इस्रोने पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण यानाचे स्वयंशासित लँडिंग मिशन संचलित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था तसेच भारतीय हवाई दलाच्या सहकार्याने इस्रोने 2 एप्रिल 2023 रोजी पहाटे एरोनॉटिकल टेस्ट रेंज (ATR), चित्रदुर्ग, कर्नाटक येथे पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण यानाचे स्वयंशासित लँडिंग मिशन यशस्वीरित्या पार पाडले.
इस्रोच्या ट्विट थ्रेड्सला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
“एक उत्तम सांघिक प्रयत्न. या यशाने आपल्याला पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपण यान साकारण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल जवळ नेले आहे.”
A great team effort. This achievement takes us one step closer to realising an Indian Reusable Launch Vehicle. https://t.co/GvBs2THWwK
— Narendra Modi (@narendramodi) April 2, 2023


