आज मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारत - 2047 दिशेने सुरू असलेल्या चाललेल्या आमच्या प्रवासाचा पाया : पंतप्रधान
यंदाच्या अर्थसंकल्पामुळे भारताच्या सुधारणा एक्सप्रेसला नवी ऊर्जा आणि नवी गती मिळेल : पंतप्रधान
भारत केवळ वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असल्याचे समाधान मानून शांत बसणार नाही; तर भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनायचे आहे. : पंतप्रधान
मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमांना नवीन गती देणारा मार्ग या अर्थसंकल्पातून दिसून येतो : पंतप्रधान
यंदाचा अर्थसंकल्प युवाशक्तीसाठी आहे, त्यासंबंधीच्या तरतुदींमुळे सर्व क्षेत्रातील नवे नेते , नवोन्मेषक आणि नवनिर्मात्यांना मिळणार पाठबळ : पंतप्रधान
यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांनी सुरु केलेल्या, चालवलेल्या बचत गटांच्या परिसंस्थेला प्राधान्य दिल्यामुळे देशातील प्रत्येक घर समृद्ध करण्‍याचे उद्दिष्ट होईल : पंतप्रधान
हा अर्थसंकल्प महत्वाकांक्षी आणि देशाच्या आकांक्षांना पाठबळ देणारा : पंतप्रधान
हा अर्थसंकल्प वर्ष 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या संकल्पाकडे झेप घेण्यास देशाची तयारी करत आहे, असे त्यांनी म्हटले.

आज मांडलेल्या  केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 विषयी,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्‍य माध्‍यमाव्दारे आपली प्रतिक्रिया व्यक्त  केली. आजचा अर्थसंकल्प ऐतिहासिक असून त्यात  देशातील सक्षम महिलांच्या  भावनांचे प्रतिबिंब दिसत आहे,  असे पंतप्रधानांनी म्हटले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचा अर्थसंकल्प सलग नऊ वेळा सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री असून, हा एक विक्रम आहे असे त्यांनी अधोरेखित केले. हा अर्थसंकल्प म्हणजे अनंत संधींनी परिपूर्ण असा एक महामार्ग असून भारताच्या वर्तमानातील स्वप्ने पूर्ण करणारा तसेच उज्वल भवितव्याची  पायाभरणी करणारा आहे,  असे ते म्हणाले. हा अर्थसंकल्प वर्ष  2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या संकल्पाकडे झेप घेण्यास देशाची तयारी करत आहे,  असे त्यांनी म्हटले.

भारत प्रवासी  असलेल्या सुधारणा  एक्सप्रेसला या अर्थसंकल्पामुळे नवी ऊर्जा आणि  नवी गती मिळेल असे त्यांनी नमूद केले. या अर्थसंकल्पात प्रस्तावित क्रांतिकारक सुधारणांमुळे देशातील आकांक्षी, धडाडीच्या आणि  प्रतिभाशाली युवकांसाठी संधींचे नवे क्षितिज खुले केल्याचे त्यांनी म्हटले. या अर्थसंकल्पामुळे विश्वासाधारित सुशासन आणि  मानवकेंद्रित आर्थिक संरचना आणण्याचे दृष्टिचित्र साकार होत आहे,  असे त्यांनी म्हटले. वित्तीय तूट कमी करणे, महागाई कमी करणे, तसेच उच्च भांडवली खर्च आणि उच्च प्रगती साध्य करणारा हा एकमेवाद्वितीय असा अर्थसंकल्प आहे.

 

या अर्थसंकल्पामुळे भारताची  जागतिक स्तरावरील भूमिका नव्याने बळकट होत आहे. भारताच्या 140 कोटी नागरिकांना केवळ वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होऊन समाधान नाही, तर भारताला  आता जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था व्हायचे आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. कोट्यवधी भारतीयांचा हा एकत्रित दृढनिश्चय आहे, असे ते म्हणले. एक विश्वसनीय लोकशाही भागीदार आणि  विश्वसनीय गुणवत्तापूर्ण पुरवठादार म्हणून भारताची भूमिका सतत वाढत आहे. अगदी अलिकडेच  भारताने  केलेल्या अनेक मुक्त व्यापारी करारांमधून  देशाच्या युवकांना, लघु आणि  मध्यम उद्योजकांना जास्तीतजास्‍त  फायदा कसा होईल, याची काळजी घेतली गेली आहे. या अर्थसंकल्पातून त्याच दिशेने प्रगतीसाठी पावले उचलली गेली आहेत,  असे त्यांनी सांगितले.

मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला गती देण्यासाठी हा अर्थसंकल्प एक महत्त्वाकांक्षी मार्गाचे रेखाचित्र सादर करतो, असे अधोरेखित करत मोदी यांनी सांगितले की बायोफार्मा शक्ती मिशन, सेमीकंडक्टर मिशन 2.0, इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन योजना, रेअर अर्थ कॉरिडॉरची निर्मिती, महत्त्वपूर्ण खनिज क्षेत्राचे बळकटीकरण, वस्त्रोद्योग क्षेत्रातील नवीन योजना, हाय-टेक टूल उत्पादनाला प्रोत्साहन आणि चॅम्पियन एमएसएमईंची तयारी अशा नव्याने उभारी घेणाऱ्या क्षेत्रांना दिलेला अभूतपूर्व पाठिंबा भविष्योन्मुख आहे आणि देशाच्या वर्तमान तसेच भविष्यातील गरजांना संबोधित करतो. पंतप्रधानांनी नमूद केले की लघु व कुटीर उद्योगांसह एमएसएमईंना दिलेला पाठिंबा त्यांना स्थानिक स्तरावरून जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी सक्षम करेल.

पंतप्रधान मोदी यांनी पुढे सांगितले की या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी अनेक मोठी पावले उचलण्यात आली आहेत, ज्यामध्ये स्वतंत्र मालवाहतूक कॉरिडॉर, देशभरातील जलमार्गांचा विस्तार, उच्चगती रेल्वे कॉरिडॉर, टियर-2 आणि टियर-3 शहरांच्या विकासावर विशेष लक्ष, तसेच शहरांना मजबूत आर्थिक पाया देण्यासाठी म्युनिसिपल बाँड्सना प्रोत्साहन यांचा समावेश आहे. त्यांनी अधोरेखित केले की ही सर्व पावले विकसित भारताच्या दिशेने प्रवास वेगाने पुढे नेतील.

पंतप्रधानांनी सांगितले की कोणत्याही राष्ट्राची सर्वात मोठी भांडवल म्हणजे त्याचे नागरिक असून, अलिकडच्या वर्षांत त्यांच्या क्षमतावृद्धीसाठी सरकारने अभूतपूर्व गुंतवणूक केली आहे. त्यांनी नमूद केले की सातत्याने कौशल्य, प्रमाण आणि शाश्वततेला बळ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा युवकशक्तीचा अर्थसंकल्प असल्याचे म्हटल्याचे पुन्हा अधोरेखित करत, मोदी यांनी सांगितले की अर्थसंकल्पातील तरतुदी विविध क्षेत्रांतील नेते, नवप्रवर्तक आणि निर्माते घडवतील. वैद्यकीय हब्सची स्थापना, अलाईड हेल्थ प्रोफेशनल्स, ऑडिओ-व्हिज्युअल्ससह ऑरेंज इकॉनॉमीला चालना, गेमिंगला प्रोत्साहन, पर्यटन आणि खेलो इंडिया मिशनद्वारे युवकांसाठी नव्या संधी उघडतील, असे त्यांनी सांगितले. भारताला जगातील डेटा सेंटर हब बनवण्यासाठी मोठी करसवलत जाहीर करण्यात आली असल्याचेही त्यांनी नमूद केले. युवकांचे विशेष अभिनंदन करत त्यांनी सांगितले की हा अर्थसंकल्प रोजगारनिर्मितीस मोठी चालना देईल. विशेषतः ईशान्येकडील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली असल्याने आणि विविध राज्यांना सक्षम करून संतुलित विकासाचा पाया मजबूत झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.

 

10 कोटींहून अधिक महिला स्वयं-सहायता गटांशी जोडल्या गेल्या असल्याचे नमूद करत मोदी यांनी सांगितले की हा अर्थसंकल्प महिलांच्या नेतृत्वाखाली व महिलांद्वारे चालवल्या जाणाऱ्या स्वयं-सहायता गटांसाठी आधुनिक परिसंस्था उभारण्यास प्राधान्य देतो, जेणेकरून प्रत्येक घरात समृद्धी येईल. प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी नवीन वसतिगृहे उभारण्याच्या मोहिमेमुळे शिक्षण अधिक सुलभ होईल, असेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी अधोरेखित केले की शेती, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय यांना सरकारने नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. या अर्थसंकल्पात नारळ, काजू, कोको आणि चंदन उत्पादनात गुंतलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. भारत विस्तार एआय साधन शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत माहिती देऊन मोठी मदत करेल, असे त्यांनी नमूद केले. मत्स्यपालन आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील उद्योजकतेला प्रोत्साहन दिल्याने गावांमध्ये अधिक रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतील, असेही त्यांनी सांगितले. शेवटी पंतप्रधानांनी म्हटले की हा अर्थसंकल्प महत्त्वाकांक्षी असून तो राष्ट्राच्या आकांक्षांना उत्तर देतो. गाव, गरीब आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी समर्पित असा दूरदर्शी आणि संवेदनशील अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल त्यांनी पुन्हा एकदा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांच्या चमूचे अभिनंदन केले.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
New train services to boost Purvanchal connectivity from June 19

Media Coverage

New train services to boost Purvanchal connectivity from June 19
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Today, the world does not suffer from a shortage of resources; it suffers from a shortage of trust: PM Modi at G7 Summit in Evian, France
June 16, 2026

राष्ट्रपति मैक्रों,
Your Excellencies,

नमस्कार!

G-7 समिट में हमारे गर्मजोशी भरे स्वागत के लिए मैं राष्ट्रपति मैक्रों का हार्दिक आभार व्यक्त करता हूँ।

Friends,

आज का विश्व पहले से कहीं अधिक inter-connected और inter-dependent है। किसी भी देश की ऊर्जा सुरक्षा, खाद्य सुरक्षा, स्वास्थ्य सुरक्षा, साइबर सुरक्षा और आर्थिक समृद्धि केवल उसकी सीमाओं के भीतर तय नहीं होती। Mobility, data, capital, technology, ये सभी हमें आपस में जोड़ते हैं।

ऐसे समय में Partnerships का महत्व स्वाभाविक रूप से बढ़ जाता है। लेकिन साझेदारियाँ तभी सफल होती हैं जब उनके केंद्र में विश्वास हो। आज सबसे महत्वपूर्ण Strategic Asset कोई mineral, technology या market नहीं, बल्कि आपसी विश्वास है।

विश्वास कि टेक्नॉलजी और supply chains को हथियार के रूप में नहीं, global good के लिए इस्तेमाल किया जाएगा। विश्वास कि विकास के अवसर कुछ देशों तक सीमित नहीं रहेंगे। विश्वास कि वैश्विक संस्थान सभी देशों की आकांक्षाओं को पूरा करने में सक्षम होंगे।

Friends,

पिछली सदी में मानवता को दो विश्व युद्धों से गुज़रना पड़ा। अनेक बलिदानों के बाद विश्व समुदाय ने शांति, स्थिरता और समृद्धि की ओर बढ़ने के लिए व्यवस्थाएं विकसित की। इन व्यवस्थाओं का आधार भी trust ही था।

किन्तु अनेक दशकों से, अनेक पीढ़ियों के योगदान से बनाए गए विश्वास को आज चोट पहुँच रही है। कोविड ने हमें आईना दिखाया कि trust और solidarity के दावे कितने खोखले थे।

Today the world does not suffer from a shortage of resources; it suffers from a shortage of trust. And the future of our partnerships depends on building this trust.

अमेरिका के राष्ट्रपति रोनल्ड रेगन ने कहा था: Trust but Verify. यह आज के समय में भी प्रासंगिक है। भावी पीढ़ियों के प्रति हमारा दायित्व है कि हम नए युग के अनुरूप trusted rules based order का निर्माण करें।

Friends,

भारत ने सदैव विश्व को एक परिवार के रूप में देखा है। हमारे सभी प्रयास “सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय” यानि, welfare and happiness for all के मूल सिद्धांत पर आधारित रहे हैं।

भारत का अनुभव दिखाता है कि विकास सबसे अधिक प्रभावी तब होता है जब वह लोगों की आकांक्षाओं से जुड़ा हो। यही सिद्धांत हमारी अंतरराष्ट्रीय साझेदारियों का भी आधार है। इसी सोच के साथ भारत ने International Solar Alliance, Coalition for Disaster Resilient Infrastructure, ग्लोबल बायोफ्यूल्स एलायंस, Mission LiFE, और “एक पेड़ माँ के नाम” जैसी वैश्विक पहलों को आगे बढ़ाया है।

संकट के समय भारत ने First Responder के रूप में सभी देशों की सहायता करना अपना दायित्व समझा है। कोविड महामारी के दौरान भारत ने डेढ़ सौ से अधिक देशों को दवाइयाँ और vaccines उपलब्ध कराईं।

श्रीलंका में cyclone हो, अफगानिस्तान में भूकंप हो, मोज़ाम्बिक में floods हों, या क्यूबा और जमैका में hurricane, भारत ने सदैव "Humanity First" के सिद्धांत पर कार्य किया है। हमारी विकास साझेदारियाँ भी इसी भावना को प्रतिबिंबित करती हैं। हमारे प्रयास पार्टनर देशों में capacity building और कौशल विकास पर केन्द्रित रहे हैं।

भारत का मानना है: The true test of partnership is not what we build for others, but what we enable others to build for themselves.

Friends,

आज ग्लोबल साउथ की विश्व समुदाय से बहुत उम्मीदें हैं। किन्तु उनकी अपेक्षा सहारे की नहीं, साथ की है। वे वैश्विक विकास के लाभार्थी नहीं, उसके भागीदार बनना चाहते हैं।

हमें donor–recipient की सोच से आगे बढ़कर, equal पार्टनर्स के रूप में काम करना होगा। उनके पास-पास नहीं, साथ-साथ चलना होगा। साझेदारी को dependency के बजाय, dignity से जोड़ना होगा। इन प्रयासों से हम भावी पीढ़ियों के सतत विकास की मजबूत नींव रख सकेंगे।

Friends,

अंतरराष्ट्रीय साझेदारियाँ और वैश्विक एकजुटता तभी सार्थक बन सकती हैं, जब हम साझा चुनौतियों का मिलकर समाधान करें। भारत का दृढ विश्वास है कि विश्व के विभिन्न हिस्सों में चल रहे तनावों और युद्धों का स्थायी समाधान dialogue, diplomacy और अंतरराष्ट्रीय सहयोग के मार्ग से ही संभव है।

हम west asia में शांति प्रयासों में हुई प्रगति का स्वागत करते हैं। इस संघर्ष से west asia में हमारे मित्र देशों को जान-माल का नुकसान झेलना पड़ा है। होर्मुज़ स्ट्रेट में maritime ट्रेड में आई बाधा के कारण पूरे विश्व की अर्थव्यवस्था को नुकसान पहुंचा। भारत के कई civilians को जान गंवानी पड़ी। Global maritime ट्रेड के माध्यम से सभी देशों को आपस में जोड़ने वाले नाविकों की सुरक्षा हमारा दायित्व है। हमें यह सुनिश्चित करना होगा कि समुद्री मार्ग सुरक्षित रहें, और Seafarers बिना भय के अपना कार्य कर सकें।

Friends,

भारत इन विषयों पर सभी पार्टनर्स के साथ मिलकर काम करने के लिए पूरी तरह से तैयार है।

बहुत-बहुत धन्यवाद।