पंतप्रधान भुवनेश्वरमध्ये ‘उत्कर्ष ओडिशा - मेक इन ओडिशा कॉन्क्लेव्ह 2025’चे करणार उद्घाटन
परिषदेच्या आयोजनामागे ओडिशाला पूर्वोदय व्हिजनचे केंद्रस्थान, भारतातील अग्रगण्य गुंतवणूक स्थान बनवून औद्योगिक केंद्र बनविण्‍याचे उद्दिष्ट
पंतप्रधान डेहराडून येथे 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे करणार उद्घाटन
यंदाच्‍या राष्‍ट्रीय क्रीडा स्पर्धांची संकल्‍पना: ‘हरित क्रीडा स्पर्धा’

पंतप्रधान  नरेंद्र मोदी उद्या – 28 जानेवारी रोजी ओडिशा आणि उत्तराखंडला भेट देणार आहेत. सकाळी 11 वाजता ते भुवनेश्वरमधील जनता मैदान येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या  ‘उत्कर्ष ओडिशा - मेक इन ओडिशा कॉन्क्लेव्ह 2025’  चे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर ते उत्तराखंडमधील डेहराडूनला जातील आणि संध्याकाळी 6 .00 वाजता ते 38  व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करतील.

पंतप्रधान ओडिशामध्ये:

पंतप्रधान भुवनेश्वरमध्ये उत्कर्ष ओडिशा - मेक इन ओडिशा कॉन्क्लेव्ह 2025 चे उद्घाटन करतील. ओडिशा सरकारद्वारे आयोजित करण्यात आलेल्या  या प्रमुख जागतिक गुंतवणूक शिखर परिषदेचे उद्दिष्ट  ओडिशा राज्याला पूर्वोदय व्हिजनचे  केंद्रस्थान तसेच भारतातील एक अग्रगण्य गुंतवणूक स्थान बनवणे असा  आहे.  त्याचबरोबर  औद्योगिक केंद्र म्हणून राज्याचे स्थान निर्माण करणे असा उद्देश   आहे.

याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी  ‘मेक इन ओडिशा’ प्रदर्शनाचे उद्घाटनही करणार आहेत. या प्रदर्शनाच्‍या माध्‍यमातून औद्योगिक परिसंस्था विकसित करण्यासाठी  राज्याने केलेल्या  कामगिरीवर प्रकाश टाकण्‍यात आला आहे. ही परिषद  28 आणि 29  जानेवारी, 2025 अशी दोन दिवस  आयोजित करण्‍यात आली आहे. या दोन दिवसांमध्‍ये उद्योग क्षेत्रातील धुरीण, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते यांना एकत्रित आणण्‍यात येणार आहे.  या सर्वांच्या दृष्‍टीने   ओडिशा पसंतीचे गुंतवणूक स्थान  बनावे, त्‍यासाठी राज्‍याकडून  दिल्या जाणा-या संधींवर चर्चा परिषदेमध्‍ये होईल. या परिषदेत विविध कंपन्यांचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी  आणि नेत्यांच्या गोलमेज परिषदा, क्षेत्रीय सत्रे, ‘बी2बी’  बैठका आणि धोरणात्मक चर्चांचे  आयोजन करण्‍यात आले आहे. यासाठी  जगभरातील गुंतवणूकदारांशी लक्ष्यित सहभाग  सुनिश्चित करण्‍यात आला आहे.

पंतप्रधान उत्तराखंडमध्ये:

पंतप्रधान देहरादूनमध्ये 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे  उद्घाटन करणार आहेत. उत्तराखंड राज्य स्‍थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्षात या स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. दि. 28  जानेवारी ते 14  फेब्रुवारी, 2025 दरम्यान उत्तराखंडच्या 8 जिल्ह्यांमधील 11 शहरांमध्ये या स्पर्धांतील खेळांचे आयोजन  केले जाईल.

या राष्ट्रीय खेळांमध्ये 36 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशांचे खेळाडू   सहभागी होणार आहेत. क्रीडा स्पर्धेच्‍या 17  दिवसांच्या कालावधीत, 35  क्रीडा प्रकारांसाठी स्पर्धा आयोजित केल्या जातील. त्यापैकी 33  खेळांसाठी पदके प्रदान केली जातील, तर दोन प्रदर्शनीय खेळ असतील. योग आणि मल्लखांब यांचा प्रथमच राष्ट्रीय खेळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. देशभरातून 10,000  हून अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील.

शाश्वतता यावर लक्ष केंद्रित करून, या वर्षीच्या राष्ट्रीय खेळांची संकल्पना  "ग्रीन गेम्स" – हरित क्रीडा स्पर्धा  अशी निश्चित केली  आहे. क्रीडा स्पर्धा स्थानाजवळ क्रीडा वन नावाचे एक विशेष उद्यान विकसित केले जाणार आहे.  या वनामध्‍ये  खेळाडू आणि  आलेले पाहुणे 10,000  हून अधिक रोपे लावणार आहेत. खेळाडूंसाठी पदके आणि प्रमाणपत्रे पर्यावरणपूरक आणि जैवविघटनशील साहित्यापासून बनवण्‍यात आली आहेत.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Indian Railways to roll out the first rake of 20 LHB coaches for Bangladesh Railway on August 12

Media Coverage

Indian Railways to roll out the first rake of 20 LHB coaches for Bangladesh Railway on August 12
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 ऑगस्ट 2026
August 12, 2026

India Rising on Every Front: Economic Strength, Global Recognition & Self-Reliance Under PM Modi’s Vision