शेअर करा
 
Comments
Himachal Pradesh, as a land of spirituality and bravery: PM Modi
Government is focusing on next-generation infrastructure in Himachal Pradesh. Projects related to highways, railways, power, solar energy and petroleum sector, are underway in the state: PM Modi
Those in habit of looting money now afraid of 'Chowkidar': PM Modi

हिमाचल प्रदेशमध्ये राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज धरमशाला येथे जनआभार रॅलीला संबोधित केले.

व्यासपीठावर येण्यापूर्वी पंतप्रधानांनी सरकारी योजनांवरील प्रदर्शनाला भेट दिली. विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.

सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेश अध्यात्मिकता आणि शौर्याची भूमी असलेल्यांचे गौरवोद्‌गार व्यक्त केले.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या राज्यांसोबत असलेल्या ऋणानुबंधांच्या आठवणींना पंतप्रधानांनी उजाळा दिला.

वर्षभरात विविध योजनांच्या माध्यमातून राज्य सरकार लोकांपर्यंत विशेषत: ग्रामीण भागापर्यंत पोहोचले असल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले.

राज्य सरकार अद्ययावत पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. महामार्ग, रेल्वे, ऊर्जा, सौरऊर्जा आणि पेट्रोलियम क्षेत्राशी संबंधित प्रकल्प राज्यात सुरू असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

राज्यातील पर्यटन क्षेत्राच्या क्षमतेविषयी पंतप्रधान बोलले. भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या 2013 मधल्या 70 लाखांवरुन 2017 मध्ये 1 कोटींवर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे भारतामधील मान्यताप्राप्त हॉटेलची संख्या 2013 मध्ये 1200 होती. ती वाढून 1800 वर पोहोचली असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी यासंदर्भात केला.

‘वन रँक, वन पेन्शन’ची मागणी 40 वर्षांपासून प्रलंबित होती. सत्तेवर आल्यावर सरकारने याबाबतचे सर्व प्रश्न, आवश्यक संसाधने समजून घेतली आणि त्यानंतर ‘वन रँक वन पेन्शन’ची अंमलबजावणी केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

स्वच्छतेसाठी हिमाचल प्रदेशमधले नागरिक कटिबद्ध असल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली. स्वच्छतेचा त्यांनी संस्कार म्हणून स्वीकार केला असल्याचे ते म्हणाले.

 

 

केंद्र सरकारने भ्रष्टाचाराला कसा आळा घातला ते पंतप्रधानांनी सांगितले. थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला पायबंद बसला असून सुमारे 90,000 कोटी रुपयांची बचत झाली असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Overjoyed by unanimous passage of Bill extending reservation for SCs, STs in legislatures: PM Modi

Media Coverage

Overjoyed by unanimous passage of Bill extending reservation for SCs, STs in legislatures: PM Modi
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 10 डिसेंबर 2019
December 10, 2019
शेअर करा
 
Comments

Lok Sabha passes the Citizenship (Amendment) Bill, 2019; Nation praises the strong & decisive leadership of PM Narendra Modi

PM Narendra Modi’s rallies in Bokaro & Barhi reflect the positive mood of citizens for the ongoing State Assembly Elections in Jharkhand

Impact of far reaching policies of the Modi Govt. is evident on ground