पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या मन की बातमध्ये केलेल्या भाषणात दिलेल्या आश्वासनानुसार त्यांनी लिहिलेल्या एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाची नवी आणि सुधारित आवृत्ती आता प्रसिद्ध झाली आहे. विविध मंचांवर आगाऊ मागणी नोंदवून नवी आवृत्ती खरेदी करता येईल. यासाठी तुम्हाला (https://amzn.to/3eaYOHH) किंवा (https://bit.ly/3eeUVl8). या ठिकाणी पुस्तकासाठी पूर्व नोंदणी करता येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या एक्झाम वॉरियर्सची पहिली आवृत्ती 2018 मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये त्यांनी जीवनाविषयीचे तसंच परीक्षा आणि इतर अनेक मुद्द्यांवरचे आपले प्रेरणादायी विचार मांडले होते. जिथे ज्ञानाची प्रशंसा होईल आणि गुणपत्रिकेऐवजी शिक्षण हे शिकण्याच्या केंद्रस्थानी असेल, असं वातावरण तयार करण्याचा त्यामध्ये प्रयत्न होता.
अनेक भाषांमधून तसंच ब्रेल लिपीमध्येदेखील हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं होतं. त्याचं विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी भरभरून स्वागत केल्यामुळे, पहिली आवृत्ती बेस्टसेलर ठरली.
गेल्या तीन वर्षात पंतप्रधानांनी शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या अनेक व्यक्तींशी संवाद साधला. त्यातून त्यांना या लोकांकडून अनेक सल्ले, दृष्टिकोन आणि सूचना प्राप्त झाल्या.
विशेषतः कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रासह प्रत्येक क्षेत्राला आपले काम सुरू ठेवण्यासाठी धडपड करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक्झाम वॉरियर्समध्ये आणखी काही गोष्टींचा अंतर्भाव करून त्याची सुधारित आवृत्ती आणण्याची गरज जाणवली.
एक्झाम वॉरियर्सच्या नव्या आवृत्तीमध्ये मानसिक आरोग्य, ध्येय निश्चिती, वर्गाच्या पलीकडचं शिक्षण अशा इतर अनेक विषयांना स्पर्श करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुटुंबांमधील तंत्रज्ञानाची भूमिका, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन तसंच त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी आणि इतरही अनेक मुद्द्यांवर पालकांना काही कानमंत्र दिले आहेत.
एक्झाम वॉरियर्सच्या पहिल्या आवृत्तीत या पुस्तकातल्या प्रत्येक प्रकरणाशी संबंधित जी संवादात्मक अॅक्टिव्हिटी होती, त्याचं विशेषत्वानं कौतुक झालं होतं. नव्या आवृत्तीतही आणखी अशा अनेक नव्या अॅक्टिव्हिटीज समाविष्ट करण्यात आल्या असून त्या नरेंद्र मोदी मोबाईल अॅपच्या एक्झाम वॉरियर्स मोड्युलशीही संलग्न करण्यात आल्या आहेत. या अॅपच्या एक्झाम वॉरियर्स मोड्युलमुळे पुस्तकाला तांत्रिक- सामाजिक पैलूदेखील मिळाला आहे.
एक्झाम वॉरियर्स पुस्तकाच्या नव्या आणि सुधारित आवृत्तीची मागणी तुम्हाला विविध मंचांवरून नोंदवता येईल. (https://amzn.to/3eaYOHH) किंवा (https://bit.ly/3eeUVl8) या ठिकाणी पुस्तकाची आगाऊ मागणी नोंदवता येईल.


