पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना 'स्वच्छता ही सेवा' अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. 'हा एक प्रेरणादायी उपक्रम असून त्यातून सामूहिक जबाबदारी आणि राष्ट्राभिमानाची भावना प्रतिबिंबित होते' असे त्यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात एक्स या समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्ट मध्ये त्यांनी म्हटले आहे:
“स्वच्छतेशी निगडित हा उपक्रम अतिशय उत्साहजनक आहे. सर्वांनी यात सहभाग घ्यावा आणि या मोहिमेला यशस्वी करावे, असे मी आवाहन करतो. swachhatahiseva.gov.in”
स्वच्छता से जुड़ी यह पहल बहुत उत्साहित करने वाली है। मेरा आह्वान है कि अधिक से अधिक लोग इस अभियान से जुड़ें और इसे सफल बनाएं।https://t.co/3dRWSUiDjy pic.twitter.com/xfCzdepe2C
— Narendra Modi (@narendramodi) September 23, 2025


