भारताने मे 1998 मध्ये पोखरण येथे केलेल्या ऐतिहासिक अणुचाचण्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्मरण केले आणि हा आपल्या देशाच्या निर्धारातील एक निर्णायक क्षण असल्याचे सांगितले. “11 मे रोजी झालेल्या चाचण्यांनंतर संपूर्ण जगाने भारतावर दबाव आणला, पण आम्ही दाखवून दिले की कोणतीही शक्ती भारताला झुकवू शकत नाही”, मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी एक संस्कृत श्लोक सामायिक केला-
“एवं परस्परापेक्षा शक्तिशक्तिमतोः स्थिता ।
न शिवेन विना शक्तिर्न शक्त्या विना शिवः।।”
पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले आहे:
“1998 मध्ये आजच्याच दिवशी भारताने केलेल्या अणुचाचण्यांनी जगाला दाखवून दिले की आपल्या देशाची इच्छाशक्ती किती अढळ आहे! 11 मे रोजी झालेल्या चाचण्यांनंतर संपूर्ण जगाचा भारतावर दबाव होता, पण कोणतीही शक्ती भारताला झुकवू शकत नाही, हे आम्ही दाखवून दिले.
एवं परस्परापेक्षा शक्तिशक्तिमतोः स्थिता ।
न शिवेन विना शक्तिर्न शक्त्या विना शिवः।।”
1998 में इसी दिन भारत ने जो परमाणु परीक्षण किए थे, उनसे दुनिया को पता चला कि हमारे देश की इच्छाशक्ति कितनी अटल है! 11 मई के टेस्ट के बाद पूरी दुनिया का दबाव भारत पर था, लेकिन हमने दिखाया कि कोई भी ताकत भारत को झुका नहीं सकती।
— Narendra Modi (@narendramodi) May 13, 2026
एवं परस्परापेक्षा शक्तिशक्तिमतोः स्थिता ।
न शिवेन… pic.twitter.com/KjIxGMA0BS


