पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी आज दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेअंतर्गत झालेल्या प्रगतीबद्दल नेतन्याहू यांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान मोदी यांनी ओलिसांच्या सुटकेबाबतच्या कराराचे आणि गाझामधील लोकांना मानवतावादी मदत वाढविण्याबाबतच्या कराराचे स्वागत केले. दहशतवादाचा जगात कुठेही कोणत्याही स्वरूपात किंवा प्रकटीकरणात स्वीकार केला  जाणार नाही, याचा पंतप्रधान मोदी यांनी पुनरुच्चार केला.

पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’  या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे;

“राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेअंतर्गत झालेल्या प्रगतीबद्दल अभिनंदन करण्यासाठी माझे मित्र, पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. ओलिसांच्या सुटकेबाबतच्या कराराचे आणि गाझामधील लोकांना मानवतावादी मदत वाढविण्याबाबत झालेल्या कराराचे स्वागत करतो. दहशतवादाचा  जगात कुठेही कोणत्याही स्वरूपात किंवा प्रकटीकरणात स्वीकार केला जाणार नाही.@netanyahu”

@netanyahu”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India launches ORV Sagar Manthan, boosting ocean research fleet

Media Coverage

India launches ORV Sagar Manthan, boosting ocean research fleet
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 10 सप्टेंबर 2026
September 10, 2026

Beyond Metros, Beyond Borders: How India Is Rewriting Its Growth Story Under PM Modi