आपल्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आभार मानले आहेत. 140 कोटी देशवासियांच्या प्रेम आणि सहकार्याने, आपण नेहमीच एक मजबूत, सक्षम आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी समर्पित राहू. या अनुषंगाने राष्ट्रपतींचे विचार आणि दृष्टीकेन आपल्यासाठी खूप प्रेरणादायी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
आपल्या शुभेच्छांसाठी आपले खूप खूप धन्यवाद आणि आभार, माननीय @rashtrapatibhvn जी. 140 कोटी देशवासियांच्या प्रेम आणि सहकार्याने आपण सशक्त, समर्थ आणि स्वावलंबी भारत घडवण्यासाठी सदैव समर्पित राहू. या अनुषंगाने आपला दृष्टीकोन आणि विचार माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहेत.
आपकी शुभकामनाओं के लिए बहुत-बहुत धन्यवाद और आभार माननीय @rashtrapatibhvn जी। 140 करोड़ देशवासियों के स्नेह और सहयोग से हम सशक्त, समर्थ और स्वावलंबी भारतवर्ष के निर्माण के लिए सदैव समर्पित रहेंगे। इस दिशा में आपके विजन और विचार हमारे लिए बहुत प्रेरणादायी हैं। https://t.co/xggt5teUg0
— Narendra Modi (@narendramodi) September 17, 2025


