शेअर करा
 
Comments

पंतप्रधान नरेंद्र मोदी, नवी दिल्लीत, इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममधल्या बुद्ध जयंती कार्यक्रमात सहभागी झाले.

पंतप्रधानांनी संघ दान अर्पण केले. सारनाथ इथल्या सेंट्रल इन्सिट्यूट ऑफ हायर तिबेटीयन स्टडीज आणि बोध गया इथल्या ऑल इंडिया भिक्षू संघाला वैशाख सन्मान प्रशस्ती पत्र त्यांनी प्रदान केले.

भारत हे अद्वितीय अशा संस्कृतीचे स्थान आहे जिथे मानव कल्याणाच्या विचारांचे प्राबल्य राहिले आहे. भगवान बुद्धाच्या शिकवणीने अनेक राष्ट्रांना घडवले. भारत हा कधीही आक्रमक देश राहिलेला नाही, असे पंतप्रधान म्हणाले.

भगवान बुद्धांच्या अष्टांग मार्गाविषयी बोलताना आपण हा मार्ग अनुसरला तर आपल्यासमोरच्या समस्यांवर मात करता येईल असे पंतप्रधान म्हणाले.

भगवान बुद्धांचा प्रेम आणि करुणेचा संदेश आजच्या जगासाठी अतिशय उपयुक्त असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

भगवान बुद्धांनी दाखवलेल्या करुणेच्या मार्गाला अनुसरुन सरकार जनतेची सेवा करत आहे. भगवान बुद्धांशी संबंधित वारश्यासह भारताचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी केंद्र सरकार कार्यरत आहे. बौद्ध परिक्रमेसाठी360 कोटी रुपये मंजूर केले आहेत असे ते म्हणाले.

देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून 2022च्या नव भारतासाठी योगदान देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी उपस्थितांना केले. या तारखेपर्यंत आपल्याला पूर्ण करता येईल असे कार्य घेऊन त्याच्या पूर्ततेचा संकल्प प्रत्येकाने करावा, असे पंतप्रधानांनी सांगितले.

 

Click here to read PM's speech

Inspire India's Olympians! #Cheers4India
Modi Govt's #7YearsOfSeva
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Over 44 crore vaccine doses administered in India so far: Health ministry

Media Coverage

Over 44 crore vaccine doses administered in India so far: Health ministry
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 27 जुलै 2021
July 27, 2021
शेअर करा
 
Comments

PM Narendra Modi lauded India's first-ever fencer in the Olympics CA Bhavani Devi for her commendable performance in Tokyo

PM Modi leads the country with efficient government and effective governance