पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोजगार निर्मिती, नवोन्मेष आणि आर्थिक विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) सक्षम करण्याबाबत सरकारची दृढ वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली. गेल्या काही वर्षांत सरकारने कर्ज उपलब्धता सुलभ करण्यासाठी, बाजारपेठेतील संधी वाढविण्यासाठी आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवरील कामकाजाचा भार कमी करण्यासाठी अनेक सुधारणा सुरू केल्या आहेत. #NextGenGST उपक्रमांतर्गत नुकत्याच झालेल्या वस्तू आणि सेवा कर सुधारणा या प्रवासात एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
श्याम शेखर यांच्या X या समाज माध्यमावरील एका संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान मोदी म्हणाले:
“रोजगार निर्माण करणारे आणि विकासाला चालना देणारे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत.
सुलभ कर्ज उपलब्धतेपासून ते व्यापक बाजारपेठेतील संधीपर्यंत, प्रत्येक सुधारणा लघु आणि मध्यम व्यवसायांना बळकटी देण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे.
नवीन वस्तू आणि सेवा कर सुधारणा या गतीला अधिक बळकटी देतात. कराचे दर सुसंगत करणे, अनुपालन सुलभ करणे आणि देशभरातील उद्योगांना चालना देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
#NextGenGST”
MSMEs are the backbone of our economy, creating jobs and driving growth.
— Narendra Modi (@narendramodi) September 4, 2025
From easier credit to wider market access, every reform has been aimed at strengthening small and medium businesses.
The latest GST changes build on this momentum by rationalising rates, simplifying… https://t.co/YKHiXWffUl


