पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरयाणातील नूह इथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. राज्य सरकार मदत आणि बचाव कार्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
हरयाणातील नूह इथे झालेला अपघात हृदय हेलावून टाकणारा आहे. शोकाकुल कुटुंबियांसोबत माझ्या सहवेदना आहेत. या कठीण काळात ईश्वर त्यांना धैर्य देवो. यासोबतच अपघातात जखमी झालेले लोक लवकर बरे व्हावेत अशा मी प्रार्थना करतो. राज्य सरकार मदत आणि बचाव कार्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे : पंतप्रधान @narendramodi
हरियाणा के नूंह में हुआ हादसा अत्यंत हृदयविदारक है। मेरी संवेदनाएं शोक-संतप्त परिजनों के साथ हैं। ईश्वर उन्हें इस कठिन समय में संबल प्रदान करे। इसके साथ ही मैं हादसे में घायल लोगों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूं। राज्य सरकार राहत और बचाव के हरसंभव प्रयास में जुटी है: PM…
— PMO India (@PMOIndia) April 26, 2025


