PM to launch special digital exhibition marking 100 years of Champaran Satyagraha

चंपारण्य येथे सत्याग्रहाचा पहिला प्रयोग महात्मा गांधीजींनी केला, त्याला उद्या 100 वर्षे पूर्ण होत आहे, त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत “स्वच्छाग्रह – बापू को कार्यांजली – एक अभियान, एक प्रदर्शनी” या नावाच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. राष्ट्रीय संग्रहालयातर्फे आयोजित “ऑनलाईन इंटरॲक्टिव्ह क्वीझ” या प्रश्नमंजुषा उपक्रमाचेही पंतप्रधान उद्या उद्‌घाटन करतील.

या उपक्रमाबद्दल पंतप्रधानांनी ट्विटच्या मालिकेद्वारे माहिती दिली. चंपारण्य सत्याग्रह ही ऐतिहासिक लोक चळवळ होती आणि त्याचा अभूतपूर्व परिणाम दिसून आला असे सांगत पंतप्रधानांनी नागरिकांना स्वच्छाग्रही होण्याचे आणि स्वच्छ भारताची निर्मिती करण्याचे आवाहन केले.

“ऐतिहासिक चंपारण्य सत्याग्रहाचा 100 वर्षांचा महत्वाचा टप्पा ओलांडताना उद्या मी “स्वच्छाग्रह - बापू को कार्यांजली” या विशेष उपक्रमात सहभागी होणार आहे.

या उपक्रमात चंपारण्य सत्याग्रहाची झलक दाखविणारे प्रदर्शन पहायला मिळेल आणि सत्याग्रहाला स्वच्छाग्रहाशी जोडणारी आधारभूत तत्वे त्याद्वारे प्रदर्शित होतील. स्वच्छ भारताच्या निर्मितीसाठी स्वच्छ भारत मोहिमेंतर्गंत लोक चळवळ उभारताना केलेले कार्य ही या प्रदर्शनात पाहता येईल.

शतकापूर्वी भारतीयांनी सत्याग्रही होऊन वसाहतवादाविरुध्द लढा दिला होता. आज, आपण सारे स्वच्छाग्रही होऊ या आणि स्वच्छ भारताची निर्मिती करुया.

चंपारण्याचा सत्याग्रह ही बापूंच्या नेतृत्वाखालची ऐतिहासिक लोक चळवळ होती आणि त्याचा प्रभाव अभूतपूर्व होता”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Led by iPhones, ‘Made in India’ smartphone exports grow 28% y-o-y in CY25: Counterpoint

Media Coverage

Led by iPhones, ‘Made in India’ smartphone exports grow 28% y-o-y in CY25: Counterpoint
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 एप्रिल 2026
April 24, 2026

Made in India, Built for 2047: PM Modi’s Reforms Turning Rural Hope into National Strength