स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, 2021 साली आयोजित ‘युनिटी इन क्रिएटीव्हिटी’म्हणजेच सृजनतेतील एकता या स्पर्धेतील विजेत्यांचे तसेच सहभागी झालेल्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
देशभरातील पाच लाखांपेक्षा अधिक लोकांनी अत्यंत उत्साहाने या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता, त्यामधून 272 विजेत्यांची निवड करण्यात आली. सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने त्यांच्या सृजनात्मक आविष्कारासाठी त्यांना हे पुरस्कार दिले. या स्पर्धेची अंतिम फेरी दिल्लीच्या नेहरू पार्क मध्ये आयोजित करण्यात आली होती.
या अमृत महोत्सवाच्या ट्वीट मालिकेला प्रतिसाद देतांना पंतप्रधानांनी म्हटले आहे;
“अद्भुत सृजनशीलतेने भरलेल्या या देशभक्तीच्या भावनेने #UnityInCreativity स्पर्धेतून एक नवा पायंडा पाडला आहे. ज्या प्रकारे, लाखों देशबांधवांनी या स्पर्धेत, उत्साहाने सहभाग घेतला, ते सगळ्यांनाच प्रेरणा देणारे आहे. विजेत्यांसोबतच, सर्व स्पर्धकांनाही खूप खूप शुभेच्छा !”
अद्भुत रचनात्मकता से भरी देशभक्ति की इस भावना ने #UnityInCreativity की एक नई मिसाल पेश की है। जिस प्रकार लाखों देशवासियों ने इसमें बढ़-चढ़कर भागीदारी की, वो हर किसी को प्रेरित करने वाला है। विजेताओं के साथ ही सभी प्रतिभागियों को बहुत-बहुत शुभकामनाएं। https://t.co/b25XwOsXJy
— Narendra Modi (@narendramodi) February 8, 2023


