नामवंत साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ रामदरश मिश्र यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत दुःख व्यक्त केले आहे.
रामदरश मिश्र यांच्या निधनामुळे हिंदी व भोजपुरी साहित्याचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. त्यांच्या लोकप्रिय साहित्यकृतींमुळे ते सदैव स्मरणात राहतील, अशा भावना पंतप्रधानांनी व्यक्त केल्या.
‘X’ माध्यमावरील संदेशात पंतप्रधान लिहीतात,
“प्रसिद्ध साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ रामदरश मिश्र यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले. त्यांचे निधन ही हिंदी व भोजपुरी साहित्यासाठी मोठी हानी आहे. आपल्या लोकप्रिय साहित्यकृतींसाठी ते सदैव स्मरणात राहतील. त्यांचे कुटुंबीय व चाहत्यांप्रती माझ्या सहवेदना. ओम शांती!”
जाने-माने साहित्यकार और शिक्षाविद रामदरश मिश्र जी के निधन से अत्यंत दुख हुआ है। उनका जाना हिंदी और भोजपुरी साहित्य के लिए अपूरणीय क्षति है। अपनी लोकप्रिय रचनाओं के लिए वे सदैव याद किए जाएंगे। शोक की इस घड़ी में उनके परिजनों और प्रशंसकों के प्रति मेरी गहरी संवेदनाएं। ओम शांति!
— Narendra Modi (@narendramodi) November 1, 2025


