हँगझोऊ येथील दिव्यांगांसाठीच्या आशियाई स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या 1500 मीटर-T11 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल ललिता किल्लाकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
तिचा असामान्य पराक्रम आणि दृढ निश्चयाची त्यांनी प्रशंसा केली आहे.
पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर म्हटले आहे:
"ललिता किल्लाकाचे महिलांच्या 1500 मीटर-T11 स्पर्धेतील रौप्य पदक हा भारतासाठी अभिमानाचा क्षण. तिची अलौकिक कामगिरी आणि दृढ निश्चय खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. असेच उत्तमोत्तम यश मिळवून तिची यशाची कमान चढती राहो.”
A moment of pride for India as Lalitha Killaka secures the Silver Medal in the Women's 1500m-T11. Her exceptional performance and steadfast determination are truly commendable. May she keep scaling new heights and achieving more! pic.twitter.com/4YVNH20mRI
— Narendra Modi (@narendramodi) October 25, 2023


