आयआयटी-म्हणजेच भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्लीच्या 51 व्या दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील. येत्या 7 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता होणाऱ्या या समारंभात ते विद्यार्थी आणि उपस्थितांशी संवाद साधतील. केंद्रीय शिक्षण मंत्री आणि शिक्षण राज्यमंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
हा कार्यक्रम मिश्र स्वरूपात होईल. काही मान्यवर कार्यक्रमस्थळी म्हणजेच संस्थेच्या डोग्रा हॉल येथे प्रत्यक्ष उपस्थित राहतील, त्यांची संख्या मर्यादित असेल. तर या संस्थेची पदवी मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना, त्यांचे पालक, संस्थेचे काही मान्यवर माजी विद्यार्थी आणि इतर पाहुणे यांना आभासी स्वरूपात या कार्यक्रमात सहभागी होता येईल. या दीक्षांत समारंभात 2000 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाईल. यात पीएचडी, एम टेक, डिझाईन क्षेत्रातील स्नातकोत्तर पदवी, एमबीए आणि बीटेक अशा विद्यार्थ्यांचा समावेश असेल. त्याशिवाय राष्ट्रपती सुवर्णपदक, डॉ. शंकरदयाल शर्मा सुवर्णपदक आणि इतर सुवर्ण तसेच रौप्य पदके प्रदान केली जातील.


