पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र आणि राज्यांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने जीएसटी दर कपात आणि सुधारणांबाबत केंद्र सरकारने सादर केलेल्या प्रस्तावांना एकमताने संमती  दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. याचा लाभ सामान्य माणूस, शेतकरी, एमएसएमई, मध्यमवर्गीय, महिला आणि युवकांना होईल. "व्यापक सुधारणांमुळे आपल्या नागरिकांचे जीवनमान  सुधारेल आणि सर्वांसाठी, विशेषतः छोटे व्यापारी आणि व्यवसायांसाठी व्यवसाय सुलभता सुनिश्चित होईल", असे  मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

"स्वातंत्र्यदिनाच्या माझ्या भाषणात, मी जीएसटीमध्ये नवीन पिढीतील सुधारणा आणण्याचा आमचा मानस व्यक्त केला होता.  केंद्र सरकारने व्यापक-आधारावर जीएसटी दरांचे  सुसूत्रीकरण आणि प्रक्रिया सुधारणांसाठी एक सविस्तर  प्रस्ताव तयार केला होता, ज्याचा उद्देश सामान्य माणसाचे जीवनमान सुलभ करणे आणि अर्थव्यवस्था मजबूत करणे हा होता.

केंद्र आणि राज्यांचा समावेश असलेल्या @GST_Council ने जीएसटी दर कपात आणि सुधारणांबाबत केंद्र सरकारने सादर केलेल्या प्रस्तावांना एकमताने संमती दर्शवली आहे हे नमूद करताना आनंद होत आहे, ज्याचा लाभ सामान्य माणूस, शेतकरी, एमएसएमई, मध्यमवर्गीय, महिला आणि युवकांना होईल. 
या व्यापक सुधारणांमुळे आपल्या नागरिकांचे जीवनमान  सुधारेल आणि सर्वांसाठी, विशेषतः छोटे व्यापारी आणि व्यवसायांसाठी व्यवसाय सुलभता सुनिश्चित होईल."

#NextGenGST

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Centre releases Rs 1.09 lakh crore tax devolution; Uttar Pradesh gets biggest share to accelerate development spending

Media Coverage

Centre releases Rs 1.09 lakh crore tax devolution; Uttar Pradesh gets biggest share to accelerate development spending
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Jharkhand meets Prime Minister
August 03, 2026