पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य आणि राजसदन अयोध्या चे प्रमुख विमलेन्द्र मोहन प्रताप मिश्रा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान म्हणाले की, विमलेन्द्र मोहन प्रताप मिश्रा यांनी आपले संपूर्ण आयुष्य धार्मिक आणि सामाजिक कार्यांना समर्पित केले.
एक्स वरील एक पोस्टमध्ये पंतप्रधानांनी सांगितले :
“श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य आणि राजसदन अयोध्याचे प्रमुख विमलेन्द्र मोहन प्रताप मिश्र यांच्या देहावसानाने अतिशय दुःख झाले आहे. त्यांचे संपूर्ण जीवन धार्मिक आणि सामाजिक कार्यांसाठी समर्पित राहिले. प्रभु श्रीराम यांच्याकडे प्रार्थना आहे की त्यांनी त्यांना आपल्या चरणी स्थान द्यावे आणि त्यांच्या शोकाकुल कुटुंबियांना व अनुयायांना धैर्य प्रदान करावे. ओम शांती!”
श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट के सदस्य और राजसदन अयोध्या के मुखिया विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र जी के देहावसान से अत्यंत दुख हुआ है। उनका जीवन धार्मिक और सामाजिक कार्यों को समर्पित रहा। प्रभु श्री राम से प्रार्थना है कि उन्हें अपने श्रीचरणों में स्थान दें और उनके शोकाकुल… pic.twitter.com/DIBWorxuwX
— Narendra Modi (@narendramodi) August 24, 2025


