पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमनाथचे कालातीत महत्त्व अधोरेखित केले आणि त्याचे वर्णन भारताच्या आध्यात्मिक सामर्थ्याचे आणि भक्तीचे शाश्वत प्रतीक असे केले.
पंतप्रधानांनी यावर जोर दिला की, सोमनाथ केवळ एक पवित्र तीर्थक्षेत्रच नाही, तर भारताच्या सांस्कृतिक सातत्याचे एक प्रतीक आहे जे श्रद्धा, लवचिकता आणि एकतेच्या संदेशाने पिढ्यान् पिढ्यांना प्रेरणा देत आहे.
एक्स वरील एका पोस्टमध्ये मोदी म्हणाले:
"भगवान श्री सोमनाथ सृष्टीच्या प्रत्येक कणात वास करतात. त्यांच्यावरची अढळ श्रद्धा अनादी काळापासून अखंडपणे वाहत आहे. ते नेहमीच भारताच्या आध्यात्मिक उर्जेचे प्रतीक राहतील.”
भगवान श्री सोमनाथ सृष्टि के कण-कण में विराजते हैं। उनकी अखंड आस्था अनंत काल से निरंतर प्रवाहित हो रही है। वे सदैव भारत की आध्यात्मिक ऊर्जा के प्रतीक रहेंगे। pic.twitter.com/XounUARIFb
— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2026


