राज्यसभा खासदार आणि गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री, श्री नरहरी अमीन जी यांनी नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान होण्यापूर्वी गुजरातमधील त्यांच्या कर्मचार्यांचा निरोप घेताना त्यांना दिलेल्या अनोख्या भेटीबद्दल सांगितले. नरेंद्र मोदींनी त्यांना गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मिळालेले वेतन आणि इतर काही आर्थिक ठेवींच्या पावत्यांची रक्कम वाटून टाकली होती याचा खुलासा त्यांनी केला.
श्री नरहरी अमीन जी म्हणाले की, नरेंद्र मोदींना मिळालेले सुमारे रु. 35 ते 40 लाख एवढे संपूर्ण अतिरिक्त उत्पन्न, त्यांनी गुजरातमध्ये 12 वर्षे त्यांच्यासोबत काम केलेल्या सुरक्षा अधिकारी, शिपाई, स्वयंपाकी आणि रखवालदार यांना वाटून टाकले होते.
"स्वातंत्र्याप्राप्तीनंतरच्या 70 वर्षात, कोणीही राजकीय व्यक्ती, मग तो मुख्यमंत्री असो, खासदार असो, केंद्रीय मंत्री असो किंवा महामंडळाचा नेता असो, पदे बदलत असताना, कोणीही कर्मचाऱ्यांना आपले अतिरिक्त उत्पन्न दिलेले नव्हते," असे श्री नरहरी अमीन जी पुढे म्हणाले.
डिस्क्लेमर:
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्यावरील लोकांचे किस्से/मत/विश्लेषण आणि त्यांचा लोकांच्या जीवनावर होणारा परिणाम सांगणाऱ्या कथा संकलित करण्याचा हा एक प्रयत्न आहे.