पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध लेखक आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित विनोद कुमार शुक्ला जी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. हिंदी साहित्य विश्वात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल ते नेहमीच स्मरणात राहतील असे मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:
"ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित प्रख्यात लेखक विनोद कुमार शुक्ला जी यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले आहे. हिंदी साहित्य विश्वातल्या त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल ते नेहमीच स्मरणात राहतील. दुःखाच्या या प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि प्रशंसकांसमवेत माझ्या शोकसंवेदना आहेत. ओम शांती."
ज्ञानपीठ पुरस्कार से सम्मानित प्रख्यात लेखक विनोद कुमार शुक्ल जी के निधन से अत्यंत दुख हुआ है। हिन्दी साहित्य जगत में अपने अमूल्य योगदान के लिए वे हमेशा स्मरणीय रहेंगे। शोक की इस घड़ी में मेरी संवेदनाएं उनके परिजनों और प्रशंसकों के साथ हैं। ओम शांति।
— Narendra Modi (@narendramodi) December 23, 2025


