मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भारताच्या विकास मार्गावर व्यक्त केला प्रबळ विश्वास
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भारतात आपला व्यावसायिक विस्तार करण्यामध्ये दाखवले तीव्र स्वारस्य
पंतप्रधान म्हणाले की, जागतिक ऊर्जा मागणी-पुरवठा संतुलनामध्ये भारत बजावेल निर्णायक भूमिका
पंतप्रधानांनी अन्वेषण आणि उत्पादनामध्ये सुमारे 100 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची क्षमता केली अधोरेखित तसेच सरकारने सुरू केलेल्या गुंतवणूकदार-स्नेही धोरणात्मक सुधारणांचा केला उल्लेख
पंतप्रधानांनी संपूर्ण ऊर्जा मूल्य साखळीमध्ये नावीन्य, सहकार्य आणि अधिक सखोल भागीदारीचे केले आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी लोक कल्याण मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी इंडिया एनर्जी वीक (आयईडब्ल्यू) 2026 च्या निमित्ताने जागतिक ऊर्जा क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

या संवादादरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भारताच्या विकासाच्या वाटचालीवर दृढ विश्वास व्यक्त केला. धोरणात्मक स्थिरता, सुधारणांची गती आणि दीर्घकालीन मागणीची स्पष्टता यांसारखी कारणे देत, त्यांनी भारतात आपला व्यावसायिक विस्तार करण्याची तसेच आपली उपस्थिती अधिक दृढ करण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली.

 

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे स्वागत करताना पंतप्रधान म्हणाले की, या गोलमेज परिषदा उद्योग आणि सरकार यांच्यातील समन्वयासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून उदयास आल्या आहेत. त्यांनी यावर भर दिला की, जागतिक उद्योग नेत्यांकडून मिळणारा थेट अभिप्राय धोरणात्मक आराखडे सुधारण्यास, क्षेत्रातील आव्हानांना अधिक प्रभावीपणे सामोरे जाण्यास आणि भारताला एक आकर्षक गुंतवणूक स्थळ म्हणून मजबूत करण्यास मदत करतो.

भारताच्या मजबूत आर्थिक प्रगतीवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी सांगितले की भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे आणि जागतिक ऊर्जा मागणी-पुरवठा संतुलनात निर्णायक भूमिका बजावेल.

भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीच्या महत्वाच्या संधींकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. सरकारने सुरू केलेल्या गुंतवणूकदार-अनुकूल धोरणात्मक सुधारणांचा उल्लेख करत त्यांनी शोध आणि उत्पादन क्षेत्रातील सुमारे 100 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या गुंतवणूकीची क्षमता अधोरेखित केली. कॉम्प्रेस्ड बायो-गॅस (सीबीजी) मधील 30 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची संधी देखील त्यांनी अधोरेखित केली. याव्यतिरिक्त, त्यांनी गॅस-आधारित अर्थव्यवस्था, रिफायनरी-पेट्रोकेमिकल एकत्रीकरण आणि सागरी आणि जहाजबांधणी यासह व्यापक ऊर्जा मूल्य साखळीत मोठ्या प्रमाणात असलेल्या संधींची रूपरेषा मांडली.

 

जागतिक उर्जा क्षेत्रात अनिश्चितता असूनही, अमाप संधी देखील उपलब्ध आहेत, असे त्यांनी नमूद केले. संपूर्ण ऊर्जा मूल्य साखळीमध्ये भारत एक विश्वासार्ह भागीदार म्हणून सज्ज आहे याचा पुनरुच्चार करून त्यांनी नवोन्मेष, सहकार्य आणि सखोल भागीदारीचे आवाहन केले.

या उच्च-स्तरीय गोलमेज परिषदेत टोटलएनर्जीज, बीपी, विटोल, एचडी ह्युंदाई, एचडी केएसओई, अकेर, लँझाटेक, वेदांता, आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंच, एक्सेलरेट, वुड मॅकेन्झी, ट्रॅफिगुरा, स्टेट्सोली, प्राज, रिन्यू आणि एमओएल यासह आघाडीच्या जागतिक आणि भारतीय ऊर्जा कंपन्या आणि संस्थांचे प्रतिनिधित्व करणारे 27 मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि वरिष्ठ कॉर्पोरेट मान्यवरांनी सहभाग घेतला. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह पुरी आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या परिषदेला उपस्थित होते.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
DBT transfers top Rs 2 lakh crore so far in FY27

Media Coverage

DBT transfers top Rs 2 lakh crore so far in FY27
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister extends greetings on Samvatsari
September 15, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, has extended his greetings to the people on the sacred occasion of Samvatsari. Shri Modi said that Samvatsari reminds us that forgiveness and compassion strengthen every bond. He called upon everyone to embrace humility and let kindness and goodwill guide their actions.

The Prime Minister posted on X:

Samvatsari reminds us that forgiveness and compassion strengthen every bond.

On this sacred occasion, may humility guide us and may kindness and goodwill shape our every action.

Michhami Dukkadam!