पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या वाराणसीला भेट दिली आणि अनेक कार्यक्रमात सहभागी झाले.

वाराणसीच्या लालबहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या पुतळ्याचे पंतप्रधानांनी अनावरण केले.

त्यानंतर वाराणसीतल्या आनंदकानन वाटीका येथे त्यांनी वृक्षारोपणाचा प्रारंभ केला.




मन महाल इथल्या अभासी संग्रहालयाला पंतप्रधानांनी भेट दिली.

दशअश्वमेध घाटाजवळ हे संग्रहालय असून, वाराणसी शहराचा सांस्कृतिक वारसा या संग्रहालयातून मांडण्यात आला आहे.
Tribute to an exemplary leader admired by all sections of society.
— PMO India (@PMOIndia) July 6, 2019
On landing in Varanasi, PM @narendramodi unveiled a statue of former PM Shri Lal Bahadur Shastri Ji. This statue is located at the Varanasi airport. pic.twitter.com/MWFBDzDsnK


