महामहिम चॅन्सलर स्टॉकर

दोन्ही देशांचे प्रतिनिधी ,

माध्यमातील मित्रगण ,

नमस्कार!

ग्रूस गॉट

चॅन्सलर स्टॉकर, तुमच्या पहिल्या भारत दौऱ्यात मी तुमचे हार्दिक स्वागत करतो. युरोपबाहेरील तुमच्या पहिल्या दौऱ्यासाठी तुम्ही भारताची निवड केली याचा आम्हाला आनंद आहे. भारत-ऑस्ट्रिया संबंधांप्रती तुमचा दृष्टिकोन आणि वचनबद्धता यातून दिसून येते.

चार दशकांनंतर ऑस्ट्रियाच्या चॅन्सलर यांचा हा भारत दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. वर्ष 2026 च्या ऐतिहासिक भारत-युरोपीय महासंघासोबतच्या मुक्त व्यापार करारानंतर, भारत आणि युरोपीय महसंघ यांच्यातील संबंधांमध्ये एका नव्या सुवर्णयुगाची सुरुवात झाली आहे. चॅन्सेलर स्टॉकर यांच्या दौऱ्यामुळे आम्ही भारत-ऑस्ट्रिया संबंधांनाही एका नव्या युगात घेऊन जात आहोत.

 

मित्रांनो,

पायाभूत सुविधा,नवोन्मेष आणि शाश्वतता यांमध्ये भारत आणि ऑस्ट्रिया हे विश्वासार्ह भागीदार राहिले आहेत. दिल्ली मेट्रो असो किंवा हिमालयात दहा हजार  फूट उंचीवर बांधलेला अटल बोगदा असो,  बोगदा बांधणीतील ऑस्ट्रियाच्या कौशल्याने आपला मजबूत ठसा उमटवला आहे.

एवढेच नाही तर,रेल्वे प्रकल्पांपासून ते गुजरातमधील गिरनार रोपवेपर्यंत , स्वच्छ ऊर्जेपासून ते शहरी विकासापर्यंत भारतातील अनेक अभियांत्रिकी प्रकल्पांमध्ये ऑस्ट्रियन कंपन्या सक्रिय भागीदार राहिल्या आहेत.

 मित्रांनो,

चॅन्सलर स्टॉकर यांच्या भेटीमुळे व्यापार आणि गुंतवणुकीला नवी ऊर्जा मिळेल. ते एका मोठ्या दूरदृष्टीसह आणि मोठ्या व्यावसायिक शिष्टमंडळासह भारतात आले आहेत याचा आम्हाला आनंद आहे.

आम्ही ऑस्ट्रियाच्या तंत्रज्ञान सिद्धतेशी भारताचा वेग आणि कौशल्य यांचा संगम साधून संपूर्ण विश्वासाठी एक विश्वसनीय तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी तयार करणार आहोत. आम्ही संरक्षण, सेमीकंडक्टर, क्वांटम आणि जैविक तंत्रज्ञान या क्षेत्रातही आमची भागीदारी अधिक मजबूत करणार आहोत.

 

त्यासोबतच,आम्ही अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण सहकार्यही अधिक मजबूत करणार आहोत.आयआयटी दिल्ली आणि ऑस्ट्रियाच्या मॉटन विद्यापीठ यांच्यामध्ये आज एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या होत असून हे माहिती आदानप्रदानाच्या क्षेत्रातील एक जिवंत उदाहरण आहे.

मित्रांनो

भारताची प्रतिभा आणि कौशल्याकडे ऑस्ट्रियाचा नवोन्मेष आणि उत्पादकता यांना प्रोत्साहन देण्याची क्षमता आहे.

2023 मध्ये आम्ही ऑस्ट्रियासोबत स्थलांतर आणि नागरिकांच्या येण्या-जाण्यासंदर्भात एक व्यापक करार केला आहे. आता या करारानुसार आम्ही नर्सिंग क्षेत्रातील देवघेवही वाढवणार आहोत. आम्ही एकत्र येऊन संशोधन आणि स्टार्टअप सहकार्य अधिक मजबूत करणार आहोत. युवकांच्या आदानप्रदानाला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी भारत ऑस्ट्रिया वर्किंग हॉलिडे कार्यक्रमही आम्ही सुरु करत आहोत.

मित्रांनो

आज संपूर्ण जग एका गंभीर आणि तणावपूर्ण परिस्थितीतून जात आहे. याचा प्रभाव आपल्या सर्वांवर पडत आहे. अशा तणावपूर्ण जागतिक वातावरणात, लष्करी कारवाईने, समस्यांची सोडवणूक करता येत नाही, याबद्दल,भारत आणि ऑस्ट्रिया यांच्यामध्ये एकमत झाले आहे. युक्रेन असो की, पश्चिम आशिया, आम्ही त्या त्या प्रदेशातील स्थैर्य आणि सातत्यपूर्ण शांततेचं समर्थन करत आहोत. वाढत्या जागतिक आव्हानांच्या समाधानासाठी जागतिक संस्थांची पुनर्रचना करने अनिवार्य झाले आहे,यावरही आमच्यात परस्पर सहमती आहे. दहशतवादाचे समूळ उच्चाटन ही देखील आमची सामायिक वचनबद्धता आहे.

 

महोदय,

2024 मध्ये चार दशकांनंतर माझा  ऑस्ट्रिया दौरा  झाला होता. या भेटीनंतर आज भारतात आपले स्वागत करणे आमच्यासाठी अभिमानास्पद आणि आनंददायक आहे. या, आपण एकत्रितपणे,भारत आणि ऑस्ट्रियाच्या भागीदारीला नवोन्मेष-केंद्री आणि भविष्यासाठी सज्ज करुयात.

खूप खूप धन्यवाद !

 

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Foreign traveller calls India's Vande Bharat sleeper a “Five-Star Hotel on Rails”; and the Internet agrees

Media Coverage

Foreign traveller calls India's Vande Bharat sleeper a “Five-Star Hotel on Rails”; and the Internet agrees
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister condoles passing of Smt. Chennamma Ji
July 18, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, has expressed deep sorrow over the passing of Smt. Chennamma Ji, wife of former Prime Minister, Shri Deve Gowda Ji. Shri Modi noted that Smt. Chennamma Ji was admired for her humility and passion towards serving society.

The Prime Minister posted on X;

“Deeply pained by the passing of Smt. Chennamma Ji, wife of former Prime Minister Shri Deve Gowda Ji. She was admired for her humility and passion towards serving society. In this hour of grief, my thoughts are with Shri Deve Gowda Ji and his entire family. Om Shanti.”

ಮಾಜಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಶ್ರೀ ದೇವೇಗೌಡ ಅವರ ಪತ್ನಿ ಶ್ರೀಮತಿ ಚೆನ್ನಮ್ಮನವರ ನಿಧನದಿಂದ ತೀವ್ರ ದುಃಖವಾಗಿದೆ. ಅವರು ತಮ್ಮ ವಿನಯ ಮತ್ತು ಸಮಾಜ ಸೇವೆಯ ಮೇಲಿನ ಬದ್ಧತೆಗಾಗಿ ಎಲ್ಲರ ಗೌರವಕ್ಕೆ ಪಾತ್ರರಾಗಿದ್ದರು. ಈ ದುಃಖದ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಶ್ರೀ ದೇವೇಗೌಡರು ಮತ್ತು ಅವರ ಇಡೀ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ನನ್ನ ಹೃದಯಪೂರ್ವಕ ಸಂತಾಪಗಳು. ಓಂ ಶಾಂತಿ.