शेअर करा
 
Comments
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेहराडून येथे डेस्टिनेशन उत्तराखंड
"क्षमता, धोरण आणि कामगिरी ...हे प्रगतीचे सूत्र आहेः पंतप्रधान मोदी "
"नादारी आणि दिवाळखोरी कायद्यामुळे व्यवसाय करणे सोपे झाले आहे. बँकिंग यंत्रणेलाही बळकटी मिळाली आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी "
"पंतप्रधान मोदी म्हणतात, सर्वांसाठी गृहनिर्माण, सर्वांसाठी वीज, सर्वांसाठी स्वच्छ इंधन, सर्वांसाठी आरोग्य, सर्वांसाठी बँकिंग आणि इतर योजनांमुळे सरकारला लक्ष्य गाठण्यास मदत करत आहे.
" # आयुष्मान भारत दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमध्ये इस्पितळे उभारण्यात मदत करेल आणि वैद्यकीय पायाभूत सुविधा सुधारण्यात मदत करेल:पंतप्रधान मोदी "
मेक इन इंडिया केवळ भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी आहे: पंतप्रधान मोदींचे गुंतवणूकदारांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेहराडून येथे डेस्टिनेशन उत्तराखंड : इन्व्हेस्टर्स समिट 2018 ला संबोधित केले.

ते म्हणाले की भारत जलद गतीने बदल करीत आहे. आगामी दशकात भारत हा जागतिक वाढीचा एक प्रमुख इंजिन असल्याचे मानले जात आहे. त्यांनी सांगितले की भारतातील आर्थिक सुधारणांचा वेग आणि प्रमाण अभूतपूर्व आहे.

 या संदर्भात त्यांनी सांगितले की भारताने उद्योग सुलभतेच्या क्रमवारीत 42 क्रमांकाने सुधारणा केली आहे. करप्रणालीत सुरू झालेल्या सुधारणांविषयी पंतप्रधानांनी भाष्य केले. ते म्हणाले की नादारी आणि दिवाळखोरी कायद्याने व्यवसाय करणे सोपे केले आहे.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात आतापर्यंत जीएसटीची अंमलबजावणी सर्वात मोठी कर सुधारणा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. यामुळे देशाला एकल बाजारपेठेत रूपांतरित केले आहे आणि कर आधार वाढविण्यात मदत झाली आहे.

पंतप्रधान म्हणाले की, पायाभूत सुविधा क्षेत्र वेगाने प्रगती करीत आहे. त्यांनी रस्ते बांधकाम, रेल्वे लाइन बांधकाम, नवीन मेट्रो प्रणाली, हाय स्पीड रेल्वे प्रकल्प आणि समर्पित मालवाहक कॉरिडॉर बद्दलही सांगितले.

हवाई क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आणि लोकांसाठी गृहनिर्माण, ऊर्जा, स्वच्छ इंधन, आरोग्य आणि बँकिंग सेवा क्षेत्रातील प्रगतीचादेखील पंतप्रधानांनी उल्लेख केला. अलीकडेच सुरू केलेल्या आयुषमान भारत योजनेमुळे श्रेणी – 2 आणि श्रेणी – 3 शहरांमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील सुविधांच्या विकासाला प्रोत्साहन मिळेल.

पंतप्रधानांनी सांगितले की, नवीन भारत हे गुंतवणूकीसाठी एक उत्तम ठिकाण आहे आणि “गंतव्य उत्तराखंड” त्याचे प्रतिनिधित्व करतो. राज्यातील गुंतवणूकदारांच्या सुलभतेसाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल त्यांनी चर्चा केली. सर्व ऋतूंसाठी अनुकूल चार-धाम रस्ते प्रकल्प आणि ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे लाइन प्रकल्पासह राज्यात दळणवळण सुधारण्यासाठी पुढाकार घेण्यात आलेल्या प्रगतीविषयी देखील सांगितले. राज्याच्या पर्यटन क्षेत्रातील प्रचंड क्षमतेविषयी पंतप्रधानांनी उल्लेख केला.

अन्न प्रक्रिया आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रामध्ये घेतलेल्या पुढाकाराबद्दल पंतप्रधानांनी भाष्य केले. “मेक इन इंडिया” या उपक्रमाच्या प्रगतीचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.

Click here to read full text speech

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
India's services sector PMI expands at second best in 13 years

Media Coverage

India's services sector PMI expands at second best in 13 years
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Share your ideas and suggestions for 'Mann Ki Baat' now!
June 06, 2023
शेअर करा
 
Comments

Prime Minister Narendra Modi will share 'Mann Ki Baat' on Sunday, June 25th. If you have innovative ideas and suggestions, here is an opportunity to directly share it with the PM. Some of the suggestions would be referred by the Prime Minister during his address.

Share your inputs in the comments section below.