मित्रांनो, 

जागतिक शांतता आणि सुरक्षा हे केवळ आदर्श नव्हेत, तर ते आपल्या सामाईक हितसंबंध आणि भविष्य यांचा पाया आहेत. मानवतेची प्रगती केवळ शांततामय आणि सुरक्षित वातावरणातच शक्य आहे. हे उद्दीष्ट पूर्ण करण्यामध्ये ब्रिक्स खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते.आपण एकत्र येत, आपले एकत्रित प्रयत्न आणि आपल्या सर्वांना भेडसावणाऱ्या आव्हानांना एकत्रितपणे सामोरे जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपण एकत्रितपणे पुढे गेले पाहिजे. 

मित्रांनो, 

आज मानवतेसमोरील दहशतवादाचे सर्वांत गंभीर आव्हान आहे. भारताने अलीकडेच एका क्रूर परंतु भ्याड दहशतवादी हल्ल्याचा सामना केला. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा थेट भारताच्या आत्मा, ओळख आणि प्रतिष्ठा यांच्यावर झाला होता. हा हल्ला केवळ भारतावरच नव्हे तर संपूर्ण मानवतेवर झालेला आघात होता. शोक आणि दुःखाच्या या काळात मी आमच्यासमवेत उभ्या राहिलेल्या आणि पाठिंबा आणि सहानुभूती व्यक्त करणाऱ्या सर्व मित्र देशांचे मनापासून आभार मानतो. 

दहशतवादाचा निषेध हा केवळ सोयीचा विषय न ठेवता तो तत्वाचा विषय असला पाहिजे. हल्ला कुठे किंवा कोणाविरूद्ध झाला यावर आपला प्रतिसाद अवलंबून असेल तर तो मानवतेचा विश्वासघात ठरेल. 

मित्रांनो, 

दहशतवादावर निर्बंध लादण्यात कोणत्याही प्रकारचा संकोच नसावा. पीडीत आणि दहशतवादाचे पाठीराखे यांना समान वागणूक देता येणार नाही. वैयक्तिक किंवा राजकीय फायद्यांसा्ठी दहशतवादाला मूक संमती देणे किंवा दहशतवादी किंवा दहशतवादाला पाठिंबा देणे हे कोणत्याही परिस्थिती कधीही स्वीकारार्ह नसेल. दहशतवादाच्या बाबतीत आपले शब्द आणि कृती यांच्यामध्ये फरक नसावा. जर आपण हे करू शकणार नसू, तर स्वाभाविकपणे दहशतवादा विरोधातील लढाईत आपण गंभीर आहोत की नाही या प्रश्न  उद्भवतो?

मित्रहो, 

आज, पश्चिम आशियापासून ते युरोपपर्यंत, सर्व जग वाद आणि तणाव यांनी वेढलेले आहे. गाझातील मानवतावादी परिस्थिती ही गंभीर चिंतेचा विषय आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरीही शांततेचा मार्ग हाच मानवतेच्या भल्यासाठीचा एकमेव पर्याय असल्याचा भारताच ठाम विश्वास आहे. 

भारत हा भगवान बुद्ध आणि महात्मा गांधी यांची भूमी असलेला देश आहे. युद्ध आणि हिंसा यांना आमच्याकडे स्थान नाही. जगाला विभाजन आणि संघर्षापासून जगाला दूर ठेवणाऱ्या आणि संवाद, सहकार्य आणि समन्वय यांच्या दिशेने नेणाऱ्या तसेच एकजूट आणि विश्वास यांना वृद्धिंगत करणाऱ्या हरेक प्रयत्नाला भारत पाठिंबा देतो. त्या दिशेने, आम्ही सर्व मित्र राष्ट्रांशी सहकार्य आणि भागीदारीसाठी वचनबद्ध आहोत. धन्यवाद. 

मित्रांनो, 

शेवट करताना, पुढील वर्षी भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी तुम्हा सर्वांना भारतात येण्यासाठी हार्दिक आमंत्रण देतो. 

खूप खूप आभार.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
A big deal: The India-EU partnership will open up new opportunities

Media Coverage

A big deal: The India-EU partnership will open up new opportunities
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 28 जानेवारी 2026
January 28, 2026

India-EU 'Mother of All Deals' Ushers in a New Era of Prosperity and Global Influence Under PM Modi