मुंबईच्या जूहू चौपाटीवर आयोजित करण्यात आलेल्या क्लिनथॉन ह्या स्वच्छता मोहिमेचे कौतूक करणारे डॉ जितेंद्र सिंह यांचे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केले असून, ह्या कामाचे त्यांनी कौतूक केले आहे. ह्या क्लिनथॉन मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांचे कौतुक करत, आपले किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करणे किती आवश्यक आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला आहे.
"कौतुकास्पद...ह्या मोहिमेत सहभागी असणाऱ्या सर्वांचे कौतूक आहे.
भारताला एक मोठा आणि अतिशय सुंदर किनारा लाभला असून, आपण आपले किनारे स्वच्छ ठेवण्यावर लक्ष देणे आवश्यक आहे.”
असं पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं आहे.
Commendable...I appreciate all those involved in this effort.
— Narendra Modi (@narendramodi) September 12, 2022
India is blessed with a long and beautiful coastline and it is important we focus on keeping our coasts clean. https://t.co/mxMTUNLYNC


