर्जेने युवकांनी लिखाण करावे असा त्यामागचा विचार होता. अतिशय कमी वेळेत आधीच हजाराहून जास्त युवक या कामासाठी पुढे आले आहेत हे पाहून मला अतिशय आनंद झाला. मित्रहो, मनोरंजक बाब ही आहे की 19 व्या 20 व्या शतकाच्या लढ्याची चर्चा होते मात्र 21 व्या शतकात ज्यांचा जन्म झाला आहे, अशा माझ्या युवा मित्रांनी, 19 व्या 20 व्या शतकाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याची गाथा लोकांसमोर आणण्याची आघाडी सांभाळली आहे. या सर्व लोकांनी माय गव्ह वर याची संपूर्ण माहिती पाठवली आहे. हे लोक हिंदी, इंग्लिश, तमिळ, कन्नड, बांग्ला, तेलुगू, मराठी, मल्याळम, गुजराती, अशा देशाच्या वेगवेगळ्या भाषात स्वातंत्र्य लढ्यावर लिहिणार आहेत. कोणी स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित आपल्या आजूबाजूच्या स्थळांची माहिती गोळा करत आहे, तर कोणी आदिवासी स्वातंत्र्य सेनानीवर पुस्तक लिहित आहे. ही एक उत्तम सुरवात आहे. माझी आपल्याला विनंती आहे की अमृत महोत्सवामध्ये आपल्याला जसे योगदान देता येईल त्याप्रमाणे जरूर द्या. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या पर्वाचे आपण साक्षीदार होत आहोत हे आपले भाग्य आहे. म्हणूनच पुढच्या वेळी ‘मन की बात’मध्ये आपल्याशी संवाद साधताना अमृत-महोत्सवाच्या आणखी तयारीबाबतही चर्चा करूया. आपण सर्व आरोग्यसंपन्न राहा, कोरोनाशी संबंधित नियमांचं पालन करत वाटचाल करा, आपल्या नव-नव्या प्रयत्नातून देशाच्या विकासाला अशीच गती देत राहा. या शुभेच्छांसह खूप-खूप धन्यवाद
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार!
कोविड-19 च्या विरोधात लढण्यासाठी देशानं आपली संपूर्ण ताकद कशा प्रकारे लावली आहे, हे आपण पहात आहोत. गेल्या शंभर वर्षामधली ही सर्वात मोठी महामारी आहे आणि या महामारीच्या काळातच भारतानं अनेक नैसर्गिक संकटांचाही दृढतेनं सामना केलाय. या काळात अम्फान चक्रीवादळ आलं, निसर्ग नावाचं चक्रीवादळ येवून गेलं. अनेक राज्यांमध्ये महापूर आले, लहान-मोठे अनेक भूकंप आले, भूस्खलन झालं. अगदी अलिकडंच गेल्या दहा दिवासांच्या काळात देशानं पुन्हा एकदा दोन मोठ्या चक्रीवादळांचा सामना केला. पश्चिमी किनारपट्टीवर ‘तौ-ते’ आणि पूर्व किनारपट्टीवर ‘यास’ चक्रीवादळं येवून गेली. या दोन्ही चक्रीवादळांनी अनेक राज्यांवर परिणाम केला आहे. देश आणि देशाची जनता संपूर्ण ताकदीनिशी या संकटाशी झुंजला आणि कमीतकमी जीवितहानी सुनिश्चित केली. काही वर्षांपूर्वी अशा नैसर्गिक संकटांमध्ये होणा-या जीवितहानीच्या तुलनेत आता जास्तीत जास्त लोकांचे जीव वाचवले जावू शकतात, याचा अनुभव आपण सगळे घेत आहोत. संकटाच्या या कठिण आणि अवघड परिस्थितीमध्ये चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या सर्व राज्यांच्या लोकांनी ज्या प्रकारे मोठे धाडस दाखवले, या विपदेच्या काळात अतिशय धैर्यानं, आपत्तीला तोंड दिलं त्याबद्दल मी सर्व नागरिकांचं अगदी आदरपूर्वक आणि अगदी हृदयपूर्वक कौतुक करू इच्छितो. जे लोक पुढाकार घेऊन मदत आणि बचाव कार्यामध्ये सहभागी झाले, त्या सर्व लोकांचं जितकं कौतुक करावं, तितकं कमीच आहे. या सर्व लोकांना मी सलाम करतो. केंद्र आणि राज्य सरकारांनी आणि स्थानिक प्रशासनाचे सर्वजण, एकत्रित येऊन या संकटाचा सामना करण्यासाठी कार्यरत आहेत.या वादळी संकटामध्ये ज्यांना आपल्या जवळच्या लोकांना गमवावं लागलं, त्यांच्याविषयी मी आपल्या सहसंवेदना व्यक्त करतो. या संकटामध्ये ज्यांना नुकसान सोसावं लागतंय, त्या सर्वांच्याबरोबर आम्ही सर्वजण अगदी ठाम उभे आहोत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आव्हान कितीही मोठं असो, भारतानं केलेला विजयाचा संकल्पही नेहमी तितकाच मोठा असतो. देशाची सामूहिक शक्ती आणि आपल्याकडे असलेली सेवा भावना, यांच्यामुळे देश प्रत्येक वादळातून बाहेर पडला आहे. अलिकडेच्या दिवसातूच आपण पाहिलं की, आमचे डॉक्टर्स, नर्स आणि आघाडीच्या फळीवर कार्यरत असलेले योद्धे, यांची स्वतःची चिंता न करता, रात्रंदिवस काम केलं आणि आजही ही मंडळी काम करीत आहेत. या सर्वांमध्ये कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये लढा देताना खूप मोठी भूमिका बजावणारेही काही लोक आहेत. या योद्ध्यांविषयी ‘मन की बात’ मध्ये चर्चा करावी, असा आग्रह मला ‘नमोअॅप’वर आणि पत्राच्या माध्यमातून केला गेलाय.
मित्रांनो, ज्यावेळी दुसरी लाट आली, त्यावेळी अचानक ऑक्सिजनची मागणी अनेक पटींनी वाढली त्यामुळे खूप मोठे आव्हान निर्माण झाले. वैद्यकीय प्राणवायू देशाच्या अगदी लहान लहान गावांतल्या भागांपर्यंत पोहोचवणे हे एक मोठे आव्हान होते. ऑक्सिजन वाहून नेणा-या टँकरचा वेग थोडा वाढला, अगदी लहानशी चूक झाली, तर त्या टँकरचा स्फोट होण्याचा धोका असतो. औद्योगिक ऑक्सिजनचं उत्पादन करणारे अनेक प्रकल्प देशाच्या पूर्व भागात आहे. तिथून दुस-या राज्यांमध्ये ऑक्सिजन पोहोचवायलाही काही दिवसांचा अवधी लागतो. देशासमोर आलेल्या आव्हानामध्ये देशाला मदत केली ती, क्रायोजेनिक टँकर चालविणा-या चालकांनी, ऑक्सिजन एक्सप्रेसने, हवाई दलाच्या वैमानिकांनी. अशा अनेक लोकांनी युद्धपातळीवर काम करून हजारो-लाखों लोकांचे प्राण वाचवले. आजच्या ‘मन की बात’ मध्ये आपल्याबरोबर असेच एक सहकारी जोडले जात आहेत. उत्तर प्रदेशातल्या जौनपूरमध्ये वास्तव्य करणारे श्रीमान दिनेश उपाध्याय जी.
मोदी जी- दिनेश जी, नमस्कार!
दिनेश उपाध्याय जी- सर जी, प्रणाम!
मोदी जी- सर्वात आधी तुम्ही स्वतःविषयी काही माहिती जरूर द्यावी, असं मला वाटतं.
दिनेश उपाध्याय जी – सर, माझं नाव दिनेश बाबूलनाथ उपाध्याय आहे. मी जौनपूर जिल्ह्यातल्या जमुआ भागातल्या हसनपूर या गावात वास्तव्य करतो.
मोदी जी- उत्तर प्रदेशातले आहात का?
दिनेश – हो! होय! सर!
मोदी जी- बरं.
दिनेश – आणि सर मला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. घरी पत्नी आणि माता-पिता आहेत.
मोदी जी- आणि, तुम्ही काम काय करता?
दिनेश – सर, मी ऑक्सिजनचा टँकर चालवतो… लिक्विड ऑक्सिजनचा.
मोदी जी- मुलांचं शिक्षण व्यवस्थित सुरू आहे ना?
दिनेश- हो सर! मुलं शिकताहेत. दोन्ही मुलीही शिकतात आणि माझा मुलगाही अभ्यास करतो सर.
मोदी जी- आता त्यांचं ऑनलाइन शिक्षणही व्यवस्थित सुरू आहे ना?
दिनेश – हो सर, अगदी चांगल्या पद्धतीनं शिक्षण सुरू आहे. आत्ताही माझ्या मुली अभ्यास करताहेत.
त्या ऑनलाईलच शिक्षण घेत आहेत. सर, 15 ते 17 वर्ष झाली, मी ऑक्सिजनचा टँकर चालवतोय.
मोदी जी- बरं! तुम्ही या 15-17 वर्षात केवळ ऑक्सिजन वाहून नेत आहात. याचा अर्थ काही तुम्ही फक्त मालमोटार चालकच आहे असे नाही. एका प्रकारे तुम्ही लाखो जणांचे प्राण वाचविण्याचं काम करीत आहात.
दिनेश- सर, माझं तर हे ऑक्सिजन टँकर चालवण्याचं काम आहे. आमची आयनॉक्स कंपनीही आम्हा लोकांची खूप काळजी घेते. आणि आम्ही कुठल्याही एखाद्या ठिकाणी ज्यावेळी ऑक्सिजनचा टँकर रिकामा करून देतो, त्यावेळी आम्हाला खूप आनंद होतो.
मोदी जी – परंतु सध्या कोरोनाच्या काळात तुम्हा सर्वांची जबाबदारी खूप वाढली आहे ना?
दिनेश – हो सर, खूप वाढली आहे.
मोदी जी – ज्यावेळी तुम्ही टँकरचा चालक म्हणून त्या जागेवर बसता, त्यावेळी तुमच्या मनात नेमक्या काय भावना निर्माण होतात? आधीच्या तुलनेत काही वेगळा अनुभव येतो का? खूप तणाव येत असेल ना? मानसिक ताणही येत असेल? कुटुंबाची काळजी, कोरोनाचं वातावरण, लोकांकडून येत असलेलं दडपण, वाढती मागणी, काय काय होत असेल?
दिनेश – सर, आम्हाला काही चिंता नसते. एकमात्र मनात असतं की, आपलं जे कर्तव्य आहे, ते नीट केलं म्हणजे जर आपण वाहून नेत असलेल्या ऑक्सिजनमुळं जर कोणाला जीवन मिळणार आहे, तर ती आमच्यासाठी खूप गौरवाची गोष्ट असते.
मोदी जी – तुम्ही आपल्या भावना खूप चांगल्या पद्धतीनं व्यक्त करीत आहात. आता जर सांगा- आज ज्यावेळी या महामारीच्या काळात लोकांना तुमच्या कामाचं महत्व जाणत आहेत, कदाचित या कामाचं महत्व यापूर्वी इतकं कुणाला जाणवलं नसेल. आता मात्र समजत आहे. त्यामुळे तुमच्याकडे आणि तुम्ही करत असलेल्या कामाविषयी त्यांच्या दृष्टीनं परिवर्तन आलं आहे?
दिनेश- हो सर जी! आधी आम्ही ऑक्सिजनचे चालक, कुठंही वाहतुकीच्या कोंडीमध्ये अडकून पडायचो. आता मात्र प्रशासनही आम्हा लोकांना खूप मदत करत आहेत. आणि आपण किती लवकर पोहोचतोय आणि किती लोकांचे प्राण वाचवू शकतो, हे पाहण्याची आता आमच्या मनातही एकप्रकारची जिज्ञासा असते. अशा वेळी मग, वाटेत काही खायला मिळेल- किंवा नाही मिळेल, कोणतीही अडचण येवो, तरीही आम्ही रूग्णालयात शक्य तितक्या लवकर पोहोचतोच. ज्यावेळी टँकर घेऊन जातो, त्यावेळी रूग्णालयातले लोक, तिथं उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णांचे नातलग, कुटुंबिय लोक सगळेजण आम्हाला हातांनी ‘व्ही’ असा इशारा करतात.
मोदी जी- अच्छा, हे लोक व्हिक्टरीचा ‘व्ही’ म्हणून असा इशारा करतात का?
दिनेश – हो सर, हातांनी ‘व्ही’ दाखवतात, काहीजण अंगठा दाखवतात. अशावेळी आम्हाला खूप बरं वाटतं. आयुष्यात मी काहीतरी चांगलं काम नक्कीच केलंय, त्यामुळंच आत्ताच्या संकटात मला अशा प्रकारे सेवा करण्याची संधी मिळतेय.
मोदी जी – टँकर चालवून आलेला थकवा दूर होत असेल?
दिनेश – हो सर ! हो सर!
मोदी जी – मग घरी आल्यानंतर मुलांबरोबर, याविषयी तुम्हा सर्वांच्या गप्पा होतात का?
दिनेश – नाही सर! माझी मुलं तर गावी राहतात. मी इथं आयनॉक्स एअर प्रॉडक्टमध्ये टँकर चालक म्हणून काम करतोय. आठ-नऊ महिन्यांनी घरी जात असतो.
मोदी जी – मग कधी फोनवर, मुलांबरोबर बोलत असणार ना?
दिनेश- हो सर! नेहमी बोलत असतो.
मोदी जी – मग त्यांच्या मनात येत असणार, बाबांनी, या काळात जरा संभाळून राहिलं पाहिजे.
दिनेश – हो सर, मुलं, घरची मंडळी सांगतात, बाबा, काम करा परंतु स्वतःला सांभाळून करा. आणि आम्हीही सुरक्षा लक्षात घेवूनच काम करतोय. आमचा मानगाव इथं प्रकल्पही आहे. आयनॉक्स आम्हा लोकांची खूप मदत करते.
मोदी जी- चला तर, दिनेश जी, तुमच्याशी बोलून मला खूप चांगलं वाटलं. तुमचं बोलणं ऐकून देशाच्या लक्षात येईल की, या कोरोनाच्या लढ्यात कोण-कोणते लोक कशा प्रकारे कार्यरत आहेत. केवळ लोकांचे जीव वाचले पाहिजेत, यासाठी तुम्ही नऊ नऊ महिने आपल्या मुलांना भेटलेले नाहीत. परिवाराची गाठ-भेट घेतलेली नाही. ज्यावेळी ही गोष्ट देश ऐकेल, त्यावेळी देशाला तुमचा अभिमान वाटेल. कोरोनाच्या विरोधातली लढाई आपण जिंकणारच आहोत, कारण दिनेश उपाध्याय यांच्यासारखे लाखों लाखो लोक जीवाची पर्वा न करता काम करीत आहेत.
दिनेश – सर जी, आपण सर्वजण कोरोनाला एके दिवशी नक्कीच हरवणार आहोत सर!
मोदी जी – दिनेश जी, तुमची भावना हीच तर देशाची ताकद आहे. खूप-खूप धन्यवाद दिनेश जी! आणि तुमच्या मुलांना माझे आशीर्वाद सांगावेत.
दिनेश – ठीक आहे सर, नमस्कार!
मोदीजी – धन्यवाद!
दिनेश – प्रणाम प्रणाम!
मोदी जी- धन्यवाद!
मित्रांनो, दिनेश जी सांगत होते, त्याप्रमाणं ज्यावेळी एक टँकर चालक ऑक्सिजन घेऊन रूग्णालयामध्ये पोहोचतो, त्यावेळी तो ईश्वरानं पाठवलेला दूतच वाटतो. हे काम किती जोखमीचं आहे, आणि ते करताना किती मानसिक दडपण येत असणार हे आपण नक्कीच समजू शकतो.
मित्रांनो, आव्हानाच्या या काळामध्ये, ऑक्सिजनची वाहतूक अधिक सुलभ करण्यासाठी भारतीय रेल्वेनं पुढाकार घेतला. ऑक्सिजन एक्सप्रेस, ऑक्सिजन रेल्वेमुळे रस्ते मार्गावरून जाणा-या ऑक्सिजन टँकरपेक्षा कितीतरी जास्त मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देशाच्या कानाकोप-यापर्यंत पोहोचवला आहे. एक ऑक्सिजन एक्सप्रेस संपूर्णपणे महिला चालवित आहेत, हे जाणून माता-भगिनींना अभिमान वाटेल. देशाच्या प्रत्येक महिलेला या गोष्टीचा अभिमान वाटेल. इतकंच नाही, तर प्रत्येक हिंदुस्तानीला महिलेच्या या कार्याचा अभिमान वाटेल.
ऑक्सिजन एक्सप्रेस चालविणा-या लोको- पायलट शिरीषा गजनी जी यांना ‘मन की बात’मध्ये मी आमंत्रित केलं आहे.
मोदी जी – शिरीषा जी नमस्ते !
शिरीषा – नमस्ते सर! कसे आहात सर?
मोदी जी – मी ठीक आहे. शिरीषा जी, मी ऐकलं की, तुम्ही रेल्वे पायलट म्हणून काम करीत आहात. आणि तुम्ही सर्वजणी म्हणजे जणू महिला मंडळ मिळूनच ऑक्सिजन एक्सप्रेस चालवत आहात, असं मला सांगण्यात आलंय. शिरीषा जी, तुम्ही खूप शानदार काम करीत आहात. कोरोना काळामध्ये तुमच्याप्रमाणे अनेक महिलांनी पुढाकार घेऊन कोरोनाशी दोन हात करताना देशाला ताकद दिली आहे. तुम्ही म्हणजे स्त्री-शक्तीचं एक प्रमुख उदाहरण आहे. हे कार्य करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा कुठून मिळते? याची जाणून घेण्याची देशाची आणि माझीही इच्छा आहे.
शिरीषा – सर, मला या कामासाठी माझ्या आई-वडिलांकडून प्रेरणा मिळते… सर, माझे वडील सरकारी कर्मचारी आहेत. खरंतर, मला आणखी दोन मोठ्या बहिणी आहेत. आम्ही घरामध्ये तिघी आहोत. तरीही माझे वडील कामासाठी प्रोत्साहन देत असतात. माझी मोठी बहीण सरकारी बँकेत नोकरी करते आणि मी रेल्वेमध्ये आहे. माझे पालकच मला कामासाठी प्रोत्साहन देतात.
मोदी जी- अरे वा, शिरीषा जी, तुम्ही सर्वसामान्य काळातही रेल्वेमध्ये नोकरी केली आहे. गाडी नेहमीप्रमाणे चालवली आहे. परंतु ज्यावेळी एकीकडे ऑक्सिजनची मागणी इतकी प्रचंड आहे. अशावेळी तुम्ही ऑक्सिजन घेऊन जाणारी गाडी चालवणं, म्हणजे थोडं जास्त जबाबदारीच काम असणार? सामान्य काळात माल, सामान वाहून नेणं वेगळी गोष्ट आहे. आणि ऑक्सिजनची वाहतूक करणं तसं खूपच नाजूक काम आहे, अशावेळी काय अनुभव आला होता?
शिरीषा – हे काम केल्यामुळं माझ्या मनाला फार आनंद वाटला. ऑक्सिजन स्पेशल गाडी चालवताना, सगळं काही पहावं लागतं. सुरक्षेचा विषय असो की फाॅर्मेशन असो अगदी कुठं गळती तर नाही ना, याचीही सारखी काळजी घ्यावी लागते. दुसरं म्हणजे भारतीय रेल्वेकडूनही खूप चांगली मदत, पाठिंबा मिळतो सर! ही ऑक्सिजन गाडी चालवण्यासाठी मला हरित मार्गिका दिली होती. या गाडीने आम्ही 125 किलोमीटरचं अंतर दीड तासात कापलं. इतक्या वेगानं ही गाडी धावली पाहिजे, यासाठी रेल्वेनंही खूप मोठी जबाबदारी घेतली होती. सर, म्हणून मीही ही जबाबदारी पेलायला तयार झाले.
मोदी जी – व्वा! व्वा! शिरीषाजी तुमचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि तुमच्या माता-पित्यांना विशेष रूपानं प्रणाम करतो. ज्यांनी आपल्या तिनही मुलींना इतकं छान प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी खूप पुढं जावं म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं धैर्य दिलं आहे, याबद्दल त्यांचं कौतुक आहे. मला वाटतं की, अशा माता-पित्यांनाही नमस्कार केला पाहिजे. तुम्हा सर्व भगिनींनाही नमस्कार. शिरीषा जी, तुम्ही वेगळे धाडस दाखवून, एक प्रकारे देशाची सेवा करीत आहात, खूप- खूप धन्यवाद शिरीषा जी!
शिरीषा – धन्यवाद सर! सर आभार! सर तुमचे मला आशीर्वाद हवेत.
मोदी जी – बस, परमात्म्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळत रहावा. तुमच्या माता-पित्यांचा आशीर्वाद मिळत रहावा. धन्यवाद !!
शिरीषा – धन्यवाद सर!
मित्रांनो, आपण आत्ताच शिरीषा जी यांचं बोलणं ऐकलं. त्यांचे अनुभव प्रेरणा देतात तसंच भावूकही करताहेत. वास्तवामध्ये ही लढाई इतकी मोठी आहे की, यामध्ये रेल्वेप्रमाणेच आपला देश, जल, थल, नभ अशा तीनही मार्गांनी कार्यरत आहे. एकीकडे रिकामे केलेले टँकर्स हवाई दलाच्या विमानांनी ऑक्सिजन प्रकल्पांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे. तर दुसरीकडं नवीन ऑक्सिजन प्रकल्प उभे करण्याचं कामही पूर्ण केलं जात आहे. त्याचबरोबर परदेशातून ऑक्सिजन, ऑक्सिजन काँन्सन्ट्रेटर्स आणि क्रायोजेनिक टँकर्सही देशात आणले जात आहेत. या कामामध्ये नाविकदल गुंतलं आहे. हवाईदलही हे कार्य करीत आहे. लष्करानंही काही जबाबदारी स्वीकारून काम करीत आहे. ‘डीआरडीओ’ सारख्या आपल्या संस्था कार्यरत आहेत. आपले कितीतरी संशोधक, औद्योगिक क्षेत्रातले तज्ज्ञ, आणि तंत्रज्ञही युद्धपातळीवर काम करीत आहेत. ही मंडळी करीत असलेल्या कामाची माहिती घेण्याची, त्यांच्या कामाचं स्वरूप जाणून घेण्याची जिज्ञासा सर्व देशवासियांच्या मनात आहे. म्हणूनच आज आपल्याबरोबर हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन पटनायक जी बोलणार आहेत.
मोदी जी- पटनायक जी, जय हिंद !
ग्रुप कॅप्टन – सर जय हिंद! सर मी, ग्रुप कॅप्टन पटनायक हवाई दलाच्या हिंडन तळावरून बोलतोय.
मोदी जी- पटनायक जी, कोरोनाविरोधातल्या लढाईमध्ये तुम्ही मंडळी खूप मोठी, महत्वाची जबाबदारी सांभाळत आहात. जगभरामध्ये जाऊन टँकर आणणं, टँकर इथं पोहोचवण्याचं काम करीत आहात. एक फौजी-लष्करी या नात्यानं वेगळ्याच प्रकारचं काम तुम्ही केलं आहे. लढताना हौतात्म्य पत्करणं किंवा समोरच्या शत्रूला मारायचं, यासाठी तुमची धावपळ असते. आज मात्र तुम्ही जीवन वाचवण्यासाठी धावपळ करीत आहात. हा अनुभव तुमच्यासाठी कसा आहे, हे आम्ही जाणून घेऊ इच्छितो.
ग्रुप कॅप्टन – सर, या संकटाच्या काळात आपल्या देशवासियांना आम्ही मदत करू शकतो, ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि हे जे काही मिशन आम्हाला मिळालं आहे, ते आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडत आहोत. आम्हाला दिलं गेलेलं प्रशिक्षण आणि मिळत असलेल्या पुरक सेवा यांच्या मदतीनं काम सुरू आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सर, या मिशनमुळं काम केल्याचं समाधान मिळतंय, ही खूप मोठी अगदी उच्च स्तरावरची बाब आहे. आणि म्हणूनच आम्ही या मिशनचं काम निरंतर करू शकतोय.
मोदी जी- कॅप्टन, तुम्ही या दिवसांमध्ये जे जे काही प्रयत्न केले आहेत आणि तेही कमीत कमी वेळेत सर्वकाही कामे करावी लागली आहेत. त्याविषयी या दिवसातला तुमचा काय अनुभव आहे?
ग्रुप कॅप्टन – सर, गेल्या एक महिन्यापासून आम्ही सातत्यानं ऑक्सिजन टँकर्स आणि द्रवरूप ऑक्सिजन कंटेनर्स, देशातून आणि देशाबाहेरून अशा दोन्ही ठिकाणांहून उचलून आणत आहोत. जवळपास सोळाशे साॅर्टिज्पेक्षाही जास्त हवाई दलाने वाहतूक केली आहे. आणि तीन हजार तासांपेक्षाही जास्त काळ उड्डाण केलं आहे. जवळपास 160 आंतरराष्ट्रीय मिशन पूर्ण केली आहेत. आधी आणि इतर देशांतर्गत कामासाठी टँकर्स आणत होतो, त्यावेळी दोन ते तीन दिवस लागत होते. मात्र सध्या ज्या कारणानं आम्ही प्रत्येक ठिकाणांवरून ऑक्सिजन टँकर्स आणतो, त्यासाठी आम्ही अवघ्या दोन ते तीन तासांमध्येच एका स्थानांवरून दुसरीकडे टँकर्स पोहोचवत आहोत. आणि आंतरराष्ट्रीय मिशन असेल तर अवघ्या 24 तासांमध्ये अगदी न थांबता, निरंतर कार्य सुरू ठेवून चोविस तासात हे काम फत्ते करतो. या मिशनसाठी संपूर्ण हवाई दल कार्यरत आहे. जितक्या लवकर आणि जितके जास्त टँकर्स आणता येतील तितके ते आणले जातात. देशाची शक्य तितकी जास्त मदत करायची, हाच विचार आमचा असतो, सर!
मोदी जी- कॅप्टन, आंतरराष्ट्रीय स्थानांवर तुम्हाला कुठं कुठं उड्डाणं करावी लागली?
ग्रुप कॅप्टन – सर, अगदी अल्पकालीन सूचनेनुसार आम्ही सिंगापूर, दुबई, बेल्जियम, जर्मनी आणि यू.के. या सर्व स्थानी वेगवेगळ्या तळांवर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी उड्डाण केलं, सर! आयएल 76, सी-17 आणि इतर सर्व विमानं गेली होती. सी-130 नं तर अतिशय कमी वेळेत मिळालेल्या सूचनेनुसार मिशनचं नियोजन केलं. आम्हाला मिळालेलं प्रशिक्षण आणि आमच्यामध्ये असलेला ‘जोश’ यामुळंच आम्ही अगदी वेळेत मिशन पूर्ण करू शकलो. सर!!
मोदी जी – लक्षात घ्या, देशाला तुमचा अभिमान आहे, जल असो, भूमी असो किंवा मग आकाश आमचे सर्व जवान ही कोरोना विरुद्धची लढाई लढत आहेत आणि कॅप्टन तुम्ही देखील तुमची जबाबदारी पार पाडली आहे त्यामुळे तुमचे देखील अभिनंदन.
Grp. Cpt.– सर, खूप खूप आभारी आहोत सर. आम्ही आमचे सर्वोत्तम द्यायचे प्रयत्न करत आहोत आणि या प्रयत्नांमध्ये माझ्या सोबत माझी मुलगी अदिती देखील आहे.
मोदी जी- अरे वाह!
अदिती – नमस्कार मोदी जी
मोदी जी – नमस्कार , अदिती तू किती वर्षांची आहेस?
अदिती – मी 12 वर्षाची आहे आणि मी इयत्ता 8 वी मध्ये आहे.
मोदी जी – तुमचे वडील नेहमी बाहेर जातात, युनिफॉर्म मध्ये (गणवेशात) असतात.
अदिती – हा! मला त्यांचा खूप अभिमान वाटतो, ते इतके महत्वपूर्ण काम करत आहेत. कोरोना पिडीत लोकांची मदत करत आहेत, आणि बाहेरील देशांमधून ऑक्सिजन टँकर आणि कंटेनर घेऊन येत आहेत.
मोदी जी – परंतु तू तुझ्या बाबांना खूप मिस करत असशील ना?
अदिती – हो, मी त्यांना खूप मिस करते. आजकाल ते खूप कमी वेळ घरी असतात. कोरोना बाधित लोकांना वेळेवर ऑक्सिजन मिळून त्यांचा जीव वाचवा यासाठी ते अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांद्वारे कंटेनर आणि टँकर त्यांच्या प्रोडक्शन प्लांट पर्यंत पोहोचवत आहेत.
मोदी जी – तुझे बाबा, लोकांना वेळेवर ऑक्सिजन पोहोचवून त्यांचे प्राण वाचविण्याचे काम करतात , ही गोष्ट आता सगळ्यांना माहित झाली असेल.
अदिती – हा
मोदी जी – तुझे वडील ऑक्सिजन सेवेत कार्यरत आहेत ही बाब जेव्हा तुझे मित्र-मंडळी, तुझ्या सोबत शिकणारे विद्यार्थी यांना कळली असेल तेव्हा त्या सगळ्यांना तुझ्या बद्दल देखील आदर वाटला असेल ना?
अदिती – हो, माझे मित्र-मैत्रिणी मला सांगतात की तुझे बाबा इतके महत्वाचे काम करतायत, त्याचा तुला देखील अभिमान वाटत असेल ना, हे ऐकल्यावर तर मला खूपच अभिमान वाटतो. आणि माझे सगळे कुटुंब आहे माझे दोन्ही आजी आजोबा सगळ्यांना माझ्या वडिलांचा खूप अभिमान वाटतो, माझी आई आणि बाकी सर्व देखील डॉक्टर आहेत, ते देखील दिवस-रात्र काम करत आहेत आणि सर्व सशस्त्र सेना, माझ्या वडिलांच्या स्क्वाड्रॉनचे सर्व काका आणि सर्व सैन्य अहोरात्र काम करीत आहे आणि मला खात्री आहे की सर्व प्रयत्नांनी आपण कोरोना विरुद्धची ही लढाई नक्कीच जिंकू.
मोदी जी – आपल्याकडे पूर्वापार असे बोलले जाते की, आपल्या मुलींच्या मुखात साक्षात सरस्वती विराजमान असते आणि आता अदिती बोलली आहे की आपण ही लढाई जिंकू म्हणजे ही एकप्रकारे देव वाणीच झाली आहे. अच्छा, अदिती, आता तर तू ऑनलाईन शिकत असशील.
अदिती – होय, आत्ता आमचे सर्व ऑनलाईन वर्ग चालू आहेत आणि आत्ता आम्ही घरी देखील संपूर्ण खबरदारी घेत आहोत आणि जर बाहेर जायचे असेल तर डबल मास्क घालतो आणि सर्व खबरदारी घेतो आणि वैयक्तिक स्वच्छतेची आणि इतर गोष्टींची देखील खबरदारी घेतो.
मोदी जी – अच्छ, तुला कोणते छंद आहेत? तुला काय आवडते?
अदिती – मला पोहायला आणि बास्केटबॉल खेळायला आवडते, परंतु आता हे सगळे बंद आहे आणि या लॉकडाउन आणि कोरोना कालावधी दरम्यान मला बेकिंग आणि स्वयंपाक करण्याची खूप आवड लागली आहे. आणि माझे बाबा जेव्हा कामावरून घरी येतात तेव्हा मी त्यांना त्यांच्यासाठी कुकीज आणि केक्स बनवते.
मोदी जी – वाह वाह वाह! चला, बर्याच दिवसानंतर तुला तुझ्या वडिलांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे. खूप छान वाटले आणि कॅप्टन मी तुमचे खूप खूप अभिनंदन करतो, परंतु जेव्हा मी कॅप्टनचे अभिनंदन करतो, तेव्हा ते केवळ त्या एकट्याचे नसते तर आपल्या सर्व सैन्याने, जल, भू, आकाश सगळीकडे कार्यरत असणाऱ्या सगळ्यांना माझा सलाम. धन्यवाद.
Grp. Cpt. – धन्यवाद सर.
मित्रांनो, आमच्या या जवानांनी, या योद्धांनी केलेल्या कार्यासाठी देश त्यांना अभिवादन करतो. तसेच लाखो लोक रात्रंदिवस कार्यरत आहेत. ते करीत असलेले काम हे त्यांच्या दैनंदिन कामाचा भाग नाही. शंभर वर्षांनंतर जगावर अशी आपत्ती आली आहे, शतकानंतर इतके मोठे संकट! म्हणून, या प्रकारच्या कामाचा कोणालाही अनुभव नव्हता. यामागे केवळ देशसेवा आणि संकल्पशक्ती आहे आणि याच्याच जोरावर देशाने ते करून दाखविले जे यापूर्वी कधीच केले नव्हते. आपण अंदाज लावू शकता की सामान्य दिवसात आपल्याकडे एका दिवसात 900 मेट्रिक टन द्रवरुपी वैद्यकीय ऑक्सिजनची निर्मिती व्हायची. आता हे दहा पटीहून अधिक वाढून सुमारे 9500 मेट्रिक टन प्रतिदिन उत्पादन होते. आमचे योद्धे हा ऑक्सिजन देशाच्या काना कोप-यात पोहोचवत आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ऑक्सिजन पोहोचविण्यासाठी देशात इतके प्रयत्न केले गेले, इतके नागरिक या कामात जोडले गेले, एक नागरिक म्हणून ही सर्व कामे खूपच प्रेरणादायी आहेत. प्रत्येकाने एक संघ म्हणून आपले कर्तव्य बजावले आहे. मला बंगळुरू येथील उर्मिला जी यांनी सांगितले आहे की त्यांचे पती प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ आहे आणि इतकी आव्हाने असताना देखील ते टेस्टिंगचे काम अविरत करत आहेत.
मित्रांनो, कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात देशात फक्त एक चाचणी प्रयोगशाळा होती, परंतु आज अडीच हजाराहून अधिक प्रयोगशाळा कार्यरत आहेत. सुरुवातीला एका दिवसात शंभर-एक चाचण्या घेण्यात आल्या, आता एका दिवसात २० लाखाहून अधिक चाचण्या घेतल्या जात आहेत. आतापर्यंत देशात 33 कोटींपेक्षा जास्त नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. या सगळ्या सहकाऱ्यांमुळेच हे इतके मोठे कार्य शक्य झाले. नमुने संकलनाच्या कामात अनेक आघाडीचे कामगार कार्यरत आहेत. संक्रमित रूग्णांमध्ये जायचे, त्यांचे नमुने घ्याचे ही खरच एक सेवा आहे. स्वत:चे रक्षण करण्यासाठी, या सहकाऱ्यांना एवढ्या उष्णतेमध्ये देखील सतत पीपीई किट घालावे लागते. त्यानंतर ते नमुने प्रयोगशाळेपर्यंत पोहोचतात. म्हणूनच जेव्हा मी तुमच्या सूचना आणि प्रश्न वाचत होतो, तेव्हा मी ठरविले की आमच्या या मित्रांसोबत देखील चर्चा केली पाहिजे. त्यांच्या अनुभवांमधून आपल्याला बरेच शिकायला मिळेल. चला तर दिल्लीत लॅब टेक्नीशियन म्हणून कार्यरत असणारे आपले सहकारी प्रकाश कांडपाल जी यांच्याशी बोलूया.
मोदी जी – प्रकाश जी नमस्कार.
प्रकाश जी- नमस्कार माननीय पंतप्रधान जी.
मोदी जी – प्रकाश जी, सर्वप्रथम 'मन की बात' च्या आपल्या सर्व श्रोत्यांना तुमच्याबद्दल सांगा. आपण कधीपासून हे काम करत आहात आणि कोरोनाच्या काळातील तुमचा अनुभव काय आहे , कारण देशातील लोकांना या सगळ्या गोष्टी टीव्हीवर किंवा वृत्तपत्रात दिसत नाही. तुम्ही एका ऋषीप्रमाणे प्रयोगशाळेत काम करत आहात. तुम्ही जेव्हा तुमचे अनुभव सांगाल तेव्हा देशवासियांना देखील माहिती होईल की देशात कशाप्रकारे काम सुरु आहे.
प्रकाश जी – मी, दिल्ली सरकारची स्वायत्त संस्था असणाऱ्या Institute of Liver and Biliary Sciences नावाच्या रूग्णालयात मागील 10 वर्षांपासून प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. माझ्याकडे आरोग्य क्षेत्राचा 22 वर्षांचा अनुभव आहे. आयएलबीएस पूर्वीही मी अपोलो हॉस्पिटल, राजीव गांधी कॅन्सर हॉस्पिटल, दिल्लीमधील रोटरी ब्लड बँक यासारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये काम केले आहे. या सगळ्या संस्थांमध्ये मी ब्लड बँक विभागात सेवा बजावली आहे, परंतु गेल्या वर्षी 1 एप्रिल 2020 पासून मी आयएलबीएसच्या विषाणूविज्ञान विभागांतर्गत कोविड टेस्टिंग लॅबमध्ये कार्यरत आहे. निःसंशयपणे, कोविड साथीच्या काळात, आरोग्य आणि आरोग्याशी संबंधित सर्व संसाधनांवर अतिरिक्त ताण आला आहे. परंतु वैयक्तिकरित्या या संघर्षाच्या कालावधीला मी एक संधी मानतो. जेव्हा राष्ट्र, मानवता, समाज आपल्याकडून अधिक जबाबदारी, सहकार्य आणि अधिक सामर्थ्य आणि आपल्याकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा करतात. आणि सर, जेव्हा आपण देशाच्या, माणुसकीच्या, समाजाच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी जेव्हा अगदी छोट्याश्या दवबिंदू इतके देखील काम करतो तेव्हा मी गोष्ट खूपच अभिमानस्पद असते. कधीकधी जेव्हा आमच्या कुटुंबातील सदस्य देखील थोडे साशंक असतात किंवा त्यांना देखील थोडी भीती वाटते अशावेळी मी त्यांना कठीण परिस्थितीमध्ये देशाचे संरक्षण करण्यासाठी सदैव आपल्या कुटुंबापासून दूर असणाऱ्या आपल्या देशातील सैनिकांची आठवण करून देतो. त्यांच्या तुलनेत तर आम्ही घेत असलेली जोखीम ही फारच कमी आहे. त्यांना देखील गोष्ट पटते आणि ते देखील मला सहकार्य करतात आणि या आपत्तीत त्यांच्याकडून जे काही सहकार्य शक्य आहे ते करतात.
मोदी जी – प्रकाश जी, या कोरोनाच्या काळात एकीकडे सरकार लोकांना शारीरिक अंतर ठेवण्यास सांगत आहे, एकमेकांपासून दूर रहाण्यास सांगत आहे. आणि आपल्याला मात्र कोरोना विषाणू मध्येच राहावे लागते. खरतर हे सगळे म्हणजे स्वतःचा जीव संकटात टाकण्यासारखे आहे अशावेळी कुटुंबाला तुमची काळजी वाटणे स्वाभाविक आहे. परंतु तरीही, ही प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांची नोकरी ही सामान्य नोकरी आहे. आणि अशा साथीच्या परिस्थितीत अजून एक महत्वाची नोकरी आहे आणि आपण ती करत आहात. कामाचे तास देखील बरेच वाढले असतील? रात्रभर प्रयोगशाळेत थांबावे लागत असेल? कारण इतक्या कोट्यावधी लोकांची चाचणी घेतली जात आहे, तर मग ताणही वाढला असेल. परंतु तुम्ही तुमच्या सुरक्षेची खबरदारी घेता की नाही?
प्रकाश जी – हो सर नक्कीच घेतो. आमची आयएलबीएस प्रयोगशाळा डब्ल्यूएचओ द्वारे मान्यता प्राप्त आहे. सर्व प्रोटोकॉल आंतरराष्ट्रीय मानकांचे आहेत, आम्ही प्रयोगशाळेत जाताना त्रि-स्तरीय पोशाख घालून जातो आणि तो घालूनच काम करतो. आणि त्याचे विघटन करणे, लेबलिंग करणे आणि चाचणी या सर्व गोष्टी संपूर्ण प्रोटोकॉल नुसार केल्या जातात. सर,माझे कुटुंब आणि माझे बहुतेक परिचित ज्यांना अजून संसर्ग झाला नाही ही देवाची कृपा आहे. एक गोष्ट आहे की, आपण सावधगिरी बाळगली आणि संयम ठेवल्यास, आपण हे संकट थोडेसे टाळू शकता.
मोदी जी – प्रकाश जी, आपल्यासारखे हजारो लोक गेल्या एक वर्षापासून प्रयोगशाळेत कार्यरत आहेत आणि बरेच त्रास सहन करीत आहात. इतक्या लोकांना वाचवण्याचे काम करत आहात. देशाला आज हे माहिती होत आहे. प्रकाश जी, मी तुमच्या मार्फत तुमच्या सर्व सहकार्यांचे मनापासून आभार मानतो. देशवासियांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. आणि आपण निरोगी रहा. तुमचे कुटुंब निरोगी राहुदे . मी तुम्हाला शुभेच्छा देतो.
प्रकाश जी – धन्यवाद, पंतप्रधानजी. तुम्ही मला ही संधी दिली याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
मोदी जी – धन्यवाद.
मित्रांनो, मी एकप्रकारे संवाद तर प्रकाशजींशी साधला, पण त्यांच्या बोलण्यातून हजारो प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या सेवेचा सुगंध आपल्यापर्यंत पोहोचत आहे. या गोष्टींमधून हजारो-लाखो लोकांचा सेवाभाव तर दिसून येतोच, आपल्या सर्वांना आपली जबाबदारी देखील कळते. प्रकाश जी यांच्यासारखे आपले अनेक साथीदार ज्या परिश्रम आणि समर्पण वृत्तीने काम करत आहेत त्याच निष्ठेने त्यांना सहकार्य केल्यास कोरोनाला पराभूत करण्यात मोठ्या प्रमाणात मदत होईल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आता पण आपल्या कोरोना योध्यांबद्द्ल बोलत होतो. गेल्या दीड वर्षात आपण त्याचे समर्पण आणि परिश्रम पाहिले आहेत. पण या लढाईत देशातील इतर अनेक क्षेत्रातील अनेक योद्ध्यांचीही मोठी भूमिका आहे. तुम्ही विचार करा, आपल्या देशावर इतके मोठे संकट आले, त्याचा परिणाम देशातील प्रत्येक यंत्रणेवर झाला. कृषी-क्षेत्राने या हल्ल्यापासून बर्याच प्रमाणात स्वत: चे संरक्षण केले. केवळ सुरक्षितच ठेवले नाही, तर प्रगती देखील केली, आणि विकास देखील केला! आपणास माहिती आहे का की या साथीच्या रोगातही आपल्या शेतकर्यांनी विक्रमी उत्पादन केले आहे. शेतकर्यांनी विक्रमी उत्पादन केल्याने देशाने देखील अन्नधान्याची विक्रमी खरेदी केली आहे. यावेळी बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना मोहरीसाठी एमएसपीपेक्षा जास्त भाव मिळाला आहे. अन्नधान्याच्या विक्रमी उत्पादनामुळे आपला देश प्रत्येक देशवासियाला देशाला आधार देण्यास सक्षम आहे. देशातील एकही गरीब कुटुंबात कोणीही कधीही उपाशी झोपू नये म्हणून आज या संकटकाळात 80 कोटी गरीब लोकांना मोफत शिधावाटप केले जात आहे.
मित्रांनो, आज आपल्या देशातील शेतकरी अनेक क्षेत्रातील नवीन व्यवस्थेचा फायदा घेत आहेत. अगरतलातील शेतकऱ्यांचेच उदाहरण घ्या! हे शेतकरी उत्तम दर्जाच्या फणसाचे उत्पन्न घेतात. त्याला देशात आणि परदेशात देखील चांगली मागणी येऊ शकते, म्हणूनच यावेळी आगरतळा येथील शेतकर्यांचे फणस रेल्वेने गुवाहाटी येथे आणले. हे फणस आता गुवाहाटीहून लंडनला पाठविण्यात येत आहेत. तसेच तुम्ही बिहारच्या 'शाही लीची' चे नाव देखील ऐकले असेलच. याची ओळख अधिक मजबूत होण्यासाठी आणि शेतकर्यांना अधिक फायदा होण्यासाठी 2018 मध्ये, सरकारने शाही लीचीला जीआय टॅग देखील दिला होता. यावेळी बिहारची ही 'शाही लीची' देखील हवाईमार्गे लंडनला रवाना झाली आहे. आपला देश पूर्व ते पश्चिम, उत्तर ते दक्षिण अशा प्रकारच्या अद्वितीय स्वाद आणि उत्पादनांनी परिपूर्ण आहे. दक्षिण भारतात तुम्ही विजयनगरच्या आंब्याबद्दल ऐकले असेलच? आता हा आंबा कोणाला खायचा नसेल! त्यामुळे आता किसान रेल्वेतून शेकडो टन विजयनगरम आंबे दिल्लीला पोहोचत आहेत. दिल्ली आणि उत्तर भारतातील लोकांना विजयनगरमचा आंबा खायला मिळेल आणि विजयनगरमच्या शेतकर्यांना चांगले उत्पन्न मिळेल.किसान रेल्वेने आतापर्यंत सुमारे 2 लाख टन शेतमालाची वाहतूक केली आहे. आता शेतकरी देशाच्या इतर दुर्गम भागात फळ, भाज्या, धान्य फारच कमी किंमतीत पाठवू शकतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज आपण 30 मे रोजी 'मन की बात' करत आहोत आणि योगायोगाने आजच सरकारला 7 वर्षे पूर्ण होत आहेत. या वर्षांमध्ये देशाने 'सबका साथ, सबका-विकास, सबका-विश्वास' या मंत्राचा अवलंब केला आहे. देशसेवेसाठी प्रत्येकाने प्रत्येक क्षण समर्पण भावनेने काम केले आहे. बर्याच सहका-यांनी मला पत्रे पाठवून सांगितले आहे की 'मन की बात' मध्ये मी आपल्या या 7 वर्षाच्या एकत्र प्रवासाबाबत देखील चर्चा केली पाहिजे. मित्रांनो, या 7 वर्षात जे काही साध्य झाले आहे ते देशाचे आहे, देशवासियांचे आहे. आम्ही या वर्षांमध्ये राष्ट्रीय अभिमानाचे अनेक क्षण अनुभवले आहेत. आता भारतावर इतर देशांचा वैचारिक दबाव नाही, भारत आता स्वतःच्या संकल्पाने मार्गक्रमण करत आहे हे जेव्हा आपण बघतो तेव्हा खूप अभिमान वाटतो. भारत आता आपल्याविरूद्ध कट रचणाऱ्याना सडेतोड उत्तर देत आहे हे बघताना आपला आत्मविश्वास वाढतो. जेव्हा भारत राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांशी तडजोड करीत नाही, जेव्हा आपल्या सैन्यांची ताकद वाढते, तेव्हा आम्हाला वाटते की होय, आम्ही योग्य मार्गावर आहोत.
मित्रांनो, मला देशातील कानाकोपऱ्यातून अनेक देशवासींचे संदेश, त्यांची पत्रे येतात. बरेच लोक देशाचे आभार मानतात की 70 वर्षांनंतर त्यांच्या गावात पहिल्यांदाच वीज पोहोचली आहे, त्यांची मुले प्रकाशात पंख्याखाली बसून अभ्यास करत आहेत. कित्येक लोकं सांगतात की, त्यांचे गावही आता चांगल्या रस्त्याने शहराशी जोडले गेले आहे. मला आठवते की आदिवासी भागातील काही लोकांनी मला हा पत्र पाठवून सांगितले होते की रस्ता तयार झाल्यानंतर प्रथमच त्यांना उर्वरित जगाचा भाग असल्याचे वाटत आहे. त्याच प्रकारे, कोणी बँक खाते उघडण्याचा आनंद सामायिक करतो, तर कोणी वेगवेगळ्या योजनांच्या मदतीने नवीन रोजगार सुरु करण्याच्या आनंदात मला सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो. 'प्रधानमंत्री आवास योजना' अंतर्गत घर मिळाल्यानंतर गृहप्रवेश कार्यक्रमात सहभागी होण्याची अशी अनेक आमंत्रणे सतत मला आमच्या देशवासियांकडून येत आहेत. या 7 वर्षात मी तुमच्या सर्वांच्या अशा करोडो आनंदांमध्ये सहभागी झालो आहे. काही दिवसांपूर्वीच गावातील एका कुटूंबाने मला 'जल जीवन अभियान' अंतर्गत घरात बसविलेल्या पाण्याच्या नळाचा फोटो पाठविला. त्या फोटोचे कॅप्शन त्यांनी लिहिले होते – 'माझ्या गावाची जीवनधारा'. अशी बरीच कुटुंबे आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या 7 दशकांत आपल्या देशातील फक्त साडे तीन कोटी ग्रामीण कुटुंबांना पाण्याचे कनेक्शन दिले होते. परंतु गेल्या 21 महिन्यांतच केवळ साडेचार कोटी घरांना शुद्ध पाण्याचे कनेक्शन देण्यात आले आहे. त्यापैकी 15 महिने तर कोरोना कालावधीचे होते. देशात असाच विश्वास ‘आयुष्मान योजने’ च्या माध्यमातून देखील आला आहे. जेव्हा एखादा गरीब मोफत उपचार घेऊन बरा होऊन घरी येतो तेव्हा त्याला असे वाटते की त्याला एक नवीन जीवन मिळाले आहे. त्याला विश्वास आहे की देश त्याच्या पाठीशी आहे. अशा अनेक कुटुंबांच्या आशीर्वादाने, कोट्यावधी मातांच्या आशीर्वादाने आपला देश सामर्थ्याने विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
मित्रांनो, या 7 वर्षात भारताने 'डिजिटल व्यवहार' मध्ये जगाला एक नवीन दिशा प्रदान केली आहे. आज आपण कोणत्याही ठिकाणी अगदी सहजपणे डिजिटल पेमेंट करतो, या कोरोनाच्या काळातही हे फार उपयुक्त ठरत आहे. आज देशवासी स्वच्छतेप्रती अधिक जागरूक आणि दक्ष होत आहेत. आम्ही मोठ्या प्रमाणात उपग्रह देखील प्रक्षेपित करत आहोत आणि विक्रमी स्तरावर रस्ते देखील बनवत आहोत. या 7 वर्षात देशातील अनेक जुने वादही संपूर्ण शांतता व सामंजस्याने मिटविण्यात आले आहेत. ईशान्य ते काश्मीर पर्यंत शांतता व विकासाचा नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. मित्रांनो, तुम्ही विचार केला आहे का की अनेक दशकांपासून ज्या गोष्टी झाल्या नाहीत त्या सर्व गोष्टी या 7 वर्षात कशा झाल्या? हे सर्व शक्य झाले कारण या 7 वर्षात आम्ही सरकार आणि लोकांहून अधिक एक देश म्हणून काम केले, एक टीम म्हणून काम केले, 'टीम इंडिया' म्हणून काम केले. प्रत्येक नागरिकाने देशाच्या प्रगतीसाठी काही पावले उचलण्याचा प्रयत्न केला आहे. होय! जिथे यश असते तिथे परीक्षा देखील असतात. या 7 वर्षात आम्ही एकत्रित बर्याच कठीण परीक्षा दिल्या आहेत आणि प्रत्येक वेळी त्यातून यशस्वीरीत्या बाहेर आलो आहोत. कोरोना साथीच्या स्वरूपात, इतकी मोठी परीक्षा तर सुरूच आहे. हे एक असे संकट आहे ज्याने संपूर्ण जगाला त्रास दिला आहे, अनेक लोकांनी आपले प्रियजन गमावले आहेत. मोठमोठे देशदेखील त्याच्या तडाख्यातून वाचलेले नाहीत. या जागतिक साथीच्या काळात भारत 'सेवा आणि सहकार्याचा' संकल्प घेऊन मार्गक्रमण करत आहे. आम्ही पहिल्या लाटेत देखील जोमाने संघर्ष केला, यावेळी देखील विषाणू विरुद्ध सुरु असलेल्या लढाईत भारत विजयी होईल. 'सहा फुटाचे अंतर’ मास्कशी संबधित नियम किंवा मग लस संबंधीचे नियम असू देत आम्हाला निष्काळजीपणा करून चालणार नाही. हाच आपला विजयाचा मार्ग आहे. पुढच्या वेळी जेव्हा आपण 'मन की बात' मध्ये भेटू, तेव्हा आपण देशवासियांच्या बर्याच प्रेरणादायक उदाहरणांबद्दल आणि नवीन विषयांवर चर्चा करू. तुम्ही तुमच्या सूचना मला अशाच पाठवत रहा. तुम्ही सर्व जण निरोगी रहा, अशीच देशाची प्रगती करत रहा. खूप-खूप धन्यवाद!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! आज जेंव्हा आपल्या सर्वांचं धैर्य, दुःख सहन करण्याच्या मर्यादेची कोरोना परीक्षा पहात आहे, अशा वेळेस आपल्याशी मन की बात मधून संवाद साधत आहे. आपल्या सर्वांचे कित्येक जिवलग अकालीच आपल्याला सोडून गेले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा यशस्वीपणे सामना केल्यानंतर देशामध्ये खूप मोठी उमेद निर्माण झाली होती, आत्मविश्वासाने देश भारलेला होता, परंतु या कोरोनाच्या वादळाने देशाला हादरवून टाकलं आहे.
मित्रांनो गेल्या काही दिवसात, या संकटाचा मुकाबला करण्यासंदर्भात माझी, वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या तज्ज्ञांबरोबर दीर्घ चर्चा झाली आहे. आमच्या औषध निर्माण उद्योगांच्या क्षेत्रातले लोक असोत की लस उत्पादनाशी संबंधित लोक असोत, ऑक्सिजनच्या निर्मितीशी संबंधित लोक असोत किंवा मग वैद्यकीय क्षेत्रातले जाणकार असोत, त्यांनी अत्यंत महत्वपूर्ण सूचना सरकारला केल्या आहेत. यावेळी, आम्हाला हे युद्ध जिंकण्यासाठी, तज्ज्ञ आणि वैज्ञानिक सल्ल्याला प्राधान्य द्यायचं आहे. राज्यसरकारांच्या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी, भारत सरकार पूर्ण शक्तिनं त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं आहे. राज्य सरकारंही आपापली जबाबदारी निभावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत.
मित्रांनो, देशातले डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विरोधात यावेळी खूप मोठ्या लढाईमध्ये गुंतले आहेत. या आजाराबाबत त्यांना गेल्या एक वर्षात वेगवेगळ्या प्रकारचे अनुभवही आले आहेत. आमच्याबरोबर, आता यावेळी मुंबईतले प्रसिद्ध डॉक्टर शशांक जोशीजी जोडले गेले आहेत.
डॉक्टर जोशी जींकडे कोरोनावरील उपचार आणि त्यासंदर्भातल्या संशोधनाचा प्रत्यक्ष अनुभव मोठा आहे, आणि ते इंडियन कॉलेज ऑफ फिजिशियन्सचे अधिष्ठाताही राहिले आहेत. या आपण आता डॉ. शशांक यांच्याशी बातचीत करू या.
मोदी जीः नमस्कार, डॉ. शशांक जी.
डॉ० शशांक – नमस्कार सर |
मोदी जीः आता अलिकडेच काही दिवसांपूर्वीच आपल्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली होती. आपले स्पष्ट विचार मला अत्यंत आवडले होते. मला असं वाटलं की, देशातल्या सर्व नागरिकांनी आपले विचार जाणून घ्यायला हवेत. ज्या गोष्टी हल्ली ऐकायला मिळतात, त्याबाबतच मी एक प्रश्न विचारू इच्छितो. डॉ. शशांक, आपण सर्व जण सध्या दिवसरात्र लोकांचे जीव वाचवण्याच्या कामात गुंतला आहात. सर्वात प्रथम आपण लोकांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दल सांगावं, असं मला वाटतं. वैद्यकीय दृष्ट्या ही लाट कशी वेगळी आहे आणि त्यासाठी काय खबरदारी आवश्यक आहे.
डॉ० शशांक – धन्यवाद, सर. ही दुसरी लाट आली आहे, ती खूप वेगानं आली आहे आणि पहिल्या लाटेपेक्षा विषाणुच्या संसर्गाची गति जोरात आहे. परंतु, त्याच्या संसर्गापेक्षाही जास्त गतिनं लोक बरे होत आहेत आणि मृत्युदरही खूप कमी आहे, ही याच्याबाबतीत दिलासादायक गोष्ट आहे. या लाटेबाबत दोन- तीन फरक आहेत. पहिल्यांदा कोरोनाचा संसर्ग युवक आणि मुलांमध्येही थोडा दिसून येत आहे. त्याची जी श्वास लागणं, कोरडा खोकला येणं, ताप येणं ही पहिल्या लाटेसारखी लक्षणं तर आहेतच, परंतु त्याबरोबर वासाची जाणिव नष्ट होणं, चव न लागणं हीही आहेत. आणि लोक थोडे घाबरले आहेत. खरंतर लोकांनी घाबरण्याची अजिबात गरज नाही. 80 ते 90 टक्के लोकांमध्ये याची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. आणि हे जे उत्परिवर्तन किंवा म्युटेशन वगैरेबाबत बोललं जातं, त्यामुळे घाबरण्याची काहीच आवश्यकता नाही. हे म्युटेशन्स होत राहतात अगदी आपण जसं कपडे बदलतो तसे विषाणुही आपलं रूप बदलत असतात आणि त्यामुळे मुळीच घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही या लाटेला परतवून लावू. लाटा येत जात राहतात आणि विषाणुही येत जात असतात आणि त्यांची लक्षणं वेगवेगळी असतात. वैद्यकीय दृष्ट्या आम्हाला सतर्क रहाण्याची गरज आहे. कोविडचा 14 ते 21 दिवसांचा कालावधी असून त्यात आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेत राहिलं पाहिजे.
मोदी जीः डॉ. शशांक, आपण जे विश्लेषण सांगितलं, ते माझ्यासाठीही खूप महत्वाचं आहे. मला खूप पत्रं आली असून त्यात उपचारांबाबत लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. औषधांची मागणी काहीशी जास्त प्रमाणात आहे. म्हणून आपण कोविडवरील उपचारांबाबतही लोकांना माहिती द्यावी, असं मला वाटतं.
डॉ० शशांकः हां सर. लोक खूप उशिरानं क्लिनिकल उपचार सुरू करतात आणि आपोआप आजार जाईल, अशा विश्वासावर रहातात. तसंच मोबाईलवर येणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवतात. आणि, जर सरकारच्या कडून देण्यात आलेल्या सूचनांचं पालन केलं तर या संकटाचा सामना करण्याची वेळच येत नाही. कोविडमध्ये क्लिनिकल उपचारांबाबत नियमावली आहे आणि त्यात तीन प्रकारच्या तीव्रतेनुसार म्हणजे सौम्य कोविड, मध्यम किंवा माफक प्रमाणातला कोविड आणि तीव्र कोविड ज्याला म्हणतात, त्याच्यासाठी हे नियम आहेत. जो सौम्य कोविड आहे,त्यासाठी आम्ही ऑक्सिजनवर नजर ठेवून असतो, तापावर देखरेख करत असतो आणि ताप वाढला तर पॅरासिटॅमॉलसारख्या औषधाचा वापर करतो. सौम्य कोविड किंवा मध्यम किंवा तीव्र स्वरूपाचा असला तरीही, आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. कोविड कोणत्याही स्वरूपाचा असला तरीही आपल्या डॉक्टरशी संपर्क ठेवणं खूप आवश्यक आहे. अगदी अचूक आणि स्वस्त औषधंही उपलब्ध आहेत. यामध्ये उत्तेजक म्हणजे स्टेरॉईड आहे, जे जीव वाचवू शकते. इनहेलर देता येतं तसंच टॅबलेटही देता येतात आणि त्याबरोबरच प्राणवायु द्यावा लागतो आणि त्यासाठी लहान लहान स्वरूपाचे उपचार आहेत. परंतु हल्ली एक नवीन प्रयोगात्मक औषध ज्याचं नाव रेमडेसिवीर आहे. त्याच्या वापरामुळे रूग्णाचा रूग्णालयात राहण्याचा कालावधी दोन ते तीन दिवसांनी कमी होतो आणि क्लिनिकल रिकव्हरीमध्ये त्याची मदत होते. आणि हे ही औषध पहिल्या नऊ ते दहा दिवसात दिलं तरच काम करतं आणि पाचच दिवस ते देता येतं. परंतु असं पाहिलं गेलं आहे की, लोक रेमडेसिवीरच्या मागे धावत सुटले आहेत. असं मुळीच धावता कामा नये. हे औषध थोड्या प्रमाणातच काम करतं. ज्यांना प्राणवायुची आवश्यकता आहे,ते रूग्णालयात दाखल होतात. परंतु डॉक्टर सांगतील तेव्हाच बाहेरून प्राणवायु घेतला पाहिजे. लोकांनी हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. आपण प्राणायाम केला, आपल्या शरिरातल्या फुफ्फुसांना जरासं विस्तारित केलं, आणि शरिरातलं रक्त पातळ करणारी जी इंजेक्शन्स येतात, ती घेतली, ज्यांना आम्ही हेपरिन म्हणतो, या छोट्या छोट्या औषधांनीही 98 टक्के रूग्ण बरे होतात. शिवाय, लोकांनी सकारात्मक रहाणंही खूप आवश्यक आहे. उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानंच घेणं अत्यंत आवश्यक आहे. या महागड्या औषधांच्या मागं धावण्याची काहीच गरज नाही सर.
आपल्याकडे चांगले उपचार सुरू आहेत. प्राणवायु आहे, व्हेंटीलेटरची सुविधाही आहे आणि सर्व काही आहे. आणि जेंव्हा केंव्हा ही औषधे मिळतील तेंव्हा ती पात्र लोकांनाच दिली गेली पाहिजेत. आपल्याकडे याबाबतीत खूप गैरसमज पसरवले जात आहेत. यासाठी, आपल्याकडे जगातले सर्वात उत्कृष्ट उपचार उपलब्ध आहेत, हे मी स्पष्ट करु इच्छितो. आपण पाहू शकता की, भारतात रूग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) सर्वात चांगला आहे. आपण युरोप किंवा अमेरिकेशी तुलना केली तर आमच्याकड़े रूग्ण उपचारांच्या नियमावलीनुसार बरे होत आहेत सर.
मोदी जीः डॉ. शशांक, आपले खूप खूप धन्यवाद. डॉ. शशांक यांनी जी माहिती आपल्याला दिली, ती खूप आवश्यक आहे आणि आपल्या सर्वांना उपयुक्त ठरेल.
मित्रांनो, आपल्याला कोणतीही माहिती हवी असेल किंवा कोणतीही शंका असेल तर ती योग्य व्यक्तिकडूनच ती माहिती घ्या. आपले फॅमिली डॉक्टर्स असतील किवा आसपास जे डॉक्टर्स असतील, त्यांच्याकडून दूरध्वनीवरून संपर्क करून माहिती घ्या. आमचे खूप सारे डॉक्टर्स स्वतःच ही जबाबदारी घेत आहेत, हे ही मी पहात आहे. काही डॉक्टर्स समाजमाध्यमांच्या द्वारे लोकांना माहिती देत आहेत. फोनवर किंवा व्हॉट्सअपवर लोकांचे समुपदेशन करत आहेत. अनेक रूग्णालयांच्या वेबसाईट आहेत ज्यावरही माहिती उपलब्ध आहे. तेथे आपण डॉक्टर्सकडून सल्लाही घेऊ शकता, हे खूप प्रशंसनीय आहे.
माझ्या समवेत श्रीनगरचे डॉक्टर नाविद शाह जोडले गेले आहेत. डॉक्टर नाविद हे श्रीनगरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. नाविदजी यांनी आपल्या देखरेखीखाली अनेक कोरोना रूग्णांना बरं केलं आहे आणि रमजानच्या या पवित्र महिन्यातही डॉ. नाविद आपलं कार्य करत आहेत. त्यांनी आमच्याशी बातचीत करण्यासाठी वेळ काढला आहे. त्यांच्याशी आता चर्चा करू या.
मोदी जीः नाविद जी, नमस्कार.
डॉ. नावीदः नमस्कार सर |
मोदी जीः डॉक्टर नाविद, मन की बातच्या आमच्या श्रोत्यांनी या बिकट प्रसंगी घबराट व्यवस्थापन म्हणजे पॅनिक मॅनेजमेंटचा प्रश्न उपस्थित केला आहे. आपण आपल्या अनुभवानुसार त्यांना काय सांगाल?
डॉ. नावीदः जेंव्हा कोरोना महामारी सुरू झाली तेव्हा सर्वप्रथम जे रूग्णालय कोविड़साठी विशेष रूग्णालय म्हणून नियुक्त करण्यात आलं, ते आमचं सिटी हॉस्पिटल होतं. जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत येतं. त्यावेळेस एक दहशतीचं वातावरण होतं. कोविडचां संसर्ग ज्याला होतो, त्याच्यासाठी हे मृत्युचं आमंत्रणच आहे, असं लोक मानायचे आणि आमच्या रूग्णालयातले डॉक्टर आणि निम वैद्यकीय कर्मचार्यांमध्येही अशा रूग्णांना आम्ही सामोरं कसं जायचं, आम्हाला संसर्ग होण्याचा धोका तर नाहि, अशी दहशत होती. जसा काळ गेला तसं आम्ही पाहिलं की, संपूर्ण प्रकारचं संरक्षक साधनं आम्ही वापरून सुरक्षेची खबरदारी घेतली, तर आम्ही सुरक्षित राहू शकतो आणि आमचे बाकी कर्मचारीही सुरक्षित राहू शकतात. पुढे तर आम्ही पाहिलं की, काही रूग्ण किंवा जे आजारी लोक होते ते असिम्प्टोमॅटिक म्हणजे त्यांच्यात कोविडची कसलीच लक्षणं नव्हती. जवळपास 90 ते 95 टक्के उपचाराविनाही ठीक होतात, हेही आम्ही पाहिलं आणि जसा काळ गेला तसा लोकांमध्ये कोरोनाच्या बाबतीत जी एक भीती होती ती खूपच कमी झाली. आज आमच्याकडे कोरोनाची दुसरी लाट आली आहे. परंतु यावेळीही आम्हाला घाबरण्याची अजिबात गरज नाहि. यावेळीही जे संरक्षक उपाय आहेत, मास्क वापरणं, सॅनिटायझरनं हात सतत धुणं आणि शारिरिक अंतर राखणं किंवा सामाजिक मेळावे टाळणं अशी जी आदर्श कार्यप्रणाली आहे तिचं पालन केलं तर आम्ही आपलं दैनंदिन काम अगदी चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो आणि या आजारापासून संरक्षणही प्राप्त करू शकतो.
मोदी जीः डॉ. नाविद, लसीबाबतही लोकांच्या मनात खूप प्रश्न आहेत. लसीपासून कितपत सुरक्षा मिळेल, लस घेतल्यानंतर किती प्रमाणात आश्वस्त राहू शकतो? आपण याबाबतीत काही सांगितलं तर श्रोत्यांना त्याचा खूप फायदा होईल.
डॉ० नावीदः आपल्याकडे कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं तेव्हापासून आजपर्यत आमच्याकडे कोविड-19 साठी कोणतेही परिणामकारक उपचार उपलब्ध नाहित. म्हणून, आम्ही या आजाराशी दोन प्रकारे लढा देऊ शकतो. एक म्हणजे प्रमुख संरक्षक उपाय आणि आम्ही प्रथमपासून हेच सांगत आलो आहोत की, जर एखादी परिणामकारक लस आमच्याकडे आली तर या आजारापासून आम्हाला मुक्ती मिळू शकते. यावेळी आमच्या देशात कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लस उपलब्ध आहेत. या दोन्ही लस याच देशात तयार झाल्या आहेत. आणि ज्या कंपन्यांनी ज्या चाचण्या घेतल्या आहेत, त्यातून असं पाहिलं गेलं आहे की, त्यांची परिणामकारकता 60 टक्क्याहून अधिक आहे. आणि जम्मू आणि काश्मीरबाबत बोलायचं तर, आमच्या केंद्रशासित प्रदेशात आतापर्यंत 15 ते 16 लाख लोकांनी लस घेतली आहे. एक आहे की, समाजमाध्यमांमध्ये या बद्दल खूप गैरसमज आहेत किंवा गृहितकं आहेत. लस घेतल्यानं दुष्परिणाम होतात वगैरे. तर आमच्याकडे ज्यांनी लस टोचून घेतली आहे, त्यांच्यात काहीही दुष्परिणाम दिसलेले नाहित. कोणत्याही नेहमीच्या लसीसोबत जे परिणाम संबंधित असतात म्हणजे ताप येणं, संपूर्ण अंगदुखी किंवा जेथे इंजेक्शन टोचलं जातं त्या भागात वेदना होणं हे दुष्परिणाम प्रत्येक रूग्णाच्या बाबतीत पाहिले आहेत. परंतु एकंदरीत कोणतेही विपरित परिणाम आम्ही पाहिलेले नाहित. दुसरी गोष्ट म्हणजे, काही लोक लसीकरणाच्या नंतर कोविड पॉझिटिव्ह झाले. याबाबतीत तर कंपन्यांनीच मार्गदर्शक तत्वांमध्ये जाहिर केलं आहे की, जर लस टोचून घेतल्यानंतर कुणाला संसर्ग झाला तर तो पॉझिटिव्ह असू शकतो. परंतु, त्या रूग्णांमध्ये आजाराची जी तीव्रता आहे ती तितकीशी रहाणार नाही म्हणजे ते पॉझटीव्ह असू शकतात परंतु तो आजार जीवघेणा सिद्ध होऊ शकत नाही. त्यामुळे लसीबाबत जो आमच्या मनात गैरसमज आहे तो आपण काढून टाकला पाहिजे. आणि जे जे पात्र ठरतील त्यांनी लस टोचून घेतली पाहिजे. कारण एक मे नंतर देशात 18 वर्षावरील प्रत्येकाला लस टोचण्याचा कार्यक्रम सुरू होईल. म्हणून लोकांना हेच आवाहन करेन की, आपण लस टोचून घ्या आणि स्वतःला सुरक्षित करून घ्या. त्यामुळे एकंदरीत आमचा समाज, आमचा समुदाय कोविड-19 संसर्गापासून संरक्षित होईल.
मोदी जीः डॉ. नाविद, आपल्याला खूप खूप धन्यवाद. आणि आपल्याला रमजानच्या पवित्र महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा.
डॉ० नाविद: खूप खूप धन्यवाद.
मोदी जीः मित्रांनो, कोरोनाच्या या संकट काळात लसीचं महत्व तर सगळ्यांनाच पटलं आहे. म्हणून, लसीच्या बाबतीत कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असा माझा आग्रह आहे. आपल्याला सर्वांना माहितच असेल की, भारत सरकारकडून सर्व राज्यसरकारांना विनामूल्य लस पुरवण्यात आली आहे, जिचा लाभ 45 वर्षांवरील सर्व लोक घेऊ शकतात. आता तर एक मेपासून देशात 18 वर्षांवरील प्रत्येकाला लस उपलब्ध होणार आहे. आता देशातलं कॉर्पोरेट क्षेत्र, कंपन्यासुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची मोहिम राबवण्यातील भागीदारीचं पालन करू शकतील. भारत सरकारकडून जो विनामूल्य लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे, तो पुढेही चालूच राहिल, हे ही मला सांगायचं आहे. माझा राज्यांना आग्रह आहे की, त्यांनी भारत सरकारच्या या विनामूल्य लसीकरण मोहिमेचा फायदा आपल्या राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात पोहचवावा.
मित्रांनो, आजाराच्या काळात, आपली तसंच आमच्या कुटुंबाची देखभाल करणं मानसिक स्तरावर किती अवघड असतं, हे आपणा सर्वाना माहितच आहे. परंतु, आमच्या रूग्णालयातील परिचारिकांना तर हेच काम सातत्यानं, अनेक रूग्णांसाठी एकाचवेळेस करावं लागतं. हा सेवाभाव आमच्या समाजाची खूप मोठी शक्ति आहे. परिचारिका ज्या प्रकारची सेवा देतात आणि कठोर कष्ट करतात, त्याबाबतीत तर सर्वात चांगल्या प्रकारे एखादी परिचारिकाच सांगू शकेल. म्हणून, मी रायपूरच्या डॉ. बी आर आंबेडकर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये सेवारत असलेल्या सिस्टर भावना ध्रुवजी यांना मन की बातमध्ये निमंत्रित केलं आहे. त्या अनेक कोरोना रूग्णांची शुश्रुषा करत आहेत. आता त्यांच्याशी बोलू या.
मोदी जीः नमस्कार भावना जी!
भावना: आदरणीय प्रधानमंत्री जी, नमस्कार !
मोदी जी: भावना जी...
भावना:- येस सर
मोदी जी: मन की बात ऐकणाऱ्यांना आपण हे सांगा की, आपल्या कुटुंबात इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडतानाच मल्टीटास्क करत असताना आपण कोविड रूग्णांच्या शुश्रुषेचं काम करत आहात. कोरोना रूग्णांबाबतीत आपला अनुभव देशवासियांना ऐकायला आवडेल कारण सिस्टर किंवा परिचारिका ही रूग्णाच्या सर्वात जवळ शिवाय सर्वात दीर्घकाळ असते. प्रत्येक गोष्ट ती बारकाईने समजून घेऊ शकते.
भावना: जी सर, कोविडच्या संदर्भात माझा एकूण अनुभव दोन महिन्यांचा आहे. आम्ही 14 दिवस ड्युटी करतो आणि 14 दिवस आम्हाला विश्रांती दिली जाते. नंतर दोन महिन्यांनी आमची कोविडची ड्युटी पुन्हा लावली जाते. जेंव्हा सर्वप्रथम माझी कोविड ड्युटी लागली तेव्हा मी आपल्या कुटुंबातील लोकांना कोविड ड्युटीबाबत सांगितलं. मे महिन्यातली ही गोष्ट आहे आणि मी जसं हे सांगितलं तसं सर्वजण घाबरले. व्यवस्थित काम कर, असं मला बजावत होते. तो एक भावनात्मक क्षण होता, सर. जेंव्हा माझी मुलगी मला म्हणाली, “ममा आप कोविड ड्युटीवर जा रहे हो”, तेंव्हा तो क्षण माझ्यासाठी खूपच भावनिक होता. परंतु, जेंव्हा मी कोविड रूग्णाच्या जवळ गेले तेंव्हा एक जबाबदारी घरी सोडून आले. जेंव्हा मी कोविड रूग्णाला भेटले तेंव्हा ते सर्वात जास्त घाबरले होते. कोविडच्या नावानेच सारे रूग्ण इतके घाबरले होते सर की, आपल्याला हे काय होत आहे, आपलं पुढे काय होणार आहे. हेच त्यांना समजत नव्हते. त्यांची भीती दूर करण्यासाठी आम्ही त्यांना एक चांगलं आरोग्यदायी वातावरण तयार केलं सर. आम्हाला जेव्हा कोविड ड्युटी करायला सांगण्यात आलं तेव्हा सर्वप्रथम आम्हाला पीपीई किट घालण्यास सांगण्यात आलं सर, पीपीई किट घालून काम करणं खूपच अवघड आहे. सर, आमच्यासाठी हे सारं खूप अवघड होतं, मी दोन महिन्याच्या ड्युटीमध्ये चौदा चौदा दिवस वॉर्डात, आयसीयू मध्ये आणि आयसोलेशनमध्ये ड्युटी केली, सर.
मोदी जी: म्हणजे एकूण आपण एक वर्षापासून याच प्रकारचे काम करत आहात.
भावना: येस सर. तिथं जाण्यापूर्वी मला माझे सहकारी कोण आहेत, हे माहित नव्हतं. आम्ही एका टीमप्रमाणे काम केलं. त्यांचे जे प्रश्न होते, ते सांगितले. आम्ही रूग्णांच्या बाबतीतील माहिती घेतली आणि त्यांच्यातील गैरसमज दूर केले. अनेक लोक कोविडच्या नावानेच घाबरत असत. जेंव्हा आम्ही त्यांची केस हिस्टरी घेत असू तेव्हा त्यांच्यात आम्हाला लक्षणं दिसत होती परंतु भीतीपोटी ते आपली चाचणी करायला धजावत नव्हते. तेंव्हा आम्ही त्यांना समजावून सांगत होतो आणि सर, जेंव्हा आजाराची तीव्रता वाढायची, तेव्हा त्यांची फुफ्फुसं संसर्गित झालेली असत. त्यांना आयसीयूची गरज लागे आणि तेंव्हा ते त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह येत. एक दोन प्रकरणात आम्ही हे पाहिलं सर आणि प्रत्येक वयोगटाबरोबर आम्ही काम केलं सर. ज्यात लहान मुलं होती, महिला, पुरूष, ज्येष्ठ नागरिक, सर्व प्रकारचे रूग्ण होते. त्या सर्वांशी आम्ही बोललो तेव्हा सर्वांनी हेच सांगितलं की, घाबरल्यामुळे आम्ही आलो नाही. सर्वांकडून आम्हाली हीच उत्तरं मिळाली सर. आम्ही त्याना समजावून सांगितलं की, भीती वगैरे काही नसते आणि आपण आम्हाला साथ द्या, आम्ही आपल्याला मदत करू. बस आपण कोविडच्या नियमावलीचं पालन करा आणि आम्ही त्यांच्याकडून हे करून घेऊ शकलो सर.
मोदी जीः भावना जी, आपल्याशी बोलल्यामुळे मला खूप छान वाटलं. आपण खूप चांगली माहिती दिली आहे. आपल्या स्वतःच्या अनुभवावरून दिली आहे. त्यामुळे देशवासियांना यातून एक प्रकारचा सकारात्मकतेचा संदेश जाईल . आपल्याला खूप खूप धन्यवाद भावना जी.
भावनाः धन्यवाद सर. जय हिंद सर.
भावना जी, नर्सिंग स्टाफचे आपल्यासारखेच लाखो बंधुभगिनी आपलं कर्तव्य अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत. आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्या परिवाराचींही काळजी घ्या.
मित्रांनो, आपल्या सोबत आता बंगळूरू इथल्या सिस्टर सुरेखा जी आहेत. सुरेखा जी के सी सामान्य रुग्णालयात वरिष्ठ परिचारिका अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. चला, त्यांचे अनुभवही जाणून घेऊया.
मोदीजी: नमस्कार सुरेखा जी
सुरेखा: देशाच्या पंतप्रधानांसोबत बोलण्याची संधी मला मिळाली. याचा मला अभिमान वाटतो आणि हा मी माझा गौरव समजते.
मोदीजी:सुरेखा जी, आपण आपल्या सहकारी परीचारिकांसोबत तसंच रुग्णालयातल्या इतर कर्मचाऱ्यांसोबत अत्यंत उत्कृष्ट काम करत आहात. भारत तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. कोविड-19 विरुद्धच्या या लढाईत देशातल्या नागरिकांना तुम्ही काय संदेश द्याल?
सुरेखा: हो सर. एक जवाबदार नागरिक म्हणून मला सर्वांना नक्कीच सांगयला आवडेल की, तुमच्या शेजाऱ्यांशी प्रेमाने वागा तसंच लवकर चाचण्या आणि संपर्कात आलेल्या संशयित रुग्णांचा शोध आपल्याला मृत्यू दर कमी करण्यात नक्कीच मदत करेल. तसंच जर तुम्हाला कोविडची लक्षणं आढळली, तर स्वतःला वेगळं करा आणि जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन जितक्या लवकर शक्य आहे, तितक्या लवकर उपचार सुरु करा. सर्व लोकांमध्ये या आजाराबाबत जागृती होणं गरजेचं आहे. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. घाबरू नका आणि कुठलाच तणावही घेऊ नका. यामुळे रुग्णाची स्थिती आणखी ढासळू शकते. आणि आमच्या सरकारचे आभारी आहोत आणि आपल्या देशात लस उपलब्ध झाल्याचा आम्हाला अभिमान आहे. मी स्वतः लस घेतली आणि माझ्या अनुभवावरून मला भारताच्या सर्व नागरिकांना सांगायचं आहे की कोणतीही लस तुमचं लगेचच 100% संरक्षण करू शकत नाही. आपल्यात रोगप्रतिकारशक्ती निर्माण व्हायला वेळ लागतो. लस घ्यायला अजिबात घाबरू नका. स्वतःचं लसीकरण करून घ्या. त्याचे अगदी किरकोळ दुष्परिणाम होतात आणि मला आणखी एक संदेश द्यायचा आहे की, घरी राहा, निरोगी राहा, आजारी लोकांसोबत संपर्क टाळा तसंच गरज नसताना नाक, डोळे आणि तोंडाला स्पर्श करू नका. शारीरिक अंतराचे नियम पाळा, मास्क योग्य प्रकारे लावा. आपले हात नियमितपणे स्वच्छ धुवा. आणि आपण घरी जे उपाय करू शकता ते अवश्य करा. आयुर्वेदीक काढा प्या, वाफ घ्या आणि दररोज गुळण्या करा. तसंच श्वसनाचे व्यायाम देखील तुम्ही करू शकता. आणखी एक शेवटची, मात्र अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे कोरोना योद्धे आणि वैद्यकीय व्यावासायिकांबद्दल सहानुभूती असू द्या. आम्हाला आपला पाठिंबा आणि सहकार्याची गरज आहे. आपण एकत्र लढूया. आपण या महामारीतून निश्चित बाहेर पडू. हाच माझा लोकांसाठी संदेश आहे सर.
मोदीजी: धान्यवाद सुरेखा जी.
सुरेखा: धन्यवाद सर.
सुरेखाजी, खरंच या अत्यंत कठीण प्रसंगी आपण नेटाने मोर्चा सांभाळला आहे. आपण आपली काळजी घ्या आपल्या कुटुंबालाही माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. मी सर्व देशबांधवांनाही आग्रह करेन की, जसं भावना जी, सुरेखा जी यांनी त्यांच्या अनुभवातून सांगितलं आहे, तसं कोरोनाशी लढण्यासाठी सकारात्मक उर्जा अत्यंत आवश्यक आहे. आणि देशबांधवांना ही ऊर्जा कायम ठेवायची आहे.
मित्रांनो,
डॉक्टर्स आणि परिचारिकांसोबतच या काळात प्रयोगशाळेतले तंत्रज्ञ आणि रुग्णवाहिकांचे चालक यांच्यासारखे पहिल्या फळीतले कोरोना योद्धे ही देवाप्रमाणेच काम करत आहेत. जेंव्हा एखादी रुग्णवाहिका रूग्णांना घ्याला येते, तेव्हा त्यांना रुग्णवाहिकेचा चालक देवदूतासारखाच वाटतो. हे सर्व लोक करत असलेल्या सेवांविषयी, त्यांच्या अनुभवांविषयी देशाला नक्कीच कळायला हवं. माझ्यासोबत आता असेच एक सज्जन आहेत. श्री प्रेम वर्मा जी. हे एक रुग्णवाहिका चालक आहेत. त्यांच्या नावावरूनच जसं आपल्याला कळतं
तसं प्रेम वर्मा जी आपलं काम, आपलं कर्तव्य अत्यंत प्रेमानं आणि चिकाटीनं करत असतात. चला, आपण त्यांच्याशी बोलूया.
मोदी जी: नमस्कार प्रेमजी.
प्रेम जी: नमस्ते सर.
मोदी जी: भाई प्रेम
प्रेम जी: हो सर..
मोदी जी: आपण आपल्या कार्याविषयी...
प्रेम जी: हां सर...
मोदी जी: जरा विस्तारानं सांगा. आपल्याला जे अनुभव येतात ते ही सांगा.
प्रेम जी: सर, मी CATS रुग्णवाहिकामध्ये चालक म्हणून काम करतो. नियंत्रण कक्षातून जसा आमच्या टॅब वर कॉल येतो. 102 क्रमांकावरून जेंव्हा फोन येतो, त्यावेळी आम्ही आमच्या रुग्णाकडे जातो. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही सातत्यानं हे काम करतो आहोत. आपली कीट घालून, हात मोजे, मास्क घालून रुग्णांना, ते जिथे घेऊन जायला सांगतात, मग ते कोणतेही रुग्णालय असो, आम्ही लवकरात लवकर त्यांना तिथे पोहोचवतो.
मोदी जी: आपण तर लसींच्या दोन्ही मात्रा घेतल्या असतील.
प्रेम जी: हो, नक्कीच सर.
मोदी जी: मग इतरांनी ही लस घ्यावी यासाठी तुम्ही त्यांना काय संदेश द्याल?
प्रेम जी: हो सर, नक्कीच. सर्वांना लसीच्या मात्रा घ्यायला हव्यात. आपल्या कुटुंबासाठी हे लसीकरण हिताचेच आहे. आता माझी आई मला म्हणत असते की ही नोकरी सोडून दे. मी सांगितलं, आई, मी जर नोकरी सोडून घरी बसलो, तर सगळीकडे रुग्णांना सोडायला कोण जाणार? कारण आता कोरोना काळात तर सगळेच दूर पळताहेत. सगळे नोकरी सोडून जात आहेत. आई मलाही म्हणत असते की बेटा ही नोकरी सोडून दे. मात्र मी सांगितलं, आई मी नोकरी नाही सोडणार.
मोदी जी –प्रेम जी, आपल्या आईचे मान नाराज करु नका, त्यांना समजून घ्या.
प्रेम जी- हो, सर.
मोजी जी – पण ही जी आईची गोष्ट तुम्ही सांगितलीत ना....
प्रेम जी – हो सर,
मोदी जी –ती मनाला स्पर्शून जाणारी आहे.
प्रेम जी –हो, सर.
मोदी जी –आपल्या आईंनाही.....
प्रेम जी – हो सर,
मोदी जी- माझा नमस्कार सांगा.
प्रेम जी – बिलकूल !
मोदी जी – हो...
प्रेम जी – हो सर...
मोदी सर- आणि प्रेम जी, आपल्या माध्यमातून...
प्रेम जी—हो सर,
मोदी जी—हे रुग्णवाहिका चालवणारे सगळे चालक देखील ....
प्रेम जी—हो ...
मोदी जी --किती मोठा धोका पत्करून काम करत आहेत.
प्रेम जी---हो सर
मोदी जी —आणि प्रत्येकाची आई काय विचार करत असेल?
प्रेम जी –बिलकूल सर
मोदी जी—जेव्हा आपल्या श्रोत्यांपर्यंत हे तुमचं हे बोलणं पोहोचेल..
प्रेम जी—हो सर,
मोदी जी—मला निश्चित वाटतं की त्यांच्याही मनाला ही गोष्ट स्पर्शून जाईल.
प्रेम जी—हो सर..
मोदी जी—प्रेम जी, खूप खूप धन्यवाद ! आपण एकप्रकारे प्रेमाची गंगाच पुढे नेत आहात...
प्रेम जी –धन्यवाद सर !
मोदी जी- धन्यवाद भाऊ..
प्रेम जी—धन्यवाद !!
मित्रांनो,
प्रेम वर्मा जी आणि त्यांच्यासारखे हजारो लोक आज आपल्या जीवाची पर्वा न करता, लोकांची सेवा करत आहेत. कोरोना विरुध्दच्या या लढाईत जितकी आयुष्ये वाचवली जात आहेत, त्यात या रुग्णवाहिका चालकांचेयोगदान खूप मोठे आहे.
प्रेम जी, आपल्याला आणि देशभरातल्या आपल्या सर्व सहकाऱ्यांना मी खूप खूप साधूवाद देतो. आपण वेळेवर पोहोचत रहा, असेच लोकांचे जीव वाचवत रहा.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, हे खरे आहे की सध्या कोरोनाचा संसर्ग खूप लोकांना होतो आहे. मात्र, कोरोनामधून बरे होणाऱ्या लोकांची संख्या देखील तितकीच जास्त आहे.
गुरूग्रामच्या प्रीती चतुर्वेदी जी यांनी अलीकडेच कोरोनावर मात केली आहे. प्रीती जी, ‘मन की बात’ मध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी आल्या आहेत. त्यांचे अनुभव आपल्याला खूप उपयोगी पडतील.
मोदी जी-प्रीती जी, नमस्कार !
प्रीती—नमस्कार सर. कसे आहात आपण?
मोदी जी—मी तर ठीक आहे. सर्वात आधी मी कोविड-19 वर ...
प्रीती—जी
मोदी जी—यशस्वीपणे मात मिळवल्याबद्दल ..
प्रीती –जी
मोदी जी—आपलं कौतुक करतो.
प्रीती – धन्यवाद सर !
मोदी जी—आपले आरोग्य लवकरच सुदृढ, निरोगी व्हावे,याच शुभेच्छा !
प्रीती – धन्यवाद सर !
मोदी जी—प्रीती जी,
प्रीती—हो सर
मोदी जी—या कोविड लाटेत केवळ आपल्याला संसर्ग झाला की आपल्या कुटुंबांतल्या इतर व्यक्तीनांही त्याची बाधा पोहोचली?
प्रीती—नाही नाही सर, मला एकटीलाच संसर्ग झाला होता.
मोदी जी- चला, देवाची कृपा झाली. अच्छा, माझी अशी इच्छा आहे...
प्रीती—हो सर..
मोदी जी—की आपण जर आपल्या या त्रासाच्या काळातले काही अनुभव लोकांना सांगितले, तर कदाचित जे श्रोते आहेत, त्यांनाही अशा वेळी आपल्या स्वतःला कसं सांभाळायचं याविषयी मार्गदर्शन मिळू शकेल.
प्रीती—हो सर, नक्कीच ! सर सुरुवातीला मला खूप आळस... सुस्त सुस्त वाटतहोतं. त्यानंतर, माझ्या गळ्यात थोडीशी खवखव जाणवायला लागली. त्यावेळी, माझ्या असं लक्षात आलं की ही लक्षणे वाटताहेत, त्यामुळे मग मी चाचणी करुन घेतली आणि दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आल्यावर मी पॉझिटिव्ह असल्याचं कळलं. मग मी स्वतःला सर्वांपासून विलग केलं. एका वेगळ्या खोलीत गेले. डॉक्टरांचा सल्ला घेतली. त्यांच्या सल्ल्यानुसार औषधे सुरु केली.
मोदी – म्हणजे आपल्या या तत्परतेमुळे आपले कुटुंबीय सुरक्षित राहिले.
प्रीती- हो सर, इतरांचीही नंतर चाचणी केली. ते सगळे निगेटिव्ह होते. मी एकटीच पॉझिटिव्ह आले होते. आणि आधीच मी स्वतःला आयसोलेट केलं होतं, एका वेगळ्या खोलीत.
मला आवश्यक ते सगळं सामान ठेवून घेत,मी स्वतःला खोलीत बंद करुन घेतलं होतं. त्यासोबतच मी नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधोपाचार पण सुरु केले होते. सर, मी या औषधोपचारांसह योगाभ्यास, आयुर्वेदिक उपचारही सुरु केले होते.आणि त्यासोबतच, मी काढाही घ्यायला सुरुवात केली होती. माझी रोगप्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी सर, मी जेंव्हाही जेवत असे, त्यावेळी सकस अन्न घेत असे. प्रथिनयुक्त पदार्थ खात असे. मी खूप द्रवपदार्थ ही खात होते. मी वाफ घेत होते, गुळण्या करत होते आणि गरम पाणी पीत होते. रोज दिवसभर मी हेच सगळं करत होते. आणि सर, या दिवसांबद्दल सांगायचं ना, तर एक सर्वात मोठी गोष्ट मला सांगायची आहे ती अशी-, की अजिबात घाबरू नका. मानसिक शक्ती मजबूत असू द्यात. आणि यासाठी मला योगाभ्यासाची, श्वसनाच्या व्यायामांची खूपच मदत झाली. मला ते सगळं करतानांच खूप छान वाटत असे.
मोदी जी—हो. अच्छा,प्रीती जी, आता जेंव्हा तुमची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली, आपण संकटांतून बाहेर पडलात ना ?
प्रीती – हो सर...
मोदी जी—मग आता आपल्या आरोग्याच्या रक्षणासाठी, त्याची काळजी घेण्यासाठी आपण काय करताय?
प्रीती- सर, एकतर मी योगाभ्यास बंद केलेला नाही.
मोदी जी- हो..
प्रीती—त्यासोबतच, मी काढाही घेते आणि माझी रोगप्रतिकार शक्ती उत्तम ठेवण्यासाठी मी अजूनही उत्तम सकस आहार घेते आहे.
मोदी जी—हो, बरोबर
प्रीती—आधी मी स्वतःच्या प्रकृतीकडे फार दुर्लक्ष करत असे. आता मात्र मी त्याकडे नीट लक्ष देते.
मोदी जी—धन्यवाद प्रीती जी!
प्रीती—धन्यवाद सर !
मोदी जी—आपण आता जी माहिती आणि आपला अनुभव सांगितला तो अनेकांना उपयोगी पडेल असे मला वाटते. आपण निरोगी रहा, आपल्या कुटुंबातले लोक निरोगी राहावेत, यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा !
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज आपल्या वैद्यकीय क्षेत्रातले लोक, पहिल्या फळीत काम करणारे सर्व कर्मचारी, अहोरात्र सेवाकार्य करत आहेत. तसेच, समाजातले इतर लोकही, या काळात कुठेहही मागे नाहीत. देश पुन्हा एकदा एकजूट होऊन कोरोनाविरुध्द लढा देत आहेत. आजकाल मी पाहतो,
कोणी विलगीकरणात असलेल्या कुटुंबांपर्यंत औषधं पोहोचवत आहेत. कोणी भाज्या, दूध, फळे अशा गोष्टी पोहचवत आहेत. कोणी मोफत रुग्णवाहिका सेवा रूग्णांना देत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून या आव्हानात्मक काळात देखील अनेक स्वयंसेवी संस्था पुढाकार घेऊन इतरांची मदत करण्यासाठी जे जे करु शकतात, ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी, गावांमध्ये देखील नवी जागृती दिसते आहे. कोविड नियमांचं पालन कठोर पालन करत लोक आपापल्या गावांचं कोरोनापासून रक्षण करत आहेत. जे लोक बाहेरून येत आहेत, त्यांच्यासाठी योग्य त्या व्यवस्था तयार केल्या जात आहेत. शहरात देखील अनेक युवक मैदानात उतरले आहेत. ते आपापल्या भागात, कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत, यासाठी, स्थानिक रहिवाशांसोबत प्रयत्न करत आहेत. म्हणजे एकीकडे देश, दिवसरात्र रुग्णालये, व्हेंटीलेटर्स आणि औषधांसाठी काम करत आहे, तर दुसरीकडे, देशबांधव देखील प्राणपणाने कोरोनाच्या या आव्हानाचा सामना करत आहेत. ही भावना आपल्याला किती बळ देते ! केवढा विश्वास निर्माण करते. हे जे सगळे प्रयत्न सुरु आहेत, ते समाजाची खूप मोठी सेवा आहे. यातून समाजाची शक्ती वाढत असते.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज ‘मन की बात’ मधली पूर्ण चर्चा आपण कोरोना महामारीवरच घेतली. कारण, आज आपली सर्वात मोठी प्राथमिकता आहे, या आजारावर मात करणे. आज भगवान महावीर जयंती देखील आहे. यानिमित्त मी सर्व देशबांधवांना शुभेच्छा देतो. भगवान महावीरांची शिकवण आपल्याला तप आणि आत्मसंयमाची प्रेरणा देते. सध्या रमझानचा पवित्र महिनाही सुरु आहे. पुढे बुद्धपौर्णिमा आहे. गुरु तेगबहादूर यांचे 400 वे प्रकाश पर्व देखील आहे. आणखी एक महत्वाचा दिवस म्हणजे- पोचीशे बोईशाक- टागोर जयंतीचा दिवस आहे. हे सगळे उत्सव आपल्याला प्रेरणा देतात.
आपली कर्तव्ये पूर्ण करण्याची प्रेरणा देतात. एक नागरिक म्हणून आपण आपल्या आयुष्यात जेवढ्या कौशल्याने आपली कर्तव्ये पार पाडू, तेवढ्या लवकर आपण संकटातून मुक्त होत भविष्याच्या आपल्या मार्गांवर तितक्याच वेगाने आपण पुढे जाऊ. याच कामनेसह, मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आग्रह करतो की लस आपण सर्वांनी घ्यायची आहे आणि पूर्णपणे सतर्कही राहायचं आहे. ‘औषधही –अनुशासन ही’. हा मंत्र कधीही विसरायचा नाही. आपण सगळे एकत्रितपणे या संकटातून बाहेर पडणार आहोत. याच विश्वासासह आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद ! नमस्कार !!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! यावेळी, जेव्हा मी, 'मन की बात' साठी आलेली पत्रे, टिप्पण्या/ सूचना तसेच मिळालेली वेगवेगळी माहिती ह्यावर नजर टाकत होतो तेव्हा बऱ्याच लोकांनी एका महत्वाच्या गोष्टीची आठवण केली.
‘मायगव्ह’ येथे आर्यन श्री, बंगलोर येथील अनुप राव, नोएडाचे देवेश, ठाणे येथील सुजित, हे सर्वजण म्हणाले,” मोदी जी, यावेळी ‘मन की बात’चा 75 वा भाग आहे. ह्याबद्दल आपले अभिनंदन”.
मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो, तुम्ही खूप बारकाईने लक्ष ठेवले आहे आणि 'मन की बात'चे अनुसरण केले आहे. ‘मन की बात’ शी जोडलेले राहिला आहात. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. माझ्या कडून आपल्याला तर धन्यवाद आहेतच, मी ‘मन की बात’ च्या सर्व श्रोत्यांचे आभार मानतो. कारण आपल्या साथी शिवाय हा प्रवास शक्य नव्हता. असं वाटतंय..जणू ही आत्ता आत्ता आत्ताची गोष्ट आहे, जेव्हा आपण सर्वांनी एकत्रितपणे हा वैचारिक प्रवास सुरू केला होता.
तेव्हा 3 ऑक्टोबर 2014 ला ‘विजयादशमी’ हा पवित्र सण होता आणि योगायोग पहा की आज, ‘होलिका दहन’ आहे. “ दिव्याने व्हावा दुसरा दिवा प्रज्वलित, आपले राष्ट्र व्हावे उज्वल, प्रकाशित.” ह्याच भावनेनें आपण हा मार्ग चालतो आहोत.
आपण देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांशी बोललो, त्यांच्या विलक्षण कामांबद्दल जाणून घेतले. आपल्यालाही अनुभव आला असेल की देशाच्या दूरदूरच्या कोपऱ्यातही किती अभूतपूर्व क्षमता दडलेली आहे! भारत मातेच्या कुशीत कशी कशी रत्ने घडत आहेत! हा समाजाकडे बघण्याचा, समाजाला जाणून घेण्याचा, समाजाचे सामर्थ्य ओळखण्याचा माझ्यासाठी देखील एक अद्भुत अनुभव होता.
ह्या 75 भागांमध्ये आपण किती-किती विषय घेतले? कधी नदीची गोष्ट तर कधी हिमालयाच्या शिखरांची गोष्ट, कधी बाब वाळवंटाची तर कधी नैसर्गिक आपत्तीची, कधी कधी मानवी सेवेच्या असंख्य कथांचा साक्षात्कार तर कधी तंत्रज्ञानाचा अविष्कार, कधी तरी अज्ञात कोपऱ्यातील एखाद्याच्या, काही नवे करून दाखवण्याच्या अनुभवाची गोष्ट.
आता तुम्हीच पाहा ना , ती स्वच्छतेची गोष्ट असेल, आपला वारसा जतन करण्याची चर्चा असेल, एवढेच नव्हे तर, खेळणी बनविण्याची गोष्ट असेल, काय काय नव्हते ह्यात? आपण ज्या विषयांना स्पर्श केला आहे, तेसुद्धा असंख्य आहेत.
या काळात आपण वेळोवेळी थोर व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली, ज्यांनी भारत घडविण्यात अतुलनीय योगदान दिले आहे, त्यांच्याविषयी जाणून घेतले. आपण बर्याच जागतिक मुद्द्यांवर देखील बोललो आहोत, त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
तुम्ही मला बर्याच गोष्टी सांगितल्या, अनेक कल्पना दिल्या. एक प्रकारे, ह्या विचार प्रवासात आपण सोबतीने चाललो, एकमेकांशी जोडले गेलो आणि नविनही काही जोडत राहिलो.
मी आज, या 75 व्या पर्वाच्या वेळी, सर्वप्रथम, प्रत्येक श्रोत्याचे 'मन की बात' यशस्वी करण्यासाठी, समृद्ध करण्यासाठी आणि ह्या कार्यक्रमाशी जोडलेले राहण्यासाठी अनेक अनेक आभार मानतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, किती सुखद योगायोग आहे ते पहा!
आज मला 75 व्या 'मन की बात' मध्ये बोलण्याची संधी आणि हा महिना, स्वातंत्र्याची 75- वर्षे, 'अमृत महोत्सव' सुरू होणारा महिना. अमृत महोत्सव दांडी यात्रेच्या दिवशी सुरु झाला आणि 15 ऑगस्ट 2023 पर्यंत चालेल. संपूर्ण देशभरात 'अमृत महोत्सवा शी' संबंधित कार्यक्रम सतत होत आहेत.
वेगवेगळ्या ठिकाणाहून या कार्यक्रमांची छायाचित्रे, माहिती लोक शेअर करत आहेत, पाठवत आहेत. ‘नमोॲप’वरही अशा च काही छायाचित्रांसमवेत, झारखंडच्या नवीन ह्यांनी मला एक निरोप पाठविला आहे.
त्यांनी लिहिले आहे की त्यांनी 'अमृत महोत्सवा ' चे कार्यक्रम पाहिले आणि ठरवले की स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित असलेल्या किमान दहा ठिकाणांना भेट द्यायची. त्यांच्या यादीतील पहिले नाव भगवान बिरसा मुंडांच्या जन्मस्थळाचे आहे. नवीन यांनी लिहिले आहे की झारखंडमधील आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या कथा ते देशाच्या इतर भागात घेऊन जातील. नवीन दादा, तुमच्या ह्या विचारसरणीबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो.
मित्रांनो, एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाच्या संघर्षाची गाथा म्हणा
एखाद्या जागेचा इतिहास म्हणा, देशाची एखादी सांस्कृतिक कथा म्हणा , 'अमृत महोत्सवाच्या’ दरम्यान आपण ते देशासमोर, देशवासियांच्या समोर आणू शकता. ह्या गोष्टींचा देशवासीयांशी संपर्क होण्याचे साधन बनू शकता. तुम्हाला दिसेल की बघता बघता 'अमृत महोत्सव' अशा बऱ्याच प्रेरणादायक अमृत बिंदूंनी भरून जाईल. आणि मग अशी अमृत धारा वाहू लागेल जी आपल्याला भारताच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे झाली तरी प्रेरणा देत राहील. देशाला एका नवीन उंचीवर नेईल, काही न काही करण्याचा उत्साह निर्माण करेल.
स्वातंत्र्याच्या लढाईत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी अतोनात कष्ट सहन केले. कारण देशासाठी त्याग करणे, बलिदान देणे हे आपले कर्तव्य आहे असे ते मानत असत.त्यांच्या त्याग आणि बलिदानाच्या अमर कहाण्या आपल्याला आता सदैव कर्तव्याच्या मार्गाने जाण्यासाठी प्रेरित करत राहोत आणि जसे भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये म्हटले आहे,
“नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मण: “
त्याप्रमाणे, त्याच भावनेने, आपण सर्वजण आपल्या नियत कर्तव्यांचे पूर्ण निष्ठेने पालन करू या. आणि स्वातंत्र्याच्या 'अमृत महोत्सवाचा’ अर्थ हाच आहे की आपण काहीतरी नवीन संकल्प करूया. तो संकल्प पूर्ण करण्यासाठी संपूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करू या. संकल्प असा असावा, जो समाजाच्या हिताचा असेल देशाच्या भल्याचा असेल आणि भारताच्या उज्वल भविष्यासाठी असेल. संकल्प असा असावा, ज्यामध्ये माझी स्वतःची काही जबाबदारी असेल, माझे कर्तव्य त्याच्याशी जोडलेले असेल. माझा विश्वास आहे की गीता प्रत्यक्षात जगण्याची ही सुवर्णसंधीच आपल्याला मिळाली आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मागील वर्षी हाच मार्च महिना होता, जेव्हा देशाने ‘जनता कर्फ्यू’ हा शब्द प्रथमच ऐकला होता. पण ह्या महान देशाच्या महान प्रजेच्या, महान सामर्थ्याचा अनुभव पहा, ‘जनता कर्फ्यू’ संपूर्ण जगासाठी एक आश्चर्य बनला.. शिस्तीचे हे एक अभूतपूर्व उदाहरण होते, येणाऱ्या अनेक पिढ्या, या गोष्टीचा, नक्कीच अभिमान बाळगतील.
त्याच प्रमाणे, आमच्या कोरोना योद्धांच्याविषयी सन्मान, आदर, थाळ्या वाजवणे, टाळ्या वाजवणे, दिवा लावणे…
आपल्याला कल्पना नाही, हे सगळे कोरोना योद्ध्यांच्या हृदयाला किती स्पर्शून गेले आणि तेच कारण आहे की पूर्ण वर्षभर ते, न थकता, न थांबता, चिकाटीने काम करत राहिले. देशातील प्रत्येक नागरिकाचा जीव वाचवण्यासाठी, पूर्ण शक्तीनिशी लढत राहिले.
गेल्या वर्षी यावेळी, प्रश्न होता की कोरोनाची लस कधी येणार? मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे की आज भारतात, जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम चालविला जात आहे. लसीकरण कार्यक्रमाच्या छायाचित्रांबद्दल भुवनेश्वरच्या पुष्पा शुक्ला यांनी मला लिहिले आहे. त्या म्हणतात की घरातील वडील माणसे लसीबद्दल जो उत्साह दाखवत आहेत, त्याविषयी मी ‘मन की बात’ मध्ये बोलावे.
मित्रांनो, बरोबरच आहे. देशाच्या कानाकोपऱ्या तून आपण अशा बातम्या ऐकत आहोत, छायाचित्रे पाहत आहोत, जी आपल्या अंतःकरणाला स्पर्श करत आहेत.
उत्तर प्रदेशच्या जौनपुरमधील 109 वर्षांच्या वयोवृद्ध माता राम दुलैया ह्यांनी लस घेतली आहे. त्याचप्रमाणे, दिल्लीमध्ये देखील, 107 वर्षे वयाच्या, केवल कृष्णजी ह्यांनी पण लसीचा एक डोस घेतला आहे. हैदराबाद मध्ये 100 वर्षांच्या जय चौधरीजी ह्यांनी लस घेतली आणि इतर सर्वांनाही लस अवश्य घेण्याचे आवाहन केले.
मी ट्विटर-फेसबुकवर पाहत आहे की कसे लोक त्यांच्या घराच्या वडीलधाऱ्यांचे, लस घेतल्यानंतरचे फोटो अपलोड करीत आहेत. केरळमधील एक तरुण, आनंदन नायर ह्यांनी तर त्याला एक नवीन नाव दिले आहे – 'लस सेवा'.
असेच संदेश दिल्लीहून शिवानी, हिमाचल येथील हिमांशू आणि इतर अनेक तरुणांनीही पाठविले आहेत. मी तुम्हा सर्व श्रोत्यांच्या विचारांचे कौतुक करतो.
ह्या सगळ्या दरम्यान, कोरोनाशी लढा देण्याचा मंत्र पण नक्की लक्षात ठेवा. 'दवाई भी – कडाई भी' ! आणि आपल्याला फक्त बोलायचेच आहे असे नाही! आपल्याला ते प्रत्यक्ष आचरणात आणायचे आहे, बोलायचे आहे, सांगायचे आहे आणि लोकांनाही ‘दवाई भी कडाई भी’ असे वागण्यासाठी वचनबद्ध करायचे आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मला आज, इंदूरच्या रहिवासी असलेल्या सौम्या ह्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. त्यांनी एका विषयाकडे माझे लक्ष वेधले आणि ‘मन की बात’ मध्ये याचा उल्लेख करावा असे सांगितले. हा विषय आहे – भारताच्या क्रिकेटर मिताली राज जी ह्यांचा नवीन विक्रम. मिताली जी, नुकत्याच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला क्रिकेटपटू बनल्या आहेत.. त्यांचे ह्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत सातहजार धावा काढणाऱ्या अशा त्या एकमेव आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू आहेत.
महिला क्रिकेट क्षेत्रात त्यांचे योगदान खूप प्रभावी आहे. दोन दशकांहूनही जास्त अशा आपल्या कारकीर्दीत मिताली राज ह्यांनी हजारो, लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे. त्यांचे कठोर परिश्रम आणि यशोगाथा, फक्त महिला क्रिकेटपटूंसाठीच प्रेरणा नव्हे, तर पुरुष क्रिकेटपटूंसाठीही प्रेरणा आहे.
मित्रांनो, हे चित्तवेधक आहे, ह्या मार्च महिन्यात,जेव्हा आम्ही महिला दिवस साजरा करत होतो तेव्हाच अनेक महिला खेळाडूंनी पदके मिळवली आहेत, विक्रम प्रस्थापित केले आहेत.
दिल्लीत आयोजित नेमबाजीच्या ‘आयएसएसएफ विश्वचषकात’ भारताने अव्वल स्थान मिळविले. सुवर्ण पदकांच्या संख्येच्या बाबतीतही भारत जिंकला. हे भारतातील महिला व पुरुष नेमबाजांच्या उत्तम कामगिरीमुळेच शक्य झाले.
ह्या दरम्यान, ‘बीडब्ल्यूएफ स्विस ओपन सुपर 300 स्पर्धेत’ पी.व्ही. सिंधू जी ह्यांनी रौप्यपदक जिंकले. आज शिक्षणापासून उद्योजकतेपर्यंत, सशस्त्र सैन्यापासून विज्ञान आणि तंत्रज्ञानापर्यंत, सर्वत्र..देशातील मुली स्वत: ची वेगळी ओळख निर्माण करीत आहेत. मला विशेष आनंद ह्यामुळे आहे की मुली, खेळात स्वत: साठी एक नवीन स्थान बनवत आहेत.
खेळ ही एक व्यावसायिक निवड म्हणून उदयास येत आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, काही काळापूर्वी झालेले मेरीटाईम इंडिया समिट तुम्हाला आठवते का? या शिखर परिषदेत मी काय बोललो हे तुम्हाला आठवते का? साहजिकच आहे, बरेच कार्यक्रम होत असतात, बर्याच गोष्टी घडत राहतात, प्रत्येक गोष्ट कुठे आपल्याला आठवते आणि तितके लक्ष तरी कुठे दिले जाते, – स्वाभाविक आहे.
पण मला हे आवडले की माझ्या एका विनंतीवर गुरु प्रसाद जी यांनी मनःपूर्वक अंमल केला. ह्या शिखर परिषदेत मी देशातील दीपगृह संकुलांच्या आसपास पर्यटन सुविधा विकसित करण्याविषयी बोललो होतो.
गुरु प्रसाद जी ह्यांनी तामिळनाडूमधील दोन दीपगृहांना, चेन्नई दीप गृह आणि महाबलीपुरम दीप गृह ह्यांना 2019 मध्ये भेट दिली होती, त्या प्रवासाचे अनुभव सांगितले आहेत. ज्या ऐकून मन की बात च्या श्रोत्यांनाही खूप आश्चर्य वाटेल अशा अतिशय मनोरंजक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत.
चेन्नई दीपगृह हे जगातील, लिफ्ट असलेल्या काही मोजक्या दीपगृहांपैकी एक आहे. इतकेच नाही तर हे भारतातील एकमेव दीपगृह आहे जे शहरी भागात आहे. इथे विद्युत ऊर्जेसाठी सौर पॅनेल्स पण लावलेली आहेत. गुरु प्रसाद जी ह्यांनी दीपगृहाजवळ असलेल्या, सागरी सुचालनाचा इतिहास सांगणाऱ्या व वारसा जपणाऱ्या एका संग्रहालयाविषयी देखील सांगितले आहे. संग्रहालयात, तेलावर जळणारे मोठेमोठे दिवे, रॉकेलचे दिवे, पेट्रोलियमच्या गॅसबत्त्या व जुन्या काळी वापरले जाणारे विद्युत दिवे प्रदर्शित केलेले आहेत..
भारतातील सर्वात जुन्या दीपगृहाबद्दल- महाबलीपुरम दीपगृहाबद्दल देखील गुरु प्रसाद जी यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांचे म्हणणे आहे की ह्या दीपगृहाजवळ शेकडो वर्षांपूर्वी, ‘पल्लव राजा महेंद्र वर्मन प्रथम’ यांनी बांधलेले 'उलकनेश्वर' मंदिर आहे.
मित्रांनो, 'मन की बात' दरम्यान, मी पर्यटनाच्या विविध पैलूंविषयी बर्याच वेळा बोललो आहे, परंतु ही दीपगृहे पर्यटनाच्या दृष्टीने अद्वितीय आहेत. त्याच्या भव्य रचनांमुळे दीपगृहे नेहमीच लोकांसाठी आकर्षण केंद्र असतात. पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतातील एक्काहत्तर दीपगृहे चिन्हांकित केली गेली आहेत. या सर्व दीपगृहांमध्ये त्यांच्या क्षमतेनुसार वस्तूसंग्रहालय, अॅम्फी-थिएटर, खुला रंगमंच, उपाहार गृह, मुलांसाठी बाग , पर्यावरणस्नेही पर्णकुटी आणि landscaping केले जाईल.
तसेच, दीपगृहाबद्दलच चर्चा चालू आहे तर मी एका अद्वितीय दीपगृहाबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो. हे दीपगृह गुजरातच्या सुरेंद्र नगर जिल्ह्यात जिन्झुवाडा नावाच्या ठिकाणी आहे.
आपणास माहित आहे का की हे दीपगृह विशेष का आहे? हे विशेष आहे कारण जिथे हे दीपगृह आहे, तेथून समुद्री किनारा सध्या शंभर किलोमीटरहून अधिक अंतरावर आहे. या गावात तुम्हाला असे दगडही सापडतील, जे सांगतील की, इथे, कधीकाळी , एक गजबजलेले बंदर असावे.
म्हणजे याचा अर्थ असा आहे की यापूर्वी किनारपट्टी जिन्झुवाड़ा पर्यंत होती. समुद्राची पातळी घटणे , वाढणे , मागे जाणे , एवढे दूर जाणे हे देखील त्याचे एक स्वरुप आहे. याच महिन्यात जपानमध्ये आलेल्या महाभयंकर सुनामीला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या सुनामीत हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. अशीच एक सुनामी भारतात 2004 मध्ये आली होती. सुनामी दरम्यान आपण आपल्या लाईटहाऊसमध्ये काम करणारे आपले 14 कर्मचारी गमावले होते. अंदमान निकोबार मध्ये आणि तामिळनाडूत लाईटहाऊसवर ते आपले कर्तव्य बजावत होते. कठोर परिश्रम करणाऱ्या आपल्या या लाईट कीपर्सना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि लाईट कीपर्सच्या कामाची भरपूर प्रशंसा करतो.
प्रिय देशवासियांनो, जीवनातील प्रत्येक क्षेत्रात, नावीन्य, आधुनिकता, अनिवार्य असते नाहीतर, तोचतोचपणा कधी-कधी आपल्यासाठी ओझे बनते. भारताच्या कृषी जगात आधुनिकता, ही काळाची गरज आहे. खूप उशीर झाला आहे. आपण खूप वेळ दवडला आहे. कृषी क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, पारंपरिक शेतीबरोबरच नवीन पर्याय, नवनवीन संशोधने स्वीकारणे देखील तितकेच आवश्यक आहे. श्वेत क्रांती दरम्यान देशाने याचा अनुभव घेतला आहे. आता मधमाशी पालन देखील असाच एक पर्याय बनून समोर आला आहे. मधमाशी पालन देशात मध क्रांति किंवा मधुर क्रांतीचा पाया रचत आहे. शेतकरी मोठ्या संख्येने यात सहभागी होत आहेत, नवसंशोधन करत आहेत. उदा. पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये एक गाव आहे गुरदुम . उंच पर्वत, भौगोलिक अडचणी, मात्र इथल्या लोकांनी मधमाशी पालनाचे काम सुरु केले आणि आज, या ठिकाणी तयार होणाऱ्या मधाला चांगली मागणी आहे.यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढत आहे. पश्चिम बंगालच्या सुंदरबन परिसरातील नैसर्गिक सेंद्रिय मध देश विदेशात प्रसिद्ध आहे. असाच एक वैयक्तिक अनुभव माझा गुजरातमधील आहे. गुजरातच्या बनासकांठा इथं 2016 मध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात मी लोकांना सांगितले की इथे इतक्या क्षमता आहेत, तर बनासकांठा आणि आपल्याकडचे शेतकरी यांनी मधुर क्रांतीचा नवीन अध्याय लिहिला तर ? तुम्हाला हे ऐकून आनंद होईल , एवढ्या कमी वेळेत बनासकांठा, मध उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनले आहे. आज बनासकांठाचे शेतकरी मध निर्मितीतून वर्षाला लाखो रुपये कमवत आहेत. असेच एक उदाहरण हरियाणाच्या यमुना नगरचे देखील आहे.
यमुना नगरमध्ये शेतकरी मधमाशी पालन करून वर्षाला शंभर टन मध तयार करत आहेत, आपले उत्पन्न वाढवत आहेत. शेतकऱ्यांच्या या मेहनतीचा परिणाम आहे की देशात मधाचे उत्पादन सातत्याने वाढत आहे. आणि वर्षाला अंदाजे सव्वा लाख टनावर पोहचले आहे. यापैकी मोठ्या प्रमाणात मध परदेशात निर्यात देखील केला जात आहे.
मित्रानो, मधमाशी पालनात केवळ मधातूनच कमाई होत नाही, तर मधाच्या पोळ्यातले मेण हे देखील उत्पन्नाचे एक खूप मोठे माध्यम आहे. औषध निर्मिती उद्योग, खाद्यपदार्थ उद्योग , वस्त्रोद्योग आणि कॉस्मेटिक उद्योग , प्रत्येक ठिकाणी या मेणाला मागणी आहे. आपला देश सध्या या मेणाची आयात करतो , मात्र आपले शेतकरी आता वेगाने ही परिस्थिती बदलत आहेत. म्हणजेच एक प्रकारे आत्मनिर्भर भारत अभियानात मदत करत आहेत. आज तर संपूर्ण जग आयुर्वेद आणि नैसर्गिक आरोग्य उत्पादनांकडे वळत आहेत. या पार्श्वभूमीवर मधाची मागणी आणखी वेगाने वाढत आहे. माझी इच्छा आहे की देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतीबरोबरच मधमाशी पालन देखील करावे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढेल आणि त्यांचे जीवन देखील सुमधुर होईल.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आता काही दिवसांपूर्वी, जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात आला. स्पॅरो म्हणजे चिमणी. काही याला चकली म्हणतात, काही चिमणी म्हणतात , काही घान चिरिका म्हणतात. पूर्वी आपल्या घरांच्या भिंतींवर , आजूबाजूच्या झाडांवर चिमण्यांचा चिवचिवाट सुरु असायचा. मात्र आता लोक चिमण्यांची आठवण काढताना म्हणतात कि शेवटचे कितीतरी वर्षांपूर्वी चिमण्यांना पाहिले होते. आज त्यांना वाचवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागत आहेत. माझ्या बनारसचे एक मित्र इंद्रपाल सिंह बत्रा यांनी असे काम केले आहे जे मी ‘मन की बात’ च्या श्रोत्यांना जरूर सांगू इच्छितो. बत्रा यांनी आपल्या घरालाच चिमण्यांचे घर बनवले आहे. त्यांनी आपल्या घरात लाकडाची अशी घरटी बनवली आहेत, ज्यात चिमण्या आरामात राहू शकतील. आज बनारसमधली अनेक घरे या अभियानाशी जोडली गेली आहेत. यामुळे घरांमध्ये एक अद्भुत नैसर्गिक वातावरण देखील निर्माण झाले आहे. मला वाटते निसर्ग, पर्यावरण, प्राणी, पक्षी ज्यांच्यासाठी म्हणून शक्य आहे , कमी-अधिक प्रयत्न आपण देखील करायला हवेत. असेच एक मित्र आहेत बिजय कुमार काबी. बिजय हे ओदिशाच्या केंद्रपाड़ा इथले रहिवासी आहेत. केंद्रपाड़ा समुद्र किनारी आहे. म्हणूनच या जिल्ह्यातील अनेक गावे अशी आहेत ज्यांना समुद्राच्या उंच लाटा आणि चक्रीवादळाचा कायम धोका असतो. यामुळे अनेकदा मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होते. बिजय यांना जाणवले की जर या नैसर्गिक आपत्तीला कुणी रोखू शकत असेल तर तो निसर्गच रोखू शकतो. मग काय , बिजय यांनी बड़ाकोट गावातून आपल्या मोहिमेला सुरुवात केली. त्यांनी 12 वर्षे, मित्रानो, 12 वर्ष, मेहनत करून , गावाबाहेर, समुद्राजवळ 25 एकरचे कांदळवन उभे केले.
आज हे जंगल गावाचे संरक्षण करत आहे. असेच काम ओदिशाच्याच पारादीप जिल्ह्यातले एक इंजीनियर अमरेश सामंत यांनी केलं आहे. अमरेश यांनी छोटी छोटी जंगल उभारली आहेत, ज्यामुळे आज अनेक गावांचा बचाव होत आहे. मित्रानो, अशा प्रकारच्या कामांमध्ये जर आपण समाजाला सहभागी करून घेतलं तर मोठे परिणाम दिसून येतात. जसे तामिळनाडूच्या कोईमतूरमध्ये बस कन्डक्टरचे काम करणारे मरिमुथु योगनाथन आहेत. योगनाथान हे आपल्या बसमधील प्रवाशांना तिकीट देतात, तेव्हा त्याबरोबर एक रोपटे देखील मोफत देतात. अशा प्रकारे योगनाथन यांनी कितीतरी झाडे लावली आहेत. योगनाथन आपल्या वेतनाचा मोठा हिस्सा याच कामावर खर्च करत आले आहेत. आता हे ऐकल्यानंतर असा कोणता नागरिक असेल जो मरिमुथु योगनाथन यांच्या कामाची प्रशंसा करणार नाही. त्यांच्या या प्रेरणादायी कार्यासाठी मी मनापासून त्यांच्या या प्रयत्नांचे खूप अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, Waste पासून Wealth म्हणजेच कचऱ्यापासून सोने बनवण्याबाबत आपण सर्वानी पाहिले देखील आहे, ऐकले देखील आहे, आणि आपणही इतरांना सांगत असतो. काहीसे अशाच प्रकारे कचऱ्याला मौल्यवान बनवण्याचे काम केले जात आहे. असेच एक उदाहरण केरळच्या कोच्चि मधील सेंट टेरेसा महाविद्यालयाचे आहे. मला आठवतंय कि 2017 मध्ये मी या महाविद्यालयाच्या संकुलात पुस्तक वाचनावरील एका कार्यक्रमात सहभागी झालो होतो. या महाविद्यालयाचे विद्यार्थी पुनर्वापर करता येईल अशी खेळणी सर्जनशील पद्धतीने बनवत आहेत. हे विद्यार्थी, जुने कपडे, टाकण्यात आलेले लाकडाचे तुकडे, बॅग आणि बॉक्सेसचा वापर खेळणी बनवण्यासाठी करत आहेत. काही विद्यार्थी कोडे तयार करत आहेत, तर काही कार आणि रेल्वेगाडी बनवत आहेत. इथे या गोष्टीबर विशेष लक्ष दिले जाते कि खेळणी सुरक्षित असण्याबरोबरच मुलांना खेळता येतील अशी असतील. आणि या संपूर्ण प्रयत्नांची एक चांगली गोष्ट ही देखील आहे की ही खेळणी अंगणवाडीतल्या मुलांना खेळण्यासाठी दिली जातात. आज जेव्हा भारत खेळणी उत्पादनात वेगाने पुढे जात असताना कचऱ्यातून मूल्य निर्मितीचे हे अभियान, हा अभिनव प्रयोग खूप महत्वाचा आहे. आंध्र प्रदेशच्या विजयवाडा इथं एक प्राध्यापक श्रीनिवास पदकांडला म्हणून आहेत. ते खूपच रंजक काम करत आहेत. त्यांनी ऑटोमोबाईल मेटल स्क्रॅपमधून शिल्प बनवली आहेत. त्यांनी बनवलेली ही भव्य शिल्पे सार्वजनिक उद्यानांमध्ये बसवण्यात आली आहेत आणि लोक त्याकडे खूप उत्साहाने पाहत आहेत. इलेक्ट्रॉनिक आणि ऑटोमोबाईल कचऱ्याच्या पुनर्वापराचा हा एक अभिनव प्रयोग आहे. मी पुन्हा एकदा कोच्चि आणि विजयवाड़ाच्या या प्रयत्नांची प्रशंसा करतो आणि आशा करतो की अशा प्रयत्नांमध्ये आणखी लोक पुढे येतील. |
माझ्या प्रिय देशबांधवांनो, भारतीय लोक जगाच्या कानाकोपऱ्यात जिथे कुठे जातात तिथे अभिमानाने सांगतात कि ते भारतीय आहेत. आपला योग, आयुर्वेद, तत्त्वज्ञान कायकाय नाही आपल्याकडे , ज्याचा आपल्याला अभिमान वाटतो , अभिमानाच्या गोष्टी करतो, त्याचबरोबर आपली स्थानिक भाषा, बोली, ओळख, पेहराव खाणे-पिणे याचाही अभिमान बाळगतो. आपल्याला नवे हवे असते आणि तेच तर जीवन असते, मात्र त्याचबरोबर जुने गमवायचे नाही. आपल्याला अतिशय परिश्रमपूर्वक आपल्या आजूबाजूला असलेल्या या सांस्कृतिक वारशाचे जतन करायचे आहे, नव्या पिढीपर्यंत पोचवायचे आहे. हेच काम, आज, आसाममध्ये राहणारे ‘सिकारी टिस्सौ’ अतिशय मनापासून करत आहेत. कार्बी अँग्लोन्ग जिल्ह्यातले ‘सिकारी टिस्सौ’ गेल्या 20 वर्षांपासून कार्बी भाषेचे दस्तऐवजीकरण करत आहेत . कोणे एके काळची एका युगातली ‘कार्बी आदिवासी’ बंधू-भगिनींची ‘कार्बी’ भाषा आज मुख्य प्रवाहातून गायब होत आहे.
‘सिकारी टिस्सौ’ यांनी हे ठरवले होते कि आपली ही ओळख ते कायम राखतील आणि आज त्यांच्या प्रयत्नांमुळे कार्बी भाषेच्या बऱ्याच माहितीचे दस्तऐवजीकरण झाले आहे. या प्रयत्नांबद्दल त्यांचे अनेक ठिकाणी कौतुक देखील झाले आहे आणि पुरस्कार देखील मिळाला आहे. ‘मन की बात’ च्या माध्यमातून ‘सिकारी टिस्सौ’ यांचे मी अभिनंदन तर करत आहेच मात्र देशाच्या अनेक भागात अशा प्रकारचे अनेक साधक असतील, जे एक काम हाती घेऊन मेहनत करत असतील , त्या सर्वांचे देखील मी अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, कोणतीही नवी सुरुवात , नवा प्रारंभ नेहमीच खूप खास असतो. नवीन सुरुवातीचा अर्थ आहे नवीन शक्यता-नवीन प्रयत्न नवीन प्रयत्नांचा अर्थ आहे – नवी ऊर्जा आणि नवा जोश. हेच कारण आहे कि विविध राज्ये आणि क्षेत्रांमध्ये तसेच विविधतेने नटलेल्या आपल्या संस्कृतीत कुठलीही सुरुवात उत्सव म्हणून साजरी करण्याची परंपरा आहे. आणि ही वेळ नवीन सुरुवात आणि नव्या उत्सवांच्या आगमनाची आहे. होळी देखील वसंत हा उत्सव म्हणून साजरी करण्याची एक परंपरा आहे. ज्यावेळी आपण रंगांबरोबर होळी साजरी करत असतो, त्यावेळी वसंत देखील आपल्या चहूबाजूला नवीन रंग पसरवत असतो.
याच वेळी फुले उमलायला लागतात आणि निसर्ग जिवंत होतो. देशाच्या विविध भागात लवकरच नवीन वर्ष देखील साजरे केले जाईल. मग ते उगादी असेल, किंवा पुथंडू, गुढी पाडवा असेल किंवा मग बिहू, नवरेह असेल, किंवा पोइला, किंवा मग बोईशाख असेल किंवा बैसाखी – संपूर्ण देश, उमंग, उत्साह आणि नव्या आशेच्या रंगात रंगलेला दिसेल. याच काळात केरळ देखील सुंदर विशु उत्सव साजरा करते. त्यानंतर लगेचच चैत्र नवरात्रीचे पवित्र पर्व देखील सुरु होईल. चैत्र महिन्याच्या नवव्या दिवशी आपल्याकडे रामनवमीचा सण असतो. भगवान रामाच्या जन्मोत्सवाबरोबरच न्याय आणि पराक्रमाच्या एका नव्या युगाची सुरुवात म्हणून देखील साजरा केला जातो. या काळात चोहोबाजूला उत्साहाबरोबरच भक्तिभावाने भारलेले वातावरण असते. जे लोकांना आणखी जवळ आणते, त्यांना कुटुंब आणि समाजाशी जोडते, परस्पर संबंध मजबूत करते. या सणांच्या निमित्ताने मी सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो.
मित्रानो, याच दरम्यान 4 एप्रिलला देश ईस्टर देखील साजरा करेल. येशू ख्रिस्ताच्या पुनर्जीवनाचा उत्सव म्हणून ईस्टरचा सण साजरा केला जातो. प्रतीकात्मक दृष्ट्या सांगायचे तर ईस्टर आयुष्याच्या नवीन सुरुवातीशी निगडित आहे. ईस्टर आशा पुनर्जीवित होण्याचे प्रतीक आहे.
या पवित्र आणि शुभ प्रसंगी मी केवळ भारतातील ख्रिस्ती समुदायाला नव्हे तर जगभरातील ख्रिस्ती बांधवांना देखील शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशबांधवानो , आज ‘मन की बात’ मध्ये आपण ‘अमृत महोत्सव’ आणि देशाप्रति आपल्या कर्तव्यांबाबत बोललो. आपण अन्य पर्व आणि सण -उत्सवांबाबतही चर्चा केली. याच दरम्यान आणखी एक पर्व येणार आहे जे आपल्या घटनात्मक अधिकार आणि कर्तव्यांचे स्मरण करून देते. ते आहे 14 एप्रिल – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्म जयंती. यावेळी ‘अमृत महोत्सव’ मध्ये तर हा दिवस आणखी खास बनला आहे. मला विश्वास आहे , बाबासाहेबांची ही जन्म जयंती आपण नक्कीच संस्मरणीय बनवू, आपल्या कर्तव्यांचा संकल्प करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करू. याच विश्वासासह तुम्हा सर्वाना सणांच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. तुम्ही सर्व आनंदी रहा, निरोगी रहा, आणि उत्साहाने साजरे करा. याच कामनेसह पुन्हा एकदा आठवण करून देतो "दवाई भी – कड़ाई भी’ . खूप-खूप धन्यवाद .
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! काल माघ पौर्णिमेचा दिवस होता. माघ या महिन्याचा संबंध विशेषत्वानं नद्या, सरोवर आणि जलस्त्रोतांबरोबर असतो, असं मानलं जातं. आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की –
‘‘माघे निमग्नाः सलिले सुशीते, विमुक्तपापाः त्रिदिवम् प्रयान्ति।।’’
याचा अर्थ असा आहे की, माघ महिन्यामध्ये कोणत्याही पवित्र जलाशयामध्ये स्नान करणं, पवित्र मानलं जातं. दुनियेतल्या प्रत्येक समाजामध्ये नदीशी संबंधित काही ना काहीतरी परंपरा असतातच. नदीकाठच्या भागांमध्येच अनेक संस्कृती, वसाहती विकसित झाल्या आहेत. आपली संस्कृती हजारो वर्षांची आहे, त्यामुळे तिचा विस्तार आपल्या इथं खूप जास्त झाला आहे.देशाच्या कोणत्या ना कोणत्या कानाकोप-यामध्ये पाण्याशी संबंधित एखादा उत्सव, सण नाही, असा भारतामध्ये एकही दिवस जाणार नाही. माघातल्या दिवसांमध्ये तर लोक आपलं घर, परिवार, घरातल्या सुख-सुविधा सोडून संपूर्ण महिनाभर नदीकिनारी ‘कल्पवास’ करण्यासाठी जाणारी अनेक मंडळी आहेत. यंदा हरिव्दारमध्ये कुंभही होत आहे. आपल्यासाठी जल म्हणजे जीवन आहे. आस्था आहे आणि विकासाची धारासुद्धा आहे. एकप्रकारे पाणी हे परिसापेक्षा जास्त महत्वपूर्ण आहे. लोखंडाला जर परिसाच्या स्पर्श झाला, तर त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होतं असं म्हणतात. त्याचप्रमाणं पाण्याचा स्पर्श जीवनासाठी जरूरीचा आहे. विकासासाठीही पाण्याची गरज आहे.
मित्रांनो, माघ महिना आणि पाणी यांचा संबंध जोडला जाण्यामागं कदाचित आणखी एक कारण असू शकेल. माघानंतरच थंडी कमी होत जाते आणि उन्हं तापायला लागतं. यासाठी पाण्याच्या बचतीसाठी आपण आत्तापासूनच प्रयत्न सुरू केले पाहिजेत. काही दिवसांनंतर म्हणजे दिनांक 22 मार्च या तारखेला ‘जागतिक जल दिन’ येत आहे.
उत्तर प्रदेशातल्या आराध्या जी यांनी मला लिहिलं आहे की, दुनियेमध्ये कोट्यवधी लोकांना आपल्या जीवनाचा खूप मोठा काळ पाण्याच्या कमतरतेची-अभावाची पूर्तता करण्यासाठीच घालवावा लागतो. ‘पाण्याविना सर्व काही व्यर्थ’ असं उगाच म्हटलेलं नाही. पाणीसंकट सोडविण्यासाठी एक खूप चांगला संदेश पश्चिम बंगालमधल्या उत्तर दीनाजपूर इथल्या सुजीत जी, यांनी मला पाठवला आहे. सुजीत यांनी लिहिले आहे की, निसर्गाने पाण्याच्या रूपानं आपल्या सर्वांना एक सामूहिक भेट दिली आहे. त्यामुळे ती भेट जपून खर्च करण्याची जबाबदारीही सामूहिक आहे. ज्याप्रमाणे सामूहिक भेट आहे, त्याप्रमाणे ती भेट सांभाळण्याची जबाबदारीही सामूहिक, ही गोष्ट तर अगदी योग्य आहे. सुजीत जी, यांचं म्हणणं, एकदम बरोबर आहे. नदी, तलाव, सरोवर, पावसाचं अथवा जमिनीतलं असं सर्व पाणी, प्रत्येकासाठी आहे.
मित्रांनो, एके काळी गावामध्ये असलेल्या विहिरी, वाव, पोखर, गावतळी यांची देखभाल सर्व गावकरी मिळून करीत असत. आत्ताही असाच प्रयत्न तामिळनाडूतल्या तिरूवन्नामलाई इथं होत आहे. इथल्या स्थानिक लोकांनी आपल्या विहिरी संरक्षित करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. हे लोक आपल्या भागातल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या सार्वजनिक विहिरींना पुन्हा एकदा जीवंत करीत आहेत.
मध्य प्रदेशातल्या अगरोथा गावातल्या बबीता राजपूत जी जे काही करीत आहेत, त्यापासून आपल्या सर्वांनाच प्रेरणा मिळेल. बबीताजींचे गाव बुंदलखंडात आहे. त्यांच्या गावाजवळच आधी एक खूप मोठा तलाव होता. तो तलाव सुकून गेला. त्यांनी गावातल्याच इतर महिलांना बरोबर घेऊन त्या तलावापर्यंत पाणी घेऊन जाण्यासाठी एक कालवा बनवला. या कालव्याच्या माध्यमातून पावसाचं पाणी थेट तलावामध्ये जायला लागलं. आता हा तलाव पाण्यानं भरलेला असतो.
मित्रांनो, उत्तराखंडच्या बागेश्वरमध्ये वास्तव्य करणारे जगदीश कुनियाल जी यांनी केलेल्या कामातूनही खूप काही शिकता येणार आहे. जगदीशजी यांचं गाव आणि आजू-बाजूचा परिसर पाण्याची गरज भागविण्यासाठी नैसर्गिक स्त्रोतांवर अवलंबून होता. परंतु काही वर्षे झाली, हे नैसर्गिक स्त्रोत आटून गेले. यामुळं त्यांच्या संपूर्ण भागामध्ये पाण्याचं संकट अधिकाधिक बिकट बनायला लागलं. जगदीशजी यांनी या संकटावर उत्तर म्हणून वृक्षारोपण करण्याचा दृढनिश्चय केला. त्यांनी संपूर्ण परिसरामध्ये गावातल्या लोकांना बरोबर घेऊन हजारों रोपांची-वृक्षांची लागवड केली आणि आज त्यांच्या भागामध्ये जो आटलेला जलस्त्रोत होता, तो आता पुन्हा पाण्यानं भरला आहे.
मित्रांनो, पाण्याच्याबाबतीत आपण अशा पद्धतीनं आपली सामूहिक जबाबदारी जाणून घेतली पाहिजे. भारताच्या बहुतांश भागामध्ये मे-जूनमध्ये पावसाला प्रारंभ होतो. आपल्या परिसरातल्या जलस्त्रोतांची स्वच्छता करण्यासाठी आणि येणा-या पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी, आपण सर्वजण आत्तापासूनच 100 दिवसांचं एखादं अभियान सुरू करू शकतो का? हाच विचार करून आता काही दिवसांतच जलशक्ती मंत्रालयाच्यावतीनंही जल शक्ती अभियान म्हणजेच ‘कॅच द रेन’ ही सुरू करण्यात येणार आहे. या अभियानाचा मूलमंत्र आहे, – ‘‘कॅच द रेन, व्हेअर इट फॉल्स, व्हेन इट फॉल्स’’ या मोहिमेसाठी आपण आत्तापासूनच काम सुरू करूया. आापल्याकडं ज्या आधीपासूनच रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम आहेत, त्यांची दुरूस्ती करून घ्यायची आहे. गावांची, तलावांची, पोखर,वाव यांची स्वच्छता करून घेऊ. जलस्त्रोतांपर्यंत जात असलेल्या पाण्यामध्ये जर कुठे अडथळा येत असेल, तर ते दूर करूया आणि जास्तीत जास्त पावसाच्या पाण्याचा संचय कसा होईल, याकडे लक्ष देऊया.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ज्यावेळी माघ महिना आणि त्याच्या आध्यात्मिक, सामाजिक महत्वाची चर्चा होते, त्यावेळी ती चर्चा एक नावाशिवाय पूर्णच होत नाही. हे नाव आहे- संत रविदास जी यांचं! माघ पौर्णिमेला संत रविदास जी यांची जयंती असते. आजही संत रविदास जींचे शब्द, त्यांचे ज्ञान, आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यांनी म्हटलं होतं की –
एकै माती के सभ भांडे,
सभ का एकौ सिरजनहार।
रविदास व्यापै एकै घट भीतर,
सभ कौ एकै घडै़ कुम्हार ।।
याचा अर्थ असा आहे की, आपण सर्वजण एकाच मातीनं बनलेली भांडी आहोत. आपल्या सर्वांना एकानंच बनवलंय-घडवलंय. संत रविदासजी यांनी समाजामध्ये असलेल्या विकृतीविषयी नेहमीच मोकळेपणानं आपलं मनोगत व्यक्त केलंय. त्यांनी त्या विकृती समाजासमोर मांडल्या. त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी मार्ग दाखवला आणि म्हणूनच मीरा जी यांनी रविदास यांच्याविषयी म्हटलं होतं –
‘‘गुरू मिलिया रैदास, दीन्हीं ज्ञान की गुटकी’’।
संत रविदास यांचं जन्मस्थान असलेल्या वाराणसी या क्षेत्राबरोबर माझा खूप मोठा संबंध आहे, हे मी स्वतःचं भाग्य मानतो. संत रविदास जी यांनी जीवनामध्ये गाठलेली आध्यात्मिक उंची आणि त्यांच्याठायी असलेली अपार ऊर्जा यांचा अनुभव मी वाराणसी या तीर्थक्षेत्री घेतला आहे. मित्रांनो, रविदास सांगत होते-
करम बंधन में बन्ध रहियो, फल की ना तज्जियो आस।
कर्म मानुष का धर्म है, सत् भाखै रविदास ।।
याचा अर्थ असा की, आपण निरंतर आपलं कर्म करीत राहिलं पाहिजे, मग त्याचं फळ तर नक्कीच मिळेल. म्हणजेच कर्मानं सिद्धी साध्य होतेच. संत रविदास यांची आणखी एक गोष्ट आजच्या युवावर्गानं जरूर शिकली पाहिजे. युवकांनी कोणतंही काम करताना, स्वतःला, जुन्या पद्धती, रिती यांच्यामध्ये स्वतःला अडकवून घेता कामा नये. आपल्या जीवनात, नेमकं कोणतं काम करायचंय , कसं करायचंय, हे स्वतःच ठरवावं. कामाची पद्धतही आपण स्वतःच निश्चित करावी. आपलं लक्ष्यही स्वतः ठरवावं. जर आपली सद्सद्विवेकबुद्धी आणि आत्मविश्वास मजबूत असेल तर मग तुम्हाला दुनियेतल्या कोणत्याही गोष्टीला घाबरण्याची गरज नाही. असं मी का सांगतोय, हे जाणून घ्या. पूर्वापार सुरू असलेल्या पद्धतीप्रमाणं काम करणं अनेकवेळा युवकांना खरोखरीच आवडत नाही, तरीही त्यामध्ये बदल कसा काय करायचा- असा विचार करून आपल्याकडचे युवक दबावामुळं मनपसंत काम करू शकत नाहीत, हे मी पाहिलं आहे. वास्तविक तुम्हा मंडळींना कधीही नवा विचार करणं, नवीन काही काम करणं यासाठी संकोच वाटता कामा नये. संत रविदास जी यांनी आणखी एक महत्वपूर्ण संदेश दिला आहे. हा संदेश आहे, तो म्हणजे- ‘‘आपल्या पायावर उभं राहणं’’ आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपण दुस-या कुणावर तरी अवलंबून रहावं, हे तर अजिबातच बरोबर नाही. जे काही- जसं आहे, तसंच सुरू रहावं, असं रविदासजींना कधीच वाटत नव्हतं. आणि आज आपण पाहतो की, देशातले युवकही असा विचार कधीच करणार नाहीत. आज ज्यावेळी देशातल्या युवकांमध्ये मी नवसंकल्पनांचे चैतन्य पाहतो, त्यावेळी वाटतं की, आमच्या युवकांविषयी संत रविदासजींना नक्कीच अभिमान वाटला असता.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ही आहे. आजचा दिवस भारताचे महान वैज्ञानिक, डॉक्टर सी.व्ही. रमण यांनी शोधून काढलेल्या ‘रमण इफेक्ट’ला समर्पित आहे. केरळच्या योगेश्वरन यांनी ‘नमोॲप’वर लिहिलं आहे की, रमण इफेक्टच्या शोधामुळं संपूर्ण विज्ञानाची दिशाच बदलली गेली होती. यासंबंधित एक खूप चांगला संदेश मला नाशिकच्या स्नेहीलजी यांनीही पाठवला आहे. स्नेहीलजी यांनी लिहिलं आहे की, आपल्या देशात अगणित संशोधक आहेत, त्यांनी दिलेल्या योगदानाशिवाय विज्ञानामध्ये इतकी प्रगती झाली नसती. आपल्याला दुनियेतल्या इतर वैज्ञानिकांची माहिती असते, तशीच आपण भारतातल्या संशोधकांची माहितीही जाणून घेतली पाहिजे. ‘मन की बात’च्या या श्रोत्यांनी व्यक्त केलेल्या मताशी मीही सहमत आहे. आपल्या युवकांनी भारतातल्या संशोधकांचा इतिहास- आमच्या वैज्ञानिकांनी केलेलं कार्य याविषयी माहिती वाचावी आणि त्यांना जाणून घ्यावं, अशी माझीही इच्छा आहे.
मित्रांनो, ज्यावेळी आपण विज्ञान-शास्त्र याविषयावर बोलतो, त्यावेळी लोकांना भौतिक-रसायन शास्त्र अथवा प्रयोगशाळा यांच्यापुरता हा विषय सीमित आहे असं वाटतं. मात्र विज्ञानाचा विस्तार त्यापेक्षा खूप प्रचंड आहे आणि ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ मध्ये तर विज्ञानाच्या शक्तीचे खूप जास्त योगदानही आहे. आपण विज्ञानाला ‘लॅब टू लँड’ म्हणजेच ‘प्रयोगशाळेपासून ते भूमीपर्यंत’ असा मंत्र मानून पुढं नेलं पाहिजे.
यासंदर्भात उदाहरण म्हणून हैद्राबादच्या चिंतला वेंकट रेड्डी यांचं देता येईल. रेड्डी जी यांच्या एका डॉक्टर मित्रानं त्यांना एकदा ‘विटामिन-डी’ च्या कमतरतेमुळं होणारे आजार आणि त्याचे धोके, यांच्याविषयी सांगितलं. रेड्डी जी शेतकरी आहेत. त्यांनी या समस्येवर उपाय योजना म्हणून आपण काय करू शकतो? यावर विचार करायला सुरूवात केली. त्यांनी खूप परिश्रम केले आणि गहू, तांदूळ या पिकांचे ‘विटामीन-डी’ युक्त वाण विकसित केलं. याच महिन्यामध्ये जिनिव्हाच्या ‘जागतिक बौद्धिक संपदा संघटनेकडून त्यांनी विकसित केलेल्या पिकांच्या वाणांचे बौद्धिक स्वामित्वही त्यांना मिळालं आहे. अशा संशोधक वेंकट रेड्डी यांना आमच्या सरकारनं गेल्या वर्षी पद्मश्रीचा पुरस्कार देऊन गौरवलं होतं.
अशाच अनेक नवसंकल्पना प्रत्यक्षात आणून लडाखचे उरगेन फुत्सौग काम करीत आहेत. उरगेनजी इतक्या उंचस्थानीही सेंद्रीय पद्धतीने शेती करून जवळपास 20 प्रकारची पिके घेतात. चक्राकार पद्धतीनं ते शेती करतात. म्हणजेच एका पिकाच्या वाया जाणा-या कच-याचा ते दुस-या पिकासाठी खत म्हणून वापर करतात. आहे की नाही कमाल?
याच पद्धतीनं गुजरातमधल्या पाटण जिल्ह्यात कामराज भाई चौधरी यांनी घरामध्येच शेवग्याचं अतिशय चांगले बियाणं विकसित केलं आहे. शेवग्याला काही लोक सहजन किंवा सर्गवा, मोरिंगा असंही म्हणतात. इंग्लिशमध्ये याला ‘ड्रम स्टिक’ असं म्हणतात. जर चांगलं बियाणं असेल तर झाडाला खूप शेवग्याच्या शेंगा लागतात. शेंगांचा दर्जाही चांगला असतो. आपल्या शेवग्याच्या शेंगा आता तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पाठवून त्यांनी उत्पन्न वाढवलंय.
मित्रांनो, आजकाल चिया सीडस् हे नाव तुम्ही लोकांनी खूप ऐकलं असेल. आरोग्याविषयी जे जागरूक आहेत, त्या लोकांना चिया सीडचं महत्व वाटतं. जगभरातून त्याला खूप मोठी मागणी आहे. भारतामध्ये बहुतांश प्रमाणात चिया सीड बाहेरून मागवले जाते. परंतु आता चिया सीडस् बाबतीत आत्मनिर्भर बनण्याचा संकल्पही अनेक लोकांनी केला आहे. अशाच प्रकारे उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी इथल्या हरिश्चंद्र जी यांनी चिया सीडस्ची शेती सुरू केली आहे. चिया सीडस्च्या शेतीमुळे त्यांच्या कृषी उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे आणि आत्मनिर्भर भारत अभियानालाही मदत मिळणार आहे.
मित्रांनो, कृषी कच-यातून संपत्ती निर्माण करण्याचेही अनेक प्रयोग देशभरामध्ये यशस्वी होत आहेत. ज्याप्रमाणे मदुराईच्या मुरूगेसन जी यांनी केळाच्या कच-यापासून दोरखंड बनविण्याचे यंत्र तयार केलं आहे. मुरूगेसनजी यांच्या या नवसंकल्पनेमुळे पर्यावरण आणि कचरा यांच्या समस्येवर उपाय मिळणार आहे तसंच शेतकरी बांधवांना अतिरिक्त उत्पन्न कमावण्याचा मार्गही मिळणार आहे.
मित्रांनो, ‘मन की बात’ च्या श्रोत्यांना इतक्या सर्व लोकांविषयी माहिती देण्यामागं माझा हेतू हाच आहे की, आपण सर्वांनी या वेगळं काम करणा-या लोकांकडून प्रेरणा घ्यावी. ज्यावेळी देशाचा प्रत्येक नागरिक आपल्या जीवनामध्ये विज्ञानाचा विस्तार करेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये विज्ञान येईल, त्यावेळी प्रगतीचे मार्गही मुक्त होणार आहेत आणि देश आत्मनिर्भर बनणार आहे. अशा अनेक गोष्टी देशाचा प्रत्येक नागरिक करू शकतो, असा मला विश्वास आहे.
माझ्या प्रिय मित्रांनो, कोलकाताचे रंजन जी यांनी आपल्या पत्रामध्ये खूप चांगला आणि मूलभूत म्हणावा असा प्रश्न उपस्थित केला आहे आणि त्याचबरोबर एका चांगल्या पद्धतीनं त्या प्रश्नाला उत्तर देण्याचाही प्रयत्न केला आहे. रंजन जी यांनी लिहिलं आहे, ज्यावेळी आपण आत्मनिर्भर होण्याची चर्चा करतो, त्यावेळी त्याचा आमच्यासाठी नेमका काय अर्थ असतो? या प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्यांनीच पुढं लिहिलं आहे की, – ‘‘ आत्मनिर्भर भारत अभियान’ केवळ सरकारी धोरण नाही, तर एक राष्ट्रीय चैतन्य आहे. त्यांना असं वाटतं की, आत्मनिर्भर होण्याचा अर्थ असा आहे की, आपल्या नशीबाचा निर्णय स्वतः करणं-घेणं. याचाच अर्थ आपण स्वतःच आपल्या भाग्याचे नियंता होणं. आपल्या जीवनाचं शिल्पकार आपणच होणं. रंजनबाबू यांचं म्हणणं अगदी शंभर टक्के योग्य आहे. त्यांचं हे म्हणणं मी पुढे नेत असंही म्हणतो की, आत्मनिर्भरतेची पहिली अट असते – आपल्या देशाच्या वस्तूंविषयी, मालाविषयी अभिमान बाळगणे. आपल्या देशातल्या लोकांनी बनविलेल्या वस्तूंचा अभिमान वाटणं. ज्यावेळी प्रत्येक देशवासीयाला असा अभिमान वाटेल, त्यावेळी देशवासी त्या वस्तूशी जोडला जाईल आणि मग आत्मनिर्भर भारत बनेल. फक्त हे एक आर्थिक अभियान राहणार नाही. ते एक राष्ट्रीय चैतन्य बनेल. ज्यावेळी आपण आकाशामध्ये आपल्या देशामध्ये बनवलेल्या तेजस लढाऊ विमानांची उत्तुंग भरारी आणि कलाकारी पाहतो, ज्यावेळी भारतामध्ये बनलेले रणगाडे, भारतामध्ये बनलेली क्षेपणास्त्रे, पाहतो, त्यावेळी आपल्याला गौरव वाटतो. ज्यावेळी समृद्ध देशांमध्ये आपण मेट्रो ट्रेनमध्ये ‘मेड इन इंडिया’ असा शिक्का असलेले कोच पाहतो, ज्यावेळी डझनभर देशांमध्ये ‘मेड इन इंडिया’ कोरोनाची लस पोहोचताना पाहतो, त्यावेळी आमची मान अभिमानानं अधिक उंचावते. असं नाही की, मोठ-मोठ्या गोष्टींमुळेच भारताला आत्मनिर्भरता येईल. भारतामध्ये बनणारे कापड, भारतातल्या प्रतिभावंत कारागिरांनी बनविलेल्या हस्तकलेच्या वस्तू, भारतातली इलेक्ट्रॉनिक उपकरणं, भारतात बनणारे मोबाइल, प्रत्येक क्षेत्रामध्ये, आपल्याला गौरव वाढवायचा आहे. ज्यावेळी आपण असा विचार करून पुढची वाटचाल करणार आहोत, त्याचवेळी ख-या अर्थाने देश आत्मनिर्भर बनणार आहे. आणि मित्रांनो, आत्मनिर्भर भारताचा हा मंत्र, देशातल्या गावां-गावांमध्ये पोहोचतोय, याचा मला आनंद होत आहे. बिहारमधल्या बेतियामध्येही असंच झालं आहे. याविषयीची माहिती मला प्रसार माध्यमांतून वाचायला मिळाली.
बेतियाचे रहिवासी प्रमोदजी दिल्लीत एका एलईडी बल्ब बनविणाऱ्या कारखान्यात तंत्रज्ञ म्हणून काम करायचे, कारखान्यात काम करत असताना त्यांनी ही संपूर्ण निर्मिती प्रक्रिया व्यवस्थित समजून घेतली. परंतु कोरोनना काळात प्रमोद जी यांना त्यांच्या घरी परत जावे लागले. प्रमोद जी घरी परत आल्यावर त्यांनी काय केले हे तुम्हाला माहित आहे का? त्यांनी एलईडी बल्ब तयार करण्याचा स्वतःचा एक छोटासा कारखाना सुरु केला. त्यांनी या कामात आपल्या परिसरातील काही तरुणांना सोबत घेतले घेतले आणि काही महिन्यांमध्येच कारखान्यात काम करणारा एक कामगार ते कारखान्याचा मालक असा प्रवास पूर्ण केला. तोही आपल्या स्वतःच्या घरात राहून.
अजून एक उदाहरण आहे- उत्तरप्रदेशातील गढमुक्तेश्वर मधील. गढमुक्तेश्वर येथे राहणाऱ्या संतोष जी यांनी कोरोना काळातील संकटाचे रूपातंर कसे संधीत केले हे त्यांनी एका पत्राद्वारे आम्हाला कळवले. संतोषजी यांचे पूर्वज हुशार कारागीर होते, ते चटई बनवायचे. कोरोना काळात जेव्हा सर्व कामकाज ठप्प झाले होते तेव्हा या लोकांनी उत्साहाने चटई बनविण्याचे काम सुरू केले. आणि अगदी अल्पावधीतच त्यांना केवळ उत्तर प्रदेशमधूनच नव्हे तर इतर राज्यांकडूनही त्यांच्या चटईला मागणी वाढू लागली. या भागातील शेकडो वर्ष जुन्या सुंदर कलेलाही यामुळे एक नवीन पाठबळ मिळाल्याचे संतोष जी यांनी सांगितले आहे.
मित्रांनो, देशभरात अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे लोक 'आत्मनिर्भर भारत अभियान’ मध्ये अशाच प्रकारे आपले योगदान देत आहेत. आज सर्वसामान्यांच्या हृदयात वाहणारी ही एक भावना बनली आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मी नामोॲपवर गुडगाव येथे राहणारे मयूर यांची एक मनोरंजक पोस्ट पहिली. ते पक्षी निरीक्षक आणि निसर्ग प्रेमी आहेत. मी हरियाणामध्ये राहतो, परंतु, तुम्ही आसाम आणि विशेषतः काझीरंगा येथे राहणाऱ्या लोकांविषयी बोलावे अशी माझी इच्छा आहे असे त्यांनी पोस्ट मध्ये लिहिले आहे. मला वाटले मयूरजी तिथले गौरव असणाऱ्या गेंड्या (रिनोस) बद्दल बोलतील परंतु त्यांनी काझीरंगामधल्या पाण पक्षांच्या (वॉटर-फॉउल्स) वाढलेल्या आकड्यासाठी त्यांनी आसामच्या लोकांचे कौतुक केले. वॉटर-फॉउल्सला सोप्या शब्दात काय म्हणतात याचा मी शोध घेत होतो, तेव्हा मला एक शब्द सापडला – पाणपक्षी. असे पक्षी ज्यांचे घरटे झाडांवर नाही तर पाण्यावर आहेत, जसे बदके इत्यादी. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प प्राधिकरण मागील काही काळापासून पाण पक्ष्यांची वार्षिक गणना करत आहे. या गणनेत पाण पक्ष्यांची संख्या आणि त्यांचे आवडते निवासस्थान याची माहिती मिळते. दोन-तीन आठवड्यांपूर्वी पुन्हा सर्वेक्षण केले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वेळी पाण पक्ष्यांची संख्या सुमारे एकशे पंचाहत्तर (175) टक्क्यांनी वाढली आहे हे जाणून तुम्हालाही आनंद होईल. या गणनेदरम्यान काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पक्ष्यांच्या एकूण 112 प्रजाती पाहायला मिळाल्या. यापैकी 58 प्रजाती या युरोप, मध्य आशिया आणि पूर्व आशियासह जगाच्या विविध भागांमधून आलेले हिवाळी स्थलांतरित पक्षी आहेत. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे येथे मोठ्या प्रमाणात जलसाठा असण्या सोबतच मानवी हस्तक्षेप फारच कमी आहे. काही ठिकाणी, सकारात्मक मानवी हस्तक्षेप देखील खूप महत्वाचा आहे.
आसामचे जादव पायेंग यांचीच गोष्ट पहा. आपल्यातील काही लोकांना त्यांच्याबद्दल माहित देखील असेल. त्यांच्या कामांसाठी त्यांना पद्म पुरस्कार मिळाला आहे. जादव पायेंग यांनी आसाममधील माजुली बेटात सुमारे 300 हेक्टर क्षेत्रात वृक्षारोपण कार्यात सक्रिय योगदान दिले आहे. ते वन संवर्धनासाठी काम करतात तसेच ते लोकांना वृक्षारोपण आणि जैवविविधता संवर्धनासाठी प्रेरित देखील करतात.
मित्रांनो, आसाममधील मंदिरे देखील निसर्ग संवर्धनात आपली स्वतःची एक वेगळी भूमिका बजावत आहेत, जर तुम्ही लक्षपूर्वक पहिले तर इथल्या प्रत्येक मंदिराच्या परिसरात तुम्हाला एक तलाव दिसेल. हाजो येथील हयाग्रीव मधेब मंदिर, सोनीतपूर येथील नागाशंकर मंदिर आणि गुवाहाटी येथील उग्रतारा मंदिराच्या जवळ अशी अनेक तळी आहेत. कासव्यांच्या नामशेष होत असलेल्या प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी या तळ्यांचा उपयोग केला जात आहे. आसाममध्ये कासवांची सर्वाधिक प्रजाती आहेत. कासवांचे संवर्धन, प्रजनन व प्रशिक्षण यासाठी मंदिरांतील हे तलाव एक उत्कृष्ट स्थान बनू शकतात.
माझ्या प्रिय देशवासियांनो, काही लोकांना असे वाटते की नवनिर्मितीसाठी वैज्ञानिक असणे आवश्यक आहे, तर काहींना असे वाटते की इतरांना काहीतरी शिकवण्यासाठी शिक्षक असणे गरजेचे आहे. ज्यांना या विचाराला आव्हान देणारी लोकं नेहमीचे कौतुकास पात्र असतात. आता हेच बघा, एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला सैनिक बनण्याचे प्रशिक्षण देत असेल तर त्याचे स्वतःचे सैनिक असणे आवश्यक आहे का? तुम्ही विचार करत असाल, हो आवश्यक आहे. पण इथेच थोडीसी कलाटणी आहे.
कमलाकांत यांनी MyGov वर एक मीडिया रिपोर्ट सामायिक केला आहे ज्यामध्ये काहीतरी वेगळेच म्हटले आहे. ओडिशाच्या अरखुडा मध्ये एक गृहस्थ आहेत – नायक सर | त्याचे खरे नाव आहे सिलू नायक पण सर्वजण त्यांना नायक सर म्हणतात. वास्तविक ते मॅन ऑन अ मिशन आहेत. सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना ते मोफत प्रशिक्षण देतात. नायक सरांच्या संघटनेचे नाव महागुरु बटालियन असे आहे. इथे शारीरिक स्वास्थ्यापासून ते मुलाखती पर्यंत आणि लेखनापासून ते प्रशिक्षणा पर्यंत सर्व गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांनी ज्या लोकांना प्रशिक्षण दिले आहे त्यांनी सैन्य, नौदल, हवाई दल, सीआरपीएफ, बीएसएफ सारख्या दलांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. सिल्लू नायक यांनी स्वतः ओडिशा पोलिस दलात भरती होण्यासाठी करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांना यश मिळाले नाही, असे असूनही, त्यांनी त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणाच्या आधारे अनेक तरुणांना देश सेवेसाठी पात्र केले आहे हे ऐकून देखील तुम्हाला आश्चर्य वाटेल. चला, आपण सर्वजण नायक सरांना आपल्या देशासाठी आणखी नायक तयार करण्यासाठी शुभेच्छा देऊया.
मित्रांनो, कधीकधी अगदी छोटे आणि साधे प्रश्न देखील आपले मन विचलित करतात. हे प्रश्न फार खूप मोठे नसतात, अगदी सोपे असतात तरीदेखील ते आपल्याला विचार करायला भाग पाडतात. काही दिवसांपूर्वी हैदराबादच्या अपर्णा रेड्डी यांनी मला असाच एक प्रश्न विचारला. तुम्ही इतकी वर्षे पंतप्रधान आहात आहेत, इतकी वर्षे मुख्यमंत्री होता, तुम्हाला असे कधी वाटले का की काहीतरी उणीव राहिली आहे? असा प्रश्न त्यांनी मला विचारला. अपर्णा जी यांचा प्रश्न अगदी सोपा पण तितकाच कठीण आहे. या प्रश्नावर मी विचार केला तेव्हा माझ्या लक्षात