भारत-मॉरिशस विशेष संबंधांवर भर देत दोन्ही नेत्यांनी परस्परांबरोबरची वाढती धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी सामायिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला
दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय विकास भागीदारी आणि इतर क्षेत्रांमधील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठीच्या उपाययोजनांवर केली चर्चा
11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल मॉरिशसचे पंतप्रधान रामगुलाम यांची पंतप्रधान मोदी यांनी केली प्रशंसा
व्हिजन महासागर आणि शेजारी सर्वप्रथम धोरणाच्या अनुषंगाने मॉरिशसच्या विकासाच्या प्राधान्यक्रमांसाठी भारताच्या वचनबद्धतेचा पंतप्रधान मोदी यांनी पुनरुच्चार केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉरिशसचे पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

भारत आणि मॉरीशस यांच्यातील विशेष आणि अनोख्या संबंधांवर अधिक भर देत, या दोन देशांतील विस्तारित  धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्याप्रती सामायिक कटिबद्धतेला दोन्ही नेत्यांनी दुजोरा दिला.

दोन्ही देशांमध्ये विकासात्मक भागीदारी, क्षमता निर्मिती, संरक्षण, सागरी सुरक्षा, डिजिटल पायाभूत सुविधा आणि लोकांचे परस्परसंबंध यांच्यासह विस्तृत श्रेणीतील क्षेत्रांमध्ये  सध्या असलेल्या सहकार्याबाबत त्यांनी चर्चा केली.

11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान रामगुलाम  मनापासून सहभागी झाल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली.

पंतप्रधान मोदी यांनी महासागर संकल्पना आणि भारताच्या शेजारी सर्वप्रथम या धोरणाला अनुसरून मॉरीशसच्या विकासविषयक प्राधान्यक्रमांप्रती भारताच्या भक्कम वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

पंतप्रधान रामगुलाम  यांना लवकरात लवकर भारत भेटीवर येण्याचे आमंत्रण पंतप्रधान मोदी यांनी दिले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्यावर सहमती दर्शवली.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
‘Assam Was Nearly Separated From India’: PM Modi Attacks Congress, Hails First CM Bordoloi's Role

Media Coverage

‘Assam Was Nearly Separated From India’: PM Modi Attacks Congress, Hails First CM Bordoloi's Role
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 डिसेंबर 2025
December 20, 2025

Empowering Roots, Elevating Horizons: PM Modi's Leadership in Diplomacy, Economy, and Ecology