|
अनुक्रमांक |
करार/सामंजस्य करार |
|
1. |
मालदीवसाठी 4,850 कोटी भारतीय रुपयांची कर्ज मर्यादा (LoC) वाढवणे. |
|
2. |
भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध केलेल्या LoC वर मालदीवच्या वार्षिक कर्ज परतफेडीची बंधने कमी करणे. |
|
3. |
भारत-मालदीव मुक्त व्यापार करार (IMFTA) वाटाघाटींचा शुभारंभ. |
|
4. |
भारत-मालदीव राजनैतिक संबंध स्थापनेच्या 60 व्या वर्धापन दिनाच्या स्मरणार्थ संयुक्तपणे टपाल तिकीट जारी करणे. |
|
अनुक्रमांक |
उद्घाटन / हस्तांतरण |
|
1. |
भारताच्या बायर्स क्रेडिट (खरेदीदार कर्ज योजना) सुविधेअंतर्गत हुलहुमाले येथे 3,300 सामाजिक घरकुलांचे हस्तांतरण. |
|
2. |
अड्डू शहरातील रस्ते आणि सांडपाणी-मलनिस्सारण प्रणाली प्रकल्पाचे उद्घाटन. |
|
3. |
मालदीवमध्ये 6 उच्च प्रभावी सामुदायिक विकास प्रकल्पांचे उद्घाटन. |
|
4. |
72 वाहने आणि अन्य उपकरणे यांचे हस्तांतरण. |
|
5. |
दोन भीष्म हेल्थ क्यूब या फिरत्या आरोग्य तपासणी यंत्रांच्या संचांचे हस्तांतरण. |
|
6. |
माले येथील संरक्षण मंत्रालय इमारतीचे उद्घाटन. |
|
अनुक्रमांक |
सामंजस्य करारांचे आदानप्रदान |
मालदीवचे प्रतिनिधी |
भारताचे प्रतिनिधी |
|
1. |
मालदीवसाठी 4,850 कोटी भारतीय रुपयांच्या कर्ज मर्यादेसाठी करार |
श्री. मूसा जमीर, वित्त आणि नियोजन मंत्री |
डॉ. एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्री |
|
2. |
भारत सरकारकडून दिलेल्या कर्ज मर्यादे वर मालदीवच्या वार्षिक कर्ज परतफेडीची बंधने कमी करण्याबाबतचा सुधारीत करार |
श्री. मूसा जमीर, वित्त आणि नियोजन मंत्री |
डॉ. एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्री |
|
3. |
भारत-मालदीव मुक्त व्यापार करार (FTA) साठी संदर्भ अटी |
श्री. मोहम्मद सईद, आर्थिक विकास आणि व्यापार मंत्री |
डॉ. एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्री |
|
4. |
मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यपालन क्षेत्रातील सहकार्यासाठी सामंजस्य करार |
श्री. अहमद शियाम, मत्स्य व्यवसाय आणि सागरी साधनसंपत्ती मंत्री |
डॉ. एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्री |
|
5. |
भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM), पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि मालदीवचे हवामान सेवा (MMS), पर्यटन आणि पर्यावरण मंत्रालय यांच्यातील सामंजस्य करार |
श्री. थोरीक इब्राहीम, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री |
डॉ. एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्री |
|
6. |
डिजिटल रूपांतरणासाठी व्यापक स्तरावर यशस्वी अंमलबजावणी केलेल्या डिजिटल उपाययोजना देऊ करण्याच्या सहकार्यासाठी (भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय आणि मालदीवचे गृहसुरक्षा आणि तंत्रज्ञान मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार |
श्री. अली इहुसान, गृहसुरक्षा आणि तंत्रज्ञान मंत्री |
डॉ. एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्री |
|
7. |
मालदीवकडून भारतीय फार्माकोपिया अर्थात औषधसंहितेला मान्यता देण्यासाठी सामंजस्य करार |
श्री. अब्दुल्ला नझीम इब्राहीम, आरोग्य मंत्री |
डॉ. एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्री |
|
8. |
भारताच्या NPCI International Payment Limited (NIPL) आणि मालदीवच्या Monetary Authority (MMA) यांच्यात, मालदीवमध्ये UPI च्या वापराबाबत नेटवर्क-टू-नेटवर्क (दोन प्रणालींमधील समन्वय) करार |
डॉ. अब्दुल्ला खलील, परराष्ट्र मंत्री |
डॉ. एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्री |


