"इतिहासातील चढ-उतारांना सामोरे जाताना मणिपूरच्या जनतेने दाखवलेली दृढता आणि एकता हीच त्यांची खरी ताकद आहे"
"मणिपुरला शांतता आणि बंद- नाकाबंदी यापासून मुक्ती मिळायलाच हवी ."
"मणिपूरला देशाच्या क्रीडा क्षेत्रातील महासत्ता बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध"
"ईशान्य प्रदेशाला अॅक्ट ईस्ट धोरणाचे केंद्र बनवण्याच्या दृष्टीने मणिपूरची महत्त्वाची भूमिका आहे"
"राज्याच्या विकासाच्या प्रवासातले अडथळे आता दूर झाले आहेत आणि पुढील 25 वर्षे मणिपूरच्या विकासाचा अमृत काळ आहेत”

मणिपूरच्या राज्य स्थापनेची 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील जनतेचे अभिनंदन केले आहे. मणिपूरच्या वैभवशाली प्रवासात योगदान दिलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या त्यागाला आणि प्रयत्नांना त्यांनी अभिवादन केले.

इतिहासातील चढउतारांना सामोरे जाताना मणिपूरच्या जनतेने दाखवलेली दृढता आणि एकता हीच त्यांची खरी ताकद आहे" असे त्यांनी नमूद केले. राज्यातील जनतेच्या अपेक्षा आणि आकांक्षा जाणून घेण्यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांचा त्यांनी पुनरुच्चार केला, ज्यामुळे त्यांना त्यांच्या भावना आणि अपेक्षा चांगल्या प्रकारे समजून घेता आल्या आणि राज्याच्या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करता आल्या. मणिपुरी लोक त्यांची शांततेची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करू शकल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. "मणिपूरमध्ये शांतता नांदावी आणि बंद आणि नाकेबंदीपासून मुक्ती मिळायला हवी", असे ते म्हणाले.

मणिपूरला देशाच्या क्रीडा क्षेत्रातील महासत्ता बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की, मणिपूरच्या मुला-मुलींनी क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवून दिला आहे आणि त्यांची आवड आणि क्षमता लक्षात घेऊन राज्यात पहिले भारताचे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. त्यांनी मणिपूरच्या तरुणांच्या स्टार्ट-अप क्षेत्रातील यशाचाही उल्लेख केला. स्थानिक हस्तकलेच्या संवर्धनासाठी सरकारची वचनबद्धता त्यांनी अधोरेखित केली.

"ईशान्य प्रदेशाला अॅक्ट ईस्ट धोरणाचे केंद्र बनवण्यात मणिपूर महत्त्वाची भूमिका बजावू शकतो यावर पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले, ‘दुहेरी -इंजिन’ सरकारच्या प्रयत्नामुळे मणिपूरला रेल्वेसारख्या बहुप्रतिक्षित सुविधा मिळत आहेत. जिरीबाम-तुपुल-इम्फाळ रेल्वे मार्गासह राज्यात हजारो कोटी रुपयांचे कनेक्टिव्हिटी प्रकल्प सुरू आहेत. त्याचप्रमाणे, इम्फाळ विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाल्यामुळे ईशान्येकडील राज्यांचा दिल्ली, कोलकाता आणि बंगळुरूशी संपर्क सुधारला आहे. भारत-म्यानमार-थायलंड त्रिपक्षीय महामार्ग आणि या प्रदेशात आगामी 9 हजार कोटींच्या नैसर्गिक वायू पाइपलाइनचाही मणिपूरला फायदा होईल.

 

पंतप्रधान म्हणाले की, राज्याच्या विकासाच्या प्रवासातले अडथळे आता दूर झाले आहेत आणि पुढील 25 वर्षे मणिपूरच्या विकासाचा अमृत काळ आहेत. भाषणाच्या शेवटी त्यांनी राज्याच्या डबल-इंजिन विकासासाठी शुभेच्छा दिल्या.

 

Click here to read full text speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's airport passenger handling capacity crosses 580 million: Govt

Media Coverage

India's airport passenger handling capacity crosses 580 million: Govt
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares Sanskrit Subhashitam applauding the effort and dedication of India's Youth
August 04, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, shared a Sanskrit Subhashitam applauding the effort and dedication of India's Youth:

"न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।

तत्स्वयं योगसंसिद्ध: कालेनात्मनि विन्दति ॥"

Shri Modi said that through continuous effort and dedication, our talents are honed and refined, and our youth is imbibing these very qualities and bringing glory to India.

The Prime Minister posted on X:

निरंतर प्रयास और साधना से हमारी प्रतिभा और निखरती है। आज हमारे युवा इन्हीं गुणों को आत्मसात कर दुनियाभर में देश का नाम रोशन कर रहे हैं।

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।

तत्स्वयं योगसंसिद्ध: कालेनात्मनि विन्दति ॥