पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होळीनिमित्त देशातील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. रंग आणि आनंदाचा हा सण प्रत्येकाच्या जीवनात हर्ष, समृद्धी आणि यश घेऊन येवो, अशी आकांक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

होळीच्या सणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो संपूर्ण वातावरणात नवीन उर्जेची भर घालतो, असे  पंतप्रधान म्हणाले. या सणादरम्यान सर्वत्र दिसणारे आनंदाचे रंग सर्वांना हर्ष आणि उत्साहाच्या वातावरणात रंगवून टाकतात, असे ही त्यांनी नमूद केले आहे.

पंतप्रधानांनी यासाठी संस्कृत सुभाषित देखील सामायिक केले आहे:

उद्भिन्नस्तबकावतंससुभगाः प्रे खन्मरुन्नर्तिताः

पुष्पोद्गीर्णपरागपांशुललसत्पत्रप्रकाण्ड त्विषः।

गम्भीरक्रमपञ्चमोन्मदपिकध्वानोच्छलद्गीतयः

प्रत्युज्जीवितमन्मथोत्सव इव क्रीडन्त्यमू भूरुहः॥

या सुभाषिताचा अर्थ असा आहे की, वसंत ऋतूतील वाऱ्याच्या लहरीवर मंत्रमुग्ध करणाऱ्या नृत्याने उमलणाऱ्या सुंदर कमळ फुलांप्रमाणे, रंग आणि सुगंधाने नटलेला प्रेमाचा हा गौरवशाली उत्सव उत्साहाने बहरतो आणि जीवनालाच जागृत करणाऱ्या आनंदमय सुरांनी भरून जातो.

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे;

"सर्व देशवासीयांना माझ्याकडून होळीच्या अनंत शुभेच्छा. रंग आणि उल्हास यांनी भरलेला हा सण सर्वांसाठी आनंद घेऊन येवो. प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यशाच्या रंगांची उधळण होवो, हीच शुभेच्छा.

 

“होली का त्योहार पूरे माहौल में नई ऊर्जा भर देता है। यही इस उत्सव की बड़ी विशेषता है। हर तरफ जिस प्रकार खुशियों के रंग बिखरे नजर आते हैं, वो हर किसी को उल्लास और आनंद से सराबोर कर जाता है।

उद्भिन्नस्तबकावतंससुभगाः प्रे खन्मरुन्नर्तिताः
पुष्पोद्गीर्णपरागपांशुललसत्पत्रप्रकाण्ड त्विषः।

गम्भीरक्रमपञ्चमोन्मदपिकध्वानोच्छलद्गीतयः
प्रत्युज्जीवितमन्मथोत्सव इव क्रीडन्त्यमू भूरुहः॥”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
IndiaAI Mission-backed startup Avataar launches indigenous video AI model

Media Coverage

IndiaAI Mission-backed startup Avataar launches indigenous video AI model
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 जून 2026
June 13, 2026

Viksit Bharat Accelerating: Tech, Defense, Infra & Exports Power India's Global Leap Under the Leadership of PM Modi