पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील पतरातूमध्ये शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.
झारखंडमधील पत्राटू येथे 50 कोटी रूपये खर्चाचा जल शुद्धीकरण प्रकल्प आणि पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाल्याबद्दल हजारीबागचे खासदार जयंत सिन्हा यांनी केलेल्या ट्विटवर पंतप्रधानांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली:
“खूपच प्रशंसनीय प्रयत्न! शुद्ध पाण्याची ही सुविधा झारखंडमधील पतरातू इथल्या आपल्या माता आणि भगिनींचे जीवन फारच सुकर बनवणार आहे.”
बहुत ही सराहनीय प्रयास! स्वच्छ पानी की यह सुविधा झारखंड में पतरातू की हमारी माताओं और बहनों के जीवन को बहुत आसान बनाने वाली है। https://t.co/NKZw7Inymi
— Narendra Modi (@narendramodi) May 17, 2023


