शेअर करा
 
Comments
पंतप्रधान देवघरमध्ये 16,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि शिलान्यास करणार
या प्रकल्पांमुळे पायाभूत सुविधांच्या विकासाला लक्षणीय चालना मिळेल, संपर्क व्यवस्था वाढेल आणि प्रदेशातील राहणीमान सुलभ होण्यास गती देईल
बाबा बैद्यनाथ धामला थेट हवाई संपर्क प्रदान करण्यासाठी देवघर विमानतळाचे पंतप्रधान करणार उद्घाटन
पंतप्रधान, देवघर इथल्या एम्स येथे रूग्ण विभाग आणि शस्त्रक्रिया विभागाच्या सेवेचे करतील लोकार्पण
​​​​​​​बिहार विधानसभेच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभालाही पंतप्रधान करणार संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जुलै 2022 रोजी दुपारी 1:15 वाजताच्या सुमाराला देवघर आणि पाटण्याला भेट देणार आहेत. देवघरमध्ये 16,000 कोटी रुपयांहून  अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि शिलान्यास पंतप्रधान करतील.  त्यानंतर दुपारी 2.40 च्या सुमारास बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या बाबा बैद्यनाथ मंदिरात ते दर्शन घेतील आणि पूजा करतील. संध्याकाळी 6 च्या सुमारास, पाटणा येथे बिहार विधानसभेच्या शताब्दी समारंभाच्या समारोप समारंभाला पंतप्रधान संबोधित करतील.

पंतप्रधानांचे देवघरमधील कार्यक्रम

पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणे, संपर्क व्यवस्था वाढवणे आणि प्रदेशातील राहणीमान सुलभतेला चालना देण्यासाठी देवघरमध्ये 16,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांचा शिलान्यास आणि लोकार्पण पंतप्रधान करतील. या प्रकल्पांमुळे या भागातील सामाजिक-आर्थिक सुबत्ता लक्षणीयरीत्या सुधारण्यास मदत होईल.

देशभरातील भाविकांसाठी एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ असलेल्या बाबा बैद्यनाथ धामकरता थेट संपर्क व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणाऱ्या देवघर विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान करतील.  सुमारे 400 कोटी रुपये खर्चून हे विमानतळ उभारले आहे. वार्षिक पाच लाखांहून अधिक प्रवाशांचे नियोजन करण्यासाठी विमानतळाची टर्मिनल इमारत सुसज्ज आहे.

देवघरमधील एम्स हे संपूर्ण प्रदेशातील आरोग्य सेवा क्षेत्रासाठी वरदान आहे.  पंतप्रधान, देवघर इथल्या एम्स इथला आंतर  रूग्ण विभाग (आयपीडी) आणि शस्त्रक्रिया विभागयांच्या  सेवा  राष्ट्राला समर्पित करतील त्यामुळे इथल्या सेवांना आणखी चालना मिळेल.

देशाच्या सर्व भागात सर्वोत्तम आरोग्य सुविधा विकसित करण्याच्या पंतप्रधानांच्या ध्येय धोरणानुसारच यांची उभारली केली आहे.देशभरातील धार्मिक महत्त्वाच्या ठिकाणी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करणे आणि अशा सर्व ठिकाणी पर्यटकांसाठी सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी पंतप्रधानांनी वचनबद्धता व्यक्त केली आहे. त्यानुसार पर्यटन मंत्रालयाच्या योजनेचे उद्घाटन होणार आहे. यामुळे प्रसाद योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या “बैद्यनाथ धाम, देवघरचा विकास” प्रकल्पाच्या घटकांना आणखी चालना मिळणार आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होत असलेल्या प्रकल्पांमध्ये प्रत्येकी 2000 यात्रेकरूंची क्षमता असलेल्या दोन मोठ्या तीर्थक्षेत्र सभामंडपाचा विकास;  जलसर तलावाच्या दर्शनी भागाचा विकास; शिवगंगा तलाव विकास समाविष्ट आहे.  नवीन सुविधांमुळे बाबा बैद्यनाथ धामला भेट देणाऱ्या लाखो भाविकांसाठी पर्यटनाचा अनुभव अधिक समृद्ध होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यावेळी 10,000 कोटी  पेक्षा अधिक खर्चाच्या अनेक रस्ते प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. या प्रकल्पांमध्ये सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग 2(NH-2) वरच्या गोरहर- बरवडा, राष्ट्रीय महामार्ग 32 (NH-32) वरच्या राजगंज - छास या रस्त्याचे पश्चिम बंगाल सीमेपर्यंतचे रुंदीकरण या कामाचा सामावेश असून याबरोबच पंतप्रधान इतर रस्ते प्रकल्पांची ही पायाभरणी करणार आहेत. याबरोबरच राष्ट्रीय महामार्ग 80 (NH-80 ) वरच्या मिर्झाचौकी - फरक्का रस्त्याचे  चौपदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग 98 वरच्या हरिहरगंज - पारवा रस्त्याचे चौपदरीकरण,  राष्ट्रीय महामार्ग२३  (NH-23) वरच्या पलमा -  गुलमा रस्त्याचे चौपदरीकरण,  राष्ट्रीय महामार्ग 75 (NH-75) वरच्या कचेरी चौक - पिसका या उन्नत मार्गाची पायाभरणी ही पंतप्रधान करणार आहेत. या प्रकल्पांमुळे या भागातल्या रहदारीला चालना मिळेल त्याचबरोबर रस्त्यांचे जाळे वाढल्याने येथील मानवी जीवन सुधारायला मदत होईल.

 पंतप्रधान यावेळी या भागातील 3,000 कोटी रूपये खर्चाच्या अनेक ऊर्जा प्रकल्पांचं उद्घाटन आणि  पायाभरणी करणार आहेत.  गेल (GAIL) कंपनीच्या बोकारो -अंगुल विभागाच्या जगदीशपुर – हल्दिया - बोकारो -धर्मा या गॅस प्रकल्पाचे उद्घाटन,बारही येथील एच पी सी एल (HPCL ) कंपनीच्या नव्या एल पी जी बाटलिंग प्रकल्प आणि बी पी सी एल (BPCL) कंपनीच्या हजारीबाग आणि बोराको एल पी जी बोटलिंग प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. तर परबतपुर गॅस कलेक्टींग स्टेशन, झारिका ब्लॉक,  ओ एन जी सी (ONGC)  च्या कोल बेड मिथेन(CBM) प्रकल्पा ची पायभरणी पंतप्रधान करणार आहेत.

पंतप्रधान यावेळी  गोड्डा -हंसदीहा  विद्युतीकरण प्रकल्प आणि गाऱ्हवा- महूरिया दुहेरी प्रकल्प या दोन रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत.या रेल्वे प्रकल्पांमुळे कोणत्याही अडथळ्याशिवाय उद्योग आणि ऊर्जा  क्षेत्रातल्या सामानाची वाहतूक करता येईल. त्याचबरोबर दुमका आणि आसनसोल मधील रेल्वे वाहतूक सुरळीत होणार आहे. पंतप्रधान यावेळी तीन रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजन करतील,यात रांची रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण, जासिदिह बायपास मार्ग आणि गोद्दा येथील एल बी एच कोच दुरुस्ती आणि देखभाल डेपो या प्रकल्पांचा सामावेश आहे.  रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रांची रेल्वे 

स्थानकाच्या या प्रस्तावित आधुनिकीकरणात जागतिक दर्जाच्या प्रवासी सुविधा, जेवण व्यवस्था, कॅफेटरीया, वातानुकूलित प्रवासी प्रतीक्षा खोल्या, आधुनिक विश्रांती  जागा याचा समावेश आहे.

पंतप्रधान पाटणा दौरा

पंतप्रधान आज बिहार विधानसभेच्या शताब्दी सोहळ्याच्या समापन कार्यक्रमाला संबोधित करतील. यावेळी पंतप्रधान शताब्दी स्मृती स्तंभाचे उद्घाटन करतील. बिहार विधानसभेच्या कामकाजाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने हा स्तंभ उभारण्यात आला आहे. यावेळी विधानसभा वस्तुसंग्रहालय ची पायभरणी पंतप्रधान करतील. या वस्तुसंग्रहालय गॅलरी मध्ये बिहार लोकशाहीचा इतिहास

सध्याचे लोकजीवन याचे प्रदर्शन होणार आहे. या वस्तुसंग्रहालयात एक सभागृह असेल ज्याची आसन क्षमता 250 एवढी असेल. याच कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान विधानसभा अतिथीगृहाचीही पायभरणी करतील.

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
What is the ‘Call Before u Dig’ application launched by PM Modi?

Media Coverage

What is the ‘Call Before u Dig’ application launched by PM Modi?
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM lauds feat by Border Roads Organisation of blacktopping of 278 Km Hapoli-Sarli-Huri road
March 23, 2023
शेअर करा
 
Comments

The Prime Minister, Shri Narendra Modi has lauded the feat by Border Roads Organisation of blacktopping of 278 Km Hapoli-Sarli-Huri road leading to Huri, one of the remotest places in Kurung Kumey district of Arunachal Pradesh, for the first time since independence.

Sharing a tweet thread by Border Roads Organisation, the Prime Minister tweeted;

“Commendable feat!”