शेअर करा
 
Comments
The human face of 'Khaki' uniform has been engraved in the public memory due to the good work done by police especially during this COVID-19 pandemic: PM
Women officers can be more helpful in making the youth understand the outcome of joining the terror groups and stop them from doing so: PM
Never lose the respect for the 'Khaki' uniform: PM Modi to IPS Probationers

नमस्कार !

दीक्षांत संचलन समारंभासाठी उपस्थित केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अमित शाह जी, डॉक्टर जितेंद्र सिंह जी, जी. किशन रेड्डी जी, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीतील अधिकारी आणि सळसळत्या उत्साहाने भारलेल्या, भारतीय पोलीस सेवेचे नेतृत्व करण्यास उत्सुक 71 आर मधील माझ्या सर्व युवा सहकाऱ्यांनो,

खरेतर येथून बाहेर पडणाऱ्या सर्वांचीच मी वरचेवर दिल्लीत प्रत्यक्ष भेट घेत असे. माझ्या निवासस्थानी सर्वांना आमंत्रित करणे, गप्पा मारणे ही माझ्यासाठी नेहमीच सौभाग्याची बाब राहिली आहे. मात्र कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सध्या मला असे करणे शक्य होत नाही. मात्र आपल्या सर्वांच्या कार्यकाळादरम्यान कधी ना कधी प्रत्यक्ष भेटण्याची संधी निश्चितच मिळेल, असा विश्वास मला वाटतो‌.

मित्रहो,

एक मात्र नक्की की जेव्हा तुम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून काम करता, तेव्हा तुमच्या मनात नेहमीच अशी भावना असते की आपण एका सुरक्षित वातावरणात काम करत आहात. आपल्या हातून काही चूक झाली तर आपले सहकारी आहेत, ते आपल्याला सांभाळून घेतील.  प्रशिक्षण देणारे लोक आहेत तेसुद्धा सांभाळून घेतील. मात्र एका रात्रीत हे सगळे बदलून जाईल. येथून बाहेर पडलात की तुम्ही सुरक्षित वातावरणात नसाल.  आपण अनुभवी नाहीत, नवखे आहात, हे तुमच्याकडे बघून सर्वसामान्य नागरिकांना कळणार नाही. तुम्ही गणवेशात आहात, हेच त्यांना समजेल. गणवेशात आहात, म्हणजे साहेब आहात. मग माझे काम होत का नाही? अरे, तुम्ही तर साहेब आहात, तुम्ही असे का करता? म्हणजेच तुमच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोण अगदीच बदलून जाईल.

अशा परिस्थितीत तुम्ही लोकांना कशा प्रकारे सामोरे जाता, कशा पद्धतीने कर्तव्ये पूर्ण करता, याकडे बारकाईने पाहिले जाईल.

या सुरुवातीच्या काळात तुम्ही थोडे जास्त सजग राहावे, असे मला वाटते, कारण पहिली छाप हीच शेवटची छाप असते. अगदी सुरुवातीच्या काळातच आपली प्रतिमा तयार होते की हा अधिकारी अमुक अमुक अशा प्रकारचा आहे. त्यानंतर कुठेही तुमची बदली झाली तरी ती प्रतिमा तुमच्या सोबत राहील. त्या प्रतिमेतून बाहेर यायला बराच वेळ लागेल. त्यामुळे तुम्ही स्वतःची चांगली प्रतिमा तयार करण्यासाठी काळजीपूर्वक प्रयत्न करावेत, असे मला वाटते.

दुसरी गोष्ट म्हणजे समाजरचनेत एक दोष असतो. जेव्हा निवड होऊन आपण दिल्लीत पोहोचतो तेव्हा दोन-चार लोक आपल्याही नकळत आपल्याला येऊन चिकटतात. हे लोक कोण असतात, कळत नाही. मग काही दिवसातच आपली सेवा करू लागतात. साहेब गाडी हवी असेल तर सांगा, मी सोय करतो. पाणी हवे असले तर सांगा साहेब. असं करा, जेवण नसेल झालं अजून तुमचं, इथे खाण्याची फार चांगली सोय नाही, तिकडे चांगलं जेवण मिळतं. मी आणू का तुमच्यासाठी? ही सेवा आपल्याला नेमकी कोण देत आहे, हे आपल्याला ठाऊक नसतं. तुम्ही जिथे कुठे जाल, तिथे असं टोळकं नक्कीच असेल. सुरुवातीला तुम्हालाही गरज असेल. आपण नव्या ठिकाणी आलोय, नवा परिसर आहे. पण एकदा त्या चक्रात अडकलात, तर नंतर त्यातून बाहेर पडणे कठीण होऊन बसेल. सुरुवातीला थोडा त्रास होईल. नवा परिसर असेल. अशा वेळी स्वतःच्या डोळ्यांनी, स्वतःच्या कानांनी, स्वतःच्या बुद्धीने गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीच्या काळात शक्य असेल, तेवढा काळ आपल्या कानांना गाळणी लावून घ्या.

तुम्हाला यशस्वी नेतृत्व करायचे असेल तर अगदी सुरुवातीपासूनच कानांवर गाळणी लावून घ्या. कानांवर टाळे लावून घ्या, असे मी सांगत नाही. गाळणी लावायला सांगतो आहे‌. यामुळे काय होईल, तर एक व्यक्ती म्हणून, अधिकारी म्हणून कर्तव्य पार पाडण्यासाठी ज्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत,   त्या सर्व गाळून आलेल्या गोष्टी आपल्या स्मरणात राहतील, आपल्या कामी येतील. अनावश्यक कचरा लक्षात ठेवायची आवश्यकता राहणार नाही. तुम्ही पाहिले असेल की एखादी व्यक्ती अधिकार पदावर  असेल तर लोक त्याला अगदी कचरापेटी मानतात. जेवढा मोठा अधिकारी तेवढी मोठी कचरापेटी मानतात आणि अनावश्यक अशा सगळ्या गोष्टी त्यात टाकत राहतात. अनेकदा आपण सुद्धा त्या कचऱ्याला संपत्ती मानतो. मात्र आपल्या मन मंदिराला जितके स्वच्छ ठेवाल तेवढाच जास्त लाभ होईल.

आणखी एक विषय म्हणजे आपण आपल्या पोलीस ठाण्याच्या संस्कृतीकडे पुरेसे लक्ष दिले आहे का? आपले पोलिस ठाणे हे सामाजिक विश्वासाचे केंद्र व्हावे. तेथील परिसर, तेथील स्वच्छता या बाबी महत्त्वाच्या असतात. काही भागांमधील पोलीस ठाणी फारच जुनी आहेत, जुनाट आहेत याची मला कल्पना आहे. मात्र ती स्वच्छ ठेवणे हे फार कठीण काम नाही.

आपण निर्धार करूया. जिथे कुठे मी जाईन, माझ्या अधिकारात 50-100-200, जितकी पोलीस ठाणी असतील, त्यांच्यासाठी बारा ते पंधरा गोष्टी मी कागदावर निश्चित करेन, अगदी ठामपणे निश्चित करेन. मला माणसांना बदलता येईल येईल किंवा नाही. पण तिथली व्यवस्था मी बदलू शकतो, वातावरण बदलू शकतो. आपण या गोष्टींना प्राधान्य द्याल का? फाइल कशा ठेवाव्यात, वस्तू कशा ठेवाव्यात, कोणी पोलीस ठाण्यात येत असेल तर त्यांना बोलावणे, बसवणे या लहान-लहान गोष्टी आपण नक्कीच करू शकता.

पोलीस अधिकारी जेव्हा नव्याने कामाला सुरुवात करतात तेव्हा बरेचदा त्यांना वाटते की आपण आपला रुबाब दाखवावा, लोकांनी आपल्याला घाबरावे, आपण लोकांना हुकुम सोडावेत. आपले नाव ऐकताच समाज विघातक कामे करणाऱ्या लोकांचा थरकाप झाला पाहिजे. सिंघम सारखे चित्रपट बघत जे लहानाचे मोठे होतात, त्यांच्या डोक्यात अशाच गोष्टी असतात. आणि त्याचमुळे जी कामे करायला हवीत ती राहून जातात. जर तुमच्या हाताखाली 100-200 लोक आहेत, 500 लोक आहेत तर त्यांच्या कामात सुधारणा कशी व्हावी, एक चांगले पथक कसे तयार करता येईल, तुमच्या विचारानुसार काय चांगले करता येईल, याकडे लक्ष द्या. बघा, लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल.

सर्वसामान्य माणसांना प्रभावित करणे, सर्वसामान्य लोकांना प्रेमाने जिंकून घेणे, याला प्राधान्य द्या. जर तुम्ही दबदबा निर्माण केला तर तो कमी काळ टिकेल, मात्र प्रेमाचे बंधन जोडले गेले तर तुम्ही निवृत्त झाल्यानंतर सुद्धा जिथे तुम्ही पहिल्यांदा कर्तव्यावर रुजू झालात, तेथील लोक तुम्हाला आठवणीत ठेवतील, की वीस वर्षांपूर्वी एक तरुण अधिकारी आमच्याकडे आला होता. त्याला आमची भाषा येत नव्हती मात्र आपल्या वर्तनाने त्याने लोकांची मने जिंकली होती. एकदा का तुम्ही सर्वसामान्य लोकांची मने जिंकली की त्यानंतर सगळे काही बदलून जाईल.

पोलिसांमध्ये एक धारणा आहे. जेव्हा मी नव्यानेच मुख्यमंत्री झालो होतो, तेव्हा गुजरातमध्ये दिवाळीनंतर नवे वर्ष सुरू होते. आमच्याकडे एक लहानसा समारंभ असतो, तिथे पोलिसांच्या दिवाळी भेटीचा कार्यक्रम असतो आणि मुख्यमंत्री त्यात नियमीतपणे हजेरी लावतात, मीसुद्धा जात असतो. पूर्वीचे जे मुख्यमंत्री जात असत, ते मंचावर बसत, काही वेळ बोलत आणि शुभेच्छा देऊन तेथून निघून जात. मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा लोकांची भेट घेतली. अगदी सुरुवातीला मला तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी थांबवले. मला म्हणाले आपण प्रत्येकाशी हस्तांदोलन का करत आहात? प्रत्येकाशी हस्तांदोलन करायची गरज नाही. त्यात कॉन्स्टेबल होते लहान-मोठे सर्व प्रकारचे कर्मचारी होते आणि सुमारे शंभर दीडशे लोकांचा जमाव असे. हस्तांदोलन का करायचे नाही, असे मी विचारले. त्यावर ते म्हणाले, साहेब प्रत्येकाशी हस्तांदोलन करत राहाल तर संध्याकाळी तुमचे हात सुजतील आणि त्यावर उपचार करावे लागतील. मी म्हणालो, तुम्हाला असे का वाटले? त्यांना असे वाटले की मी अगदीच सामान्य लोकांशी हस्तांदोलन करत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या अधिकारानुसार मी त्याची भेट घ्यावी असे त्या अधिकाऱ्याला वाटले होते. मात्र पोलिस खात्यात असेच असते, असाही एक विचार प्रवाह आहे. पोलीस नेहमीच हमरीतुमरीवर येतील, असा विचार करणे चुकीचे आहे.

कोरोनाच्या या काळात पोलिसांची जी प्रतिमा तयार केलेली होती, ती फारशी खरी नाही हे दिसून आले. ते सुद्धा माणूस आहेत. ते सुद्धा मानवतेच्या हितासाठी कर्तव्य बजावत आहेत. आपल्या वर्तणुकीतून त्यांनी हे जनसामान्यांना दाखवून दिले आहे. केवळ आपल्या वर्तणुकीने आपण आपली प्रतिमा कशा प्रकारे उज्वल करू शकतो?

त्याचप्रमाणे मी पाहिले आहे की  राजकीय नेते आणि पोलीस अनेकदा समोरासमोर येतात. जेव्हा ते गणवेशात असतात, तेव्हा त्यांना वाटते की मी अमुक प्रकारे वागलो तर माझा धाक राहिल.

एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपला देश लोकशाहीप्रधान आहे. लोकशाहीत पक्ष कोणताही असला तरी लोकप्रतिनिधीचे महत्त्व मोठे असते. लोकप्रतिनिधीचा आदर राखणे म्हणजेच लोकशाहीचा आदर राखणे. त्यांच्याशी मतभेद असले तरीही प्रत्येक गोष्टीची एक पद्धत असते. आपण योग्य पद्धत स्वीकारली पाहिजे. मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगतो. जेव्हा मी नव्याने मुख्यमंत्री झालो तेव्हा तुम्हाला प्रशिक्षण देणारे अतुल जी त्यावेळी मलाही प्रशिक्षण देत होते आणि मी त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे, कारण ते माझे सुरक्षा प्रमुख होते, मुख्यमंत्री सुरक्षेचे प्रमुख होते.

एके दिवशी काय झाले की मला पोलीस आणि इतका डामडौल मनापासून रुचत नाही. मला विचित्र वाटत राहते मात्र तरीही मला ती व्यवस्था स्वीकारावी लागते. अनेकदा मी नियम मोडून गाडीतून उतरून जात असे, गर्दीत उतरून लोकांशी हस्तांदोलन करत असे. एके दिवशी अतुल करवल यांनी माझ्याकडून वेळ मागून घेतली. ते माझ्या कक्षात मला भेटायला आले. त्यांना आठवते आहे की नाही, मला कल्पना नाही. पण त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. बरेच ज्युनियर होते ते. मी वीस वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतो आहे.

त्यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नजरेला नजर देत आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले साहेब, तुम्ही असे नाही जाऊ शकत. कारमधून आपल्या मर्जीने उतरु शकत नाही, अशा प्रकारे गर्दीत जाऊ शकत नाही.  मी म्हणालो, अरे भाऊ, तुम्ही माझ्या आयुष्याचे मालक आहात का ? मी काय करावे आणि काय करू नये, हे तुम्ही ठरवणार का? ते जराही विचलित झाले नाही, त्यांनी स्वच्छ शब्दात मला सांगितले, साहेब, तुमचे आयुष्य वैयक्तिक नाही. आता ती राज्याची संपत्ती आहे आणि या संपत्तीची देखभाल करणे, ही माझी जबाबदारी आहे. तुम्हाला नियमांचे पालन करावेच लागेल. हा माझा आग्रह असेल आणि मी तुमच्याकडून नियमांचे पालन करून घेईन.

मी काहीच बोललो नाही. लोकशाहीचा आदर होता, लोकप्रतिनिधीचा सुद्धा आदर होता आणि त्याच वेळी आपल्या कर्तव्याबाबत अतिशय सौम्य शब्दात आपले म्हणणे त्यांनी योग्य प्रकारे सांगितले होते. मुख्यमंत्री म्हणून माझ्या कारकिर्दीचा तो सुरुवातीचा काळ होता. इतक्या वर्षांनंतरसुद्धा माझ्या मनात त्या घटनेने घर केले आहे‌ का बरे? कारण एका पोलीस अधिकाऱ्याने ज्या पद्धतीने आणि ज्या दृढपणे लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीचे महत्त्व सांगितले होते, मला असे वाटते की प्रत्येक पोलिस हे करू शकतो. आपण हे लक्षात घेतले पाहिजे.

आणखी एक विषय आहे. अलीकडे तंत्रज्ञानाची बरीच मदत होते आहे. सुरुवातीच्या काळात अनेकदा आपल्याला जी माहिती कॉन्स्टेबल कडून मिळत असे, गुप्तहेर खात्याकडून मिळत असे, त्यामुळे पोलिसांचे काम सोपे होत असे. दुर्दैवाने त्यात थोडे शैथिल्य आले आहे. याबाबत कोणतीही तडजोड करू नका. कॉन्स्टेबल स्तरावरील हेरगिरीची पोलिसांना फार गरज असते. त्याकडे दुर्लक्ष करू नका. आपण आपले स्रोत शक्य तितके वाढवत राहा. आपल्या पोलिस ठाण्यातील लोकांचे बळ वाढवत राहा, त्यांना प्रोत्साहित करत राहा. हल्ली अगदी सहजपणे तंत्रज्ञान उपलब्ध होते आहे. गुन्ह्यांच्या संदर्भात तंत्रज्ञानाची मोठीच मदत होते आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण असो किंवा मोबाईलचे ट्रॅकिंग असो. या सर्वांमुळे फार मोठी मदत होते आहे. ही फार चांगली गोष्ट आहे. मात्र अलीकडे ज्या प्रमाणात पोलीस निलंबित होत आहेत, त्यामागे सुद्धा तंत्रज्ञानच आहे. कधीतरी पोलीस उर्मटपणे वागतात, चिडखोरपणे वागतात. कधीतरी  त्यांचा संयम सुटतो, कधी अवाजवी वर्तन करतात आणि दूरवर कोणीतरी त्याचा व्हिडिओ तयार करत असतो, याची कल्पनाच नसते. मग तो व्हिडिओ व्हायरल होतो. त्यानंतर प्रसारमाध्यमांचा दबाव निर्माण होतो आणि पोलिसांविरुद्ध बोलणारे खूप नागरिक अगदी सहज पुढे येतात. शेवटी संबंधित पोलिसांवर कारवाई करावी लागते, त्याला निलंबित करावे लागते. त्याच्या संपूर्ण कारकीर्दीवर डाग लागतो.

तंत्रज्ञान मदत करत आहे, त्याचप्रमाणे तंत्रज्ञान अडचणी सुद्धा वाढवत आहे. पोलिसांना याची सर्वात जास्त कल्पना आहे.  तुम्हाला लोकांना प्रशिक्षित करावे लागेल. सकारात्मक पद्धतीने तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग होईल यावर भर दिला पाहिजे. मी पाहिले आहे की, तुमच्या संपूर्ण तुकडीमध्ये तंत्रज्ञानाची पार्श्वभूमी असणारे अनेक जण आहेत. आज आपल्याकडे माहितीची कमतरता नाही. आजघडीला माहितीचे विश्लेषण आणि त्यातून हवे असलेले तपशील काढून, घेणे बिग डेटा कृत्रिम बुद्धिमत्ता, समाजमाध्यमे या सर्वच बाबी म्हणजे आधुनिक काळातील हत्यारे आहेत. आपण आपले एक पथक तयार केले पाहिजे. आपल्या सोबत काम करणाऱ्या लोकांचे सहकार्य घेतले पाहिजे. त्यातील प्रत्येकजण तंत्रज्ञानात कुशल असलेच पाहिजे, असा आग्रह नाही.

मी एक उदाहरण सांगतो. जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा एक कॉन्स्टेबल माझ्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात होता. कॉन्स्टेबल होता की त्याच्या वरच्या दर्जाचा अधिकारी होता, मला नक्की आठवत नाही.  संयुक्त लोकशाही आघाडीचे सरकार केंद्रात होते आणि एका ई-मेल मध्ये काही दोष होते जे सुधारता येत नव्हते. भारत सरकारसाठी ही काळजीची बाब होती. वर्तमानपत्रात सुद्धा त्याची बातमी आली. माझ्या सुरक्षाव्यवस्थेतला एक बारावीपर्यंत शिकलेला तरुण. त्याने त्यात लक्ष घातले आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्याने तो दोष दूर केला.  त्या वेळी बहुतेक चिदंबरमजी गृहमंत्री होते. त्यांनी त्याला बोलावले आणि प्रमाणपत्र दिले. म्हणजेच काही लोक असे असतात ज्यांच्याकडे असे कौशल्य असते.

असे लोक आपण शोधले पाहिजेत, त्यांचा वापर करून घेतला पाहिजे आणि त्यांच्यावर कामे सोपवली पाहिजे. जर आपण हे करू शकलात तर आपली नवीन शस्त्रे तयार होतील. असे लोक तुमची शक्ती वाढवतील. जर तुमच्याकडे शंभर पोलिसांचे बळ आहे आणि अशा साधनांची ताकदही आपल्याला मिळाली, माहितीच्या विश्लेषणाच्या कामी तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपण शंभर राहणार नाहीत, हजार व्हाल तुमची ताकद एवढी वाढेल. याकडे आवर्जून लक्ष द्या.

आणखी एक आपण पाहिले असेल की नैसर्गिक आपत्ती येत राहतात. पूर येतो, भूकंप होतो, मोठा अपघात होतो, चक्रीवादळ येते, अशा वेळी लष्कराचे लोक तिथे पोहोचतात. नागरिकांनाही असे वाटते की चला, लष्कराचे लोक आले. आता या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आम्हाला फार मोठी मदत मिळेल. अगदी सहजपणे होत राहते. गेल्या काही वर्षांमध्ये एसडीआरएफ आणि एनडीआरएफ मध्ये आमच्या पोलीस बलाचे जवान आहेत. त्यांनी जे काम केले त्यामुळे दूरचित्रवाहिन्यांचे लक्ष सुद्धा त्यांच्यावरच राहते. त्यांचा वेगळा गणवेश आहे, ते पाण्यात धावपळ करतात, जमिनीवर धावपळ करतात, दगड-मातीत धावपळ करतात, मोठमोठ्या शिळा उचलतात. या सर्वातून पोलिसांची एक वेगळी ओळख तयार झाली आहे.

मी आपणा सर्वांना विनंती करेन की आपण आपल्या क्षेत्रात एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या कामासाठी जास्तीत जास्त पथके सज्ज करा. आपल्या पोलिस पथकात, त्या भागातील लोकांसाठी सुद्धा ही पथके सज्ज करा.

नैसर्गिक आपत्तींच्या काळात जर आपण सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी तत्पर असाल, त्याकामी सज्ज असाल तर अगदी सहजपणे आपण हे कर्तव्य पार पाडू शकाल. अलीकडच्या काळात याची आवश्यकता वाढत चालली आहे.  एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या माध्यमातून पोलिसांची एक नवी ओळख संपूर्ण देशभरात तयार होते आहे.

अभिमानाने आज देश सांगतो आहे की बघा, संकटाच्या या काळात पोलिस आमच्यापर्यंत पोहोचले. इमारत कोसळली होती, लोक अडकले होते, मात्र ही पथके वेळेत पोहोचली आणि त्यांनी वाचवले.

मला असे वाटते की अनेक क्षेत्रांमध्ये आपण नेतृत्व करू शकता. आपण अनुभवले आहे की प्रशिक्षण फार महत्त्वाचे असते. आपण कधीही प्रशिक्षणाला कमी लेखू नये. अनेक देशांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण ही शिक्षा मानली जाते. एखादा कुचकामी अधिकारी असला तर त्याला प्रशिक्षण दिले जाते, अशी भावना असते.  सुप्रशासनाच्या मार्गातील अडचणींवर प्रशिक्षणाच्या सहाय्याने मात करता येईल आणि या सगळ्या समस्यांमधून आपल्याला बाहेर यावे लागेल.

बघा, मी पुन्हा एकदा अतुल करवाल यांचे कौतुक करू इच्छितो. ते सुद्धा तंत्रज्ञान क्षेत्रातले आहेत. एव्हरेस्ट सर करून आले आहेत. फार धाडसी आहेत. त्यांच्यासाठी पोलीस दलातील कोणतेही पद प्राप्त करणे कठीण नाही. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांनी हैदराबादमध्ये प्रशिक्षणाचे काम स्वखुषीने निवडले होते आणि तेथे येऊन काम केले होते. यावेळी सुद्धा स्वतःहून सांगीतले की मला प्रशिक्षणाचे काम द्या आणि ते आज येथे आले आहेत. हे फार महत्त्वाचे आहे. मला असे वाटते की या बाबीला महत्त्व दिले गेले पाहिजे.

आणि म्हणूनच भारत सरकारने, केंद्रीय मंत्रिमंडळाने मिशन कर्मयोगी या मोहिमेला दोन दिवसांपूर्वीच मंजुरी दिली आहे. प्रशिक्षणाच्या या कामाला आम्ही प्रतिष्ठा प्रदान करू इच्छितो. मिशन कर्मयोगी या मोहिमेच्या माध्यमातून ही प्रतिष्ठा मिळवून देऊ इच्छितो.

मला असे वाटते की हा प्रघात सुरू राहिला पाहिजे. मी तुम्हाला माझा आणखी एक अनुभव सांगू इच्छितो. मी गुजरातसाठी प्रशिक्षणाची 72 तासांची कॅप्सूल तयार केली होती आणि शासकीय अधिकाऱ्यांना,  सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांना तीन दिवस, 72 तासांचे प्रशिक्षण दिले होते. प्रशिक्षणानंतर मी स्वतः त्यांचे अभिप्राय जाणून घेत असे.

सुरुवातीच्या काळात 250 लोक होते. त्यांनी प्रशिक्षण घेतले होते. मी त्यांची बैठक घेतली आणि 72 तासातला त्यांचा अनुभव विचारला. जास्तीत जास्त लोकांचे म्हणणे होते की  72 तासांची वेळ आणखी वाढवली पाहिजे. हे प्रशिक्षण आमच्यासाठी फारच उपयुक्त आहे. एका पोलिसांने सुद्धा आपला अनुभव सांगितला. त्याने सांगितले की साहेब मी आतापर्यंत पोलीस होतो. या 72 तासांनी मला माणूस बनवले. खूप महत्त्वाचे शब्द आहेत हे. तो म्हणाला की मी माणूस आहे, हे कोणी लक्षातच घेत नसे. मी पोलीस आहे, याकडेच सगळ्यांचे लक्ष असे. 72 तासांच्या या प्रशिक्षणात मी अनुभवले की, मी केवळ पोलिस नाही तर एक माणूस सुद्धा आहे.

बघा, प्रशिक्षणाचे हे सामर्थ्य असते. आपण सतत प्रशिक्षण घेतले पाहिजे. आपण संचलन करता, त्यावेळी त्याचे जे ठरलेले तास आहेत त्यात एक मिनिट सुद्धा कमी होणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. आपण आपल्या प्रकृतीची ज्या प्रकारे काळजी घेता, आपल्या सहकाऱ्यांना वारंवार विचारता, तुमची प्रकृती कशी आहे, व्यायाम करता की नाही, वजनावर नियंत्रण ठेवता की नाही, वैद्यकीय तपासणी करता की नाही. या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे, कारण तुम्ही अशा क्षेत्रात काम करता जिथे तुमचे शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त असणे केवळ गणवेशात छान दिसण्यासाठी नसते तर कर्तव्यपूर्तीसाठी गरजेचे असते. त्या कामी आपल्याला पुढाकार घ्यावा  लागेल. आपल्या शास्त्रांमध्ये म्हटले आहे की

यत्, यत् आचरति, श्रेष्ठः,

तत्, तत्, एव, इतरः, जनः,

सः, यत्, प्रमाणम्, कुरुते, लोकः,

तत्, अनुवर्तते।।21।।

अर्थात श्रेष्ठ लोक जसे वर्तन करतात, त्याचप्रमाणे इतर लोक त्यांचे अनुकरण करतात.

आपण सर्व सुद्धा त्या श्रेष्ठ लोकांसारखेच आहात, असा विश्वास मला वाटतो. आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची एक संधी आपल्याला मिळाली आहे आणि त्याच बरोबर एक जबाबदारी सुद्धा मिळाली आहे. आज मानवजाती ज्या आव्हानांचा मुकाबला करत आहे, त्यापासून त्यांचे रक्षण करण्यासाठी, आपल्या देशाच्या तिरंग्याची शान कायम राखण्यासाठी भारताच्या संविधानाप्रति संपूर्ण समर्पणाने सेवा परमो धर्म, ही भावना महत्त्वाची आहे. नियम महत्त्वाचे आहेतच, मात्र भूमिका जास्त महत्त्वाची आहे.

मी नियमाधारित काम करावे की भूमिका आधारित काम करावे? जर आपण भूमिका आधारित कामाला महत्त्व दिले तर नियम आपोआप पाळले जातील. आपण आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली तर लोकांचा आपल्यावरचा विश्‍वास आणखी वाढली.

मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना अनेकानेक शुभेच्छा देतो. या खाकी गणवेषाचा सन्मान वाढवण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न कराल, असा विश्वास मला वाटतो. मी सुद्धा आपणा सर्वांप्रती, आपणा सर्वांच्या कुटुंबीयांप्रति, आपल्या सन्मानाप्रती ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्या योग्य प्रकारे पार पाडत राहिन, त्यात कधीही कुचराई करणार नाही. याच विश्‍वासासह आजच्या या शुभ प्रसंगी अनेकानेक शुभेच्छा देत मी आपणाला शुभास्‍तेबंधा म्हणतो.

धन्यवाद!.

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
Modi Govt's #7YearsOfSeva
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Agri, processed food exports buck Covid trend, rise 22% in April-August

Media Coverage

Agri, processed food exports buck Covid trend, rise 22% in April-August
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
अमेरिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
September 22, 2021
शेअर करा
 
Comments

अमेरिकेचे  अध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणानुसार  मी 22 ते 25 सप्टेंबर, 2021 दरम्यान अमेरिका दौऱ्यावर जाणार आहे.

माझ्या या दौऱ्यादरम्यान, अध्यक्ष जो बायडेन यांच्याबरोबर मी  भारत-अमेरिका  यांच्यातील  व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेणार आहे तसेच परस्पर  हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर आम्ही आपली मते मांडू. विशेषत: विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्याच्या संधींबाबत चर्चा करण्यासाठी अमेरिकेच्या उपाध्यक्ष  कमला हॅरिस यांचीही भेट घेण्यासाठी मी उत्सुक आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन , ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांच्यासह पहिल्या क्वाड लीडर्स शिखर परिषदेत  मी व्यक्तिशः सहभागी होणार आहे.

या वर्षी मार्चमध्ये झालेल्या आभासी शिखर परिषदेच्या निष्कर्षांचा आढावा घेण्याची आणि हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी आमच्या सामायिक दृष्टिकोनावर आधारित भविष्यातील सहभागाला प्राधान्य देण्याची  संधी या शिखर परिषदेच्या निमित्ताने मिळणार आहे.

मी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान सुगा यांचीही स्वतंत्रपणे  भेट घेणार असून  त्या दोन्ही   देशांशी असलेल्या भारताच्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणार आहे  आणि प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची  उपयुक्त देवाणघेवाण करणार आहे.

दौऱ्याच्या शेवटी मी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत  भाषण करणार असून त्यात कोविड -19 महामारी, दहशतवादाचा सामना करण्याची गरज, हवामान बदल आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांसह जागतिक स्तरावरील  आव्हानांवर माझ्या भाषणाचा भर राहील.

माझा हा अमेरिका दौरा हा  अमेरिकेबरोबर  व्यापक वैश्विक धोरणात्मक भागीदारी मजबूत करणे, जपान आणि ऑस्ट्रेलियाशी या सामरिक भागीदारांशी संबंध दृढ करणे याबरोबरच महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर  आमचे सहकार्य अधिक दृढ करण्याची संधी असेल.