पुद्दुचेरीच्या उत्साही लोकांमध्ये उपस्थित राहताना मला आनंद होत आहे. आज अनेक विकासकामांचा शुभारंभ होत आहे, ज्यामुळे राहणीमान सुलभ होईल आणि या प्रदेशाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल." : पंतप्रधान
मी यापूर्वी जेव्हा येथे आलो होतो, तेव्हा मी BEST पुद्दुचेरीचा मंत्र दिला होता; BEST म्हणजे बिझनेस, एज्युकेशन, स्पिरीच्युऍलिटी, आणि टूरीझम. गेल्या साडेचार वर्षांत हा दृष्टिकोन प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे : पंतप्रधान
पुद्दुचेरीने सुशासन आणि विकासाचा अनुभव घेतला आहे
एक मजबूत आणि सशक्त युवा हा आपल्या वृद्धीचा पाया आहे. त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी आम्ही काम करत आहोतः पंतप्रधान
एनआयटी कराईकल येथे नवीन डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंजिनीअरिंग ब्लॉक आणि आधुनिक वसतिगृह सुविधांमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या तांत्रिक शिक्षणाला बळकटी मिळेल; तसेच पाँडिचेरी विद्यापीठातील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे." : पंतप्रधान
आमचा असा विश्वास आहे की आरोग्य सेवा सर्वांसाठी सुलभ, उपलब्ध आणि परवडणारी असावी; आयुष्मान भारत योजना आधीच संपूर्ण भारतातील कोट्यवधी कुटुंबांसाठी हे स्वप्न पूर्ण करत आहे : पंतप्रधान
माझा ठाम विश्वास आहे की पुद्दुचेरी 'मेडिकल टुरिझम'चे (वैद्यकीय पर्यटन) केंद्र बनू शकते. पुद्दुचेरीमध्ये आधीच नऊ वैद्यकीय महाविद्यालये आहेत; 'जिपमेर' (JIPMER) मधील प्रादेशिक कर्करोग केंद्राच्या आधुनिकीकरणामुळे आरोग्य सेवा क्षमतेचा आणखी विस्तार होईल : पंतप्रधान
आज PM-ABHIM अंतर्गत गंभीर आजारी रुग्णांसाठी तीन 'क्रिटिकल केअर ब्लॉक्स'ची पायाभरणी करण्यात आली आहे : पंतप्रधान

पुदुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगासामी, माझे केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकारी मनसुख मांडवीय, पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल के. कैलाशनाथन, सभापती आर. सेल्वम, गृहमंत्री ए. नमस्सिवायम, इतर नेते, पुद्दुचेरीच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, वणक्कम्!

मित्रांनो,

पुद्दुचेरीमध्ये असणे हा एक सन्मान आहे. ही सिद्ध, संत, कवी आणि स्वातंत्र्यसैनिकांची भूमी आहे. इथेच महाकवी सुब्रमण्यम भारती यांनी राष्ट्रवादाची आग पेटवली. येथूनच श्री अरबिंदो आणि माताजी यांनी संपूर्ण जगाला एक नवीन आध्यात्मिक दृष्टी दिली.

 

मित्रांनो,

मी जेव्हा आधी इथे आलो होतो तेव्हा मी बेस्ट पुद्दुचेरीचा मंत्र दिला होता. बीईएसटी- बेस्ट म्हणजे व्यवसाय, शिक्षण, अध्यात्म आणि पर्यटन. गेल्या साडेचार वर्षात हा दृष्टिकोन फलदायी ठरला आहे. पुद्दुचेरी सुशासन आणि विकास यांचा साक्षीदार झाला आहे. जेव्हा केंद्र आणि केंद्रशासित प्रदेश समान दृष्टिकोन आणि समर्पणाने काम करतात तेव्हा निकाल जलद आणि चांगले मिळतात. पुद्दुचेरीने दरडोई उत्पन्नात प्रभावी वाढ दर्शविली आहे. त्यांनी देशातील सर्वोच्च सामाजिक प्रगती निर्देशांक देखील मिळवला आहे. आता डबल-इंजिन एनडीए सरकार पुद्दुचेरीच्या विकासाला अधिक गती देईल. आज दोन हजार सातशे कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होत आहे. हे प्रकल्प लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणतील.

मित्रांनो,

संपूर्ण भारतात उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीवर मोठा भर दिला जात आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात आम्ही पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी विक्रमी बारा लाख कोटी रुपये राखून ठेवले आहेत. याचा फायदा पुद्दुचेरीच्या लोकांनाही होईल. राज्यांच्या विशेष सहाय्यासाठी असणाऱ्या भांडवली गुंतवणूक योजनेत आम्ही पुद्दुचेरीला समाविष्ट केले, जी पूर्वी फक्त राज्यांसाठी खुली होती. पायाभूत सुविधांसाठी अधिक निधी म्हणजे चांगले रस्ते, पाणीपुरवठा, किनारी पायाभूत सुविधा, शाळा, रुग्णालये आणि असे अनेक प्रकल्प. या सुविधा थेटपणे नागरिकांचे जीवन चांगले बनवतात.

मित्रांनो,

सशक्त आणि सक्षम युवावर्ग हा आपल्या विकासाचा पाया आहे. आम्ही त्यांच्या स्वप्नांना पाठिंबा देण्यासाठी काम करत आहोत. एनआयटी कराईकलमधील नवीन डॉ. एपीजे अब्दुल कलाम अभियांत्रिकी ब्लॉक आणि आधुनिक वसतिगृह सुविधा अनेक विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक शिक्षण मजबूत करतील. पाँडिचेरी विद्यापीठात पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. नवीन व्याख्यान कक्ष, मुलींचे वसतिगृह आणि इतर पायाभूत सुविधा विद्यार्थ्यांसाठी सहाय्यभूत ठरतील. मला सांगण्यात आले आहे की पुदुचेरी सरकारच्या विविध विभागांमधील हजारो रिक्त जागा भरण्यात आल्या आहेत. यापैकी अनेक पदांसाठी गेल्या अनेक दशकांपासून थेट भरती परीक्षा घेतल्या जात नव्हत्या. परंतु डबल इंजिन सरकारने हे काम पूर्ण करून घेतले. लोकांची सेवा करण्यासाठी भरती झालेल्या सर्व युवावर्गाचे मी अभिनंदन करतो.  

 

मित्रांनो,

आज जग स्वच्छ आणि हरित गतिशीलतेवर लक्ष केंद्रित करत आहे. इलेक्ट्रिक वाहने आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनली आहेत. प्रदूषण कमी करणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस पुद्दुचेरीसारख्या पर्यटन केंद्रासाठी कलाटणी देणाऱ्या ठरू शकतात. आज पीएम ई-बस सेवेअंतर्गत इलेक्ट्रिक बसेस पुरवल्या जात आहेत. आज आपल्या कार्यक्रमाशी संबंधित गृहनिर्माण प्रकल्प कुटुंबांना स्थिरता आणि प्रतिष्ठा देतील. पुद्दुचेरी, कराईकल, माहे आणि यानममध्ये शंभर कोटींचे प्रकल्प होत आहेत जे लोकांना मदत करतील. वॉटर डिसॅलिनेशन प्लांटमुळे पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल. नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमुळे कचरा व्यवस्थापन सुधारेल. पावसाळ्यात पूर आणि पाणी साचणे कमी करण्यासाठी सरकार काम करत आहे. आमचे सर्व प्रयत्न पुद्दुचेरीच्या लोकांचे राहणीमान सुलभ करण्यासाठी आहेत. इथे काही मुले छान छान चित्र काढून घेऊन आली आहेत. जरा एसपीजीच्या लोकांना सांगतो, जरा ती गोळा करा. धन्यवाद मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. कृपया सर्व भेटवस्तू गोळा करा. 

मित्रांनो,

कोणताही देश तेव्हाच प्रगती करू शकतो जेव्हा त्याचे मानवी भांडवल निरोगी असेल. म्हणूनच आरोग्यसेवा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आम्हाला असा विश्वास आहे की आरोग्यसेवा सर्वांसाठी सुलभ, उपलब्ध आणि परवडणारी असावी. आयुष्मान भारत योजना भारतातील कोट्यवधी कुटुंबांसाठी हे स्वप्न पूर्ण करत आहे. पुद्दुचेरीतील कोणत्याही नागरिकाला उपचारांसाठी दूर जाण्याची सक्ती केली जाऊ नये. त्याऐवजी, आम्हाला इतर प्रदेशातील लोकांनी येथे येऊन बरे व्हावे असे वाटते. पुदुचेरी हे वैद्यकीय पर्यटन केंद्र बनू शकते असा माझा ठाम विश्वास आहे. पुद्दुचेरीमध्ये आधीच नऊ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. जिपमेर येथील प्रादेशिक कर्करोग केंद्राच्या आधुनिकीकरणामुळे आरोग्यसेवा क्षमता आणखी वाढेल. आज, PM-ABHIM अंतर्गत गंभीर आजारी रुग्णांसाठी तीन क्रिटिकल केअर ब्लॉक्सची पायाभरणी करण्यात आली. पुद्दुचेरी आणि कराईकलमधील हे नवीन क्रिटिकल केअर ब्लॉक्स आपत्कालीन क्षमता लक्षणीयरीत्या वाढवतील. पुद्दुचेरी सिद्ध औषध आणि समग्र आरोग्यसेवेसाठी ओळखले जाते. कराईकलमधील नवीन एकात्मिक आयुष रुग्णालय लोकांची सेवा करेल.

मित्रांनो,

कनेक्टिव्हिटी ही प्रगतीचा कणा आहे. आम्ही ग्रामीण आणि शहरी पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करत आहोत. एकीकडे शेकडो किलोमीटर ग्रामीण रस्ते बांधले जात आहेत. ते विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि लहान व्यवसायांसाठी कनेक्टिव्हिटी सुधारत आहेत. त्याच वेळी आम्ही पुद्दुचेरीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी देखील काम करत आहोत. आम्ही पुद्दुचेरी शहरात एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची घोषणा केली आहे. यामध्ये चारशे चाळीस कोटी रुपयांच्या उड्डाणपुलाचा समावेश आहे.

मित्रांनो,

ईस्ट कोस्ट रोड आणि ग्रँड सदर्न ट्रंक रोडच्या सुधारणांमुळे चेन्नईशी कनेक्टिव्हिटी सुधारली जात आहे. पुदुचेरी आणि चेन्नई दरम्यानचा प्रवास वेळ सुमारे 1.5-2 तासांपर्यंत कमी होईल. पुद्दुचेरी ते कुड्डालोर राष्ट्रीय महामार्ग आधीच पूर्ण झाला आहे आणि कराईकल राष्ट्रीय महामार्गाचे अद्यतनीकरण केले जात आहे. आम्ही कन्याकुमारीपर्यंतच्या ईस्ट कोस्ट कॉरिडॉरच्या रस्ते प्रकल्पांमध्ये तीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करत आहोत. हे प्रकल्प पुदुचेरीचे काही भाग चेन्नई, बेंगळुरू आणि कोइम्बतूर सारख्या प्रमुख आर्थिक केंद्रांशी जोडतात. अशा कनेक्टिव्हिटीमुळे पर्यटन, व्यापार आणि उद्योगाला लक्षणीयरीत्या चालना मिळेल. 

 

ईस्ट कोस्ट रोड आणि ग्रँड सदर्न ट्रंक रोडच्या सुधारणांमुळे चेन्नईशी कनेक्टिव्हिटी सुधारली जात आहे. पुदुचेरी आणि चेन्नई दरम्यानचा प्रवास वेळ सुमारे 1.5-2 तासांपर्यंत कमी होईल. पुद्दुचेरी ते कुड्डालोर राष्ट्रीय महामार्ग आधीच पूर्ण झाला आहे आणि कराईकल राष्ट्रीय महामार्गाचे अद्यतनीकरण केले जात आहे. आम्ही कन्याकुमारीपर्यंतच्या ईस्ट कोस्ट कॉरिडॉरच्या रस्ते प्रकल्पांमध्ये तीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करत आहोत. हे प्रकल्प पुदुचेरीचे काही भाग चेन्नई, बेंगळुरू आणि कोइम्बतूर सारख्या प्रमुख आर्थिक केंद्रांशी जोडतात. अशा कनेक्टिव्हिटीमुळे पर्यटन, व्यापार आणि उद्योगाला लक्षणीयरीत्या चालना मिळेल. 

मित्रांनो,

पर्यटन हे पुदुचेरीच्या सर्वात मोठ्या ताकदींपैकी एक आहे. आठवड्याच्या अखेरीचे गंतव्य स्थान म्हणून येथे हजारो लोक येतात. गाड्या आणि विमाने नेहमीच भरलेली असतात. पुद्दुचेरीच्या लोकांच्या प्रेमामुळेच हे घडत आहे. आध्यात्मिक पर्यटन, पर्यावरणीय पर्यटन आणि आरोग्य पर्यटनात गुंतवणूक करून, आम्ही हे नवीन उंचीवर नेत आहोत. प्रशाद योजनेअंतर्गत, विविध मंदिरांमध्ये तीर्थक्षेत्र सुविधांचा विकास केला जात आहे. श्री अरबिंदो आणि माताजींनी ऑरोव्हिलला चेतनेचे वैश्विक शहर म्हणूनच पाहिले. मला हे जाणून आनंद झाला की आज ऑरोव्हिलमध्ये जागतिक आध्यात्मिक महोत्सव सुरू होत आहे. अशा मेळाव्यामुळे प्रदेश आणि धर्मांमधील लोक एकत्र येतात.

मित्रांनो,

डबल इंजिन सरकार करत असलेल्या चांगल्या कामाचे उत्सव साजरे करणे महत्त्वाचे आहे. परंतु पूर्वीची परिस्थिती कशी होती हे देखील लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. काँग्रेस-द्रमुकच्या राजवटीत पुद्दुचेरीच्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. ती वर्षे राजकीय अस्थिरता, भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि गरिबांच्या दुःखाने भरलेली होती. रेशन दुकानांमध्ये तांदूळ नव्हता. पगार उशिरा मिळत होते. गुंड आणि ड्रग्ज माफियांचे रस्त्यावर राज्य होते.

मित्रांनो,

काँग्रेसने पुद्दुचेरीला दिल्लीतील एका कुटुंबासाठी एटीएम बनवले होते. द्रमुकचा विचार केला तर, तमिळनाडूमध्येही घोटाळ्यांची मोठी यादी तुम्हाला दिसतेच आहे. पुद्दुचेरीच्या विकास प्रवासात काँग्रेस आणि द्रमुक हे स्पीड ब्रेकर बनले होते. आता त्याच शक्ती पुन्हा सत्तेसाठी भुकेल्या आहेत. पुद्दुचेरी भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीच्या त्या काळात परत जाईल का? मला खात्री आहे की पुदुचेरीच्या लोकांना ते नको असेल.

मित्रांनो,

पुद्दुचेरी हा आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वपूर्ण भाग राहिला आहे. अनेक नेते येथे जन्माला आले. त्यापैकी काही येथे आले आणि त्यांनी येथून काम केले. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ही भूमी महत्त्वाची ठरली आहे. आता, 2048 पर्यंत आपल्याला एक विकसित पुद्दुचेरी आणि विकसित भारत निर्माण करायचा आहे. पुद्दुचेरीचे डबल इंजिन सरकार या मोहिमेत तुमच्यासोबत आहे. आम्ही बेस्ट पुदुचेरीसाठी काम करत राहू. 
नण्ड्री!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Zojila Tunnel achieves final breakthrough at 11,578 feet, bringing Kashmir-Ladakh link closer

Media Coverage

Zojila Tunnel achieves final breakthrough at 11,578 feet, bringing Kashmir-Ladakh link closer
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister expresses gratitude to Vice President Thiru CP Radhakrishnan Ji for his warm wishes
June 10, 2026

Prime Minister Shri Narendra Modi today expressed gratitude to Vice President Thiru CP Radhakrishnan Ji for his warm wishes. The Prime Minister stated that the trust and blessings of the people of India inspire him to work harder in service of the nation.

Shri Modi noted that all his efforts will continue to be guided by the aim of building a Viksit Bharat that is prosperous and proud of our civilisational heritage. The Prime Minister affirmed that no stone will be left unturned in fulfilling the dreams and aspirations of our fellow Indians.

The Prime Minister posted on X:

"Thank you for your warm wishes, Vice President Thiru CP Radhakrishnan Ji.

The trust and blessings of the people of India inspire me to work harder in service of the nation. All my efforts will continue to be guided by the aim of building a Viksit Bharat that is prosperous and proud of our civilisational heritage. No stone will be left unturned in fulfilling the dreams and aspirations of our fellow Indians.

@VPIndia

@CPR_VP"