पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इटलीचे उप-पंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री अँटोनियो तायानी यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान, पंतप्रधानांनी भारत-इटली संयुक्त धोरणात्मक कृती योजना 2025-2029 च्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देशांकडून उचलल्या जात असलेल्या सक्रिय पावलांचे कौतुक केले. यावेळी व्यापार, गुंतवणूक, संशोधन, नवोन्मेष, संरक्षण, अंतराळ, संपर्क व्यवस्था, दहशतवादविरोधी कारवाई, शिक्षण आणि दोन्ही देशांमधील नागरिकांचे परस्पर संबंध या आणि अशा अनेक प्राधान्यक्रमावरील क्षेत्रांवर चर्चा करण्यात आली.
या भेटीसंदर्भात पंतप्रधानांनी एक्स समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :
"आज इटलीचे उप-पंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री अँटोनियो तायानी यांची भेट घेऊन आनंद झाला. व्यापार, गुंतवणूक, संशोधन, नवोन्मेष, संरक्षण, अवकाश, संपर्क व्यवस्था, दहशतवादविरोधी कारवाई, शिक्षण आणि जन-ते-जन संपर्क अशा प्रमुख क्षेत्रांमध्ये भारत-इटली संयुक्त धोरणात्मक कृती योजना 2025-2029 च्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देशांकडून उचलली जात असलेली सक्रिय पावले कौतुकास्पद असल्याचे त्यांना सांगितले.
भारत आणि इटलीमधील मैत्री सातत्याने दृढ होत असून, याचा मोठा फायदा आपल्या दोन्ही देशांतील लोकांना आणि जागतिक समुदायाला होत आहे.
@GiorgiaMeloni
@Antonio_Tajani"
Lieto di aver incontrato oggi il Vice Primo Ministro e Ministro degli Affari Esteri e della Cooperazione Internazionale dell’Italia, Antonio Tajani. Ho espresso apprezzamento per le misure proattive adottate da entrambe le parti per l'attuazione del Piano d'Azione Strategico… pic.twitter.com/ZNozUwumv7
— Narendra Modi (@narendramodi) December 10, 2025




