देशभरात पवित्र छठ महोत्सवाच्या तयारीला उत्साहाचे स्वरूप आले असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना श्रद्धा आणि सांस्कृतिक ऐक्याच्या भावनेने छठी आईला अर्पण केलेली भक्तिगीते सामायिक करण्याचे आवाहन केले आहे.
एक्स या समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी छठ महोत्सवाचा निसर्ग आणि संस्कृतीशी असलेला घट्ट संबंध अधोरेखित केला असून, बिहारसह देशभरात सुरू असलेल्या जोरदार तयारीचा उल्लेख केला आहे. मोदी यांनी नागरिकांना छठ महोत्सवाचा उत्साह आणि अध्यात्मिकतेचे दर्शन घडविणारी भक्तिगीते पाठविण्याचे आवाहन केले आहे.
निसर्ग आणि संस्कृतीला समर्पित भव्य सण छठ जवळ येत आहे. बिहारसह देशभरातील भाविक पूर्ण भक्तीने त्याच्या तयारीत गुंतले आहेत. छठी आईला समर्पित गाणी या पवित्र प्रसंगाच्या भव्यतेत आणि दिव्यतेत भर घालतात. छठ पूजेशी संबंधित गाणी माझ्यासोबत सामायिक करण्याची मी तुम्हाला विनंती करतो. पुढील काही दिवसांत मी ती गाणी आपल्या सर्व देशवासीयांसोबत सामायिक करेन.
प्रकृति और संस्कृति को समर्पित महापर्व छठ आने वाला है। बिहार सहित देशभर में इसकी तैयारियों में श्रद्धालु पूरे भक्ति-भाव से जुट चुके हैं। छठी मइया के गीत इस पावन अवसर की भव्यता और दिव्यता को और बढ़ाने वाले होते हैं। आपसे आग्रह है कि आप भी छठ पूजा से जुड़े गीत मेरे साथ शेयर करें।…
— Narendra Modi (@narendramodi) October 24, 2025


