राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी सद्यस्थितीविषयी पंतप्रधानांना दिली माहिती.
पंतप्रधानांकडून चिंता व्यक्त आणि तणाव कमी करण्यासाठी, परस्परसंवाद आणि राजकीय मुत्सद्दी धोरणावर भर, तसेच शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य पुनर्स्थापित करण्याचा पुनरूच्चार
पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांचे भारतीय समुदायाला मायदेशी परतण्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले
विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य भक्कम करण्याविषयीही त्यांनी चर्चा केली.

इराणचे राष्ट्राध्यक्ष महामहीम मसूद पेझेश्कियान यांनी दूरध्वनीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला.

इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिली आणि प्रदेशात सद्यस्थितीविषयी विशेषतः इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या संघर्षाविषयीचा त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट केला.

अलीकडच्या काळातील वाढत्या तणावाविषयी भारताला वाटणारी तीव्र चिंता पंतप्रधानांनी व्यक्त केली. भारत शांतता आणि मानवतेच्या बाजूने असल्याचं सांगितले. या संदर्भात, पंतप्रधानांनी सद्यस्थितीत, तणाव कमी करणे, संवाद आणि राजकीय मुत्सद्दी धोरणावर भर दिला. त्यांनी प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य पुनर्स्थापित होण्यासाठी भारताचा पाठिंबा असल्याचा पुनरूच्चार केला.

पंतप्रधानांनी भारतीय समुदायाला मायदेशी सुरक्षित परतण्यासाठी दिलेल्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी, व्यापार आणि आर्थिक सहकार्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि लोकांमधील सहसंबंध या आणि अशा विविध क्षेत्रांत द्विपक्षीय सहकार्य भक्कम करण्यासाठी काम करत राहाण्यासाठी सामाईक वचनबद्धता व्यक्त केली.

परस्पर संपर्कात राहण्यास त्यांनी मान्यता दिली.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'We'll provide AI skill training to 1 crore youth': PM Modi's big announcement on Independence Day 2026

Media Coverage

'We'll provide AI skill training to 1 crore youth': PM Modi's big announcement on Independence Day 2026
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 ऑगस्ट 2026
August 15, 2026

Azadi Ka Amrit Mahotsav Continues: PM Modi’s Independence Day Vision Unites Growth, Youth Power & National Pride