
मी अनेक पंतप्रधानांसोबत काम केले आहे. पण नरेंद्र मोदीजींसारखा नेता मात्र मी कधीही पाहिलेला नाही. ते विश्रांती न घेता किंवा जराही उसंत न घेता सतत काम करत असताता. मोदीजींनी अनेक अभूतपूर्व सुधारणा घडवून आणल्या आहेत. परिणामी, आज जगभरात भारताला आदराचे स्थान प्राप्त झाले आहे. भारत खंबीर आहे आणि भारत प्रगतीशील आहे. 2047 पर्यंत, स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षापर्यंत, भारत जगातील पहिल्या क्रमांकाची महासत्ता म्हणून पुढे येईल. हे केवळ नरेंद्र मोदीजींमुळेच शक्य झाले आहे.

मोदीजी हे अत्यंत समर्पितपणे देशाची सेवा करणारे अद्वितीय नेते आहेत. यात मला अजिबात शंका नाही. 21 वे शतक मोदीजींचे आहे. ते योग्य स्थानी असलेले योग्य नेते आहेत. देशाला नरेंद्र मोदीजींसारखा नेता मिळाला हे त्याचे खूप मोठे भाग्य आहे. आम्हाला याचे खूप समाधान आहे.

त्यांच्या धाडसी सुधारणांमुळे मला भारताबद्दल मोठ्या प्रमाणात आशा आहे. उदाहरणार्थ, सर्वांनी भारताला सांगितले की मोठ्या प्रमाणावर डिजिटल ओळख करता येऊ शकणार नाही... परंतु भारताने त्यांचे म्हणणे चुकीचे होते हे सिद्ध केले.

जगातील सर्वात मोठी लोकशाही. 2028 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर असलेल्या भारताचे नुसते प्रमाणच पहा. आम्ही म्हणजे यूके त्या प्रवासात भागीदार होण्याच्यादृष्टीने अगदी योग्य स्थितीत आहोत. आम्हाला भविष्यातील क्षेत्रे आणि कौशल्यांची एकत्रितपणे उभारणी करायची आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाला प्रकाशझोतात आणण्यात त्यांनी (पीएम मोदींनी) बजावलेल्या भूमिकेबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर केला जावा यासाठी पुढाकार घेऊन, त्यांनी योगाच्या अभूतपूर्व प्रसारात योगदान देऊन त्यामुळे सर्वांचेच भले होऊ शकते हे त्यांनी अधोरेखित केले.

नरेंद्रभाईंच्या नेतृत्वशैलीत समावेशकता लगेच दिसून येते. ‘मन की बात’ हा उपक्रम शासनाच्या अवाढव्य यंत्रणेतील एक लहानशी गोष्ट वाटू शकतो, परंतु ती खोलात जाऊन तपशीलवार सांगण्याची गोष्ट आहे. सामान्य नागरिकाशी थेट संवाद साधून, ते त्यांच्याशी एकरूप होऊन त्यांच्या कथा, संघर्ष आणि योगदानाचे आनंदाने कौतुक करतात. यामुळे ते जमिनीशी, अगदी साध्या स्थितीतील लोकांशी जोडलेले राहतात आणि त्यांचा कारभार हा त्यावर योग्य प्रतिसाद देऊन काम करेल हे ते सुनिश्चित करतात.

"वसुधैव कुटुंबकम" आणि "सर्व भवन्तु सुखिनः" हे नेहमीच भारतीय संस्कृतीचे आदर्श राहिले आहेत. भारताचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी या मूल्यांचे खरोखर मूर्त रूप आहेत. सामान्य परिस्थितीतून पुढे येत जागतिक राजकारणाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचण्यापर्यंत- त्यांचे जीवन समर्पण, दृढनिश्चय आणि प्रयत्नांची प्रेरणादायी गाथा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने विकास, आत्मनिर्भरता आणि सांस्कृतिक पुनर्जागरणात उल्लेखनीय प्रगती केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारताने जागतिक स्तरावर अधिक समावेशक आणि सहकारी मानवतेच्या रोड मॅपचे पुनः पुन्हा दर्शन घडवले आहे.

नेहमीच समावेशकतेची वृत्ती जपणाऱ्या भारताने स्वतःसाठी नरेंद्र मोदी यांच्यासारखा साजेसा नेता निवडला आहे, मूलभूतपणे त्याची मूल्ये समान आहेत. अनेक अर्थांनी, भारताने आपल्या नेत्याची जी कल्पना केली होती अगदी तसेच आपली मूळ नीतीमूल्ये, आपले उपजत संस्कार जपणारे आहेत

आजचा दिवस 1.45 अब्ज भारतीयांसाठी सणासारखाच दिवस आहे. आपले सर्वात आदरणीय आणि प्रिय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी जी यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. भारतातील संपूर्ण व्यावसायिक समुदायाच्या वतीने, रिलायन्स परिवार आणि अंबानी कुटुंबाच्या वतीने मी पंतप्रधान मोदीजींना शुभेच्छा व्यक्त करतो. मोदीजींचा अमृत महोत्सव भारताच्या अमृत कालमध्ये येणे हा योगायोग नाही. स्वतंत्र भारताला 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हाही मोदीजींच भारताची सेवा करत रहावे अशी माझी मनापासून इच्छा आहे.

राजकारणाच्या पलीकडे, मोदी हिमाचलला नेहमीच 'देवभूमी' मानत आले आहेत. ते डोंगरांवरच्या मंदिरांमध्ये झाडाखाली बसून खूप वेळ ध्यान साधना करत असत. निसर्ग आणि ईश्वरावर असलेली त्यांची गाढ श्रद्धा त्यांचे जीवन आणि कार्यशैली दोन्हींमधून प्रत्ययास येते.

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचा - एक समर्पित कार्यकर्ता ते देशाच्या सर्वोच्च नेतृत्वस्थाना पर्यंतचा जीवनप्रवास म्हणजे भारताच्या विविध प्रदेशांशी असलेल्या त्यांच्या खोलवर संबंधांची गाथा आहे.