महामहिम अध्यक्ष ,
"द ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III" पुरस्कार देऊन मला गौरवल्याबद्दल मी तुमचे, सायप्रस सरकारचे आणि येथील जनतेचे आभार मानतो.
हा सन्मान केवळ माझा,नरेंद्र मोदींचा सन्मान नाही. हा 1.4 अब्ज भारतीयांचा सन्मान आहे. त्यांचे सामर्थ्य आणि आकांक्षांचा हा सन्मान आहे. हा आमच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा आणि 'वसुधैव कुटुंबकम' अर्थात 'जग एक कुटुंब आहे' या तत्वज्ञानाचा सन्मान आहे.
मी हा सन्मान भारत आणि सायप्रसमधील मैत्रीपूर्ण संबंधांना, आपल्या सामायिक मूल्यांना आणि आपल्यातील परस्पर सामंजस्याला समर्पित करतो.

सर्व भारतीयांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक आणि नम्रपणे मी हा पुरस्कार स्वीकारतो.
हा पुरस्कार शांतता, सुरक्षा, सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि आपल्या लोकांच्या समृद्धीप्रती असलेल्या आमच्या अतूट वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
महामहिम,
भारत आणि सायप्रसमधील मैत्रीचे बंध मजबूत करण्याची जबाबदारी म्हणून मी हा सन्मान स्वीकारतो.

मला विश्वास आहे की आपली भागीदारी आगामी काळात आणखी नवी उंची गाठेल आणि एकत्रितपणे, आपण केवळ आपल्या देशांच्या विकासासाठीच नव्हे तर जागतिक शांतता आणि सुरक्षिततेसाठी योगदान देत राहू.
पुन्हा एकदा,या सन्मानाबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो.
खूप खूप धन्यवाद.


