‘भारत छोडो’ आंदोलन भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातला महत्वाचा टप्पा होता. याच चळवळीमुळे ब्रिटीश राजवटीतून भारताला मुक्त करण्याचा पूर्ण देशाने जणू निश्चय केला होता. याच वेळी देशातल्या प्रत्येक कोपऱ्यातल्या भारतीयांनी एकत्र येऊन खांद्याला खांदा भिडवत ‘भारत छोडो’ आंदोलनात भाग घेतला.
- ‘मन की बात’ कार्यक्रमांत नरेंद्र मोदी, 30 जुलै 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेणाऱ्या महान व्यक्तींचे स्मरण केले. ‘भारत छोडो’ आंदोलन सुरु झाल्यानंतर 5 वर्षांनी भारत स्वतंत्र झाला. यापुढच्या 5 वर्षांनंतर भारताच्या स्वतंत्रतेची 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. आपल्या देशातून भ्रष्टाचार, जातीयवाद, संप्रदायवाद आणि वाईट गोष्टींचे उच्चाटन करण्याची आपण प्रतिज्ञा करू या. आपण आपल्या भूतकाळाशी जोडलेले राहूनच भविष्याचा गौरवशाली लेख लिहू शकतो. पंतप्रधान मोदी म्हणाले की ज्या समाजाने आपल्या भूतकाळाशी नाते तोडले, तो प्रगतीपथावर खूप पुढे जाऊ शकला नाही. यावर्षी ‘भारत छोडो’ आंदोलनाची 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हे क्विझ तुम्हाला काही काळ मागे, 1942 मध्ये घेऊन जाईल; त्या स्वातन्त्र्यावीरांकडे ज्यांच्यामुळे आम्ही आज स्वतंत्र देशात श्वास घेत आहोत.
क्विझमध्ये भाग घ्या आणि आपल्या इतिहासाला उजाळा द्या, भविष्याचा विचार करा. आणि हो; आकर्षक बक्षिसं मिळवा. दिवसातल्या 10 टॉप विजेत्यांना एक विशेष प्रमाणपत्र मिळेल आणि सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या टॉप 20 विजेत्यांना पंतप्रधानांबरोबर संवाद साधण्याची संधी मिळेल.
हे क्विझ 8 ऑगस्ट 2017 पासून सुरु होईल


