Text Speeches

While addressing the Economic Times World Leaders Forum 2026, PM Modi highlighted India's next-generation reform journey, from governance and policy reforms to Ease of Living and Ease of Doing Business. He underlined how these reforms are driving growth, creating opportunities and strengthening India's foundation for a Viksit Bharat.
August 21, 2026
शेअर करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित केले. त्यांनी देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ‘वंदे मातरम्’च्या 150व्या वर्षपूर्तीचा उत्सव साजरा करत असताना देशभरातील प्रत्येक घर आणि प्रत्येक हृदयात तिरंग्याची भावना आणि नव्या संकल्पांचा उत्साह प्रतिबिंबित होत असल्याचे त्यांनी सांगितले. “त्यागाची महान परंपरा जागृत करणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना आणि महान क्रांतिकारकांना मी आदरपूर्वक नमन करतो,” असे मोदी यावेळी म्हणाले.
August 15, 2026
शेअर करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या “ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक: माय लाइफ, माय स्ट्रगल्स” (Triumph of the Indian Republic: My Life, My Struggles) या आत्मचरित्राचे प्रकाशन केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, “आज आपल्याला रामनाथ कोविंद जी यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्याची संधी मिळाली आहे आणि मी या कार्यक्रमाचा एक भाग बनलो याचा मला आनंद आहे.”
August 12, 2026
शेअर करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय पदकविजेत्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी गेल्या दशकभरात भारतीय क्रीडा क्षेत्रात झालेल्या स्थित्यंतराचा आढावा घेतला आणि आपल्या 12 ते 13 वर्षांच्या कार्यकाळात राष्ट्रीय खेळाडूंना आपल्या निवासस्थानी आमंत्रित करणे ही एक नियमित आणि अभिमानास्पद परंपरा झाल्याचे अधोरेखित केले.
August 10, 2026
शेअर करा
तप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) दिल्ली संकुलाच्या 57 व्या पदवीदान समारंभाला संबोधित केले. या समारंभाचे भावनिक महत्त्व त्यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केले. या संकुलातील प्रफुल्ल आणि स्वप्नांनी भारलेल्या वातावरणाचे स्मरणही त्यांनी करून देले. जगभरात आलेल्या कोविड साथरोगाच्या काळात आपण दूरस्थ पद्धतीने अशाच समारंभाला उपस्थित राहिल्याच्या आठवणींना त्यांनी यानिमित्ताने उजाळा दिला. आता पदवीधर होत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष उपस्थित राहता आल्याबद्दल आपल्या
August 08, 2026
शेअर करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'नशामुक्त युवा - विकसित भारत संकल्प अभियाना'चा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शुभारंभ केला. यावेळी संबोधित करताना त्यांनी, 28,000 हून अधिक ठिकाणांहून जोडल्या गेलेल्या एक कोटीहून अधिक युवा नागरिकांसह उपस्थित विविध जनसमुदायाचे औपचारिक स्वागत केले. या क्षणाचे सामूहिक गांभीर्य व महत्त्व अधोरेखित करत त्यांनी, यातून सखोल राष्ट्रीय कटिबद्धता दिसून येत असल्याचे नमूद केले. "आज आपण सर्व देशवासीय एका महान आणि महत्त्वाच्या संकल्पासाठी एकत्र आलो आहोत," असे पंतप्रधान म्हणाले.
August 02, 2026
शेअर करा
सर्वप्रथम मी म्हैसूरच्या अधिष्ठात्री देवी माता चामुंडेश्वरी यांना साष्टांग प्रणाम करतो. अवघ्या दोन दिवसांपूर्वी आपण सर्वांनी गुरुपौर्णिमा साजरी केली. आपण सर्व जाणता की, माझ्या जीवनप्रवासाची सुरुवात जिथून झाली आणि आज मी ज्या स्थानावर आहे, त्या प्रवासात रामकृष्ण मिशनचे अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. तीन महिन्यांपूर्वी मला हावडा येथील बेलूर मठाला भेट देण्याची संधी मिळाली होती.
August 01, 2026
शेअर करा
पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशमध्ये सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले, ज्यामध्ये विकसित भारताचे एक विकास इंजिन म्हणून राज्याच्या होत असलेल्या उदयावर भर देण्यात आला. जागतिक दर्जाची कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिकपासून ते सेमीकंडक्टर्स, एआय, हरित ऊर्जा आणि उत्पादनापर्यंत, पंतप्रधान मोदींनी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि आंध्र प्रदेशच्या विकासाला गती देण्याचा दृष्टिकोन मांडला.
August 01, 2026
शेअर करा
PM Modi today interacted with participants of the Viksit Vibrant Village Programme 2026, lauding the young friends of MY Bharat for their commendable work across the country. He highlighted the official redesignation of border settlements from the 'last' to the 'first villages' of India, noted the newly established infrastructure and praised the local inhabitants for living and breathing patriotism.
July 26, 2026
शेअर करा