पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वन महोत्सव समारंभात सन्माननीय न्यायाधीशांच्या उत्साही सहभागाची प्रशंसा केली, तसेच पर्यावरणीय जबाबदारीसाठी नागरिकांना प्रेरित करण्यात त्यांची भूमिका अधोरेखित केली.
न्यायाधीशांच्या सहभागामुळे ‘एक पेड माँ के नाम’ या देशव्यापी उपक्रमाला नवीन गती मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. आपल्या मातेप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला झाडे लावण्यास प्रोत्साहित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
दिल्ली-एनसीटी सरकारचे मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांच्या X या समाज माध्यमावरील संदेशावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी यांनी लिहिले आहे:
"वन महोत्सवात माननीय न्यायाधीशांचा सहभाग प्रत्येकाला प्रेरित करणार आहे. 'एक पेड मां के नाम' या उपक्रमाला यामुळे एक नवा वेग मिळेल, असा विश्वास मला वाटतो."
सर्वोच्च न्यायालय के माननीय न्यायाधीशों की गरिमामयी उपस्थित में आज वन महोत्सव का कार्यक्रम संपन्न हुआ।
— Manjinder Singh Sirsa (@mssirsa) July 19, 2025
कार्यक्रम में चीफ जस्टिस ऑफ इंडिया, माननीय जस्टिस भूषण रामकृष्ण गंवई जी, जस्टिस सूर्यकांत शर्मा जी, जस्टिस विक्रमनाथ जी, जस्टिस एम.एम. सुंदरेश जी, जस्टिस पी. श्री. नरसिम्हा… pic.twitter.com/uRCXVoHxxR


