उत्तर प्रदेशात कौशांबी येथे वैद्यकीय व्हॅनचा वापर करून सार्वजनिक आरोग्य सेवा मजबूत करण्याच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे.
उत्तर प्रदेशातील कौशांबी येथील खासदार विनोद सोनकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये वैद्यकीय व्हॅनच्या सहाय्याने 2,47,500 हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी झाल्याची आणि या ठिकाणी 25000 पेक्षा अधिक लोकांनी विविध सरकारी योजनांचे लाभार्थी म्हणून नावनोंदणी केली असल्याची माहिती दिली आहे, या संदर्भात पंतप्रधानांनी ट्विट केले;
“अभूतपूर्व प्रयत्न! जनसेवेशी संबंधित अशा प्रकारचे अभियान, विकासाला नवी गती देणारे आहे. ”
अद्भुत प्रयास! जन सेवा के ऐसे अभियान विकास को नई गति देने वाले हैं। https://t.co/4iupUQQHk4
— Narendra Modi (@narendramodi) March 23, 2023


