पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिंदी दिनानिमित्त, देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. भारताच्या अस्मितेचा आणि मूल्यांचा जिवंत वारसा म्हणून त्यांनी हिंदीचे सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्व अधोरेखित केले.
नागरिकांनी सर्व भारतीय भाषा समृद्ध करण्यासाठी आणि त्या अभिमानाने भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन यावेळी नरेंद्र मोदी यांनी केले.
आज X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या एका पोस्टमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले,
"हिंदी दिवसानिमित्त तुम्हा सर्वांना अनंत शुभेच्छा. हिंदी हे केवळ संवादाचे माध्यम नाही तर आपल्या ओळखीचा आणि संस्कृतीचा जिवंत वारसा आहे. या प्रसंगी, आपण सर्वजण हिंदीसह सर्व भारतीय भाषा समृद्ध करण्याचा आणि त्या अभिमानाने भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया. जागतिक स्तरावर हिंदीबद्दल वाढता आदर हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा विषय आहे."
आप सभी को हिंदी दिवस की अनंत शुभकामनाएँ। हिंदी केवल संवाद का माध्यम नहीं, बल्कि हमारी पहचान और संस्कारों की जीवंत धरोहर है। इस अवसर पर आइए, हम सब मिलकर हिंदी सहित सभी भारतीय भाषाओं को समृद्ध बनाने और उन्हें आने वाली पीढ़ियों तक गर्व के साथ पहुँचाने का संकल्प लें। विश्व पटल पर…
— Narendra Modi (@narendramodi) September 14, 2025


