चीनमधील हांगझोऊ येथे दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिला पॅरा पॉवरलिफ्टिंग 61 किलो वजनी गटाच्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल राज कुमारीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर म्हटले आहे:
“महिला पॅरा पॉवरलिफ्टिंग 61 किलो वजनी गटाच्या स्पर्धेत राज कुमारीची कांस्यपदकाची दिमाखदार कामगिरी. भारताला अभिमान आहे. तिचे यश अनेक उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा देईल.”
A fantastic Bronze by Raj Kumari in Women's Para Powerlifting 61 kgs event. India is elated. Her success will inspire several upcoming athletes. pic.twitter.com/j4ee2ffSAz
— Narendra Modi (@narendramodi) October 25, 2023


