पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 150 उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश असलेल्या प्रतिनिधीमंडळाची,‘लोक कल्याण मार्ग’ इथे भेट घेऊन,
त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, उत्तराखंड आणि कर्नाटकमधल्या शेतकऱ्यांचा या प्रतिनिधीमंडळात
समावेश राहील.
ऊस क्षेत्रासाठी केंद्र सरकारने उचलेली पाऊले आणि उपक्रम याबाबत या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.


