पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशच्या 50 व्या स्थापना दिनानिमित्त तेथील जनतेला शुभेच्छा दिल्या.
“हिमाचल प्रदेश राज्याच्या निर्मितीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मी राज्यातील सर्व रहिवाशांना हार्दिक शुभेच्छा देतो. नैसर्गिक सुंदरता आणि मनमोहक पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध असलेला हा प्रदेश विकासाची नवीन मानके विकसित करत राहो आणि देशाच्या प्रगतीत हातभार लावो” असे पंतप्रधानांनी ट्वीट संदेशामध्ये म्हटले आहे.
हिमाचल प्रदेश के पूर्ण राज्यत्व दिवस के 50 वर्ष पूरे होने पर राज्य के सभी निवासियों को मेरी हार्दिक शुभकामनाएं। प्राकृतिक सुंदरता और मनमोहक पर्यटन स्थलों के लिए प्रसिद्ध यह प्रदेश विकास के नित नए मानदंड गढ़ता रहे और देश की उन्नति में अपना योगदान देता रहे। #SwarnimHimachal
— Narendra Modi (@narendramodi) January 25, 2021


